अनोखी गाठ २८ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, सासूबाई माहेर वरून आल्यावर कावेरीला घराबाहेर काढतात. कावेरीकडे पर्याय नसल्याने ती गोठयात रात्र काढते. रात्रभर डास आणि दुर्गंधीमुळे कावेरी आजारी पडते. दुसऱ्यादिवशी सकाळी सरस्वती ताई तिला उठवून आपल्या खोलीत नेत असताना सासूबाई येतात आणि तिला घरात घ्यायचं नाही आणि तिला घ्यायचं परत बोलीस तर तुला सुद्धा घराबाहेर जायचं. कावेरीला सरस्वती ताई असं आजारी आणि एकटी सोडू शकत नव्हत्या. त्यांनी कावेरीसोबत घर सोडले आणि कावेरीला घेऊन एका पडक्या मंदिरात आश्रय घेतला. सरस्वती ताई आपल्या परीने कावेरीची पूर्ण काळजी घेत होत्या. कावेरीची तब्बेत अजून खालावते आणि ती बेशुद्ध होते. शुद्ध येते तेव्हा कावेरी एका घरामध्ये असते. तिचा थोडा गोंधळ होतो. कावेरीचे पती महादेवराव येऊन तिला सर्व सांगतात. तिच्यासाठी सरस्वती ताई भिक्षा सुद्धा मागत होत्या हे सुद्धा त्यांनी सांगितलं. सरस्वती ताई सारखा भक्कम आधार पाहून कावेरी भावुक होते. आता पुढे............)
आजी आपली गोष्ट पुढे नेते," माझा जीव वाचला. ताईंनी माझ्यासाठी लोकांच्या घरी जाऊन भिक्षा पण मागितली. मी ताईंच्या प्रेमाच्या ऋणात होते. मी व्यवस्थित शुद्धीत आल्यावर 'ह्यांना' विचारलं. सासूबाईंनी घरातून काढलं. मी आणि ताईंनी आता कुठे राहायचं ? आणि हे घर कोणाचं आहे ? त्यावर ते म्हणाले," हे आपलंच घर आहे. आपल्या शेतातलं घर. मी घरी गेलो होतो. आई माझं ऐकायला तयार नव्हती मग मीच तुझ्या सोबत राहायचा निर्णय घेतला. शेकडा एकर मध्ये जमीन असून सुद्धा आईने फक्त दहा एकर मला देऊ केली आणि या भागात घर असल्यामुळे मी ही शेती घेतली. आता या पुढे तू, मी आणि सरस्वती वहिनी मुलांसोबत येथेच राहणार. "
त्यांच बोलणं ऐकून मी बावरले. मी त्यांना म्हणाले," अहो , तुम्ही असं केलं तर सर्व म्हणतील मी तुम्हाला घरापासून तोडलं. शिवाय तुमच्या घरच्यांपासून मला तुम्हाला तोडायचं पण नाही. मी आणि सरस्वती ताई राहू येथे. तुम्ही घरी परत जा. " त्यावर 'ते' म्हणजे," कावेरी , तू माझी पत्नी आहेस. तुझी सर्व जबाबदारी , तुझी सुरक्षा माझी आहे. त्यामुळे मी तुला सोडून जाणार नाही. दुसरं तुझी चूक नव्हती. लोक काय बोलतील? याचा विचार मी केला असता तर तू माझी पत्नी नसतीस. त्यामुळे जास्त विचार करू नकोस. आराम कर." असं बोलून ते त्याच्या कामाकरिता निघून गेले.
शेतातलं घर छोटं होतं पण छान टुमदार होतं. तीन खोल्या , एक देवघर, मोठा स्वयंपाक घर, दोन पडव्या , एक मोठा हॉल , घराच्या मागे - पुढे आंगण , घरासमोर तुळशी वृंदावन, मागच्या अंगणी विहीर आणि चौहूबाजूने बहरलेलं शेत. मन अगदी प्रसन्न झालं. दुसऱ्या दिवशी 'हे' मुलांना घेऊन आले आणि त्या घरात खऱ्या अर्थाने आमच्या संसाराला सुरुवात झाली. सरस्वती ताईचं मंदिरातून आल्यावर दार लावून बसणं बंद झालं. आम्ही गुण्यागोविदांने सर्व राहत होतो. मुलांना मी पुरेपूर प्रेम देण्याचा प्रयत्न करत होते. आता मला अभ्यास करण्यासाठी रात्र होण्याची वाट पाहावी लागत नव्हती. 'ह्यांचं ' कचेरीत जास्त काम असल्यामुळे मी शेतीकडे लक्ष द्यायचं ठरवलं. मी स्वतःहून जबाबदारी घेतेय हे पाहून ह्यांना आनंदच झाला. सरस्वती ताई सुद्धा माझ्या आणि मुलांसोबत थोडं थोडं शिकू लागल्या. 'ह्यांनी ' मला परदेशात शेती कशी करतात ? यावर काही पुस्तके आणून दिली होती. मी आणि सरस्वती ताई ते वाचत असू. त्यामुळे शेतीत कामे करताना आम्हाला बरीच मदत मिळत होती.
शेतात राहायला आल्यामुळे मुले सुद्धा परिश्रम करू लागली. शेतात कामे करू लागली. त्यामुळे त्यांना अन्नाची आणि पैशाची किंमत कळू लागली. मी आणि सरस्वती ताई घराबाहेर पडलो , ह्यांनी देखील घर सोडले. ही गोष्ट सासूबाईंच्या जिव्हारी लागली. गावात त्या आमच्याबद्दल वाईट पसरवत होत्या. मी कसं लग्न ठरलेल्या नवऱ्याला खाल्ला? माझ्यामुळे कसं त्यांना त्यांच्या मुळापासून दूर व्हावं लागलं ते गावात सांगू लागल्या. त्यामुळे गावातील लोक आमच्यासोबत नीट वागत नव्हती. पडत- धडपडत मी आणि सरस्वती ताई शेतीची काम शिकत होतो. धान्य बाजारात नेवून विकायचं काम हे करायचे , ह्यांचे देशी- परदेशी व्यापारी मित्र असल्यामुळे चांगला दर मिळून माल संपत होता. गावातील लोक आमच्यापासून लांबच राहत. पहिले २- ३ वर्षे शेती छान झाली. घर छान फुलत होतं. त्यानंतर एका वर्षी पावसाने आपला मनमानी कारभार केला आणि खूप नुकसान झालं. जेम- तेम धान्य हाताशी लागलं. शिवाय ह्यांची कचेरीची कामे असायची , त्यातून मिळणारा पैशा यामुळे ते वर्ष पार पडलं. पुन्हा पावसाने आपला लहरी स्वभाव दाखवला. आता मात्र यावर काहीतरी उपाय करणे गरजेचं झालं.
ताई आणि मी बसून यावर चर्चा केली. आमचे काही निर्णय झाले. रात्री मी आणि सरस्वती ताईंनी 'ह्यांना' सांगितले आम्हाला शेतीत काही बदल करायचे आहेत , शिवाय काही कामे काढायची आहेत. आम्ही शक्य तितका कमी खर्च होईल असा प्रयत्न करू. 'ह्यांनी' सांगितले," शेती तुम्ही करताय त्यामुळे त्यासंबंधी सर्व निर्णय तुम्हीच घ्या. पैसा लागेल तो मी माझ्याकडून शक्य तितका देईन. " ह्यांचा पाठींबा मिळाल्यावर आम्हाला हुरूप आला. मागच्या अंगणात विहीर होती पण त्याचं पाणी दहा एकर जमिनीला आम्हाला देता येत नव्हतं. त्यामुळे मी आणि ताईंनी शेताच्या मधोमध विहीर बांधायचं ठरवलं. विहीर अशी बांधायची की विहिरीच्या एका बाजूला पाच एकर आणि दुसऱ्या बाजूला पाच एकर जमीन आली पाहिजे. सुरुवातीला पैसे नसल्यामुळे ह्यांनी विहिरीचं थोडं पुढे काम करू असे सांगितले. पण आम्ही मनावर घेतलं होत त्यामुळे आम्ही सकाळी लवकर कामे उरकून स्वतःच विहीर खणायचं काम करू लागलो. शक्य तितकं काम करू लागलो.
त्यावेळी सर्व शेतकरी हंगामी पिके घेत होते. ज्वारी , बाजरी, ऊस इत्यादी. मी आणि ताईंनी बरीच शेतीविषयक पुस्तके वाचली होती , ती आता अमलात आणायची होती. ह्यांनी मला सांगितलं होत की इंग्रजांकडे माती परीक्षण करतात. मी ह्यांना सांगून आपल्या शेतातली माती परीक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवली. पुढे काही दिवसांनी मातीचं परीक्षण होऊन त्यासंबंधी पत्र आलं. त्यात मातीचा पोत, त्यात असणारी क्षार आणि खनिजांची पातळी सर्व सविस्तर सांगितलं होतं शिवाय , अश्या प्रकारच्या मातीत कोण- कोणती पिके घेऊ शकतो तेही लिहिलं होतं. आमचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून त्यांनी शेतीत लक्ष देणं कमी केलं. शिवाय सर्वच जबाबदारी आमच्यावर दिली. चूल आणि मूल याशिवाय मिळालेली ही जबाबदारी एक संधी होती ज्याचं आम्हांला सोनं करायचं होतं.
आम्ही टप्प्या- टप्प्याने पाऊले उचलायला सुरुवात केली. आम्ही काही फुलांची आणि काही फळांची रोपे आणि बिया मागवल्या. शेतात एक विशिष्ट अंतर सोडून फळ झाडे लावली आणि जमिनीच्या एका तुकडयावर फुलझाडे रोवली. विहीर खणायचं काम सुद्धा सुरु होतंच. शेतात राहायला आल्यापासून आम्हाला हे जमणार नाही- ते जमणार नाही किंवा ही तुमची कामे नाहीत असं बोलणारं कोण नव्हतं. त्यामुळे आम्ही विश्वासाचे पंख पसरले होते. आता हळू- हळू पंख फडफडवायचे आणि त्यानंतर हळू- हळू आकाशात झेप घ्यायची, एका विशिष्ठ अंतर राखून उडायचं , आकाशाचा अंदाज घ्यायचा आणि मग उंच भरारी घ्यायची असं ठरलं होतं.
विहिरीचं अर्ध्यापर्यंत काम झालं होतं. एके दिवशी मधल्या प्रहरी 'हे' घरी आले तेव्हा त्यांच्यासोबत अजून कोणीतरी होतं. आम्ही पटकन आत गेलो. 'ह्यांनी' आत आल्यावर मला आणि सरस्वती ताईंना आवाज दिला. आम्ही कधीही पुरुष पाहुण्यांसमोर गेलो नव्हतो. ह्यांनी का बाहेर बोलावलं? मी कचरतच बाहे आले. सरस्वती ताई नाही आल्या ते पाहून ह्यांनी पुन्हा ताईंना आवाज दिला. ताई बाहेर यायला संकोचत होत्या पण ह्यांनी बोलावलं तर त्यांना यावं लागलं. बाहेर एक इंग्रज माणूस आणि एक इंग्रज बाई होती. ह्यांनी बोलायला सुरुवात केली," कावेरी, सरस्वती वहिनी हे आहेत श्री. जॉन आणि ही त्यांची बहीण जुली. यांनी शेतीत बरीच प्रगती केलं आहे. आपल्या भारताच्या जमिनीत काय नवी प्रयोग करता येईल ? त्यासाठी हे आले आहेत. " मी आणि सरस्वती ताईंनी त्यांना हात जोडून नमस्कार केला. त्यांनी सुद्धा हात जोडून नमस्कार केला. जुली म्हणू लागल्या," मिसेस . कावेरी, मी चार वर्षे झाली भारतात आले आहे पण येथे शेतीविषयी फक्त पुरुषच बोलतात किंवा निर्णय घेतात. मी त्यांच्यासोबत चर्चा करायचं म्हटलं तर एका स्त्रीसोबत चर्चा करणं त्यांना अपमान वाटतो. त्यांनी आयुष्यभर शेती केली पण तरी अजून शेत नीट त्यांना कळली नाही. मी त्यांना हे सांगणं आणि त्यावर त्यांनी काम करणं तर दूरची गोष्ट आहे. मला भारतात शेतीत नवीन प्रयोग करून बघायचा आहे. पण कोणी मदत करायला तयार नाही. सकाळी महादेव राव कचेरी बाहेर भेटले. त्यांच्याशी बोलताना कळलं की तुम्ही सुद्धा शेतीत बदल करण्याचा विचार करत आहात. मला तुमच्यात सामील करून घ्याल का?"
जुलीचं मराठी ऐकून मी आणि ताई आवक झालो. वाटलं नव्हतं की एक इंग्रज स्त्री एवढी छान मराठी बोलू शकते. मला जुलीचं बोलणं ऐकून आनंद झाला. एक भक्कम हात मिळणार होता आम्हाला. मी ताईकडे पहिले ताईंनी डोळ्यांनीच मला होकार दिला. मी जुलीला हो म्हणाले आणि आमच्यासोबत आत यायला सांगितले. जुली आमचा होकार ऐकून खूप आनंदित झाली होती. मी आणि ताईंनी मिळून फराळ बनवला आणि बाहेर देऊन आलो. शेतीत काम करायचा, बदल करायचा त्यामुळे जुलीला आमच्यासोबत राहावं लागणार होतं. जुली आमच्यासोबत राहिली. आता आमच्या कामांना वेग आला होता. जुलीकडून आम्ही काही गोष्टी शिकलो ते म्हणजे, काहीही करायच्या आधी त्याचा आराखडा तयार करायचा, त्यासाठी काय काय लागणार याची यादी बनवायची, कोणती गोष्ट आधी ? कोणती नंतर करायची ? त्याच प्राधान्य ठरवायचं, सुरु केलेलं काम किती वेळात संपवायचं ? हे काम सुरु करण्यापूर्वीच ठरवायचं. एकंदरीत pre - planning मी तिच्याकडून शिकले. आम्ही विहिरीचं काम हाती घेतलं होतं पण ते आम्ही वेळ मिळेल तसं करत होतो. जुलीने ते पाहिलं तिने आम्हांला कारण विचारलं. आम्ही तिला खरी परिस्थिती सांगितली. एकतर अवजड काम , सर्व काम करून, शेती पाहून जमेल तसंच करणार ना ?"
जुलीला काय झालं माहित नाही. ती म्हणाली," कावेरी पावसाळा लवकरच सुरु होईल हे काम आपण अर्धवट नाही ठेवू शकत. अश्यावेळी दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घ्यायचा." हे ऐकून मला वाईट वाटलं मी म्हणाले" जुली तू इतर इंग्रज सारखी नाहीस असं वाटलं होतं पण तू तीच भाषा करतेस? " त्यावर जुली हसली आणि म्हणाली," कावेरी डिअर , प्रत्येक गोष्ट एकाच पद्धतीने घ्यायची नसते. तू चाणक्य नीती बद्दल वाचाल नाहीस का ? नसेल वाचाल तर मी एक प्रयोग करणार आहे तो झाला की तुला स्वतःलाच ते वाचावंसं वाटेल. दोन दिवस फक्त बघ मी काय करते. दोन दिवसात विहीर तयार असेल."
क्रमश..........
अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145
अनोखी गाठ ८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221
अनोखी गाठ ९ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331
अनोखी गाठ भाग १०
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468
अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943
अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979
अनोखी गाठ १३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010
अनोखी गाठ भाग १४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049
अनोखी गाठ भाग १५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090
अनोखी गाठ भाग १६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128
अनोखी गाठ भाग १७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183
अनोखी गाठ भाग १८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220
अनोखी गाठ भाग १९ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727
अनोखी गाठ भाग २० #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806
अनोखी गाठ भाग २१ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882
अनोखी गाठ भाग २२ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-bhag-22-----marathi-kadambari-_7930
अनोखी गाठ भाग २३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-23----marathi-kadambari-_7945
अनोखी गाठ भाग २४ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-24---marathi--kadambari_7973
अनोखी गाठ भाग २५ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-25---marathi--kadambari_8004
अनोखी गाठ भाग २६ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-26---marathi--kadambari_8119
अनोखी गाठ भाग २७ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-27--marathi--kadambari_8164
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा