अनोखी गाठ ९     मराठी कादंबरी

---------------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील


समीरा मनात नसताना सोहळ्यासाठी तयार होऊन स्वाती आणि जानकीसोबत निघते. आजी आधीच सोहळ्यासाठी गेल्याने तिघींही गाडीतून जाताना जानकी आणि स्वातीची थट्टा - मस्करी सुरु होती तर समीरा मात्र डेव्हिड बद्दल समजल्यापासून उदास होती. आपलं नक्की कुठे आणि काय चुकलं याचाच विचार समीरा करत होती.

गाडी सोहळ्याच्या ठिकाणी पोहचली. समीरा आणि जानकीला वाटलं होतं की गाव टाईप काहीतरी जमवाजमवीची सभा असेल पण तिथे पोहचल्यावर पाहतात तर खूप मोठं आयोजन होतं. मोठा सभा मंडप,चारी बाजूने फुले आणि लाईटची तोरणे, प्रवेश दाराजवळ मोठ्या मोठ्या रांगोळ्या, जवळ जवळ ७ ते ८ गावाचे लोक. हे सर्व पाहून दोघींना नक्की काय चालू आहे कळत नव्हतं.

समीरा आणि जानकी स्वातीला विचारतात की, नक्की काय आहे इथे? एवढं मोठं आयोजन कशासाठी आहे? स्वाती हसून म्हणते, " थोडा वेळ थांबा काय आहे ते कळेलच. " स्वाती दोघींना घेऊन आत जाते. आत मध्ये पाहिल्या दोन VIP ओळींमध्ये स्वाती त्यांना घेऊन जाते. तिथे आजी आधीच बसली होती. आजी हात वरून करून तिघींना बोलवते आणि तिघींही आजीजवळ जावून बसतात.

नक्की काय सोहळा आहे? आपण VIP लाईन मध्ये कसे? काय चालू आहे समीरा आणि जानकी दोघीनाहीं काही कळत नव्हतं. आजी आणि स्वातीच्या चेहऱ्यावर मात्र एक मोठा आनंद नक्कीच दिसत होता. सोहळ्याचा आरंभ होतो. गणपतीस्तवन, पाहुण्यांचे आगमन, काही गीत असा कार्यक्रम होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते.

सूत्रसंचालन करणाऱ्याने बोलायला सुरुवात केली आणि जानकी समीरा चकित होऊन समोर होणारा प्रसंग पाहत होत्या. सूत्रसंचालन करणारा, " आज हा सोहळा कशासाठी आयोजित केला आहे, हे उपस्थित सर्वांना माहीतच आहे. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रम सुरु करू. इनामदार घराण्याचं नाव कायमच सन्मान आणि अदबीने घेतलं जातं. कावेरी आजी तर सर्वांची हक्काची आजी. कोणाला काहीही अडलं तरी कावेरी आजी आहेच. आजीने या गावात शेतीमध्ये एक आगळी वेगळी क्रांती आणली आणि आज त्यांच्या पंतूने म्हणजेच ' अभिषेक सरदेशमुख ' याने आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत जवळ जवळ सर्वच शेतकऱ्यांची मदत होईल असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. इंजिनीरिंगचं शिक्षण झाल्यावर शहरात जावून खोऱ्याने पैसे कमवायची संधी असताना आपल्या सर्वांसाठी, शेतकऱ्यांसाठी मेहनत घेतली. अभिषेक सरदेशमुख एक प्रगत शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या पणजी आजीप्रमाणेच स्वतः पुरता विचार न करता सर्व शेतकरी बांधवांसाठी विचार केला. त्यांनी एक असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की त्यामुळे २ एकर जमिनीतसुद्धा ६ एकरचं पीक घेता येईल. शिवाय नैसर्गिक आणि कृत्रिम संकट सर्वांशी सामना करता येईल. त्याबाबत कार्यशाळा घेतली जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा वापर कसा करायचा याचं शिक्षण दिलं जाईल. या आनंदात आजूबाजूच्या शक्य तितके शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांचे आभार. मी या मंचावर कावेरी इनामदार आजींना आमंत्रित करतो. त्यानी येवून आपल्या ( पंतू ) नातवाचा 'अभिषेक सरदेशमुख' यांचा शेतकरी संघटनेतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करावा अशी विनंती करतो. "

समीरा आणि जानकी मात्र आजीचा आता हा कोण नातू? जो आम्हाला माहित नाही? शिवाय येवून दोन - तीन दिवस झाले याचं नावही आपण ऐकलं नाही. आजी मंच्याकडे जाताना दोघींही सन्मानासाठी नक्की कोण येतंय याची उत्सुकतेने वाट पहात होत्या. जानकी आणि समीराची नजर चारी बाजूला भिरभिरत होती. हा नक्की कोण? याची दोघीनाहीं उत्सुकता होती. टाळ्यांच्या कडकडाटात मुख्य प्रवेश द्वारातून 'अभिषेक सरदेशमुख ' याची एन्ट्री होते आणि समीरा - जानकी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहतात.

हा तोच तरुण होता जो त्यांना एअरपोर्टवर घ्यायला आला होता, हा तोच होता ज्या त्यांनी त्याचं सामान उचलायला लावलं, हा तोच होता ज्या त्या घरचा नोकर समजत होत्या. दोघींसाठी हा खूप मोठा धक्का होता. अभिषेक मंचावर गेला आणि आजीच्या हातून त्याने पुरस्कार घेतला. सूत्रसंचालकांनी कावेरी आजीला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. आजी बोलू लागल्या, " मला माझ्या पंतूवर गर्व आहे. त्याने फक्त स्वतःचा विचार न करता सर्वांसाठी विचार केला. पूर्वी ' वासुदेव कुटुंबकमः ' पद्धती असायची आणि तिचं एक पिढी दुसऱ्या पिढीला द्यायची. आज जवळ जवळ सर्वच जण आपापला विचार करतात. अश्यावेळी माझ्या पंतुने आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकले आणि पुन्हा एकदा ' वासुदेव कुटुंबकम : ' चा श्रीगणेशा केला आहे. आपण एकमेकांच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही. तेव्हा सर्वांनी मनापासून आपल्या घरचं समजून एकमेकांना मदत करावी आणि या धरतीला परत एकदा सुजलम, सुफलम करण्यासाठी हात पुढे करावा. " असे म्हणून आजी माईक अभिषेकच्या हाती देते. सूत्रसंचालक आता अभिषेकला दोन शब्द बोलण्याची विनंती करतात. अभिषेक हातात माईक घेऊन सुरुवात करतो, " जमिनीत बी रुजल्याशिवाय रोप येतं नाही. तसेच हा विचार माझ्या पणजी आजीने माझ्या मनात रुजवला, त्याला वेळोवेळी योग्य ते खत - पाणी घातलं. त्यामुळे आज मी हे करू शकलो. आजी तुझी मदत मला आणि सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना कायम लागणार आहे. " असं म्हणून तो खाली उतरतो.
उपस्थित मान्यवर देखील अभिषेकचं कौतुक करतात. सोहळा छान पार पडतो. सर्वजण घरी निघतात.

घरी पोहचल्यावर सर्वजण जेवून झोपायला आपापल्या खोलीत निघून जातात. मात्र जानकी आणि समीरा अजून खाली घुटमळत होत्या. अभिषेक शेतातील मोटार बंद करायला गेला होता. जानकी आणि समीरा त्याची वाट पाहत होत्या. कार्यक्रमाच्या धावपळीत जानकी खूप थकली होती. ती समीराला म्हणते, " ताई, मी जाते झोपायला. अभिषेक आला की त्याला माझ्याकडून पण सॉरी बोल. " त्यावर समीरा म्हणते, " थांब ना थोडा वेळ येईलचं तो एवढ्यात. मी एकटी कसं बोलू त्याच्याशी.? "
" ताई एक काम कर तू तुझ्या वाटणीच सॉरी बोल, माझं राहू दे, मी सकाळी बोलेन पण मला आता खूप झोप आलीये मी जाते बाय.... " जानकी एवढं बोलून समीराचं काहीही न ऐकता झोपायला निघूनही जाते.

अभिषेक रात्री आत येतो. पाहतो तर समीरा अंगणाबाजूच्या ओट्यावर बसून चंद्र पाहण्यात गर्क होती. तिच्या चेहऱ्यावर अभिषेकला एक नाराजी आणि दुःखाची लकेर स्वच्छ दिसत होती. अभिषेक हळूच तिच्या बाजूला जातो आणि तिला ' भो ' करतो. समीरा दचकते आणि अभिषेक हसू दाबत मागे सरकतो. समीरा त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करते. ते पाहून अभिषेक म्हणतो, " मला वाटलं तू माझ्यावर ओरडशील. पण तू तर हसतेस. शी बाबा तू तर मूडचं घालवलास. " समीरा मात्र शांत असते. अभिषेकला तिच्या वागण्यातला बदल कळत होता.समीरा विचारते, " तू आजीचा पंतू आहेस, म्हणजे नक्की कोण मला अजून नाही कळलं. "
अभिषेक हसत म्हणतो, " म्हणजे तुझे बाबा माझे मामा लागतात आणि माझी आई तुझी आत्या. कळलं का? "
" हो पण मग आत्या कुठे आहे? " समीरा.
" आपल्या दुसऱ्या घरी. " अभिषेक.
" दुसऱ्या घरी म्हणजे? " समीरा.
" अगं हे माझं आजोळ आहे. आई तिच्या सासरी म्हणजे माझ्या बाबासोबत तिच्या सासरी आहे. मी माझं शेतीवरच संशोधन आणि त्याचं संबंधी कामासाठी आजीकडे थांबलो आहे. आजी खूप हूशार आहे. प्रॉब्लेमस चुटकी सरशी सोडवते. म्हणून मी इथे आई पण येईल पुढच्या आठवड्यात.

समीरा त्याकडे पाहते आणि म्हणते, " आम्हाला माफ कर अभिषेक. आम्हाला माहित नव्हतं की तू या घरातला एक मेंबर आहेस. मला वाटलं की... म्हणजे तुझं वागणं, जनावरासोबत राहणं, नेहमी काही ना काही सारखं काम करत असायचास म्हणून माझा आणि जानकीचा गैरसमज झाला होता. सॉरी... "
" इट्स ओके, मॅडम... चालायचंच... मला रिकामं बसायला आवडतच नाही त्यामुळे समोर दिसेल ते काम करतो त्यामुळे तुमचा गैरसमज होणं साहजिकच आहे. " अभिषेक म्हणतो.
समीरा अजूनही चंद्रकडे एकटक बघत असते. अभिषेक समीराला विचारतो, " काय पाहतेयस त्या चंद्रात? "
समीरा, " हा चंद्र ना मी खूप वेळा पाहिलाय पण कधी एवढा थंडावा, एवढी शांती नाही मिळाली जी आज वाटतेय.

अभिषेक पण त्या चंद्रकडे पाहत समीराला म्हणतो, " कसं आहे ना देव समोर सगळ्यांच्याच असतो पण तो दिसतो फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला. तसंच आपल्याकडेच, आपल्या मनातच सुख, दुःख, शांती, समाधान सर्वच असतं. फक्त आपण ते बाहेरील परिस्थितीवरून ठरवतो. अमेरिकेत चंद्र फक्त एक ग्रह आहे पण भारतात चंद्र एक ग्रह, एक देव, एक भाऊ, एक मामा, एक सोबती, एक साक्षीदार, एक वाटाड्या, प्रेमाचा रंग खुलवणारा, त्यावर कविता करतात, त्याला पाहून भारतात अनेक ठिकाणी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात, भारतीय सिनेमा तर चंद्रशिवाय अपूर्णच आहे असं समज. मग तूच सांग भारतीय एवढे त्या चंद्राशी इमोशनली जोडले गेले आहेत तर तुझ्यावर पण प्रभाव पडणारच ना? " अभिषेक हसत म्हणतो.

समीरा त्याला एक स्मित हसू देते आणि म्हणते, " खूप रात्र झाली आहे. मी जावून झोपते. तू पण झोप आज थकला अशील ना? गुड नाईट.. "
अभिषेक मानेनेच होकार देतो. समीरा आपल्या खोलीत निघून जाते. इकडे मात्र अभिषेकच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. समीराच्या वागण्यात नक्कीच बद्दल झाला होता. त्याला भेटलेली समीरा थोडी चिडचिडी पण बोलकी होती. मी नोकर नाही ही गोष्ट तर तिला आज कळली मग काल तिने अचानक मारलेली मिठी. तिच्या बोलण्यात, वागण्यात एक वेदना जाणवत होती. समीराला काही प्रॉब्लेम आहे का? कसलं टेन्शन? ती आल्यापासून तरी तसं काही नव्हतं. कालपासून काहीतरी बिनसल आहे. नक्की काय?  अनेक विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजत. पण काहीही करून समीराचा नक्की काय झालंय ते शोधून काढायचं असं अभिषेक ठरवतो.  

समीरा आपल्या रूम मध्ये येते पण तिच्या डोक्यात डेव्हिड तिच्याशी जे वागला तेच फिरत होतं. तो माझ्याशी असं का वागला? त्याने मला लिव इन मध्ये राहू सांगितलं आणि स्वतः लग्न करतोय? त्याने मला आधीच स्पष्ट नाही म्हणून का नाही सांगितलं? कितीही झालं तरी मॉम - डॅडला हे पटण्यासारखं नव्हतं. कितीही झालं तरी ते भारतीयचं ना. तरीसुद्धा माझ्या आनंदासाठी ते काहीही बोलले नाही. समजूनच घेतलं आणि आपण डेव्हिडला समजू शकलो नाही. कुठे आजीच्या स्वप्नासाठी शहरातील संधीना लाथ मारणारा अभिषेक आणि कुठे स्वतःच्या आनंदासाठी मॉम - डॅडला दुखावणारी मी.या विचारांमध्येच तिला रात्री केव्हातरी झोप लागली.
सकाळी स्वाती येवून दार वाजवत होती. त्याने दोघींची झोप मोडली. समीराने जावून दार उघडले. स्वाती बाहेरूनच म्हणाली, " समीरा - जानकी लवकर तयार व्हा. अभी दादा आपल्याला सिहंगडावर फिरायला नेतोय. आवरा लवकर.. " त्यावर जानकी वैतागत म्हणते, "अगं पण आता तर फक्त ४ वाजले आहेत. "" तुम्हाला १ तास तयार व्हयला जाईल. आपल्याला ५ वाजता निघायचं आहे. त्यानंतर गेलो तर मज्जा नाही येणार. म्हणून उठा आणि लगेच तयार व्हा. " असं म्हणून स्वाती निघून जाते.......


क्रमश...

🎭 Series Post

View all