अनोखी गाठ ५   मराठी कादंबरी

-------------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986


अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

श्रावणी रश्मीचा निरोप घेऊन मंदिरातून निघाली. आता तिला माहित होत की तिला नक्की काय करायचं आहे. श्रावणी घरी पोहचली तेव्हा भालचंद्र गॅलरीमध्ये हताश आणि कुठेतरी हरवल्यासारखा बसला होता. श्रावणी मागून भालचंद्रला पाहत होती आणि विचार करत होती की ,' हा तोच माणूस आहे ना ? ज्याने त्याकाळी सुद्धा घरच्यांचा विरोध पत्करून यश आणि प्रगतीसाठी मुंबई गाठली होती? हा तोच आहे ना ज्याने वाडवडिलांपासूनची संपत्ती आणि व्यवसायात रस न घेता स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी न थांबता मेहनत घेतली ? हा नक्की तोच आहे ना, ज्याने यशश्री खेचून आणली ? आज तोच आपल्या मुलीने दिलेल्या धक्यातून सावरता सावरत नाहीये ? एवढ्या ठेचा लागल्या पण कधी थांबला नाही आणि आज आपल्या लेकीचे बोल ऐकून चक्कर येऊन पडला ? '

श्रावणीला आता एकावेळी अनेक परिस्थितीशी सामना करायचा होता. ती बाहेर बागेत आली आणि तिने गावी कावेरी आजीला फोन लावला. कावेरीने सर्व परिस्थिती आजीला सांगितली. आजीने श्रावणीला "माझ्याकडे पाठव तिला , पुढे मी काय ते बघते. आणि याबद्दल तू माझ्याशी बोललीस इतर कोणालाही काहीही सांगू नकोस." असं सांगितले. आजीचं बोलणं ऐकून श्रावणीला धीर आला. रश्मीने जेव्हा मंदिरात श्रावणीला सांगितलं की," मुलांना नीट समजावता आलं पाहिजे ." त्याच वेळी श्रावणीसमोर आजीचा चेहरा आला तिच्या लक्षात आलं की या परिस्थितीतून कावेरी आजीचं आपल्याला बाहेर काढू शकतात आणि समीराला समजावू शकतात. 

श्रावणी आजीशी बोलल्यावर आत येते आणि भालचंद्रच्या बाजूला जाऊन बसते. भालचंद्र उदास नजरेने श्रावणीकडे पाहतो आणि म्हणतो," यश आणि प्रगतीच्या धुंदीत माझ्याकडून घराकडे दुर्लक्ष झालं का गं श्रावणी ? मी कमी पडलो का ? माझ्याच मुलीने मला आज अश्याप्रकारे खडबडून जागं केलंय. माझ्या चुका सुधारण्यापलीकडे गेल्या आहेत का ? मी तुझं ऐकायला हवं होतं. अधूनमधून वेळ काढून गावी , भारतात जायला हवं होतं. " भालचंद्रच्या डोळ्यात आता पाणी आलं होतं. श्रावणीला भालचंद्रची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटत. श्रावणी म्हणते, " तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. मी सुद्धा कमी पडलेच ना ? पण आता असं हताश होऊन बसण्याने काही होणार नाही. आपल्या मुलीला यातून आपणच बाहेर काढायला हवं. "   भालचंद्र म्हणतो , " कसं काढणार बाहेर ? ती इथे जन्मली, इथेच वाढली. हा विचार कसा काढणार आपण तिच्या डोक्यातून ?" 

" आपण नाही काढणार , कावेरी आजी काढणार आहे त्यांच्या पद्धतीने ." श्रावणी. 

" काय ? आजी काढणार हा विचार तिच्या डोक्यातून ? आजीला कसं माहित ? " भालचंद्र 

" मी आजीला फोन केला होता. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही परिस्थिती तुमच्याकडून किंवा माझ्याकडून हाताळणं शक्य नाही. ते कावेरी आजीचं करू शकतात. आजीशी माझं बोलणं झालं आहे. आजीने आपल्याला फक्त समीराला तिकडे पाठवायला सांगितलं आहे. बस ..."  श्रावणी.

श्रावणीच बोलणं ऐकून भालचंद्रला बरं वाटत. त्याच्या मनाला एक उभारी मिळते. श्रावणी पुढे बोलते, " आता आपल्याला एकच करायचं आहे , ते म्हणजे समीराला काहीही करून गावी पाठवायचं. त्यासाठी तिला आपण तिच्या निर्णयाशी सहमत आहोत हे सांगावं लागेल. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते ?  " श्रावणी.  भालचंद्र होकारार्थी मान हलवतो. 

थोडयावेळाने समीरा आणि जेनी आत येतात आणि भालचंद्राच्या बाजूला बसतात. समीरा बाबांच्या डोक्यावर आणि मानेला हात लावते आणि विचारते , " डॅड , तुला काय झालंय ? बरं नाही वाटत का ? " समीराने केलेली चौकशीने आणि आपल्या मुलीचा आपल्यावर किती जीव आहे हे पाहून भालचंद्रच्या डोळ्यात पाणी येतं पण तो स्वतःला सावरतो. त्याला माहित असतं , ' आपली लेक मनाने पक्की भारतीय आहे , ते रक्तात असतं पण या वातावरणात तिला ती जे करतेय ते योग्य वाटत होतं. भालचंद्र तिला म्हणतो, "असं का विचारतेयस बेटा ?" त्यावर समीरा म्हणते , " डॅड , मी आणि जेनी बाहेर गेलो होतो. परत आलो तेव्हा कळलं की डॉक्टर अंकल येऊन तुला बघून गेलेत. काय झालंय डॅड ?"   त्यावर भालचंद्र म्हणतो , " काय नाही बाळा फक्त जरासं गरगरत होतं. या कामाच्या व्यापात जेवणाचा टाइम टेबल नसतो ना ? त्यामुळे थोडा अशक्तपणा आलाय बस. डॉक्टर आता औषध देऊन गेलेत दोन दिवस आराम केला की मी ठीक होईन." 

" काय रे डॅड काळजी घेत जा ना स्वतःची. तू माझा पहिला वाहिला हिरो आहेस. " समीरा. हे ऐकून श्रावणीला सुद्धा बरं वाटतं. भालचंद्र म्हणतो, " ok , done . यापुढे मी माझी नीट काळजी घेईन बस्स ..? हे ऐकून सॅम आणि जेनीच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. भालचंद्र पुढे बोलतो, " तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. " सरप्राईज ऐकून दोघीनांही आनंद होतो. दोघी एकदम विचारतात, " काय आहे डॅड सांग ना पटकन. " त्यावर भालचंद्र म्हणतो, " तुम्हा दोघींसाठी भारताची टूर प्लॅन करतोय मी. "  " काय ? इंडिया ? डॅड इंडिया मध्ये काय आहे बघण्यासारखं ? आम्हाला नाही जायचं. तू दुसरीकडे कुठेतरी टूर प्लॅन कर प्लिज ." दोघीही एकदम म्हणतात. 

"बाळांनो , मी जन्मलो आणि वाढलो आहे तिथे मला माहित आहे , तिथे खूप काही आहे बघण्यासारखं. शिवाय तुम्ही आपल्या सर्व फॅमिलीला सुद्धा भेटाल. तुला माहित आहे माझी आजी खूप छान पुरणपोळी बनवते. जाऊन थोडे दिवस राहा. नाहीच आवडलं तर परत या. " 

" डॅड, तुझी आजी म्हणजे आमची ग्रेट ग्रँड मदर ना ? " जेनी उत्साहाने म्हणाली. 

" हो " भालचंद्र. 

" एक मिनिट , जेनी, तू तयार झालीस की काय इंडियात जायला ? सॅम. 

" हो " जेनी. 

" no way डॅड , मी नाही जाणार. " सॅम.

" बाळा , आम्ही तुमच्या सर्व गोष्टी मानतो, मग तू आमची एक गोष्ट नाही मानू शकत का?" श्रावणी. 

" आम्हाला सुद्धा बोलतात, दोन मुली आहेत तुम्हाला कधी दाखवलं पण नाही. आपलं स्वतःच आणि हक्काचं घर कधी त्या मुलींना दाखव नाही. आपल्या लोकात कधी आणलं नाही. वाईट वाटत बाळा, मला सुद्धा आणि त्यांना सुद्धा. सो प्लिज , थोडे दिवस जा, आणि डॅड म्हणते तसे , जर नाही आवडलं तर या परत. " श्रावणी. 

सॅम विचार करते. तिला मॉम - डॅडचं मन मोडवत नाही आणि ती जायला तयार होते. गावी प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे उद्या आपण शॉपिंगला जायचं आहे असं श्रावणी म्हणते. दोघीही हो म्हणतात. सॅम गावी जायला तयार झाली त्यामुळे श्रावणी आणि भालचंद्रला बरं वाटत. संध्याकाळी भालचंद्र श्रावणीला म्हणतो, " आपण सुद्धा जायचं का गावी आपण पण खूप वर्षात गेलो नाहीये." त्यावर श्रावणी म्हणते, " नाही, आपण नाही जायचं, त्या दोघीना जाऊ देत. आपण सोबत गेलो तर त्या आपल्या पाठीच राहतील. त्यांना सगळं समजून गेट येणार नाही शिवाय थोडं काही झालं तर परत जाऊया म्हणून तगादा लावतील ते वेगळा. त्यापेक्षा त्यांचं जाऊ दे. आजीला पण नीट बोलता येईल. हवं तर आपण त्यांना परत आणायला जाऊयात. " भालचंद्रला श्रावणीच बोलणं पटतं. 

दुसऱ्या दिवशी तिघीजणी खुप खूप शॉपिंग करतात आणि मज्जा करतात. संध्याकाळी सॅम , जेनी आणि श्रावणी गिफ्ट पॅकिंग करत असतात. गंमत - जंमत करत आणि हौसेने हे सर्व सुरु होतं भालचंद्रला हे पाहून खूप छान वाटत होत. भालचंद्र सॅम आणि जेनीला आपल्या जवळ बोलावतात आणि बोलू लागतात, " बाळांनो, तुम्ही आपल्या गावी जात आहात तेव्हा काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत आणि काही दिवस तुम्ही सुद्धा त्या पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे तुमचे कपडे. अमेरिका आणि इंडिया यात आजही खूप फरक आहे. मान्य आहे बदल होत आहेत पण आजही इंडिया इंडियाचं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही पंजाबी ड्रेस कुवा साडी नेसून फिरा पण अंगभर कपडे घाला जीन्स - टॉप चालेल पण पूर्ण. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो सर्वांशी प्रेमाने राहा मला हे आवडत नाही, मला याची सवय नाही, मी खात नाही असं करू नका. थोडया दिवसांचा प्रश्न आहे. आणि तिथली चव पण घ्या. आणि तिसरी पण महत्वाची गोष्ट सॅम तू लिव इन मध्ये राहणार आहेस हे तिथे कोणालाही सांगू नकोस. तिथे हे पचण्यासारखं नाहीये बाळा. इथे आणि तिथे खूप फरक आहे. त्यामुळे जा मज्जा करा आणि थोडे दिवस राहून या. " 

डॅडचं बोलणं पटलं नसलं तरी 'आपल्याला कुठे तिथे कायमच राहायचं आहे ?'  हा विचार करून सॅम आणि जेनी जायला तयार होतात. एरपोर्टला निघेपर्यंत श्रावणी काही ना काही देत होती. एवढ्या बॅग्स बघून जेनी म्हणते, " मॉम पूर्ण अमेरिका देणार आहेस का ? एवढं सामान एरपोर्टला नाही नेऊ देणार प्लिज बस्स कर सामान देणं. काही राहिलाच तर आम्ही एरपोर्टला उतरून घेऊ."  श्रावणी आणि भालचंद्र दोघीना सोडायला एरपोर्टला येतात. श्रावणी दोघीनांही काही सूचना देत असते. एरपोर्टला त्या दोघीना घ्यायला कोणाला तरी आजी पाठवेल नीट जा असं श्रावणी सांगते. भालचंद्र आणि श्रावणी देवाकडे प्रार्थना करतात की ज्यासाठी मुलींना पाठवतोय ते व्यवस्थित होऊ दे.  काही क्षणात विमान आकाशात झेपावत.

सॅम आणि जेनीला विमान प्रवास नवीन नव्हता म्हणून श्रावणी आणि भालचंद्र निर्धास्त होते. विमानात  दोघी बहिणी मज्जा मस्ती करत जातात. अमेरिका ते मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्ट वरून कोल्हापूर एअरपोर्ट ( छत्रपती राजाराम महाराज एअरपोर्ट ) असा प्रवास होता. मुंबईवरून कोल्हापूर एअरपोर्ट जाणाऱ्या विमानाला अवकाश असल्यामुळे दोघी बहिणी एरपोर्टवर काही शॉपिंग करतात. काही वेळाने दोघीही पुन्हा विमानाने कोल्हापूरला निघतात.  इंडिया मध्ये अनुभव नक्कीच कसा असेल असा विचार सॅम च्या डोक्यात येतो. या विचारात विमान कोल्हापूर एरपोर्टला उतरत. त्यावेळी सकाळचे ३: ३० वाजले होते. सॅमला विमानातून उतरणारे लोक सोडले तर सर्व सामसूमच वाटत होतं. 'नक्की आपल्याला घ्यायला कोणी आलं असेल की नाही.' सॅम आणि जेनी दोघी एरपोर्टच्या बाहेर पडल्या. आजूबाजूला पाहिलं तर कोणी दिसत नव्हतं शिवाय त्यांच्याकडे आजीचा फोन नंबर असला तरी तिच्या फोन वरून आजीला फोन लागला नसता. कारण इंडियन सिम कार्ड त्यांनी अजून घेतला नव्हता. 

दोघी आजूबाजूला काही गाडी मिळतेय का ते पाहत होत्या. तेवढ्यात त्यांची नजर एका गाडीकडे गेली त्यावर एक तरुण बसला होता. कुरळे केस, रुबाबदार दाढी - मिशी, सावळा रंग, शरीराने पहिलवान अगदी तरणा ताठा. त्याच्या हातात एक पोस्टर होतं त्यावर लिहलं होतं. " समीरा  आणि जानकी."  ते पाहून सॅम जेनीला खुणावते. सॅम आणि जेनी तिथे जातात. त्यांना पाहून तो तरुण त्यांना विचारतो , " तुम्हीच समीरा आणि जानकी आहात का ? " त्यावर त्या हो म्हणतात. तो तरुण गाडीवरून खाली उतरतो आणि गाडीत बसायला सांगतो. त्यावर सॅम त्याला त्यांचं सामान गाडीत ठेवायला सांगते. तो तरुण वळून सॅमकडे बघतो. एक स्मितहास्य करतो आणि सामान उचलून गाडीत ठेवतो, आणि गाडी सुरु होते. 

क्रमश ......................

🎭 Series Post

View all