अनोखी गाठ ६ मराठी कादंबरी

---------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

सकाळी ३.३० वाजता गाडी शांत रस्त्यावरून जात होती. दुतर्फा झाडे डोलत होती. थंड हवा, मन प्रसन्न करणारं वातावरण. सॅम आणि जेनी ने असं वातावरण याआधी कधी अनुभवलं नव्हतं. लेट नाईट पार्टी वगैरे मुळे रात्र जगवल्या पण पार्टी, मस्ती, लाऊड मुझिक यामुळे रात्र इतकी सुंदर, शांत आणि समाधान देऊन जाणारी असेल असं कधी वाटलंच नव्हतं. मन आज या क्षणाला खूप स्थिर होतं तिचं.

सकाळी ५ च्या सुमारास गाडी घराजवळ येवून थांबली. मोठा वाडा, मागे -पुढे भलं मोठं अंगण अंगणात फुलांसोबतच फळांचीही झाडे होती. सर्वजण उठले होते. सॅम आणि जेनी घरात जाणार तोच त्या तरुणाने दोघीना हातानेच अडवलं. ते पाहून सॅमला राग येतो. तो तरुण हाताने दुसरीकडे इशारा करतो. घरातून गाडीचा आवाज ऐकून कावेरी आजी हातात आरतीचं ताट घेऊन बाहेर येतात.

हातात ताट पाहून सॅम आणि जेनीला वेगळं वाटतं. त्यांच्या लहानपणी त्यांच्या बर्थडेला त्यांची मॉम म्हणजेच श्रावणी त्यांना ओवाळायची. पण पुढे पुढे त्या दोघीही टाळाटाळ करायच्या म्हणून ते पुढे बंद झालं. आज पुन्हा ते पाहून सॅम आणि जेनीला असं वाटलं की मॉम सारखं पुन्हा इथे तेच होणार.

आजीने दोघीना ओवाळलं आणि पायावर पाणी ओतलं. आत आल्यावर त्यांनी पाहिलं की चारी बाजूने वाडा आहे आणि मध्ये वेगवेगळी फुलझाडे आहेत, कढीपत्ता आणि लिंबाच झाडही आहे. त्यामुळे वाड्यात एकप्रकारचा सुगंध सतत दरवळत आहे. अमेरिकेत अश्या सुंगधासाठी एअरफ्रेशनर वापरतात, त्यासाठी दर महिन्याला बरेच पैसेही मोजावे लागतात.

आजीने दोघींच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. कधी नव्हे तो त्या दोघीनाही त्या स्पर्शातली माया कळली. आजीने त्यांच्या घरच्या घरगडीला आवाज दिला, " गणप्पा, आपल्या मुलींचं सामान त्यांच्या खोलीत आत ठेव. " त्यावर सॅम मागून आत येणाऱ्या त्या तरुणाकडे बघून म्हणते, " आजी, त्यांना का त्रास देतेस? याला सांग ना. " आजी नवलाने तिच्याकडे पाहत म्हणते, " तो कशाला गणप्पा ठेवेल ना? " त्यावर तो तरुण हसत म्हणतो, " असू दे आजी ठेवतो मी आणि त्यांना त्यांची रूम पण दाखवतो."

तो तरुण दोघीना त्याच्या मागे यायला सांगतो. तो तरुण त्यांना त्यांच्या रूमपर्यंत घेऊन जातो आणि सामान आत ठेवून निघून जातो. जेमतेम ५.३० वाजले होते म्हणून सॅम आणि जेनी झोपी जातात आणि महत्वाचं म्हणजे आज ac शिवाय त्यांना गाढ झोप लागते.

१० च्या सुमारास दरवाजावर थाप पडते आणि सॅम - जेनीची सुखाची झोप मोडते. सॅमच्या लक्षात येतं की ती इंडियात आहे. दरवाजा उघडते तर समोर गणप्पा असतो. तो म्हणतो, " ताई साहेब तुम्हाला आणि जानकी ताई साहेबांना नाश्ता करण्यासाठी खाली बोलावलं आहे.

जेनी आणि सॅम खाली जातात. जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो. आजी दोघीना आवाज देतात आणि म्हणतात, " समीरा - जेनी, बाळांनो तयार व्हावा, नाश्ता करा आणि मग जावून आराम करा. लांबचा प्रवास करून आलात दमला असाल. पण पोटभर खाऊनच आराम करा. " त्यावर सॅम म्हणते, " आजी आधी आम्हाला अंघोळ करायची आहे. " त्यावर आजी म्हणते, " हो, हो बाळ करा ना. तोपर्यंत मी तुमच्यासाठी ताज दूध धार काढायला लावते." आजी आवाज देतात, " स्वाती ".

आजीचा आवाज ऐकून स्वयंपाक घरात असलेली स्वाती बाहेर येते आणि सॅमकडे बघून स्मिथहास्य करते. आजी म्हणते," जानकी - समीरा, ही स्वाती, तुमची छोटी चुलत बहीण. ही तुम्हाला न्हानीघर दाखवेल. " असं म्हणून आजी आपल्या कामाला जातात.

स्वाती त्यांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला येते. सॅम विचारते अगं बाथरूम कुठे आहे? स्वाती एकीकडे बोट दाखवते. ते पाहून सॅम आणि जेनीला काय बोलावं ते कळत नसतं. कारण समोर एक चार भिंतीचं न्हानीघर असतं ज्याला कौलरू छप्पर असतं. अश्या बाथरूम मध्ये कधी अंघोळ करावी लागेल असं तिला वाटलंच नव्हतं. पण मॉमने सांगितलं होतं,'कोणाला दुखवू नका, थोडं  अड्जस्ट करा.' म्हणून काहीही न बोलता आत जाते.

न्हणीघरात आत जाते तर तिला ते खूप छान वाटतं. न्हानीघर प्रशस्त होते. आजूबाजूला मातीचे रांजन पाण्याने भरले होते. एक पितळची गरम पाण्याची बादली होती. न्हनिघरच्या छप्पराचे दोन कौल काढून त्याजागी काच लावली होती, त्यामुळे सुंदर सूर्यप्रकाश आत डोकावत होता. बाजूच्या झरोखा होता त्यावर पडदा. मस्तानी हवा आत बाहेर बगडत होती. बाजूला छान सुंगधित उठणं आणि शिकाकाई - रिठा पेस्ट ठेवली होती.

सॅम अंघोळीला बसली आणि त्या नॅचरल गोष्टी पहिल्यांदा हाताळत होती. गरम पाण्याच्या बादलीत कडूलिंबाची पाने होती. अंगावरून पाणी घेताना, उठणं लावताना तिला खूप प्रफुल्लीत वाटतं होतं. तो सुंगध तिला फ्रेशनर देत होता. आज खूप छान आणि प्रसन्न वाटतं होतं अंघोळ करून. तिने बाहेर येवून केस पुसत होती. तिला जाणवलं आपण हजारो रुपये देऊन हेअर स्पा करून घेतो पण आज फक्त शिकाकाई आणि रिठा त्याचा वापराने तिच्या केसात एक प्रकारचा समूथनेस आला आहे.

सॅम - जेनी अंघोळ करून येतात. स्वाती त्यांना गरम गरम दूध आणि थालीपीठ देते. सॅम स्वातीला विचारते, " स्वाती तू नाही बसत का आमच्यासोबत नाश्ता करायला? " त्यावर स्वाती म्हणते, " समीरा ताई अगं माझा नाश्ता कधीच झाला आहे. तुम्ही जेवा. " तेवढ्यात समोरून तोच तरुण येताना दिसतो. त्याच्या खांद्यावर भला मोठा गवताचा भारा असतो. त्याला पाहून स्वाती म्हणते, " तुम्हाला नाश्ता करायला कंपनी मिळाली." असं म्हणून ती त्या तरुणाला हाक मारते, " दादा, तुझा पण नाश्ता देते, हात -पाय धुवून लगेच ये. " हे ऐकून तो तरुण मानेनेच होकार देतो आणि गवत सोडून सर्व गायी,बैल आणि म्हशीसमोर टाकतो. जेनी सॅमला विचारते, " इकडे नोकराला पण सोबत जेवायला बसवतात का? " त्यावर सॅम म्हणते, " डिअर, ये इंडिया हैं, यहा सब कुछ हो सकता हैं! मॉम म्हणाली होती ना सर्वांना सामान वागनूक असते इथे. तसंच असेल आपल्याला काय. "

तो तरुण हात पाय धुवून देतो आणि स्वातीला आवाज देतो. स्वाती त्या तरुणाचा नाश्ता घेऊन येते. एक कळशी दूध, ७-८ थालीपीठ ती त्याच्या समोर ठेवते. आणि म्हणते, " दादा तू सुरु कर मी अजून आणून देते. " हे ऐकून सॅमला ठसका लागतो. हे पाहून तो तरुण बोलतो, " स्वाती, एक काम कर यांना आधी पाणी पाज नाहीतर अजून त्रास होईल यांना. " सॅम त्याच्याकडे रागाने बघते.

सॅम आणि जेनीला त्या दुधाची आणि थालीपीटाची चव वेगळीच जाणवते. थालीपीठाच ठीक आहे पण दुधाची चव सुद्धा वेगळी. असं कसं होऊ शकतं?  ती या विचारात असताना तो तरुण आवाज देतो, " मॅडम, आपल्याला बाहेर जायचं आहे. आजीने सांगितलं आहे. लवकर नाश्ता संपवा, तुमच्या मागून माझा नाश्ता झाला सुद्धा. आज जरा कमीच जेवलो. " हे ऐकून सॅम आणि जेनी त्याच्याकडे बघतच राहिल्या.

थोडया वेळाने स्वाती त्या दोघीना बोलवायला त्यांच्या रूम मध्ये येते आणि म्हणते, " तयार झालात का तुम्ही आपल्याला निघायचं आहे. " त्यावर जेनी विचारते, " आपण कुठे जातोय? "

" आपल्या कुलदेवीच्या मंदिरात." स्वाती.

" कुलदेवीचं मंदिर? " सॅम.

" हो, आजी सांगून गेलीय. दोघीनाही मंदिरातील घेऊन जा. संध्याकाळी वेळ मिळणार नाही. अंधार पण होईल. " स्वाती.

" संध्याकाळी का वेळ मिळणार नाही? "  जेनी.

" तुम्ही सकाळी १० नंतर उठलात ना, तोपर्यंत सर्व आपापल्या कामाला निघून गेले. त्यामुळे तुमच्याशी सर्वांची भेट झाली नाही. संध्याकाळी सर्व येतील तेव्हा यात्रा लागेल इथे. नातेवाईक, आजूबाजूचे सर्व येतील भेटायला. " स्वाती.

" काय? एवढे लोक येणार भेटायला? " जेनी अवंढा गिळत विचारते.

" हो तुम्ही पहिल्यांदा आलात तर सर्वजण भेटायला तर येणारच ना? " स्वाती.

सॅम आणि जेनी होकारार्थी मान हलवतात. स्वाती,' लवकर तयार होवून खाली या दादा कधीचा वाट बघतोय.'असं म्हणून खाली निघून जाते.

समीरा आणि जानकी तयार होवून खाली येतात. स्वाती, समीरा आणि जानकी त्या तरुणा सोबत मंदिरात जातात. मंदिरात जाताना स्वाती समीरा आणि जानकीला आजूबाजूच्या परिसराची माहिती देत असते. खेडवळ असलं तरी मनाला भावणारं वातावरण होतं. मंदिरात पोहचल्यावर समीरा आणि जानकी बघतात की अमेरिकेतील मंदिरापेक्षा हे मंदिर अगदीच सुमार आहे. अमेरिकेतलं मंदिर अगदी पॉश होतं. वेगवेगळ्या कळकुसरी त्यावर होत्या. देवापासून एक विशिष्ट अंतर राखून भाविकांना दर्शन दिलं जायचं. पण या मंदिरात एक उत्साह जाणवत होता. अनाहुतपणे समीरा तशीच आत जात होती. ती आत जात असतानाच तो तरुण तिचा हात धरून मागे ओढतो. याप्रकारामुळे समीरा चिडते. ती काही बोलणार तोच तो तरुण पायाकडे इशारा करतो आणि समीराच्या लक्षात येतं की तिने चप्पल काढलीच नाहीये. त्यामुळे समीराला वरमल्यासारखं झालं. चप्पल उतरवून ती आत गेली.

समोर सुरेख कुलदेवीची मूर्ती होती. आजूबाजूला भिंतीवर महाभारत कालीन चित्र रेखाटले होते. प्रत्येक भिंतीवर एक कथा होती. दर्शन घेतल्यानंतर समीरा त्या भिंतीवरची चित्र न्याहाळात होती. तोच मागून तो तरुण येतो आणि विचारू लागतो, " या कथा तुम्हाला माहित आहेत का? "

त्यावर समीरा नकारार्थी मान हलवते. त्यावर तो ते सांगू लागतो, " हा प्रसंग महाभारताला आहे जेव्हा दुशासन द्रौपदीला खेचून भर सभेत आणतो. "

" काय? का? असं एका स्त्रीला भर दरबारात आणलं? म्हणजे इंडिया मध्ये आधीपासूनच स्त्रीला हीन वागणूक होती. वाह..! आणि मॉम म्हणते की इंडिया महान आहे. " समीरा.

" अहो मॅडम, किमान पूर्ण ऐकून तर घ्या. यामुळेच पुढे स्त्रीच्या सन्मानासाठी मोठं युद्ध झालं. या महाभारत ग्रंथात जे जे आहे, ते ते सर्व या जगात आहे आणि या ग्रंथात जे नाही ते या जगातही नाही. " तरुण.

" हे थोडं जास्त नाही वाटतं का? " समीरा.
" काय? " तरुण.
" हेच या महाभारत ग्रंथात जे जे आहे, ते ते सर्व या जगात आहे आणि या ग्रंथात जे नाही ते या जगातही नाही." समीरा.
" नाही मॅडम, हे जास्त नाहीये. मी अगदी खरं बोलतोय. तुम्ही खोटं वाटत असेल तर आजीला विचारा. " तरुण.
" हो विचारणारच आहे. तुझ्यावर थोडीच विश्वास ठेवणार आहे. " असं म्हणून समीरा नाक मुरडून पुढे चित्र पहायला निघून जाते. आणि तो तरुण तिच्या अश्या बालिश वागण्यामुळे गालातल्या गालात हसत असतो.

थोड्या वेळाने सर्व मंदिराबाहेर येतात आणि मंदिराबाजूच्या एका झाडाच्या पारावर बसतात. समीरा आणि जानकीला खूप प्रसन्न वाटतं होतं. अमेरिकेत एवढं सर्व असून पण जे समाधान नाही मिळालं ते आज या मंदिरात मिळालं होतं. शांती आणि समाधान मनात घेऊन सर्वजण घराच्या मार्गाला लागतात.

क्रमश.......

🎭 Series Post

View all