अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
आजीने दिलेल्या माहितीमुळे समीरा आणि जानकी यांची उत्सुकुता अजूनच वाढली होती. जानकी म्हणते,"आजी बरं मग एक सांग देवाला नैवेद्य वाढताना किंवा मी इथे आपल्यापासून पाहतेय जेवायला बसताना सर्वजण जेवणाभोवती पाणी फिरवतो / सोडतो. असं का ? "
आजी प्रेमाने दोघींकडे पाहत होती. कुठेतरी आजीला जाणवत होत की मुलींना आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम आणि ओढ निर्माण होतेय. आजी जानकीला उत्तर देते, " बाळा, पूर्वी लादी किंवा फरशी , मार्बल असा प्रकार नव्हता. घरातली आणि बाहेरची जमीन शेणाने सारवली जायची. आता सुद्धा काही ठिकाणी, काही गावांमध्ये शेणानेच सारवतात. " " ईईई ... शेणाने ... " जानकी तोंड वेंगाडत मध्येच म्हणाली. ते पाहून आजी पुढे म्हणाली, " बाळा शेण हर प्रकारे माणसाला लाभदायक आहे. आणि फक्त शेणच कशाला निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट आपल्यसाठ चांगली आहे. पूर्वी सर्वजण नैसर्गिक गोष्टीच वापरायचे आणि राहायचे त्यामुळे माणूस सुखी होता. आता माणसाला हाव सुटली आहे. कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. हे हवं , ते मिळालं की दुसरं काहीतरी हवंच." त्यावर समीरा म्हणते, " आजी अगं पण त्याशिवाय प्रगती कशी होईल ? आणि प्रगती करत राहणं हे माणसाचं लक्षण आहे. " त्यावर आजी त्यांना समजावते, " बाळा त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. विकास आणि प्रगती हवीच ना, पण कोणत्या किंमतीवर? ते ही महत्वाचं आहे ना. आता हेच बघ, प्रगती आणि विकासाच्या नावाखाली मोठं मोठी उड्डाणं पूल, इमारती बांधल्या जातात. त्यासाठी अनेक झाडे सर्रास तोडली जातात. दोन झाडे तोडली तरी जवळपास १ कोटींचं नुकसान होतं. "
जानकी आश्चर्याने विचारते, " १ कोटी? आजी काय गं, आम्ही ऐकतोय म्हणजे तू काहीही सांगणार का? " आजी हसून म्हणते, " बाळा मी काहीही नाही सांगत. आता हे बघ, एक झाडाचं आयुष्य किमान ५०-६० वर्षे पकडू. कारण झाड सहसा मरत नाही. १ ऑक्सिजन सिलेंडर ला किती पैसे लागतात? किमान २ ते ३ हजार एखादी महामारी आली तर १० हजार पेक्षा जास्तच. काही झाडे १२ तास ऑक्सिजन देतात, काही झाडे १८ तास तर काही झाडे २४ तास. आता ५०- ६० वर्षात ते देत असलेल्या ऑक्सिजनचा १२ तासाने विचार केला तर तो किती ऑक्सिजन देतो? झाड फक्त ऑक्सिजन नाही देत तर कार्बन डायऑक्ससाईड हवेतून शोषून घेतो, ते सुद्धा ५० ते ६० वर्षे, याशिवाय झाडे फळ - फूल देतात, औषधं देतात, जमिनीची धूप थांबवतात, ओझोनचा थर झाडांमुळेच व्यवस्थित राहतो. ग्लोबल वॉर्मिंग यांच्यामुळेच संतुलित राहते, आणि हे सर्व जवळपास ५० ते ६० वर्षे. म्हणजे एक झाड ५० - ६० वर्षात ५० लाखाच्या आसपास आपल्याला देतातच असतो.
आता तुम्हीच हिशोब लावा. " समीरा आणि जानकीला आजीचं बोलणं पटत. जानकी म्हणते, " आजी पुढे सांग ना. " आजी म्हणते, " प्रगती आणि विकास असा साधावा की निसर्गाला हानी पोहचली नाही पाहिजे. त्यातच माणसाची बुद्धिमत्ता आणि भलं आहे. पूर्वी आता पेक्षा जास्त विकास होता पण असं वातावरण नव्हतं. आधीच्या बांधकाम, इंजिनीरिंग, राजनीती, अर्थशास्त्र, शिक्षण अगदी सगळंच उत्तम होतं. त्यावर आजही कोणी बोटं ठेवू शकत नाही. आणि आज रात्री बांधलेली इमारत सकाळी कोसळते. बरोबर आहे ना? " आजी दोघींकडे पाहत विचारते. दोघीही होकारार्थी मान हलवतात. आजी म्हणते, " गायी, म्हशी, बैल अनेक झाडांचा पाला खातात. त्यामुळे शेणाने घर आणि अंगण सरवल्याने घरात जिवजंतू सहसा येतं नाहीत. पण ते सुकल्यावर हवे बरोबर त्याचे कण उडतात. त्यामुळे ताटाभोंवती पाणी फिरवून जेवण केल्याने आजूबाजूला असलेले कण पाण्यासोबत खाली बसतात. हे आहे वैज्ञानिक कारण. आणि कोणतीही वस्तू आपण पाण्याने पवित्र करतो, म्हणून नैवेद्य दाखवताना पाणी सोडल्याने पवित्र मनाने वाढल्याचं समाधान मिळत. हे आहे अध्यात्मिक कारण.
समीरा आणि जानकी प्रश्न विचारत होत्या आणि आजी उत्तरे देत होती. दोघीही आजीचं ज्ञान पाहून आणि ऐकून चाट पडल्या होत्या. बरीच रात्र झाल्यावर आजी म्हणते, " आता खूप रात्र झाली आहे. आता जावून झोपा. आता तुम्ही आहात ना? मग बाकी नंतर विचारा. " दोघीनाही जायचं नव्हतं पण आजीचं ऐकून दोघींही झोपायला जातात. समीरा आणि जानकीच्या मनात आजीबद्दल कुतूहल मात्र खूप निर्माण होतं. आजीबद्दल विचार करतच दोघी झोपी जातात.
सकाळी समीराला लवकरच जाग येते. तिला स्वतःलाही या गोष्टीच नवल वाटतं. नकळत ती उठून त्याचं खिडकीत जाते जिथे आदल्या सकाळी तो तरुण बैलांना काहीतरी शिकवत होता. समीरा जावून खिडकी उघडते आणि थंड हवा तिच्या अंगावर येते. एसी ची हवा तर वर्षनुवर्षे ती घेत होतीच पण या हवेत एक नैसर्गिकपणा होता, वेगळापणा होता. तिची नजर खाली गेली तर तो तरुण नुकताच तिथे आला होता. त्याने बंब पेटवून त्यावर पाणी गरम करायला ठेवला. त्यानंतर त्याने कोवळं गवत आणून बैल, गायी आणि म्हशींना दिलं. त्यांच्या वासरांशी खेळू लागला. ते वासरू सुद्धा तो त्यांचा मित्र असल्याप्रमाणे त्याच्याशी मस्ती करू लागते. समीरा वरून सर्व पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं.
काही वेळाने त्या तरुणांची नजर खिडकीवर पडली. समीराला एवढ्या लवकर उठलेलं पाहून त्याला सुद्धा थोडं नवल वाटलं. त्याने समीराला तिथूनच विचारलं, " इथे नीट झोप नाही लागत का? " त्यावर समीरा म्हणते, "असं काही नाही पण आज लवकर जाग आली. " हे ऐकून तो तरुण पण हलकं स्मित हास्य करतो आणि आपल्या कामाला लागतो.
समीरा आज लवकरच तयार होते. ती पुन्हा फोन घेते आणि डेव्हिडशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे सकाळ म्हणजे तिकडे रात्र असणार डेव्हिडचं काम संपलं असेल,त्याला बोलायला वेळ असेल.रिंग जाते पण कोणी उचलत नसतं. समीराला वाटतं की कदाचित नवीन नंबर बघून तो उचलत नसेल. ती पुन्हा फोन लावते. यावेळी मात्र फोन उचलला जातो. समोरून एका मुलीचा आवाज येतं असतो. मुलीचा आवाज ऐकून समीराला आश्चर्य वाटतं. ती त्या मुलीला डेव्हिड कुठे आहे असं विचारते. त्यावर ती मुलगी तिला सांगते की अंघोळीला गेला आहे. ती मुलगी समीराला विचारते तू कोण? त्यावर समीरा त्याची मैत्रीण असं सांगते. त्यावर समीरा तू कोण असे विचारते. समोरून उत्तर येतं मी त्याची होणारी बायको. हे ऐकून समीराला धक्काच बसतो. समीरा जी त्यासोबत लिवइन मध्ये राहणार होती. तिच्यापासून डेव्हिडने एवढी मोठी गोष्ट लपवली होती. समीराला खूप राग येतं होता आणि रडूही येतं होतं. ती स्वतःला सावरू शकत नव्हती. जानकीला तिने नाश्ताला खाली जायला सांगितलं आणि ती गेल्यानंतर तिच्या आसवांचा बांध फूटला. समीरा रडू लागली. तिला डेव्हिड बरोबर घालवलेला एक एक क्षण आठवू लागला. आपली एवढी मोठी फसवूक झाली आहे, हे तीला सहनच होतं नव्हतं.
समीरा दुःखात बुडाली असताना दारावर टक टक झाली. समीराने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला. समोर तोच तरुण उभा होता. समीराचे डोळे आणि चेहरा पाहून त्याच्या लक्षात आलं की समीरा रडली आहे. समीरा एवढी कोलमडली होती की त्याला आत ये किंवा परत जा असं सांगण्याचं भानही तिला राहिलं नाही. तो तरुण थोडा आत आला आणि त्याने तिला विचारलं, " काय झालं समीरा? काही प्रॉब्लेम आहे का? " यावर समीरा काहीही उत्तर देत नाही. तो पुन्हा विचारतो, " मम्मी पप्पांची आठवण येते का? माझ्याकडे बघ समीरा. काय झालंय? तू सांगणार नाही तर कसं कळणार? तुला येथे कोणी काही बोललं का? मला सांग मी बघतो. " तो तिची ज्या प्रकारे चौकशी करत होता, समीराला अगदी भरून आलं आणि अनावधानाने ती त्याला मिठी मारून रडू लागली. त्याला हा प्रसंग अचानक झाल्याने काहीच सुचलं नाही पण तिचं रडू वाढलं आणि तो भानावर आला. त्याने मिठी सैल केली आणि तिच्या खांद्याला धरून तिला बेडवर बसवलं. बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या ओठांना लावला. तिने पाणी पिल्यावर तिने हळूच तिचे डोळे पुसले आणि तिला विचारलं, " काय झालं समीरा अचानक ? तुला बरं वाटतं नाही का? आपण डॉक्टरकडे जायचं का? " यावर समीरा शांतच राहते. तो पुढे बोलतो, " तुला मला सांगायचं असेल तर सांग, जबरदस्ती नाहीये. आता नसेल सांगायचं नंतर सांगावंसं वाटलं तर नंतर सांग. काही घाई नाही. फक्त एक लक्षात ठेव, तुला रडवणारी गोष्ट, ती तुला रडवत असेल तर त्या गोष्टीला खरंच एवढं महत्व द्यायला पाहिजे का? या जगात रडवणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातून आपल्याला हसू देणाऱ्या आपणच शोधायच्या असतात.
आता चेहऱ्यावर पाणी मार आणि नाश्ताला खाली चल नाहीतर आजी मला पण जेवायला देणार नाही. ( समीराला हसवण्याचा प्रयत्न करत तो असं म्हणतो. ) समीरा त्याला म्हणते, " मी वरच नाश्ता करते. " त्यावर तो म्हणतो, " आपल्याकडे खोलीत बसून जेवायची परवानगी त्यालाच असते जो आजारी असतो. त्यामुळे तुला खाली यावंच लागेल. " तो तरुण काहीही न ऐकून घेता समीरा खाली घेऊन जातो.
नाश्ता करताना समीरा शांत असते आणि तिने त्याला मारलेल्या मिठी बद्दल विचार करत असते. " असं कसं मी भान हरपलं? याला कशी मिठी मारली? पण त्यांच्या मिठीत आश्वासन होतं, एक विश्वास होता, एक आपलेपणा होता. यापूर्वी कधीही जाणवलं नाही असं जाणवलं त्याच्या मिठीत. मी मिठी मारली तरी त्याने हात नाही लावला. पुतळ्यासारखा उभा राहिला. नक्की काय जाणीव आहे ही? " स्वतःशी विचारात गुंग होती ती. तेवढ्यात स्वाती बोलते, " समीरा जानकी आज आपण कुठेही बाहेर जाणार नाही आहोत. संध्याकाळी आपल्या गावात एक सोहळा आहे त्यामुळे संध्याकाळी आपल्याला तिथे जायचं आहे. त्यामुळे तुम्ही आराम करा. "
समीराला तसही कुठे जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून ती आपल्या रूममध्ये निघून गेली. जानकी मात्र स्वातीसोबत खाली थांबली. तिला आता ते वातावरण आणि माणसं आवडू लागली होती.
संध्याकाळी स्वाती समीराला बोलवायला येते. तेव्हा समीरा मला नाही यायचं तुम्ही जा असं सांगते. त्यावर स्वाती तिला म्हणते, " आजच्या सोहळ्याला सर्वांनी जायचं असं आजीने सांगितले आहे. त्यामुळे तू नाही म्हणू शकतं नाहीस. हवं तर थोडा वेळ बस आणि लगेच परत ये पण आमच्यासोबत चल. जानकी बघ कधीच तयार होऊन बसलीये. " स्वाती जानकी कडे हात करत बोलते.
समीरा पाहते तर जानकी खरंच छान तयार होऊन बसली असते, शिवाय लहान मुलाला जत्रेत जाणार असं सांगितल्यावर होणारा आनंद जानकीच्या चेहऱ्यावर होता. आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून समीरा सोहळ्याला जाण्यासाठी तयार होते.
क्रमश........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा