अनोखी गाठ भाग २४     # मराठी _ कादंबरी 

-----------

अनोखी गाठ भाग २४     # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की,  कावेरीला शिक्षण घेण्यासाठी पतीला हो बोलावं की नाही यात संभ्रम होता. संभ्रम दूर करण्यासाठी कावेरी दुपारी सर्वांची नजर चुकवून सरस्वती ताईला  भेटायला जाते. सरस्वती ताईंना कावेरीला असं आलेलं पाहून आश्चर्य वाटत. कावेरी सर्व काही सरस्वती ताईला सांगते. सरस्वती ताई सुद्धा कावेरीला शिक्षण घेण्यास सांगतात. ताईला सुद्धा असं वाटतंय की , आपण शिक्षण घ्यावं म्हणजे आपण काही चुकीचं करत नाही आहोत याच कावेरीला समाधान वाटतं. रात्री कावेरीला शिक्षणाबद्दल विचारल्यावर ती हळूच पाटी पुढे करते. पहिला शब्द कावेरी जो शिकते तो म्हणजे " सरस्वती". कोणाला कळणार नाही याची काळजी घेत कावेरी आपलं शिक्षण सुरु ठेवते. असेच  दिवस जात होते. एके दिवशी भाऊराव ' जमिनीचे हिशोब ठेवणारे मुनीम / लेखापाल ' आले आणि मालकांना मागच्या तीन महिन्यांचे हिशोब आणलाय तो तपासून घ्या असे म्हणाले. मालकांना त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी विशेष असं काही लक्ष दिलं नव्हतं वही- खात्यात. मालक वही- खात्यात लक्ष देत नाहीत ही गोष्ट भाऊरावांना चांगलीच माहित होती तरी आपण कसे इमानदार आहोत हे दाखवण्यासाठी ते अधून - मधून हिशोब वही तपासा म्हणून सांगत. मालकांनी वही ठेवा मी नंतर पाठवतो असे सांगितले. नवऱ्याचं असं वागणं कावेरीला पटलं नव्हतं तरी ती म्हणाली , ' आपण लक्ष घालतो तेव्हा गैरव्यवहार होतं नाहीत, कामे चोख होतात. ' असं म्हणते. त्यावेळी तिचे पती तिला म्हणतात,' त्यांच्या अनेक पिढ्यानी आपल्याकडे हिशोब ठेवला आहे. अविश्वास करावा असं काही नाहीये. त्यावर कावेरी म्हणते मग मी तपासते त्या निमित्ताने माझ्या अभ्यासाची उजळणी होईल. ते होकार देतात. दुपारी कावेरी हिशोब करायला बसते . तीन - चार वेळा हिशोब केल्यानंतरही हिशोब लागत नव्हता. साडे चार रुपयांचा घोळ होता. रात्री कावेरीने पतीला सर्व प्रकार सांगितला. आधी त्यांना वाटलं की कावेरी अजून शिकतेय त्यामुळे तिच्या हिशोबात चूक असेल पण जेव्हा त्यांनी पुन्हा हिशोब केला तेव्हा त्यांना खात्री पटली. रागात ते बाहेर जाणार तोच कावेरीने रोखलं आणि शांतपणे परिस्थिती हाताळायला सांगितली..... आता पुढे....)

आजीची गोष्ट ऐकताना सर्वांना छान वाटत असतं. स्वाती म्हणते," आजी, म्हणजे तू एक फ्रॉड पकडून दिला होतास. तोही काय माहित कधी पासून सुरु असलेला. " त्यावर जानकी म्हणते," हो ना, आजी आजोबा तर तुझ्यावर खुश झाले असतील ना?" आजी हसत म्हणाली," हो बाळांनो, तुमचे आजोबा खुश झाले कारण मला ज्ञान आता व्यवहारात वापरता येत होता. " समीरा ," आजी मग पुढे काय झालं ?" लहान मुलांना जशी गोष्ट ऐकताना 'पुढे का होणार/ झालं?' याची उत्सुकता असते , तशीच यांच्या चेहऱ्यावर आजीला दिसत होती.  आजी गोष्ट पुढे सांगू लागली, " सकाळी काहीतरी मोठं घडणार याची कल्पना मला रात्रीच आली होती, मात्र तरीसुद्धा मी घरात, स्वयंपाकघरात मला काहीच माहित नाही अशीच वावरत होते. सकाळी आपल्या कामावर लवकर जाणारे 'हे ' अजून घरातच होते. सासूबाईंनाही या गोष्टींचं नवल वाटलं. कारण 'हे ' कामाच्याबाबतीत पक्के होते. 

सासूबाई माझ्याजवळ आल्या आणि मला विचारलं," काय गं कावेरी अजून हा कामावर कसा नाही गेला? तुला काही म्हणाला का ?" माझ्यात आणि सासूबाईंमध्ये फार जवळीक नसली तरी एवढे दिवस वाडयात असल्यामुळे त्या माझ्या नीट बोलत होत्या. मला सर्व माहित आहे ही गोष्ट मी त्यांना सांगू शकत नव्हते. मी त्यांना म्हणाले, " नाही सासूबाई . ते मला काहीच बोलले नाहीत. हा पण ते रात्री खूप उशिरापर्यंत जागे होते. हिशोबाच्या वह्या तपासत होते. बहुदा म्हणून त्यांना पहाटे उठायला उशीर झाला असेल." सासूबाई " बरं " म्हणून निघून गेल्या. थोडा वेळाने हे खाली आले आणि त्यांनी आमच्याकडे असलेल्या सालगडीला भाऊरावांना बोलवायला पाठवलं. त्यानंतर ते पुन्हा कोणत्या तरी हिशोबात गुंतले. 

थोडया वेळाने भाऊराव आले आणि म्हणाले," मालक झाले का हिशोब तपासून ? नेऊ का मी वह्या ?" त्यावर 'हे' शांतपणे म्हणाले," भाऊराव थोडा वेळ थांबा. मी तुमच्या वडिलांनाही बोलावणं पाठवलं आहे ते ही येतील इतक्यात तेव्हा बोलू." यांच्याकडून या बोलण्याची अपेक्षा भाऊरावांना नव्हती. शिवाय आज पहिल्यांदा असं होत होतं. नाही म्हणलं तरी भाऊरावांनी धडधड वाढली होती. मी स्वययंपाक घरातूनही हे सर्व स्पष्ट पाहू शकत होते. भाऊरावांची चलबिचल वाढली होती. त्यांची हातची बोटे ते एकमेकांवर सारखे चोळत होते. भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. एक होतं शिक्षणामुळे आणि 'ह्यांच्या ' सोबत राहून माझ्यात बदल नक्कीच घडत होता. जर तसं नसत तर मी वह्या तपासण्याचा हट्ट केला नसता , हे चिडले तेव्हा त्यांना संयम बांधण्याचा सल्ला दिला नसता, आणि स्वयंपाक घरात बसूनही बाहेरच्या गोष्टीवर विचार केला नसता. आपण बरं आणि आपलं काम बरं , आपलं जग म्हणजे स्वयंपाक घर बाकी कशात लक्ष नसतं. पण मला माझ्यातला हा बदल जाणवत होता. 

काही वेळाने भाऊरावांचे वडील आले. ह्यांनी त्यांना बसायला सांगितलं. त्यानंतर ह्यांनी बाबांना ( सासरे ) आणि सासूबाईंना आवाज दिला. सर्वजण तिथे गेले तेव्हा हे म्हणाले, " सर्वजण इथे बसा मला बोलायचं आहे." मी स्वयंपाक घरात होते मला तिथे जायची परवानगी नव्हती. मी तिथूनच सर्व गोष्टी पाहत होते आणि जे घडणार त्यातून खूप काही शिकणार होते. 

ह्यांनी बोलायला सुरुवात केली, "महादेव काका ( भाऊरावांचे वडील ) या वाडयात तुम्ही , तुमच्या अनेक पिढ्यांनी काम केलं. आमच्या जमिनीचे व्यवहार जेवढे आम्हाला माहित नाहीयेत तेवढे तुम्हाला माहित आहेत. तुमच्या अनेक पिढ्यांनी आमच्या जमिनीच्या व्यवहारांची नोंद ठेवली. अनेक वर्षांपासून तुमच्या कामावर विश्वास ठेवला पण कदाचित तीच आमची चूक झाली. " असं बोलणं ऐकून महादेव काकांना धक्का बसला. ते काकुळतीला आले आणि रडक्या स्वरात म्हणाले, " असं का बोलताय धाकटे मालक अशी काय चूक झालीये मालक जे तुम्ही आम्हांला असे विषारी शब्द ऐकवताये ? आज वर जीवापेक्षा जास्त इमान जपलंय मी. असं बोलून माझ्या इमानाचा अपमान करू नका." हात जोडत ते बोलत होते. 

" तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हांला ? ह्यांच्या पिढ्यानपिढ्या आपल्याकडे इमाने इतबारे काम करतायत." माझे सासरे ह्यांच्यावर चिडले होते. त्यावर हे म्हणाले, " आबा म्हणूनच मी सुद्धा कधी हिशोबाच्या वह्यांवर लक्ष दिलं नाही. हिशोब भाऊरावांच्या हातात आहे म्हणून मी हिशोबावर लक्ष न देता दुसऱ्या गोष्टी पाहत होतो. कधी तपासून पाहावस पण नाही वाटलं कारण विश्वास होता म्हणूनच ना? काल सकाळी भाऊराव हिशोबाची वही घेऊन आले होते. मला म्हणाले तपासा. मी म्हणालो तुम्ही व्यवहार पाहताय तर मी तपासायची काय गरज ? कारण मी कधीच तपासत नाही हे भाऊरावांना माहित आहे. ते म्हणाले तरी सुद्धा तपासा. मी त्यांच मन ठेवण्यासाठी म्हणालो," नंतर बघतो आणि वही पाठवतो." तस मी तपासणार नव्हतोच पण रात्री मला वेळ मिळाला तर म्हणलं आता वही आहेच इथे तर बघावं , म्हणून तपासायला सुरुवात केली तर पहिली दोन - तीन पाने व्यवस्थित होती पण त्यानंतर टाळा बसत नव्हता. मी अनेक वेळा तपासलं साडे चार रुपयांचा फरक होताच. मग विचार केला की , हा फक्त मागच्या तीन महिन्यांचा हिशोब आहे, त्याआधी किती घोळ असेल? म्हणून मी गड्याकडून जुन्या हिशोब वह्या मागवल्या. आतापर्यंत जेवढा हिशोब झाला त्यानुसार दीडशे रुपयांचा घोळ आहे आणि अजून काही वह्या तपासायच्याच आहेत. " असं म्हणत ह्यांनी हिशोबाच्या वह्या आबांसमोर आणि महादेव काकांसमोर ठेवल्या. हे सर्व ऐकून भाऊरावांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. या गोष्टीच सर्वांनाच नवल वाटलं. 

महादेव काकांना या गोष्टीचा धक्का बसला. त्यांनी थरथरत्या हातांनी हिशोब वही उचलली आणि हिशोब करू लागले आणि त्यानंतर रडू लागले. ' आजवर जेवढी इज्जत कमवली तेवढी नालायक मुलामुळे गमावली.' असं म्हणू लागले. भाऊराव आबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागले. चूक झाली माफ करा असं म्हणून लागले. आबांना सुद्धा य फसवणुकीमुळे प्रचंड राग आला होता. त म्हणाले," विश्वास ठेवला याच फळ हे दिलंत तुम्ही आम्हांला ? आजवर काय कमी केलं तुम्हाला ? तुमच्या ठरलेली पगाराशिवाय पीक आलं की वर्षभराचं धान्य , सणा -वाराला कपडे -लते वाड्यातून पाठवतो , तुमच्या घरचं कार्य आमच्या घरचं समजतो. आमच्याकडून काय करायचं बाकी होतं ? " आबा आणि हे शिवाय सासूबाईही खूप चिडल्या होत्या. या सर्वांत मला वाईट महादेव काकांबद्दल वाटत होतं. रागात ह्यांनी काही निर्णय घेतला तर ? माझ्या मनात भीती घर करत होती. मी देवाकडे प्रार्थना करत होत की देवा एकदा ह्यांचा लक्ष माझ्याकडे जावं . सासरे तर फसवणुकीचा खटला दाखल करू असं म्हणूं लागले. ह्यांचा सूरही तसाच काहीसा वाटत होता. ह्यांनी माझ्याकडे पाहिलं मी स्वयंपाक घराच्या छोटी खिडकीतून त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिल्या - पाहिल्या मी त्यांना हाताने फक्त पंचा दाखवून " थांबा " तेवढाच इशारा केला. त्यांना मला नक्की काय बोलायचं आहे हे कळलं नाही पण एवढं कळलं की मी या घटनेसंदर्भातच बोलतेय. 

त्यांनी प्रसंग सावरला. त म्हणाले," आबा, आता काही नको बोलायला, ह्यांना आता जाऊ दे ह्यांना उद्या बोलवा. आपण य विषयावर उद्या सकाळी बोलू. आता मला सुद्धा महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. शेवटी तरुण मुलाच्या हातात व्यवहार आपणच दिला आहे म्हणून आबांनी ह्यांचं बोलणं मान्य केलं. उद्या सकाळी यायला सांगितलं. महादेव काका रडतच वाड्याबाहेर पडले. त्यानंतर आबांनी ह्यांना प्रश्न केला," आज निकाल लावता आला असता मा उदयावर का ढकललं ?" त्यावर हे म्हणाले," आबा , रागात निर्णय घेऊ नये. म्हणून उद्यापर्यंतची वेळ घेतली मी. थोडा सारासार विचार करू आणि मग काय तो निर्णय घेऊ. उद्या सकाळी त यायच्या आधी काय ते आपण ठरवू ." सासूबाई आणि आबांना  ते बोलणं पटलं. 

तो दिवस थोडा विस्कटलेलाच गेला. एखाद्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तो समोरच्याने तोडला तर त्रास होतोच ना? तसंच आज वाड्यात झालं होतं. रात्री 'हे' आले आणि मी विचारलं," मला तू थांबवत का होतीस ?" त्यांना मी म्हणाले," तुमच्या किंवा आपल्या घरच्यांच्या हातून पाप घडू नये म्हणून." हे ऐकून त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले ," पाप ?" मी म्हणाले ," हो , पाप . " 

क्रमश........

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

अनोखी गाठ भाग १७       #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183

अनोखी गाठ भाग १८      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220

अनोखी गाठ भाग १९     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727

अनोखी गाठ भाग २०      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806

अनोखी गाठ भाग २१    # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882

अनोखी गाठ भाग २२     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-bhag-22-----marathi-kadambari-_7930

अनोखी गाठ भाग २३       # मराठी _ कादंबरी 

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-23----marathi-kadambari-_7945

🎭 Series Post

View all