अनोखी गाठ ११ मराठी कादंबरी

----------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221

अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


 

अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

(  मागच्या भागात आपण पाहिलं की समीरा, जानकी, स्वाती आणि अभिषेक मंदिरात जातात. दर्शन घेतल्यावर स्वाती जानकीसोबत तिच्या मैत्रिणीकडे जाते. इकडे अभिषेक समीराला तिच्या उदास असण्याचं कारण विचारतो. हो ना करत, मनाचा कौल घेऊन समीरा अभिषेकला सर्व खरं सांगते. अभिषेक तिला समजावतो आणि चुका माणसाकडूनच होतात असं म्हणतो. शिवाय नातं, प्रेम, त्याग या गोष्टी आज्जीकडून शिक्षण्यासारख्या आहेत असं म्हणतो.   आज्जीची स्टोरी जास्त छान प्रकारे समीराला आयुष्यात अर्थ, प्रेम आणि त्याग, समर्पण या गोष्टींची जाणीव करून देईल. समीरा आता आजीची स्टोरी ऐकायला उत्सुक आहे. आता पुढे...........)

स्वाती, समीरा, जानकी आणि अभिषेक एक सुंदर प्रवास करून पुन्हा घरी परत येतात. समीरा आणि जानकीला येवून आठवडा, दहा दिवस झाले होते. दोघींही आता छान रूळल्या होत्या. ज्या गोष्टी त्यांना आउटडेटेड आणि जुनाट वाटतं होत्या, त्या आजी त्यांना नव्या दृष्टीने दाखवत होती. त्यामुळे या सर्वांत त्यांना एकप्रकारे रस निर्माण झाला होता. त्यांना आता अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. अभिषेकने आजीची आगळी वेगळी स्टोरी आहे असं सांगितल्यापासून समीराला उत्सुकता लागली होती. समीरा आता आजीशी या विषयावर बोलण्यासाठी कारण शोधत होती.

तिला कारण मिळत नसल्याने ती अभिषेककडे जाते, आणि त्याला सांगते की, " अभिषेक मला आजीची ती स्टोरी ऐकायची आहे ते पण आजी कडूनच पण मला विषय काढताच येत नाहीये. कसं बोलू मी? कसा विषय काढू? "
अभिषेक म्हणतो, " तू नको टेन्शन घेऊस. मी करतो काहीतरी. " असं म्हणून अभिषेक जातो. अभिषेक 'मी करतो काहीतरी ' असं म्हणाल्यामुळे समीरा रिलॅक्स होते. कुठेतरी तिच्या मनात अभिषेकच्या शब्दाबद्दल विश्वास होता.

रात्री सर्व जेवायला बसल्यावर अभिषेक कावेरी आज्जीला म्हणतो, " आजी खूप दिवस झाले आपण टेरेस वर नाही झोपलो. तिथे बसून तुझ्या हाताने डोक्याला तेल लावत, गप्पा मारत, तुझ्या मांडीवर झोपायला खूप आवडतं मला. किती दिवसात तू माझ्या डोक्याला तेल पण नाही लावलंस. आज आपण सर्व वर झोपायला जाऊयात. सर्व म्हणजे बाकीच्यांना जास्त वेळ जागरण नको तेव्हा तू, मी, स्वाती, जानकी आणि समीरा एवढे जण वर झोपुयात. बोल आजी जायचं ना? "
अभिषेकच्या या लडीवाळ गोड बोलण्याला आजी नाही म्हणू शकली नाही. आणि 'जेवल्यावर चला वर' असे आजी म्हणाली.

अभिषेकने गच्ची वर गाद्या टाकल्या, स्वातीने पाण्याचे गडवे भरून आणले, आजीने आपला पान - सुपारीचा आपला डब्बा पण आणला. सुंदर चांदणं पडलं होतं. गच्ची, गच्चीवरची फुलझाडं त्या चंद्र प्रकाशात न्हावून निघत होतं. डोळ्यांसोबतच मनालासुद्धा थंडावा जाणवत होता, सुखावत होता. Late night पार्टीज पेक्षा आजची रात्र अधिक सुखवणारी वाटतं होती समीरा आणि जानकीला. सर्वजण आले आजीने सर्वांना एक - एक गोड पान बनवून दिला. समीरा नको म्हणाली तसं आजी म्हणाली, " घे बाळा याने काही नुकसान होणार नाही. उलट विड्याच्या पानाने पचन चांगला होतं. काहीजण विड्याच्या पानात तंबाखू, अतिजास्त चुना टाकतात ते शरीराला हानिकारक असतं. हे गोड पान आहे आणि कधी कधी खाल्ला तर चालत.  आपण आठवड्यातून एकदा फक्त विड्याच पान  चाऊन खाल्लं तरी आपली पचन क्रिया सुरळीत राहते आणि बरेच रोग दूर राहतात. आपल्या आसपास छोट्या छोट्या झाडा झुडपात औषधं आहेत. असो घे. "

समीरा पान घेते. अभिषेक तेलाची बाटली घेऊन आजीच्या समोर बसतो. गप्पा रंगतात. आजी अभिषेकला तेल लावत होती ते पाहून समीरा पण आजीच्या हातून तेल लावून घ्यायची इच्छा होते. समीरा आजी म्हणते, " आजी माझ्या पण डोक्याला तेल लावून दे. त्याला बाजूला कर. " लहान मुलाने बोलावं तसं समीरा बोलली त्यामुळे सर्वांना हसू आलं. अभिषेक बाजूला झाला आणि समीरा आजीच्या समोर येवून बसली. सुरकुत्या हाताने आजी हळू हळू तेल लावत होती. समीराला छान वाटतं होतं. समीरा मध्येच विषय काढते, " पणजी आजी तू पणजोबांना पहिल्यांदा कधी बघितलं होतंस? " आजी हसून उत्तर देते, " लग्नाच्या ८ महिन्यांनी. "
"काय?" समीरा आश्चर्याने बोलते. आजी पुढे बोलते, " बाळ तो काळ वेगळा होता. तेव्हा घरातील मोठी माणसं लग्न ठरवायची. आपला जोडीदार कोण? काय करतो? कसा दिसतो? काही माहित नसायचं फक्त लग्नाच्या दिवशी मांडवात जावून उभं राहायचं. डोक्यावरून मोठा पदर असायचा शिवाय आसपास खूप माणसं असायची त्यामुळे डोळे वर करून पाहायची हिम्मत सुद्धा व्हायची नाही. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा आपला नवरा किंवा आपली बायको कशी दिसते हे जोडप्याना माहित नसायचं. आता वेळ - काळ बदलला आहे. आता मुलंच सर्व ठरवतात आणि औपचारिकता म्हणून येऊन घरी सांगतात. "

जानकी मध्येच म्हणते, " पण आजी आपला जोडीदार आपण निवडला तर बिघडलं कुठे? उलट पुढचं आयुष्य सोपं जातं ना. "

आजी, " बरोबर बाळा काळानुसार बदलणं बरोबर आहे. पण आपला मूळ पाया कधीच विसरायचा नसतो. एकमेकांना समजून उमजून लग्न करणं वेगळं आणि फक्त आपण एकमेकांना अनुरूप वाटतो म्हणून लग्न करणं वेगळं. त्यामुळे प्रेम विवाह कमी प्रमाणात टिकतात. शिवाय तरुण मुलं जोशात निर्णय घेऊन मोकळे होतात तर आई वडील आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे यानुसार आपल्यासाठी निवड करत असतात. असं नाही म्हणत की प्रेम विवाह करू नये पण काहींना वाटतं की लग्न झालं आपण, आपलं प्रेम जिंकलं पण खरा संघर्ष हा विवाह नंतर सुरु होतो. त्यासाठी कायम तयार राहायला हवं. "

समीरा, " म्हणजे आजी? "

आजी, " एक आठ - दहा वर्षांपूर्वी आपल्या गावात राहणारी एक मुलगी आणि मुलगा आम्ही एकमेकांन वर प्रेम करतो आणि आम्ही लग्न करणारच. आम्हाला कोणी जबरदस्ती केली तर आम्ही आत्महत्या करू असे म्हणाले. जातीचा प्रश्न नव्हता, दोघे एकाच जातींचे होते पण तरीसुद्धा मुलीच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुलीला स्पष्ट सांगितलं की तुला जे करायचं ते कर फक्त त्यानंतर तुझा आणि आमचा संबंध संपला. मुलाच्या घरच्यांनी मुलाला गमवावं लागू नये म्हणून त्या दोघांचं लग्न लावून त्या मुलीला घरात घेतलं. त्या दोघांना वाटलं आपलं प्रेम जिकलं पण........"

" पण काय आजी? " समीराने उत्सुकतेने विचारलं.

आजी, " मुलाच्या आईच्या मनात भावाची मुलगी करायचं होतं. शिवाय तसं बहीण भावामध्ये बोलणं सुद्धा झालं होतं. भावाची मुलगी येताना दागिने आणणार होती आणि मुलाला त्याचा नवीन व्यवसाय सुरु करायला भाऊ मदत पण करणार होता. पण हे असं झालं आणि सगळंच बिघडलं. शिवाय मुलाच्या आईचे माहेरचे संबंध सुद्धा बिघडले. त्यामुळे त्या मुलीला घालून - पाडून बोलणं, त्रास देणं सुरु केलं. हे लग्न दोन्ही घरांना नको होतं ते झालं आणि त्या मुलीचा त्रास वाढला. मुलाला जो व्यवसाय सुरु करायला मदत मिळणार होती ती मिळाली नाही पुढे काही होतं नाही म्हणून त्याची चिडचिड सुरु झाली. मुलीने त्या मुलाला तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं तेव्हा तो तिच्यावरच चिडला म्हणाला, " माझ्या आई वडिलांनी, घरच्यांनी आपलं लग्न लावून घरात घेतलं. तेवढं त्यांनी केलं आणि तू माझ्या घरच्याबद्दल मला खोटं सांगतेस, तू आपल्यापासून सगळ्या गोष्टी बिघडल्यात. घरचे एवढे समजवून सांगत होते तिच्याशी लग्न करू नको पण मला काय झालं होतं काय माहित? " त्याचं असं बोलणं ऐकून तिला तिच्या वडिलांचे बोल आठवले. ते म्हणाले होते, " या मुलाकडे संयम, कर्तृत्व, स्वाभिमान असं काहीच नाही. दुसऱ्याच्या कुबड्या घेतल्याशिवाय हा पुढे जावू शकत नाही. आणि त्याकडून काही झालं नाही तर तो दुसऱ्यावर ढकललो. अश्या मुलाबरोबर संसार काय करणार तू? " तिला आता तिच्या घरच्याच बोलणं पटत होतं. पण आता काही उपयोग नव्हता. आता तो मुलगा काम मिळालं तर करतो नाहीतर दारू पिवून पडून राहतो. ती मुलगी दुसऱ्यांच्या शेतात काम करून दोन मुलांना सांभाळून घर चालवते. तरी सुद्धा तिची सासू अजूनही तिलाच दोष देते. त्यामुळे म्हणते की प्रेम विवाह चुकीचा नाही एकमेकांना किती ओळखता ते सुद्धा महत्वाचं आहे. आई वडील निवडताना चार जागी स्थळाविषयी चौकशी करतात, अनुभव असतो त्यांना माणसं ओळखता येतात. शिवाय आपल्या मुलाचे गुण - अवगुण नूसार या नात्यात जाणं योग्य असेल की नाही तेही त्यांना कळतं. मुलाने किंवा मुलीने निवडला असेल त्यांनी भेटून एकदा योग्य असल्याचे सांगितले की पुढे जायला हरकत नाही पण हट्ट म्हणून कधीच करू नये. आता आई - वडील सुद्धा आपल्या मुलांच्या निवडीची कदर करतात. त्यामुळे आता सहसा घरातून विरोध वगैरे फारसे होतं नाहीत. पण जर होतं असेल तर एकदा पुन्हा विचार करायला काय हरकत आहे."

" आजी म्हणजे घरचे निवडतात ते कधीच चुकत नाहीत असं म्हणायचं आहे का तुला? " जानकी

" नाही बाळा, मला असा नाही म्हणायचं. त्यांच्या निवडी सुद्धा कधी कधी चुकतात. मी फक्त एवढंच म्हणते की ते शक्य तितकं तुमच्या साठी उत्तम करतात." आजी.

" पणजी आजी, मला असं कळलं की तू आजोबांची सावत्र आई आहेस. मग एका आधीच लग्न झालेल्या आणि मुलं असलेल्या मुलाशी लग्न लावून देणारे तुझे आई - वडील सुद्धा तुला बरोबर वाटतात? " जानकी.

" बाळा तुला कोणी सांगितलं की तुझ्या पणजोबांना माझ्यासाठी माझ्या घरच्यांनी निवडलं होतं? " आजी.

" कोणी म्हणजे आता तूच म्हणालीस ना की घरचे ठरवायचे म्हणून. " जानकी.

" हो बाळा पण तुझ्या पणजोबाशी माझं लग्न माझ्या घरच्यांनी नाही तर नियतीने ठरवलं होतं, नशिबाने ठरवलं होतं. " आजी.


" आजी नीट सांग गं. असं गोल गोल फिरवून सांगू नकोस. " जानकी.

आजी सांगायला सुरुवात करते आणि समीरा कान आणि मन लावून आजीची गोष्ट ऐकायला सुरुवात करते.
आजी बोलते , " माझं माहेर खूप मोठं होतं. आता सुद्धा आपलं घर मोठंच आहे पण तेव्हा आता पेक्षा मोठी घरी असायची, एकत्र असायची. आजी, आजोबा, पणजी, ७ ते ८ काका, काकी, आत्या त्यांची मुलं. घरातल्या बायकांचा पूर्ण दिवस स्वयंपाक घरातच जायचा. माझं लग्न ठरलं तेव्हा मी १२ वर्षांची होते. लग्न म्हणजे नक्की काय हे माहित नसायचं तेव्हा. नवीन कपडे, दागिने, छान - छान खाऊ मिळतो म्हणून मी खुश होते. त्यापलीकडे लग्न त्यावेळी मला माहित नव्हतं. माझं लग्न ठरलं, मुहूर्त ठरला. घरात लगबग सुरु झाली. जात्यावरची गाणी सुरु झाली. आधी आता सारखे कॅटरिंग नसायचे घरीच सर्व बनवावं लागायचं. त्यामुळे महिनभर तर अन्न धान्य निवडणे, पाखडणे, यादी बनवून त्यानुसार सामान आणायला सुरुवात करावी लागायची. कारण काही खरेदी करायची म्हटलं तर तालुक्याच्या गावी जावं लागायचं. काही णा काही राहणार म्हणून महिना, दोन महिने आधी तयार सुरु व्हायची. माझं लग्न ठरलं तसं माझं घरात होनारे लाड वाढले.    काका - काकीचे डोळे भरून यायचे, जो तो येता जाता डोक्यावरून हात फिरवायचा. मला या गोष्टी त्यावेळी फरश्या कळतं नव्हत्या. आई, आत्या, काकी सारख्या सासरी कसे वागावे यावर सूचना देत होत्या. हळद उत्तम पार पडली. लग्नचा दिवस उजाडला. आई - काकी, माझ्या आधी लग्न झालेल्या काही मैत्रिणी मला सजवत होत्या. पिवळ्या रंगाचं, काठा पदराच लुगडं नेसले होते मी. केसांचा छान खोपा केला होता काकीने, नथ, बिलवर, पाटल्या, तोडे, मोहन माळ, लक्ष्मीहार, बोरमाळ किती दागिने होते काय सांगू. अशी नटून सजून मी बसले होते आणि बाहेर गोंधळ ऐकू येवू लागला. काही वयस्कर बायका बाहेर कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत होत्या. पण बाहेर जे झालं होतं त्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं........ "

क्रमश............

(  सर्व वाचकांची माफी मागते. खूप उशिरा post करते. त्या पुढे एक दिवस आड post करण्याचा प्रयन्त करेन. )

🎭 Series Post

View all