अनोखी गाठ   भाग १०   मराठी कादंबरी

-----------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221

अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०       # मराठी _ कादंबरी

जानकी आणि समीरा तयार होऊन खाली येतात. खाली अभिषेक आणि स्वाती दोघींची वाट पाहत असतात. समीरा, जानकी आणि स्वाती गाडीत बसायला जातात तेव्हा अभिषेक स्वातीला आवाज देऊन बाजूला बोलावतो आणि एक्सट्रा स्काफ घ्यायला सांगतो. स्वाती पटकन जावून एक्सट्रा स्काफ घेऊन येते. जानकी पटकन जावून मागच्या सीट वर बसते आणि तिच्या बाजूच्या सीटवर स्वाती कब्जा करते. सीट फूल झाल्याने अभिषेक समीराला समोरच्या सीट वर बसायला सांगतो. समीरा जास्त काही न बोलता येवून अभिषेकच्या बाजूच्या सीटवर बसते.

सर्वांचा सुंदर प्रवास सुरु होतो. हवेत बोचणारी थंडी होती म्हणून जानकी अभिषेकला खिडकी बंद करायला सांगते त्यावर अभिषेक म्हणतो, " सकाळची हवा आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे स्वातीने आणलेले स्काफ कानाभोंवती गोंडाळून वातावरणाची मज्जा घे. " स्वाती एक स्काफ समीरालाही देते. समीरा कानाभोंवती स्काफ गोंडाळते आणि गाडीतून बाहेर पाहत असते. सगळीकडे धुकं पसरलं होतं. गाडीची लाईट पडेल तेवढाच रस्ता दिसत होता.

ती बोचणारी थंडीसुद्धा छान वाटतं होती. समीरा मध्येच अभिषेकला प्रश्न विचारते, " आपण गड पहायला थोडं उशिरा गेलो असतो तरी चाललं असता ना? एवढ्या सकाळी जायची काय घाई होती? "

अभिषेक आरश्यातून मागे स्वातीकडे पाहतो आणि दोघे हसू लागतात. समीरा गोंधळते आणि विचारते, " मी असं काय विचारलं जे तुम्ही हसताय? " त्यावर अभिषेक म्हणतो, " तू सकाळचा नाश्ता दुपारी आणि दुपारच जेवण रात्री करशील का? किंवा सकाळी नाश्ता नाही केला तर तू दुपारी जेवशील त्याला जेवण म्हणशील की नाश्ता? "

" काय बोलयोयस मला काही कळत नाहीये अभिषेक. प्लीज मला कळेल असं बोल. " समीरा थोडी वैतागून बोलते.

अभिषेक म्हणतो, " थोडा वेळ थांब तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. " समीरा हे ऐकून शांत बसते आणि पुढच्या प्रवासाचा आनंद घेते.

तीन - साडे तीन तासांचा प्रवास अभिषेकने २ तासात करून गाडी सिहंगडला आणली होती. गाडी गडाच्या पायथ्याशी येते. अभिषेक सर्वांना खाली उतरायला सांगतो आणि गाडी पार्क करायला जातो. सिंहगड नावाप्रमाणेच दिसत होता. सिंह आपली आयाळ पसरवून बसल्यासारखा. थोडं धुकं अजूनही होतं त्यात सिंहगड अगदीच देखणा दिसत होता. जानकी आणि समीरा मान वर करून गडाचा शेवट पाहायचा प्रयत्न करत होत्या. तेवढयात समीरा वर पाहत असताना तिचा तोल जातो, तोच अभिषेक पटकन तिचा हात पकडतो. समीरा सावरते आणि अभिषेक बाजूला होतो. आज पहिल्यांदा एका मुलाचा स्पर्श जो खूप वेगळा होता, ज्यात प्रामाणिकपणा होता, एक निरागस भाव त्या स्पर्श मध्ये जाणवला.

सर्वजण गड चढायला सुरुवात करतात. एक एक पायरी चढताना एक वेगळंच चैतन्य जाणवत होतं. थंडगार वारा अंगावर झेलत सर्वजण वर चढतात. खूप लांबपर्यंत चालल्यावर अभिषेक एका जागेवर अचानक वळतो आणि वर चढतो. समीरा, जानकी आणि स्वातीसाठी ती जागा उंच असल्यामुळे त्यांना वर चढायला जमत नव्हतं. अभिषेक एक एकाला हात देऊन वर घेवू लागला. स्वाती आणि जानकी वर आल्या, समीराला अभिषेकने हात दिला. समीराला वर चढत असताना अभिषेकने तिचा हात घट्ट धरला आणि वर खेचलं. समीरा वर चढली आणि डळमळली. अभिषेकने हाताची पकड अजून मजबूत केली आणि तिला आपल्या दिशेने ओढलं. त्या खेचण्यामुळे समीरा अभिषेकच्या अगदी जवळ आली. समीराचं डोकं अभिषेकच्या धातीवर होतं. त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू आली तिला. ती चटकन बाजूला झाली आणि अभिषेक पण काही झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. या सगळ्या प्रकारकडे स्वाती आणि जानकीच लक्षच नव्हतं. ते तर दुसरीकडेच पाहत होत्या. या दोघी एवढं काय पाहतायत हे पहाण्यासाठी समीरा पुढे जाते आणि समोरचा नजारा पाहतच राहते.

ते एका उंच कड्यावर उभे होते आणि समोर धुक्याची शाल ओढून निसर्ग उभा होता. सूर्यदेव आपलं डोकं हळूहळू वर काढत होते. त्यामुळे कोवळी किरणे निसर्गाला सोन्याचा मुलामा देत असल्याचा भास होतं होता. आपण वर आकाशात उभे आहोत असा भास सर्वांना होतं होता. बोचणाऱ्या थंडीमध्ये सूर्यदेवाची कोवळी किरणे एक वेगळीच उब देत होते. हा नजारा असाच डोक्यासमोर राहावा असंच वाटतं होतं. बराच वेळ असाच गेला ते सर्व निहाळण्यात. ऊन डोकं वर काढायला लागल्यावर अभिषेकने खाली उतरायला सांगितलं. समीरा आणि जानकी तर सर्व पाहून दंग होत्या.

अभिषेक खाली उतरतो आणि एक एक जणीला खाली यायला हात देतो. समीरा अभिषेकच्या हातात हात देते. समीराला अभिषेकच्या स्पर्शात एक विश्वास,एक ममत्व जाणवत होतं जे याआधी तिला कधीच जाणवलं नव्हतं. अमेरिकेत वाढलेली समीरा, तिला मित्र - मैत्रिणीसोबत सोबत गळ्यात गळे घालून फिरायची सवय असून आज अभिषेकच्या स्पर्शाने शहारली. गड उतरताना निसर्ग आपला रंग कसा उधळतो ते दिसत होतं. खाली आल्यावर अभिषेक सर्वांना नाश्ता करायला सांगतो. सर्वजण धाब्यावर नाश्ता करत असतात तेव्हा स्वाती अभिषेकला म्हणते, " दादा माझ्या एका मैत्रिणीचं घर थोडं पुढेच आहे. मी जावून येवू का? " अभिषेक होकार देतो.

स्वाती जानकी आणि समीरा चला म्हणते. सर्व निघतात पण अभिषेक तिथेच बसून असतो. समीरा त्याला म्हणते, " तू नाही येणार का? " त्यावर अभिषेक नाही म्हणतो. " तुम्ही जाऊन या मी थांबतो इथेच. " अभिषेक.

"का?" समीरा विचारते. अभिषेक म्हणतो, "असंच."

मग समीरा म्हणते, " जानकी, स्वाती तुम्ही जावून या मी अभिषेक सोबत इथेच थांबते. "

स्वाती आणि जानकी स्वातीच्या मैत्रिणीच्या घरी जातात. अभिषेक समीराला म्हणतो, " इथे थोडं पुढे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. जायचं का? "

समीरा हो बोलते. ते दोघेही चालत चालत निघतात. समीरा अभिषेकला विचारते, " तू स्वातीच्या मैत्रिणीच्या घरी जायला नाही का म्हणालास? "

" समीरा हे शहर नाही गाव आहे. इथे मुलांशी मुली बोलत पण नाहीत. मुलगा - मुलगी बोलताना जरी दिसलें तरी गावभर बोभाटा होतो. नाव ठेवतात. मी तिचा भाऊ असलो तरी माझं तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणं योग्य नाही म्हणून नाही म्हणालो. " अभिषेक.

" मग माझ्यासोबत कसा फिरतोस? " समीरा.

अभिषेक हलकसं स्मित हसू करून बोलतो, " समीरा तू माझी नातेवाईक आहेस. त्यामुळे चालत. कळलं? "

" हो कळलं. " समीरा सुद्धा खट्याळ हसून म्हणते.

बोलता बोलता दोघेही मंदिरात पोहचतात. मंदिर अगदी छोटंसं पण निर्मळ, स्वच्छ आणि भक्ती भावाने भरलेलं होतं. मंदिरात पाऊल ठेवताच समीराला खूप हलकं वाटू लागलं. महादेवाच्या पिंडिसोमर बसून हात जोडले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. समीराला हे सर्व पहिल्यांदा जाणवत होतं. अभिषेक आणि समीरा बाहेर येवून पारावर बसतात.

समीरा म्हणते, " अभिषेक असं पहिल्यांदा झालं की देवासमोर हात जोडले आणि डोळ्यात पाणी आलं. एवढ्या मोठं मोठ्या मंदिरात जावून आले मी पण आजवर असं कधी झालं नाही. "

" समीरा मंदिर मोठं की छोटं यावर काही नसतं. महत्वाची असते आपल्या मनातली भावना आणि भक्ती - भाव. जिथे मनाला शांती आणि समाधान मिळेल तेच खरं मंदिर. तुझ्या डोळ्यात हात जोडल्यावर पाणी आलं असं म्हणालीस ना, म्हणजे तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहचली. असं आजी म्हणते. " अभिषेक समीराला समजवून सांगत होता.

थोडा वेळ शांततेत गेल्यावर अभिषेक समीराला विचारतो, " समीरा राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू? "

" अरे असं का विचारतोयस? विचार ना. " समीरा म्हणते.

" समीरा त्यादिवशी मी तुला रूममध्ये बोलवायला आलो होतो त्यादिवशी तुला नक्की काय झालं होतं? तू त्यादिवसापासून उदास आहेस. मला सांगण्यासारख असेल तर सांग. काही मदत हवी असेल तर मी आहे. " अभिषेक समीराच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो.

समीराला कळत नव्हतं की काय बोलावं. तिच्या मनात अनेक  भावना होत्या. तिचा झालेला विश्वासघात सर्वच मनात खदखदत होतं. अभिषेकच्या " मी आहे " यावर समीराला रडू कोसळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि अभिषेक तिला म्हणू लागला," प्लीज रडू नकोस. मी तुला त्रास देतोय असं समजून मला मारतील लोक. " हे अभिषेक ज्या प्रकारे बोलत होता ते ऐकून मध्येच समीराला हसू आलं. स्वतःला सावरून समीरा अभिषेकला काही सांगणार तोच तिच्या मनात आलं की अभिषेकला हे आवडलं नाही तर? त्याच्या मनात माझ्या बद्दल काही वेगळं तर येणार नाही ना? म्हणजे तो माझ्यासोबत आधी सारखाच वागेल की त्याचं वागणं बदलेल? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात येतं होते. पण त्याला नाही सांगितलं तर मनात राहिलं माझ्या आणि त्रास होतं राहिलं. 

अभिषेक म्हणतो, " समीरा, मला सांगण्यासारखं नाहीये का? तसं असेल तर नको सांगुस पण उदास राहू नकोस, हसू छान वाटतं तुझ्या चेहऱ्यावर. अजून एक तुला कधीही काही सांगायचं असेल तर एक मित्र म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. "

अभिषेकचं बोलणं ऐकून समीराला ठरवते अभिषेकला सर्व सांगायचं. समीरा अभिषेकला सर्व सांगते. अगदी लिवइन मध्ये राहण्याच्या निर्णयापासून ते त्याच्या फोनवर झालेल्या सर्व गोष्टींपर्यंत सर्वच. अभिषेक समीराचा हात हातात घेऊन म्हणतो, " असं होतं समीरा जेव्हा आपल्याला गोष्टींच महत्व, त्याचं अस्तित्व माहित नसतं तेव्हा अश्या चुका होतात. माणूस ओळखायला सुद्धा यायला हवा समोरचा ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. " अभिषेकचं बोलणं ऐकून समीराला खूप बरं वाटतं. तिला त्याने एवढ्या छान प्रकारे समजून घेतल्यामुळे समीराचा अभिषेकच्या प्रति स्नेह वाढला होता.

अभिषेक पुढे म्हणतो, " समीरा तुला जर खरंच प्रेम, नातं,  नात्याचं अस्तित्व, त्यासाठीचा त्याग याविषयीं जाणून घ्यायच  असेल तर तू आपल्या आजीला विचार आपल्या आजीचा जीवन प्रवास या सर्वांनी पुरेपूर भरला आहे. "

" म्हणजे? " समीरा आश्चर्याने विचारते.

अभिषेक म्हणतो, " ते तुला तिची अनोखी स्टोरी ऐकल्यावर कळेल. पण एक आहे तू त्यातून प्रेम, जिव्हाळा आणि नाती याविषयीं नक्कीच खूप काही मिळवशील. "

समीरा अभिषेककडे पाहत राहते. मध्येच ती त्याला प्रश्न विचारते, " अभिषेक तुला एक प्रश्न विचारू? "

अभिषेक हसून होकारार्थी मान हलवतो.

समीरा विचारते, " तू इंजिनीरिंग शहरात राहून केलंयस मग एखादी गर्लफ्रेंड वगैरे... "

अभिषेक समीराकडे पाहून विचारतो, " असं मध्येच काय आठवलं तुला? "

"असंच " समीरा.

" माझ्या मागे होत्या दोघी जणी. त्यातल्या एका मुलीचे डोळे निळे होते. दिसायला पण खूप सुंदर होती आणि..... " अभिषेक पुढे काही बोलणार तोच समीरा रागाने म्हणते, " तुला तुला फक्त गर्लफ्रेंड होती की नाही एवढंच विचारलं, कौतुक नाही विचारलं. " समीरा चिडून बोलते.

"ना...नाही... नाही... नव्हती.." अभिषेक चाचपून बोलतो.

समीराला स्वतःच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं होतं. तिला नक्की कसला राग आला ते कळत नव्हतं.

जानकी आणि स्वाती तिच्या मैत्रिणीच्या घरून येतात आणि ते सर्व घरी निघतात.

आजीची अनोखी कहाणी नक्की काय असेल? समीराला प्रेम, समर्पण, त्याग या गोष्टी कळणार का? अभिषेकच्या तोंडून दुसऱ्या मुलीचं कौतुक ऐकून समीराला राग का आला असेल? जाणून घेऊया पुढील भागात...

क्रमश.....

( मी माझं काम ( जॉब ) आणि शिक्षण सांभाळून लेखन करते त्यामुळे भाग post करायला वेळ लागतो. वाचकांनी थोडं समजून घ्यावं ही विनंती...)

🎭 Series Post

View all