अनोखी गाठ १७  मराठी कादंबरी

--------

अनोखी गाठ १७  # मराठी _ कादंबरी


© आरती पाटील 


( मागच्या भागात आपण पाहिलं की, सरस्वती ताईंशी कावेरीची छान गट्टी जमली होती. दोघी एकमेकांना समजून घेत, आधार देत. एके दिवशी दोघी गोधडी शिवत असताना दोन मुले येतात. एक सरस्वती ताईंच्या गळ्यात हात टाकून तर एक त्यांच्या मांडीवर बसला. त्या मुलाने सरस्वतीला हळूच काहीतरी विचारलं. त्यावर सरस्वती मोठयाने त्याला म्हणाली, " हो, हीच तुझी नवी आई. " यावर कावेरी आश्चर्य चकित होते. मुले गेल्यावर कावेरी याबाबत सरस्वती ताईंकडे विचारणा करते. सरस्वती ताई तिला सर्व सत्य सांगते. त्यामुळे कावेरीच्या मनात अजूनही न पाहिलेल्या नवऱ्याबद्दल आदर वाढतो... आता पुढे.....)

आजीची आगळी - वेगळी कहाणी ऐकताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. जानकी म्हणते, " आजी पुढे सांग ना. " त्यावर आजी म्हणते, " बाळांनो, आता खूप रात्र झाली आहे. आता सर्वजण झोपा. राहिलेली गोष्ट नंतर सांगेन. "
समीरा, " नंतर कधी गं आजी? आताच सांग. "
आजी, " असं नाही करायचं बाळा, खूप रात्र झाली आहे ना. आता झोपा उद्या पुन्हा आपण येथेच झोपायला येवू तेव्हा पुढची गोष्ट सांगेन. चला आता झोपा. " सर्वांचा नाईलाज होते. सर्वजण अंगावर चादर ओढून घेतात पण झोप कोणालाच लागत नसते. सगळ्यांच्या डोळ्यासमोर आजीची फरफट फिरत होती. आजीचा त्रास मनाला टोचत होता.
सकाळी सर्वांना जरा उशिराच जाग आली. आजी मात्र आपल्या वेळेवर उठून आपल्या कामाला गेली सुद्धा होती. समीराला पणजी आजी आणि पणजोबा यांच्या नात्याचं कौतुक वाटतं होतं. दोघांनीही एकमेकांना पाहिलं नाही, बोलले नाही तरीही एकमेकांनविषयी आदर होता, विश्वास होता. आपण एवढे दिवस डेव्हिड सोबत होतो. आधी ओळख मग मैत्रीण त्यानंतर प्रेम. तरीसुद्धा मी त्याला समजू शकले नाही. समोर व्यक्ती असतानाच फक्त प्रेम असतं का? ते प्रेम समोर व्यक्ती नसताना संपत का? नाही.... नक्कीच नाही. आजीच्या गोष्टीतून एक गोष्ट नक्की कळली की, विश्वास आणि संवेदना महत्वाच्या. व्यक्ती समोर असो किंवा नसो, त्याच्याबद्दल सतत प्रेम आणि विश्वास असावा.
जानकी आणि समीरा तयार होवून खाली आल्या. घरात स्वाती सोडल्यास कोणी दिसत नव्हतं. जानकी आणि समीराने त्याबद्दल स्वातीकडे विचाराने केली असता, स्वाती म्हणाली ' सर्वजण आपापल्या कामात आहे. म्हणून कोणी दिसत नाहीये. ' जानकी आणि समीरा नाराज होतात. स्वातीला म्हणतात, "मग आज काय करायचं? घरातच दिवस जाणार का? "  स्वाती म्हणते, " घरात कंटाळत असाल तर एक सुचवू? "  जानकी आणि समीरा आशेने तिच्याकडे पाहत ' हो ' म्हणतात.  स्वाती म्हणते, " माझ्यासोबत शेतात चला. शेती पण पाहून होईल. अभिषेक दादांचा प्रोजेक्ट पण पाहून होईल आणि तुम्हाला पण प्रसन्न वाटेल. "
शेती म्हणल्यावर दोघीनाहीं जायचं नव्हतं पण घरात बसण्यापेक्षा तिथे जाऊ असं त्या ठरवतात. स्वाती दुपारी खूप  जेवण घेऊन निघते. ते पाहून जानकी आणि समीरा तिला विचारतात, " एवढं जेवण कशाला? " त्यावर ती म्हणते, " आपल्या शेतात जे काम करतात त्यांच्यासाठी आहे. आणि दुसऱ्या दुरडी मध्ये आपल्यासाठी. ""दुरडी म्हणजे?" जानकीने विचारले." अगं दुरडी म्हणजे ही बांबू पासून बनवलेली टोपली. " स्वाती टोपलीकडे बोटं दाखवत म्हणाली."ओह... याला दुरडी म्हणतात. " असं म्हणत जानकी ती टोपली हातात घेते आणि तिघींही शेतात निघतात.
बाहेर ऊन खूप असतं. जानकी आणि समीराला त्याचा त्रास होऊ लागतो. समीरा आणि जानकी शक्य तितकं आपलं शरीर स्काफने कव्हर करत होत्या. शेतात पोहचताच स्वाती त्या दोघींना शेतात बनवलेल्या छोट्याश्या घरात नेते. दोघीनाहीं खूप बरं वाटतं. त्या घराला मोठा ओटा होता त्यावर गवताच छप्पर होतं. आजूबाजूला विविध झाडे होती. त्या झाडांची दाट सावली तिथे पडत होती. उन्हातून येताना जो त्रास त्या दोघींना जाणवत होता, इथे सावलीत बसल्यावर त्यांना तो गारवा सुखद वाटू लागला.
 स्वातीने सर्वांना जेवायला बोलावलं. सर्वजण विहिरीवर जावून हात - पाय स्वच्छ धुवून जेवायला आले. अभिषेकही आला. सर्वजण आनंदाने जेवत होते. असं सर्वांना जेवताना पाहून जानकी आणि समीराला त्यांच्या फ्रेंड्स सोबतचं डिनर आणि लंच आठवलं. मनोमन दोघीनाहीं जाणवत होतं की त्या हॉटेल्स मधल्या जेवणापेक्षा या जेवणाची चव सरस आहे. गप्पा - गोष्टी करत जेवण पूर्ण झाले. थोड्यावेळ बसून सर्वजण परत कामाला गेले.
कितीही नाकारलं तरी जानकी आणि समीरा दोघीनाहीं शेत आवडल होतं. आजूबाजूला अनेक रंगांची, आकाराची, छोटी - मोठी, वासाची - बिनवासाची फुले. त्यावर उडणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरू, चतुर त्यांनी पहिल्यांदा अनुभवलं होतं. एवढं कडक ऊन असताना त्या उन्हात आणि शेतात राबणारी ती साधी - भोळी माणसं.
समीराला बांधावर असणाऱ्या फळ झाडांकडे जायचं होतं. फळे तोडायची होती पण तिथे पोहचेपर्यंत बऱ्याच उन्हातून जावं लागणार होतं. समीरा व्याकुळ होवून त्या बांधावरच्या झाडांकडे पाहत होती. अभिषेकच्या ती गोष्ट लक्षात आली. समीरच्या जवळ जावून त्याने तिला विचारलं, " काय झालं? फळं हवी आहेत का? " समीरा चमकून त्याच्याकडे बघते. विचार करते ' याला मनातलं कळतं का?' तो पुन्हा विचारतो. समीरा होकारार्थी मान डोलावते. तो म्हणतो, " अगं मग जा आणि घे. का तूला एखादा मंत्र येतो? तो तू इथून बोलणार आणि फळं आपोआप तुझ्याकडे येणार? " अभिषेकने हसत तिला विचारलं. समीरा खोट्या रागाने अभिषेककडे बघते आणि नंतर त्याला म्हणते," ऊन बघ. " त्यावर अभिषेक म्हणतो, " एवढंच ना एक मिनिट. " असं म्हणून तो घरात जातो आणि एक बांबूपासून बनवलेली छत्री घेऊन येतो. ते पाहून समीरा म्हणते, " इकडे सगळ्या गोष्टी अश्याच बनवतात का? नाही म्हणजे जेवण ठेवायला दुरडी, बांबूची छत्री, हात पंखा नारळाच्या पानांपासून बनवलेला. नॉर्मल गोष्टी वापरातच नाहीत का? " हे ऐकून अभिषेक म्हणाला, " या नॉर्मल गोष्टीच आहेत. पूर्वीपासून याचं वापरल्या जायच्या.  आता ज्या गोष्टी वापरतात ना त्या नॉर्मल नाहीयेत असं म्हण. " हे ऐकून समीराला आता आपला मुद्दा बरोबर सिद्ध करायचा असतो.
ती म्हणते, " कसं? ते सांग. "अभिषेक म्हणतो, " या सर्व गोष्टी नॅचरल आहेत. यामुळे निसर्गाला पुढे काही त्रास होणार नाही. आणि आता आपण ज्या गोष्टी वापरतो त्यामुळे निसर्गाला पुढे त्रास होणार, आणि त्याच्यासोबत आपल्याला सुद्धा. प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तू खूप वापरतो आपण जसं बघ, डब्बा, बॉटल, घरात किराणा ठेवायला डब्बे, चमचे, दुकानातून येणार सामान सुद्धा प्लास्टिक मधून येत. शिवाय मोबाईल, कॉम्पुटर, पेन रिमोट पासून जवळ जवळ सर्व गोष्टींमध्ये प्लास्टिक. विचार करून बघ. अशी कुठली गोष्ट आहे ज्यातं प्लास्टिक नाही वापरत? अगं तू ज्या छत्रीला नॉर्मल म्हणतेस त्याची मूठ सुद्धा प्लास्टिकची असते. या जगात सर्व नॅश्वर आहे प्लास्टिक सोडून. मग आता मला सांग आम्ही नॅचरल गोष्टी वापरतो त्या नॉर्मल आहेत की तूला वाटतात त्या? "
समीरा क्षणभर विचार करू लागली. 'खरंच आपण दिवसभर प्लास्टिक मध्येच वावरत असतो. कधी विचारच केला नाही असा आपण.' अभिषेक तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो. समीरा जेव्हा त्याच्याकडे पाहते अभिषेक खट्याळ हसतो आणि हातातली बांबूपासून बनवलेली छत्री तो तिला देतो. समीरा ती छत्री घेते. समीरा, जानकी आणि स्वाती छत्र्या घेऊन फलझाडांकडे जातात. जानकी आणि समीराला झाडावरची फळे हाताने तोडून खाताना आनंद होतं असतो. फळेही मधूर असतात. समीरा पेरू तोडत असताना स्वाती तिला म्हणते, " समीरा तो नको हा पेरू तोडून खा. हा खूप गोड आहे. " समीरा विचारते, " तूला कसं माहित हा गोड असेल? " त्यावर स्वाती म्हणते, " अगं याला पोपटाने चोच मारली आहे. " पोपटाने खाल्लेलं आपण खायचं? " जानकीने विचारलं.
" अगं इथे असं काही नसतं. पोपटाने चोच मारलेली फळे खूप गोड असतात. म्हणून लोकं पोपटाने चोच मारलेली फळे शोधातात. तू खाऊन बघ मग सांग. " स्वातीचं बोलणं ऐकून समीराने तो पेरू तोडून घेतला आणि तिथून वाहणाऱ्या ओहळामध्ये धुवून घेतला. एक घास घेताच तिचे डोळे मिटले गेले. ती कदाचित अशी चव पहिल्यांदाच घेत होती. खरंच पेरू खूप गोड होता. समीराने जानकीलाही दिला. आपल्या मातीशी तिचं एक नातं निर्माण होऊ लागलं होतं. स्वाती तिला शेतीबद्दल बरीच माहिती सांगत होती. समीरा तिला विचारते, " अभिषेक कुठे गेला? दिसत नाहीये तो. " त्यावर स्वाती सांगते, " तो त्याच्या प्रयोगाच्या शेतीत असेल. " हे ऐकून समीराची उत्सुकता वाढते. ती स्वातीला म्हणते, "चल आपण पण तिथे जाऊया. " 

स्वाती जानकी आणि समीराला घेऊन अभिषेक तिथे होता तिथे जाते. तिथे जाऊन जानकी आणि समीरा थक्क होतात. एकाच झाडाला पेरू आणि चिकू , एका फुलझाडाला तीन - तीन प्रकारची फुलं, एका जागेत काही काही अंतराने पिकांचे थर होते. समीराला लांबून नीट काही कळत नव्हतं म्हणून ती बघायला जवळ आली. खाली जमिनीवर एक पीक लावलं होतं. त्यावर बांबूपासून बनवलेला एक थर टाकला जसा आपण घर बनवताना वरचा माळा बनवताना टाकतो. त्यानंतर त्यावर दुसरं पीक , पुन्हा तिसरा बांबूपासून बनवलेला थर पुन्हा तिसरं पीक. मध्ये मध्ये लोखंडाचे पत्रे काळा रंग लावलेले होते. जानकी स्वातीला विचारते ," मध्ये - मध्ये काळा रंग लावलेले लोखंडी पत्रे का लावले आहेत ?" स्वाती सांगते ," अगं एकावर एक थर आहेत ना मग सूर्यप्रकाश खाली पोहचणार नाही. काळा रंग उष्णता शोषून घेतो , लोखंड लवकर तापतो, म्हणून काळ्या रंगाचे लोखंडी पत्रे लावले आहेत . त्यामुळे उष्णता रिफ़्लेकट होऊन खालच्या पिकांपर्यंत पोहचते. ते पाहून जानकी आणि समीरा दोघीनांही अभिषेकच्या बुद्धीच कौतुक वाटतं. थोडं पुढे तुतीची लागवड केली होती. जानकी विचारते ," हे कसलं पीक आहे ?" त्यावर स्वाती तिला समजावते, ही तुतीची झाडे आहेत हे पीक रेशीम बनवणाऱ्या किड्याना खाऊ घालतात. त्यापासून आपल्याला असलं रेशीम मिळत. अभिषेक घेत असलेल्या मेहनतीचं समीराला नवल वाटत. ती अभिषेकला म्हणते," अभिषेक , एक विचारू ?" 

" मी नाही म्हणणार आहे का ?" अभिषेक म्हणतो. समीरा म्हणते," तुझ्याकडे एवढं डोकं आहे, स्किल आहे , तू एक इंजिनीअर आहेस. इथे का वेळ वाया घालवतोयस ? तुला तुझ्या टॅलेंट वर खूप छान पॅकेज मिळेल. हे ऐकून अभिषेक हसू लागतो. समीरा त्याला विचारते ," मी जोक केला आहे का ?" अभिषेक तिचा हात धरतो आणि एका झाडाच्या पारावर बसवतो. ती म्हणतो," समीरा , शेती ही खूप मोठी उद्योग संस्था आहे. शेतीशिवाय कोणताही उद्योग होऊ शकत नाही. हा शेती करताना योग्य बदल, योग्य योजना, योग्य निर्णय घेतले तर शेतीसारखी इनकम दुसरीकडे कुठेच नाही. आता बघ, एका झाडाला दोन फळ आली, एका फुझाडाला तीन प्रकारची फुले, थराची शेती. एवढं का करतोय मी? एक एकर मध्ये तीन एकरचं पीक मिळालं तर गरीब शेतकऱ्यांचा किती फायदा होईल. अजूनही शेतकरी परंपरागत शेती करतो पण रासायनिक खत वापरतो. या रासायनिक खतांमुळे कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणावर हात - पाय पसरतोय. शेतीत बदल करायचा आहे, ज्या बदलाची सुरुवात आजीने केली , त्याला मला पुढे न्यायचं आहे. 

" आजीने ?..............." समीरा.

" हो , आजीने ." अभिषेक ...........

क्रमश ........................

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

🎭 Series Post

View all