रणसंग्राम - एक झुंजार भाग ४
भाग १ - रणसंग्राम १
भाग २ - रणसंग्राम २
भाग ३ - रणसंग्राम ३
मागील भागात-
अमरचं आय.टी. पार्क प्रपोजल कारखानीसांना खुप आवडलं आणि ते त्या कामासाठी लागले. गायत्रीला लोकांनी खुप छान प्रतिसाद दिला. अमरला एअरपोर्टवर रिसिव्ह करण्यासाठी गायत्री, अभी व आदिनाथ घरुन निघाले. तिकडे रंगा नावाचा गुंड अमारच्या राहत्या घराकडे निघाला.
---------------------------
पी.ए. दळवी कडुन रंगा बद्दल कळताच विजयसिंहांनी त्यांची काही माणसं लगेच पोलिस स्टेशनकडे पाठवली. काही वेळाने रंगा खरोखर बाहेर आला आणि तो शिरुरच्या दिशेने निघाला. अमरच्या घरी जाण्याचा त्याचा मनसुबा असावा असा विजसिंहांनी अंदाज बांधला. त्याची हालचाल कळताच त्याला पकडायचं निश्चित केलं.
पण तिथेच डाव फसला...
अमरची फ्लाईट संध्याकाळी ८ वाजता लॅंड होणार होती.
विजयसिंहांना मनातुन खुप अस्वस्थ वाटत होतं.
८ वाजतांच त्यांनी अमरला फोन करणं सुरु केलं पण लागत नव्हता आणि नंतर तो उचलत नव्हता.
त्यांनी एक मिनिटभर डोळे बंद केले आणि अचानक डोक्यात विचार आला
"गायत्री, आदिनाथ दोन महिन्यापासुन इथेच आहेत त्यामुळे अमर त्याच्या घरी जाण्याचा प्रश्नच नाही. मग रंगाला तिकडे पाठवुन काय साध्य होणार…!
ते सगळे तर एअरपोर्टवर…!
अरे देवा ssss….!"
विजयसिंह सिक्युरिटी घेऊन तडक त्या दिशेने जाण्यासाठी बाहेर पडले. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर दिनानाथ हॉस्पिटलमधुन फोन आला आणि ते लगेच तिकडे वळले.
हॉस्पिटलमधील दृश्य बघुन ते पुर्णपणे कोसळले. कोणाशी काहीही बोलण्याची मनस्थिती राहिली नाही. पी. ए. दळवी सोबतच होते. त्यांनी ईश्वरी व कारखानीसांना दिनानाथमध्ये येण्यासाठी कळवले. अमरच्या गाडीचा खुप मोठा अपघात झाला होता.म्हणजे चिरागनीच तो घडवुन आणला होता.
गुन्हेगार रंगाला जेलमधुन अमरच्या घराकडे पाठवणे ही चिराग आणि अमरच्या पार्टनर्सची चाल होती, दिशाभुल करण्यासाठी. विजयसिंह रंगाकडे लक्ष केंद्रित करतील आणि इकडे चिरागने एका मोठ्या ट्रकद्वारे अमरच्या गाडीला धडक दिली व त्यांची गाडी दरीमध्ये कोसळली. अमर-गायत्रीने अभिश्री आणि आदिनाथला गाडी दरीमध्ये कोसळण्याआधी दार उघडुन बाहेर काढले.
आदिनाथने तिला घट्ट पकडुन गाडी बाहेर उडी मारल्याने तिला खरचटलं सुध्दा नाही. आदिनाथला हात, पाय, पाठीवर बऱ्याच जखमा झाल्या. ते दोघं तर बाहेर पडले पण अमर, गायत्री, सिक्युरिटी मी. जाधव आणि ड्रायव्हर हरीला तेवढा वेळ मिळाला नाही. हरीने त्यांची गाडी कंट्रोल करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण अखेर ते दरीत कोसळले.
त्या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. थोड्या वेळात काही लोकांनी सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेलं.
दळवींचा फोन येताच इतर सगळे हॉस्पिटलमध्ये पोहचले. विजयसिंहांसारखीच अवस्था बाकी सर्वांची झाली.
१५ दिवस सर्व विधी आटोपले लोकांचे येणे जाणे झाले. विजयसिंह मात्र कोणाशी एक शब्दही बोलु शकत नव्हते. अमरला स्टील बिझनेस बंद न करु देणे, गायत्रीला निवडणुकीसाठी उभं करणे. हे निर्णय त्यांचे असल्याने झालेल्या प्रकरासाठी ते स्वतः लाच दोषी मानत होते. ईश्वरी आदिनाथ व विजयसिंहांना सांभाळण्याचा पुर्ण प्रयत्न करत होती.
अभिश्रीला तिचे काका काकी अपघाता मध्ये गेले एवढं ज्ञात झालं होतं. कारखानीस कुटुंब सर्वापरीने त्यांना आधार देत होते. अभिश्रीला सहसा करुन त्यांच्याच घरी घेऊन जात.
आदिनाथ थोडा थोडा सावरत होता पण महिना झाला तरीही विजयसिंहांनी स्वतःला एका रुममध्ये कोंडुन घेतले होते.
शेवटी आदिनाथनेच त्यांची समजुत घातली. जे झालं ते लोकांच्या वाईट प्रवृत्तीमुळे झालं त्याचा दोष त्यांनी स्वतःवर घेऊ नये. लहान वयातच खुप मॅच्युरिटी आली होती त्याला. त्यादिवशी पासुन त्याने ईश्वरी व विजसिंहांना आई बाबा मनानं व म्हणणं सुरु केलं. त्याच्या खंबीर आधाराने ते थोडे सावरले.
आदिनाथच्या मनात राजकारणा विषयी निर्माण झालेला राग त्यांना जाणवला. त्यामुळे विजसिंहांनी राजकारणातुन निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
पण ईश्वरीने त्यांना समजावलं अभिश्री आणि खास करुन आदिनाथच्या भविष्यासाठी त्यांना भक्कम आधार द्यायचा आहे, राजकारण सोडलं तर तो कसा देता येईल….!
आदिषच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांचा राजकारणात दबाव असणं गरजेचं होतं. मंत्रीपंद नाही तरी किमान आमदार म्हणुन तरी त्यांनी कार्यरत राहावं असं तिने मत मांडलं व त्यांनाही ते पटलं. शेवटी त्यांच्या विभागतील जनतेला सुध्दा असं पोरकं करणं ठीक नव्हतं.
आदिनाथच्या भविष्यासाठी ते पुन्हा उभे राहिले व कारखानीसांसोबत ' आदिष सोफ्टेक सोल्स ' कंपनी उभारणं सुरु केलं. दोघांनी पुढे परिस्थितीतुन सावरुन अमरचं स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेतला.
----------------------
पुढच्या महिन्या भरात परिस्थिती बरीच निवळली होती. एक दिवस विजसिंह व ईश्वरी त्यांच्या स्टडीमध्ये बसुन चहा पित होते.
"फक्त नियती म्हणुन आपण ही परिस्थिती मान्य नाही करु शकत. गुन्हेगारांना शिक्षा देणंही आवश्यक आहे."विजयसिंह
"बरोबर आहे तुमचं. ही कीड आत्ताच काढली गेली नाही तर पुर्ण घर पोखरुन काढेल" ईश्वरी
विजयसिंहांनी आपले सर्व सुत्र कामाला लावले. तिथुनच लॅंडलाईन वरुन काही फोन लावले. तो फोन खास गुप्त कार्यांसाठी वापरला जात. कोणीही तो नंबर ट्रेस किंवा रेकॉर्ड करु शकत नव्हतं.
"हॅलो कमिश्नर साहेब… विजयसिंह सरपोतदार बोलत आहे. आमच्या खाजगी कामासाठी तसदी देतो तुम्हाला… संपतराव शेलारांचा मुलगा चिराग आणि अम्म… अमरच्या पार्टनर्सचे मागील महिन्यातील सर्व रेकॉर्ड शोधुन काढा. ते कुठे गेले होते, कोणा कोणाशी भेटले. त्यांचे सर्व कॉल ट्रेस करा. या संदर्भात मी प्रत्यक्ष कोणालाच भेटणार नाही. यावेळेस मला कुठलीही चुक होउ द्यायची नाही"
"ठीक आहे सर… संपुर्ण पुणे पोलिस तुमच्या पाठीशी आहे. त्यांना गाजाआड केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही." कमिशनर
"धन्यवाद…" विजयसिंह
"मला असं वाटते गायत्रीचे वडील मोठे जज आहेत तर कायद्यानुरुप शिक्षा देण्यासाठी आपल्याला त्यांची मदत होईल." ईश्वरी
" हो.. त्यांच्या मार्गदर्शनानी केसमध्ये खुप फायदा होईल… पण खरं सांगु... मला आता त्यांच्याशी बोलण्याची हिम्मतच होत नाहीये. ते इथे आले तेव्हा कसा बसा मी त्यांना सामोरे गेलो" विजसिंह
"तुम्ही परत स्वतःवर दोष घेऊ नका बरं… असो आत्ता राहु देऊ. पुरावे गोळा होत आले की मग बोलु" ईश्वरी
चिराग आणि अमरच्या पार्टनर्स विरोधी बरेच ठोस पुरावे गोळा झाले. त्यांच्या फोन रेकॉर्डिंग वरुन स्पष्टपणे कळत होतं की त्यांनी हा सगळा कट कसा रचला.
गायत्रीच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या विरोधात एक मजबुत केस उभी राहिली.
अमर व गायत्री गेल्यानंतर चिरागला शिरुर मधुन उभं रहायचं होतं आणि फॅक्ट्रीमध्ये गैरव्यवहार सुरु करुन पैसा कमवायचा होता. पण केस सरपोतदारांच्या बाजुने अधिक बळकट होती. संपतरावांच्या पार्टीने चिरागला आमदारकीसाठी उभं राहण्यास विरोध केला. संपतरावही हतबल झाले. इच्छा असुन मुलाच्या मुर्खपणामुळे ते त्याची मदत करु शकत नव्हते. चिरागला ते सहन झालं नाही. आधीच तो नशेच्या आहारी गेला होता. आता तर हातचं आलेलं यशही निसटुन गेलं. त्याने जिवाच्या पलीकडे स्वतः ला नशेत झोकुन दिले आणि प्राण सोडले. त्याच्या मृत्युमुळे संपतराव पुर्णपणे खचुन गेले. त्यांची बायको सुध्दा मुलीला घेऊन निघुन गेली.
पुढे विजयसिंह आमदार म्हणुन निवडुन आले. त्यांची नवक्रंती पार्टी (NKP) नेहमीप्रमाणे सत्तेत आली.ठरल्याप्रमाणे यावेळेस त्यांनी मंत्रीपद घेतलं नाही.
अमरच्या पार्टनर्सला १२ वर्ष कारावासाची शिक्षा झाली. विजयसिंहांनी स्टील कंपनी विकली व प्रत्येकाच्या शेअर नुसार आलेला पैसा सर्व पार्टनर्सच्या कुटुंबीयांना दिला. अमरचा काही शेअर आदिषमध्ये लावला व काही आदिनाथच्या भविष्यासाठी शेअर्स, रियल इस्टेटमध्ये गुंतवुन ठेवला.
काळ हे सर्व त्रासांचं औषध असते पण घडलेली घटना ही प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतुन बसली होता.
दिवसामागुन दिवस जात होते. सरपोतदार व कारखानीसांचे संबंध अणखी घट्ट होत होते. कारखानीसांनी त्यांचा नवीन बंगला सरपोतदारांच्या जवळच बांधला. सर्व मुलांना एकाच शाळेत घातलं. अभिश्री व भार्गवी एका वर्गात आणि आदिनाथ व परीतोष एका वर्गात जाऊ लागले.
बघता बघता ११ वर्षांचा काळ लोटला. मुलांचा प्रवास आता शाळेतुन कॉलेजकडे वळला आणि त्यांच्या वाटा वेग वेगळ्या झाल्या. पण त्यांच्यात असलेले आंबट, गोड, तिखट संबंध होते तशेच कायम राहिले.
-----------------------------------
बाहेर हातपाय धुवून अभिश्री तणतणतच घरात शिरली.
विजयसिंह डायनिंग टेबलवर बसुन ईश्वरीसाठी मोगऱ्याचा गजरा बनवत होते.
"अहो sss झाशीच्या राणी…! कशी चालु आहे कॉलेज कल्चरलची तयारी." विजयसिंह
अभिश्री यंदा कॉलेजच्या फायनल इयरला होती. सध्या तिच्या कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्राम चालु होते.
"ठीक चालु आहे बाबा." अभिश्री
"गणु काका जेवले नाही तुम्ही सगळे अजुन…!"
"ताई ते.. ते जरा…!" गणु (घरातील जुना व विश्वासु नोकर)
"किती वेळ सांगितलंय तुम्हां लोकांना, वेळेवर जेऊन घेत जा..!" अभिश्री
"ते घेतीलच जेऊन. ये sss तु पण खाऊन घे" ईश्वरी
"तुम्ही दोघं बसुन घ्या आई sss. मी जरा डोक्यावर थंड पाणी घेऊन येते प्लीज." अभिश्री
"ह्म्म्म.. आता कुणावर रागावली म्हणायची स्वारी…!" ईश्वरी
"अहो sss.. ही कसली सवय लावुन ठेवली तुम्ही, राग शांत करण्यासाठी डोक्यावर पाणी घ्यायचं." विजयसिंह
"आता मला काय माहिती sss… या गोष्टीची इतकी गरज पडेल…! जाऊद्या sss... कोणाचं डोकं फुटण्यापेक्षा हे बरं आहे की…!" ईश्वरी
"ते आहे म्हाणा…! येऊ द्या तिला मग एकत्रच जेवु. तोवर हा गजरा मळुन देतो." विजयसिंह
विजयसिंह हळुच किचनमध्ये गेले व अलगद ईश्र्वरीला गजरा माळुन दिला.
"अहो sss… काय हे sss… किती वर्ष झाले, रोज हातांनी बनवुन गजरा माळता. शोभत का या वयात." ईश्वरी
" दिवसेंदिवस तुम्ही अजुनच सुंदर दिसता. त्यात आम्ही काय करणार. माझ्या हतच्या गाजर्यानी फुललेलं तुमचं रुप रोज बघायला आवडत मला म्हणुन करतो." विजयसिंह
ईश्वरी आजही त्या बोलण्याने लाजुन चुर्र झाली.
अभिश्री अंघोळ करुन डायनिंगमध्ये आली. तिचा राग थोडा निवळला होता.
"एवढा राग येणं बरं नाही अभीsss... पुढे कधी कोणाचं काम पडेल सांगता येत नाही. डोक्यावर बर्फ आणि तोंडत साखर ठेवावी लागते." ईश्वरी
"बाकी कोणाचा कधी एवढा राग कधी येत गं आई... हाच एक माणुस डोक्यात जातो. बोक्या सारखा नेहमी माझ्या आडवा येतो. एरवी तर बोलतोच पण आज लिमिट क्रॉस केली" आभिश्री
"परीतोष कारखानीस..." विजयसिंह
"ह्ममम…" आभिश्री
"तुमच्या दोघांमध्ये नक्की काय प्रोब्लेम आहे आम्हाला कळत नाही. तुम्हाला तो सोडवायचा की नाही ते तुम्ही बघा. पण तुला पुढे जायचं असेल तर येणाऱ्या रागाला योग्य दिशा द्यावी लागेल. ह्या रागाला अडथळा न बनवता स्टेपिंग स्टोन बनवता आलं पाहिजे" विजयसिंह
"बरोबर बोलत आहे बाबा तु…" आभिश्री
अभिश्रीला कॉलेज मधुन एक फोन आला. तिने फोन वर उत्तर दिले. "एका तासात कट्टयावर भेटु"
"यावर्षी कॉलेजच "२०१४ इलेक्शन" बिनविरोध राहणार नाही. कोणीतरी दिल्लीचा मुलगा आमच्या विरोधात उभा राहिलाय. पण तो म्हणजे बस बुजगवणं आहे. यामागचा सुत्रधार कोणीतरी दुसराच आहे. मला माहिती आहे हे कोणाचं काम आहे…
मला जेऊन लगेच भाईच्या ऑफिसमध्ये जाव लागेल." अभिश्री
"आदिनाथच्या…! त्यानी काय केलंय" दोघंही अश्चारचाकित होऊन अभिश्रीकडे बघत होते.
क्रमशः
(पुढील भाग मंगळवारी प्रकाशित करण्यात येईल)
अभिश्रीच्या मनात परीतोषबद्दल एवढा राग का होता…?
अभिश्रीच्या विरोधात त्या मुलाला उभं करणारा सुत्रधार नक्की कोण होता…?
अभिश्रीच्या राजकारणी कारकिर्दीच्या सुरुवातीतच काही अडथळा तर नाही येणार…?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.}
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा