रणसंग्राम - एक झुंजार भाग ३
भाग १ - रणसंग्राम भाग १
भाग २ - रणसंग्राम भाग २
मागील भागात-
अमरच्या पार्टनर्समुळे त्याला कंपनीमध्ये अडचण येत होती. ईश्वरीने त्यांना गायत्रीला आमदारकीसाठी उभं करण्याचा सल्ला दिला. पुजेच्या दुसऱ्या दिवशी अभिश्रीच्या वाढदिवसा निमित्त मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. गायात्री विषयी ऐकुन संपतरावांचा मुलगा चिराग खुप चिडला कारण त्याला त्या विभागातुन उभं रहायचं होतं.
----------------------
"हॅलो… चिराग बोलतोय… मी जे सांगत आहे ते आणि तसच झालं पाहिजे. रंग्याला एका रात्री साठी जेल मधुन बाहेर काढा. त्याचं काम झालं की पुन्हा आत पाठवा. पैश्याची फिकीर नाही…
जोवर त्या सरपोतदार घराण्याला नेस्तनाबुत करत नाही तोवर संपतराव शेलारचं नाव लावणार नाही…"
आणि पुन्हा तेच अमानवी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलं…
चिराग बाहेर पडताच विजयसिंहांनी पी. ए. दळवींना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं. त्यांनी ही लगेच आपली २ विश्वासु माणसं चिरागच्या मागावर लावली. हे काम संपतरांवाना कळु न देता करायचं होतं, कारण त्यांचं मत स्पष्ट कळलं नव्हतं आणि त्यात मुलावर असलेलं अंधप्रेम. थोड्या वेळानी संपतराव पार्टीतुन निघाले व अर्धवट नशेत असलेल्या चिरागला तिथुन घेऊन गेले.
पार्टीमध्ये आता फक्त खास आणि जवळचेच लोक राहिले होते. त्या खास लोकांमध्ये विजयसिंहांचे जवळचे मित्र आणि एक अत्यंत हुशार उद्योगपती प्रबोध कारखानीस सुध्दा होते. अमर आणि त्यांची पहिलीच भेट होती ती. पण त्याच्या हुशारीने ते अगदी हुरळून गेले होते. आपलं नवीन बिझनेस प्रपोजल समजुन घेण्यासाठी अमरने त्यांना दुसऱ्या दिवशी लंचसाठी सहकुटुंब घरी बोलावलं. कारखानीस आणि विजयसिंहांचे संबंध एवढे दिवस फक्त व्यावहारिक होते.
पार्टी आटोपुन थकुन भागुन सर्व घरी परतले.
-----------------------
दुसऱ्या दिवशी कारखानीस येणार त्यासाठी खास तयारी सुरु होती.
"अरे sss.. अमर… काय हा सगळा पसारा मांडुन ठेवलाय आमच्या किचनमध्ये…!
कारखानीस येतीलच थोड्या वेळात. आत्ताच पुर्ण स्वयंपाक करवुन सगळं आवरुन घेतलं होत ना रे…!" गायत्री
"चिल्ल… स्वीटहार्ट…!
किती ते टेंपर…!
गेस्टसाठी एक भारी वेलकम ड्रिंक बनवतोय मी. बस इथे आणि हे बघ थंडगार मोकटेल, टेस्ट करुन सांग कसं झालंय…! अमरसिंह
"हम्मम… झालंय छान पण तुझ्या एका मॉकटेल पायी आमचं अख्ख किचन उलथुन टाकलंस…" गायत्री
"हॅलो sss... व्हॉट डू यू मीन बाय आमचं किचन…!
का म्हणुन इथे स्त्रियांचीच मक्तेदारी…!
मॅडम लॉयर…आम्हालाही स्वयंपाकाचा तेवढाच अधिकार आहे म्हटलं संविधानात" अमरसिंह
"पुरे sss... आवर आता.. आधी तुझा अवतार ठीक करुन ये...
मी किचनचा करुन घेते. आणि ड्रिंक खरंच छान झालंय" गायत्री
"वाह sss…! चक्क बायको कडुन प्रशंसा. याला म्हणतात मेहनतीचं चीज…" अमरसिंह
तेवढ्यात मी. अँड मिसेस. कारखानीस व त्यांची मुलं परीतोष आणि भार्गवी आले.
"अरे अमर sss.. माॅकटेल पिण्यासाठी उरलंय ना…!
की पुर्ण शर्ट वरच संपलं..!" विजयसिंह
"बस sss.. का दादा….!" अमरसिंह
गायत्री डोळ्यांनी खुणावत त्याला आत पाठवत होती.
"अहो sss.. वहिनी राहु द्या...
नका दम देऊ त्याला, आपलेच लोक आहोत." कारखानीस
सर्वांना माॅकटेल खुप आवडलं.
"अमर भाऊजी मला याची रेसिपी द्याल नक्की. माझ्या कुकरी क्लास मध्ये शिकवेल म्हटलं." विदीता (मिसेस कारखानीस)
"हो हो sss... नक्कीच… हवं तर डेमो द्यायला पण येतो…!
बरं सगळे स्टडी रुममध्ये चला... जेवायला तसही अवकाश आहे. आपण आपलं प्रपोजाल डिस्कस करु" अमरसिंह
तिन्ही बायका पोर्च मध्ये निवांत गप्पा मारण्यासाठी निघाल्या.
"हॅलो sss…! लेडीज... तुम्ही पण यायचंय…
असं काय बघत आहा, सॉफ्टवेअर इज अ मॅजिक, जादू बघायला म्हणुन चला" अमरसिंह
भार्गवी व अभिश्री एकाच वयाच्या असल्याने त्यांची लगेच गट्टी जमली आणि दोघी बाहेर खेळायला निघुन गेल्या.
परीतोष, आदिनाथ आणि सगळे अमरच्या स्टडी रुममध्ये जमले. ती रुम म्हणजे एखाद्या साईंटिस्टची लॅबंच. विविध प्रकारचे गॅजेट्स कंप्युटर, कीपॅड मोबाईल्स, सीडी, फ्लॉपी, ब्रॉड बँड, ज्यांची त्यावेळी सहसा कोणाला नावही माहिती नव्हती.
"आय नो sss... तुम्हाला या गोष्टी बोअरिंग बिझनेस डिस्कशन असं वाटत असेल पण खर तर हे त्याच्या कितीतरी पलीकडे आहे. म्हणुन मी आवर्जुन सर्वांना बोलावलंय. यातले काही गॅजेट्स आपल्या परिचयाचेही आहेत. जसं हा मोबाईल... कुठूनही कुठेही आपण बोलू शकतो, कंप्युटर ज्यामध्ये आपण कुठली माहिती ठेऊ शकतो, शोधू शकतो. आज २००४ मध्ये या गोष्टी फक्त बिझनेससाठी जरी वापरल्या जात असतील तरी पुढच्या १० वर्षात याच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनणार आहेत. या कंप्युटरमध्ये इंटरनेट नावाचं मध्यम आहे ज्यामुळे आपण संपुर्ण जगाशी काही सेकंदात जोडले जातो.
मी नुकतच US ला काही कॉन्फरन्स अटेंड करून आलोय. तिथे त्यांचे फ्युचर प्लॅन्स अचंबित करणारे आहेत. हे सॉफ्टवेअर्स जेव्हा मोबाईलमध्ये येतील तेव्हाअगदी सामान्य माणसाच्या मुठीत जग सामावून देतील.
आज जर या बिझनेसमध्ये आपण शिरलो तर पुणे हे विद्येसोबत आय.टी.च ही माहेर घर होईल.
"पण त्याचा आम्हाला नक्की कसा उपयोग होईल…?" विदीता.
"विदीता वहिनी तुमचं कुंकिंग स्किल तुम्ही घरी बसुन जगाला शिकवु शकाल, गायत्री तुझी पुर्ण लॉची लायब्ररी एका कोपऱ्यात बसेल या कंप्युटरच्या. वहिनी तुमच्या चेस काॅंपिटिशन, ट्युटोरियल्स सुध्दा घेता येतील, दादा तुझ्या इलेक्शन कॅंपेन साठी पुढे यांची खुप मदत होईल.
आज फेसबुक हा प्रकार नुकताच आलाय. पुढे ही मुलं आपण, मित्र, नातेवाईक सर्व एकमेंशी त्यानी जोडले जाऊ" अमरसिंह
"म्हणजे sss.. आपण एकमेकांना बघु सुध्दा शकू" परीतोष.
"नक्कीच…! लवकरच…" अमरसिंह.
परीतोषला नुकतंच कॅमेराचा छंद जडला होता. सर्वत्र तो कॅमेरा गळ्यात घेऊन फिरत. त्याने तिथे असणाऱ्या सर्व गॅजेट्सचे फोटो घेतले.
"मला खरंच खूप आवडेल हे सगळं शिकायला." आदिनाथ
"अफकोर्स…! तुमच्या दोघांच्या फ्युचर साठीच आहे हा..
आपला आय. टी. पार्क ड्रीम प्रोजेक्ट…" अमरसिंह
"ठरलं तर मग…!
आज पासुन आपला आय.टी पार्क प्रोजेक्ट चालु. अमर खुप हुषार आहेस तु. भविष्य बघण्याची क्षमता आहे तुझात. तुला जी मदत लागेल ती माझ्याकडुन मिळेल पण हे प्रोजेक्ट झालंच पाहिजे" प्रबोध कारखानीस
"काय sss.. परीतोष आणि आदिनाथ करायचं न मग…!" विजयसिंह
दोघंही उत्साहात
"हो हो…"
"ग्रेट…! आजच कामाला लागु. पण नाव काय ठेवयचं आपल्या कंपनीचं…?" अमरसिंह
"ह्ममम… "आदिष" कसं राहील…! आदिनाथ आणि परीतोष मिळुन" गायत्री
"परफेक्ट…!" विदिता कारखानीस
"चला sss… तुम्ही आता पुढचं प्लॅनिंग करा. आम्ही तोवर जेवायचं गरम करुन घेतो.
आदी sss... अभी आणि भार्गवीला बोलाव जेवायला." ईश्वरी
"ओके मोठी आई…चल परीतोष.." आदिनाथ
पुढचं थोड फार बोलणं झालं आणि सर्व जेवायला बसले पण मुलं काही आलीच नाही.
आदिनाथ धावत धावत डायनिंग मध्ये आला…
"मोठी आई sss.. ती अभी sss… रक्त…!!!"
सगळे घाबरुन बाहेर पळाले.
अभिश्री परीतोषच्या पाठीवर बसुन त्याला बडवत होती. ओठातुन रक्त येत होतं त्याच्या. तेच बघुन आदिनाथ घाबरला.
"अभी sss… तुझा राग अनावर झाला की काहीही भान नसतं तुला..." ईश्र्वरी
"मी काय करणार आई…! आज पहिल्यांदाच भेटलो आम्ही आणि तो माझ्या अजिंक्यला किती चिडवत होता तो…!
म्हणे घोड्याचं नाव कोणी अजिंक्य ठेवत का..!
गायत्री काकीनी किती प्रेमानी नाव ठेवलंय त्याचं…! आणि माझ्या वजनानी अजिंक्य खाली बसेल म्हणे."
ईश्र्वरीने अभिश्रीचा हात धरुन ओढतच तिला घराच्या मध्यभागी असलेल्या चौकात नेलं आणि बकेटभर थंड पाणी तिच्या डोक्यावर ओतलं.
ईश्वरीचा असा अवतार क्वचितण बघायला मिळत. कारखानीस आपल्या मुलाला नीट ओळखुन होते. त्यांनी सुध्दा परीतोषला चांगलाच दम दिला.
पुढे एकीकडे अमर नवीन बिझनेससाठी जोमाने कामाला लागला, त्याच्या सतत US चकरा सुरु झाल्या. काही फायनान्स तर कारखानीस लावणार होते आणि बराचसा पैसा विजसिंह व कारखानीस दोघांच्या रेपुटेशनवर मार्केट मधुन घ्यायचं ठरलं पण चमत्कार दिसल्या शिवाय नमस्कार नाही, त्यामुळे सुरुवात स्वतःच्याच भांडवलात करायची होती.अमर जवळ काही फायनान्स होता पण नवीन बिझनेसची कुण कुण त्याच्या स्टील बिझनेसच्या पार्टनर्सला लागली होती. त्यामुळे सहाजा सहजी ते त्याचा शेअर उचलु देणार नव्हते कारण अमर त्यांच्यातुन निघाला तर बिझनेस वाईंड अप करण्याशिवाय पर्याय नव्हता.
अमरसिंहची स्टील फॅक्ट्री शिरुर भागात होती. पण तिथे संपतरावांचा होल्ड होता. त्यांचा मुलगा चिराग त्यादिवशी पार्टीमध्ये जे काही बोलुन गेला त्याचा विचार करुन विजसिंह मुद्दाम शिरूरला त्यांच्या घरीच गेले. शिरूरभाग हा पुणे शहराच्या बराच बाहेर होता. त्यांची अडचण, अमरचा पुढचा प्लॅन त्यांनी संपतरावांना नीट समजावुन सांगितला व संपतरावांनाही ते पटलं. गायत्रीला त्या विभागातुन उभं करुन चिरागला पुणे शहरातील विभागातुन उभं करण्याचं प्रपोजल विजसिंहांनी मांडलं.
"पार्टी अपोझिट असली तरीही याला माझा पाठिंबा राहील." असा शब्द त्यांनी संपतराव व चिरागला दिला. संपतरावांच्या दबावामुळे का होईना चिरागनी ते मान्य केलं. त्यामुळे विजयसिंह त्याच्या बाजुने थोडे निश्चिंत झाले.
पुढचं पाऊल होतं गायत्रीला आमदार उमेदवार म्हणुन उभ राहण्यासाठी तयार करणे जे सर्वात जास्त कठीण काम होतं. शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा घालण्याच काम ईश्वरी नी घेतलं. तिच्या डावपेचांसमोर कोणी टिकेल तर शप्पथ..!
गायत्री आधीच मितभाषी, गर्दीत जाणं टाळणारी. आदिनाथ स्वभावाने तिच्यावरच गेला होता. त्यात राजकारणात उतरण्याचा तिने कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. पण तिच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क होता. कोर्टाततील बहुतांश फॅमिली केसेस ती समुपदेशानेच सोडवत. अमर तिला काऊन्सिलींग एक्सपर्ट म्हणत.
ईश्वरींनी अखेर तिला निवडणुकीसाठी तयार केलं. गायत्री व विजसिंहांचा प्रचार अगदी दणक्यात सुरु झाला. सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी एकदम जोमाने कामाला लागले. विजसिंहांसाठी खडकवासला विभागातुन तर जनतेचा चांगला प्रतिसाद अपेक्षित होताच पण गायत्रीच्या विभागातील जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला. गायत्रीचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढला आणि तिला त्यात आवड सुध्दा निर्माण झाली. पुढे तिने स्वतः लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजुन घेणं सुरु केलं.
अमरचं सेटअप, इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास पुर्ण होत आलेलं. तो आणि कारखानीस महिनाभर अमेरिकेतच होते. विजयसिंहांचे मित्र मंत्री रणदिवेंनची केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान विभागात चांगली ओळख होती आणि पुण्यातील सरकारी विभागात तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे सर्व कागदपत्र, सरकारी औपचारीकता सहज पार पडल्या. आधी कारखानीस अमेरिकेतुन परत आले व त्यांनी पुण्यात 'आदिष सॉफ्टेक सोल्सच्या' उद्घाटनाची तयारी सुरु केली. अमर सर्व साहित्य शीपमध्ये चढवुन आठवड्या भरात परतणार होता.
सगळं अगदी ठरल्या प्रमाणे आणि निर्विघ्न पार पडत होतं तरी विजसिंहांना एक गोष्ट खटकत होती. ती म्हणजे चिरागची प्रचारासाठी कुठलीच हालचाल दिसत नव्हती. निवडणुक अर्ज भरण्याची शेवटची तारीखही जवळ आली तरी त्यानी नाव नोंदवलं नव्हतं. त्याचे कार्यकर्ते सुध्दा फार कमी कार्यरत होते.
अखेर "आदिष सोफ्टेकच्या" उद्घाटनाचा दिवस जवळ आला. अमर दोन दिवस आधी पोहचणार होता.
अमर जवळपास दोन महिन्यांनी घरी येणार असल्याने गायत्री, आदिनाथ व अभिश्री त्याला रिसिव्ह करण्यासाठी उत्साहात एअर पोर्टसाठी निघाले.
थोड्याच वेळात विजसिंहांना त्यांच्या सुत्रांकडुन माहिती मिळाली. दुपारी चिराग आणि अमरचे पार्टनर्स बराच वेळ एका बारमध्ये बसुन होते. त्याचं अमरच्या पार्टनर्स बरोबर आधीच सुत जमलं होतं. त्यालाही फॅक्ट्रीमध्ये गैरव्यवहार करुन पैसा कमवायचा होता. त्यादिवशी चिराग कोकेनच्या नशेत पुर्णपणे गढुन गेला होता.
विजासिहांचे पी. ए. दळवीला पोलीस स्टेशन मधुन एका हवालदाराचा फोन आला.
"साहेब काहीतरी गडबड सुरु आहे. गायतोंडे साहेब आम्हाला सगळ्यांना उगाच संध्याकाळी पेट्रोलींगसाठी पाठवत आहेत आणि रंगा नावाच्या अट्टल गुन्हेगाराला बाहेरच्या सेल मध्ये आणलंय. चिराग साहेबांचे बरेच फोन चालु होते गायतोंडे सरांना, त्यात अमर साहेब आणि गायत्री मॅडमचं नाव कानावर येत होतं. जेव्हा रंगा कडुन काही गैर प्रकार करायचा असतो तेव्हा अशा हालचाली दिसतात. पुढे काही कळलं की नक्कीच सांगतो. तुम्ही खबरदारी घ्या."
दळवी कडुन ही गोष्ट कळताच विजयसिंहांनी त्यांची काही माणसं लगेच पोलिस स्टेशनकडे पाठवली. काही वेळाने रंगा खरोखर बाहेर आला आणि तो शिरूरच्या दिशेनी निघाला. अमरच्या घरी जाण्याचा त्याचा मनसुबा असावा असा विजसिंहांनी अंदाज बांधला. त्याची हालचाल कळताच त्याला पकडायचं निश्चित केलं.
पण तिथेच डाव फसला.
क्रमशः
( पुढील भाग परवा रविवारी सायंकाळी प्रकाशित करण्यात येईल )
चिराग रंगा कडुन काय काम करुन घेणार होता…?
डाव नक्की कोणाचा फसला…?
सरपोतदारांवर कुठलं संकट तर येणार नाही…?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.}
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा