थोडासा तडका - भाग ३

Urvi is excited for the welcome of new guest, she leaves office early. Prepare sweet for evening and gets ready. Saket and Ankit reaches home, urvi has ordered food already. She is impressed by ankit's personality, he has very positive and charming a

भाग - १ - थोडासा तडका भाग - १

भाग - २ - थोडासा तडका भाग - २

थोडासा तडका - भाग - ३

शनिवारी उर्वी थोड लवकरच घरी आली, तसं फारसं कधी कुणी पाहुणे यायचे नाही, सणासुदीला उर्वी - साकेतच दोघांपैकी कोणाच्या आई - बाबा कडे जात, हल्ली तेही कमीच.
मावशी एरवी पण घर स्वच्छ ठेवत असे, त्यामुळे उर्वीजवळ स्वीट बनवण्यासाठी वेळ होता, तिने येतानाच दुध आणलं होत केशर रबडी साठी. ती फ्रेश होऊन आली व दुध मंद आचेवर ठेऊन सिंपल अशी तयारी केली उगाच कुणाला आपण गबाळ नको वाटायला. तेवढ्यात जेवणच पर्सलही आलं तिने कॅस्रोल मधे काढून ठेवलं, थोड्या वेळात साकेत व अंकित घरी पोचले.
अंकितची परस्नॅलिटी खुप आकर्षक होती कोणीही इंप्रेस होईल अशी, जशी कॉलेज मध्ये साकेत ची होती. घरात येताच अंकितने त्यांना एक सुंदर बुके दिला व एक पॉप्युलर सॉफ्टवेअर डेवलपमेंट च बूक दिलं.
अंकित - हॅलो उर्वी, सॉरी मी नावनीच बोललो उगाच फॉर्मलिटीचा कंटाळा येतो, मला लगेच मैत्री करायला जास्त आवडते, म्हणुन तर बोअरिंग शो पीस पेक्षा मला वाटला हे बूक तुझा कामी येईल.
उर्वी - थॅ॑क यू अंकित, रिअली नाईस टू मीट यू
अंकित जिथे कुठे जात आपल्यासोबत एक पोझीटीव्ह आणि आनंदी वतरवण घेऊन जात, समोरचा कितीही अनोळखी किंवा अबोल असो त्याच्याशी लगेच कंफर्टेबल होत. साकेत आणि अंकित बराच वेळ बाल्कनी मधे गप्पा मारत बसले. त्यांच्याकडे बघुन उर्वी विचार करत होती, तिला सतत कॉलेजचा साकेत आठवत होता, तोही असाच अंकित सारखा दिलखुलास होता.
अंकित - उर्वी, कुठे हरवली चल जेऊया, म्हणजे तयार आहे ना, नाहीतर मी पण छान बनवतो बर लगेच घुसेन किचन मधे.
उर्वी - अरे पहिल्याच वेळेस थोडी तुला कामाला लावणार, सगळं तयार आहे आणि हो स्तुती करणार असाल तर फक्त रबडीचीच करू शकता बाकी सगळं ऑर्डर केलंय.
अंकित - हा हा, म्हणजे काय रबडीची तर करणारच पण चांगलं जेवण बोलावणं हीपण आजकाल एक कलाच झाली आहे.
अंकित जेवताना त्याच्या बँगलोरच्या गमती जमती सांगत होता. तिथे त्याने वीकेंड ला स्काय डायव्हिंग ट्युटर म्हणुन काम केलेलं, जे लोक उडी मारायला घाबरत त्यांना तो सरळ खाली ढकलून देत अर्थात विथ ऑल सेफ्टी. आणि वर्षात २ वेळा तरी १५ दिवस तो अनोळखी ठिकाणी जाऊन राहत कधी आदिवासी जंगल, कधी कुठलं बेट तर कधी एखाद एनजीओ. उर्वी मंत्रमुग्ध होऊन ते सर्व ऐकत होती, जेवणाकडे ही तीच भान नव्हत, साकेत लाही ते जाणवलं तो तिच्याच कडे बघत होता.
उर्वी - अंकित तुला कामाचा व्याप सांभाळून कसं जमतं हे सगळं.
अंकित - अगं उर्वी आपण जगण्यासाठी काम करतो ना मग एवढं काम काय उपयोगाचं की आपण जगणच विसरून जाऊ. मी हे अशे क्षण गोळा करतो म्हणुन मला काम करताना अजुन जोश येतो आणि पुढच्या सुट्टीपर्यंत सगळ्यांच्या आधी टार्गेट पुर्ण होत.
उर्वीला ते ऐकुन खुप हायसं वाटलं, चला म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते योग्य आहे, मनाशीच बोलली.
जेवण उरकून सगळं आवरून झालेलं अंकितनी तिला काही किचन टिप्स ही दिल्या.
अंकित - खुप छान जेवण झालं, अरे तुम्हाला कोणाला पान आवडतं का मे येतानाच बघुन ठेवलेलं एक मोठं पान शॉप.
सकेतही असच नवीन जागी काही न काही शोधून ठेवायचा.
साकेत - हो अरे ते लोक पार्सल पण देतात थांब मागवतो आत्ता.
अंकित - अरे पार्सल कशाला पोटभरून जेवण झालंय,शतपावली करत खाऊन येऊ.
साकेत - (आता याला कसं नाही म्हणु, उचलून नेईल हा) बरं ठीक आहे
उर्वी ला हसु आलं.
अंकित - चल उर्वी तु पण फिरून येऊ.
उर्वी - नको अरे तुम्हीच जा मी अवरते थोड.
अंकित - ओके मग निघतो मी भेटू लवकरच
उर्वी - हो नक्की, बाय.
उर्वीला खुप पोझिटिव वाटत होत आणि इंस्पायर्ड पण, आपण जो विचार करत होतो हा तर त्याच्याही पलीकडे निघाला.
साकेतची मात्र चांगलीच दमछाक झाली होती, कधी एकदा बेडवर आडवा होतो असं झालेलं.
उर्वी अंकित ने दिलेलं पुस्तक वाचत होती, साकेत रूम मध्ये आलाच तेवढ्यात.
उर्वी - अंकित किती स्पाॅ॑टॅनीअस आणि मन मोकळा आहे न, वटूच दिलं नाही पहिल्यांदा घरी आला.
साकेत - हो अगं आधीपासून तसाच आहे तो.
उर्वी - आधी कधी सांगितलं नाही तु त्याच्याबद्दल.
साकेत - हा तसा कधी विषय ही निघाला नाही आणि तो लवकरच बँगलोर ला पण गेला होता.
का बरं काय झालं..?
उर्वी - काही नाही जरा मी माझा विचार बदलला असता, तिने अगदी मिष्खील पणे म्हटलं.
साकेत - हो का मॅडम, दुरून डोंगर साजरे असतं बर का, झोपा आता.
उर्वी - हो का जेलस फील होतंय का
साकेत - नो वे, आय ट्रस्ट यू मोअर दॅन एनिथी॑ग.
उर्वी - अरे व्वा, छानच की.
साकेतचा डोळा लागला, समोर अचानक उर्वी दरात बॅग घेऊन उभी दिसली व त्याच्याकडे पाठकरून बाहेर निघणारच की त्याला जाग आली, बाजूला चेक केलं उर्वी झोपुन दिसली त्याला हायसं वाटलं, खुप भीती वाटली त्याला थोड्यावेळ साठी नंतर विचार केला आपण तिला माहेरी जाऊन ये म्हटलं होत त्यामुळे असं स्वप्न पडलं असेल. सोडुन कशी जाऊ शकणार ती, शक्य तरी आहे का.
थोड्या वेळात त्याला गाढ झोप लागली.

क्रमशः

- रेवपुर्वा

शुध्द लेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
पुढचा भाग उद्या प्रकाशित केला जाईल.

🎭 Series Post

View all