Oct 20, 2020
स्पर्धा

थोडासा तडका - भाग २

Read Later
थोडासा तडका - भाग २

भाग १ - थोडासा तडका भाग - १

थोडासा तडका - भाग -

उर्वी संध्याकाळी साकेतच्या ऑफिस बाहेर थांबली. साकेतनी तिला विचारलं एवढं काय खास काम आहे आज, ती फक्त सांगते म्हटली. आधी चल तर आणि त्याला त्यांच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेली. मस्त असा रोमँटिक डिनर प्लॅन करून घेतला होता. मूड लाईट, फ्लॉवर अरेंजमेंट, हार्ट बलून्स आणि एक स्पेशल टेबल फॉर टू. साकेत हे सगळं बघतच राहिला न राहुन त्यानी विचारलं उर्वी आर यू प्रेग्नंट...?  उर्वीला यावर खुप हसु आलं स्वतःला थोड कंट्रोल करून तिने कालपासूनच सगळं त्याला सांगितलं. त्यावर त्याने विचार केला व म्हणाला, "उर्वी सगळ्यांचं असच असतं ना रे, नवीन नवीन असताना जबाबदाऱ्या नसतात, आज ऑफिस मध्ये मला खुप लोड असतो, तुझेही क्लाएंट्स खूप वाढलेत अगदी शनिवार रविवार सुद्धा, त्यात फ्लॅट चे ई एम आय, कार लोन, पुढचं सेविंग, अधिसारख कसं राहु शकणार..? आणि मला नाही वाटत आपल्यात काही प्रोब्लेम झालाय, वुई आर जस्ट नॉर्मल कपल" 
उर्वी - अरे मी असं नाही म्हणत काही प्रॉब्लेम झालाय पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत तर बदल करू शकतो ना अगदी टेरेस वर कॉफी, लाँग ड्राईव्ह, वन डे ट्रीप, योगा, मॉर्निंग वॉक, या कारणांनी आपलं संभाषण बदलेल, आपण फ्रेश होऊ, असं यांत्रिक पणे किती दिवस जगायचं.
साकेत ला तेव्हढसं काही ते पटलं नाही तरीही त्याने ठीक आहे प्रयत्न करू म्हणुन वेळ निभावून नेली, काही दिवसात ही विसरेल असा विचार केला. पण त्याला काय माहिती उर्वीने हे किती मनावर घेतलेलं. जेवण आटपून दोघंही घरी पोचले, साकेत अर्थात खुप थकलाच होता नेहमीप्रमाणे आणि त्यात एवढं जड संभाषण. उर्वीला ही ते कळलंच, तिने हसुन म्हटलं उद्यापासून बदल करू आज झोप तु. त्याच्या मनातलंच झालं तसा तो लगेच झोपलाही. उर्वीला मात्र उद्यापासून ची प्लॅनिंग करायची होती.
-------*****-------
आज सकाळी उर्वी लवकरच उठली झाडांना पाणी दिले फ्रेश हवेच्या सहवासात एकदम ताजेतवाने वाटत होते. चहा गॅस वर ठेऊन तिने साकेतला आवाज दिला, तो कसला उठणार होता, ती त्याच्या जवळ गेली हळुच गालावर हात फिरवला, साकेत झोपेतच शहारून गेला व डोळे उघडले.
उर्वी - साकेत उठ ना वॉक ला जाऊयात.
साकेत बुचकळ्यातच पडला, हे काय नवीन, हिनी तर जाम सिरीयसली घेतलं. ????
साकेत - अ हो थोड्या वेळानी उठतो ना ग
उर्वी - काय रे तु, काल ठरलेलं ना आपलं
साकेत - हो तु हो पुढे मी आलोच
साकेत पुन्हा साखर झोपेत गेला, रूटीन मोडण खरंच मनात असेल तरच जमत, साकेत नी फक्त वेळ निभावण्यासाठी हो म्हटलं होत.
उर्वीला कळलेलं हा काही उठणार नाही, ती छान एक फेरफटका मारून आली, याला आता संध्याकाळीच गाठते.
नंतर उर्वी काही बोलली नाही, साकेतनी सुटकेचा निःश्वास सोडला व तिच्या मनाखातर उद्या नक्की जाउ म्हणुन ऑफिस ला निघाला.
उर्वीचे रोज नवीन निष्फळ प्रयत्न चालुच होते -
- साकेत संध्याकाळी पब मधे जाऊयात ना लवकर निघशील - अर्रे आज खुप महत्त्वाची मीटिंग आहे आज नको
- साकेत उठ ना लवकर योगा क्लास ला जाऊ - अग किती थकलो मी, काल खुप काम होत ना
- अरे त्या नवीन मूव्हीला जायचं का - अग उगाच ३ तास जातात नंतर घरीच बघु न
- साकेत एक अनाथ आश्रम आहे तिकडे जाऊन येऊ न संडेला - अग फॉरेन क्लाएंट येणार आहेत असं करू ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करून देऊ, आश्रमात नंतर कधी जाऊ.
साकेतला त्याच्या कं‌‌फर्ट झोन मधून अजिबात निघाव वाटत नव्हते पण उर्वीला आपलं आयुष आनंदी हवं होत, पण साकेतच्या रोजच्या बहाण्याना ती आता कंटाळली होती. तिनी मनात ठरवलं आज याचा सोक्ष मोक्ष लावायचाच.
रात्री जेवण झाल्यावर उर्वी ने साकेत ला स्पष्टच विचारलं
- तुला खरंच मी जे म्हणत आहे ते पटलंय का, नुसत तोंड देखल हो म्हणुन किती दिवस टाळणार तु मला असं, आता तर आपण अधीपेक्षही कमी बोलतोय, तुझी सारखी टाळाटाळ चालु असते. माझा कंटाळा आला का तुला.
साकेत - हे बघ उर्वी, सॉरी मी स्पष्टच बोलतो, काही गोष्टी वेळेनुसार आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात. जसं आपण लहानपणी वागत होतो तस आज वागतो का. आता ही आपली फेझ आहे, पुढे वेगळी असेल.
उर्वी - तुला तुझा कंफर्ट झोन सोडायचा नाही त्याची ही कारणं आहे.
साकेत - हे बघ तु गैरसमज नको करू पण मला हे असच वाटतं आणि तु ही जास्त विचार करू नको सगळे असच जगतात आपणही तसेच अहो.
उर्वी - अरे पण मे काही तुला वेगळं किंवा अशक्य अस काही करू म्हणतच नाहीये, या गोष्टी आपल्या हातात आहे आपले जुने दिवस तो गोडवा परत मिळवणं आपल्याच हातात आहे आणि खुप सोप आहे.
साकेत - I don't understand उर्वी तुला काय प्रोब्लेम वाटत आहे आपल्या आयुष्यात, भूतकाळातुन बाहेर ये, आज मध्ये जग प्लीज.
मला खुप झोप आली आहे आणि थकवा ही. I hope उद्या सगळं नॉर्मल असेल, तुला खरंच सुट्टी हवी असेल तर काही दिवस आई - बाबा कडे जाऊन ये, बर वाटेल.
उर्वी - ठीक आहे यानंतर मी आता या विषयावर नाही बोलणार, पण शक्यतोवर वेळ हातात असतानाच गोष्टी कराव्यात नाहीतर बरेचदा खुप उशीर होतो, तेव्हा त्या प्रयत्नांना काही अर्थ राहतं नाही.
तुला तुझ्या आयुष्यात बदल नको असतील तर ठीक आहे पण मला हवेत आणि त्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करेन तुला फोर्स नाही करणार.
विचार करत उर्वी चा डोळा लागला, खरंच आपण चुकीच्या गोष्टीसाठी मागे लागत अहो का...?
साकेतच रोजप्रमाने सकाळच रूटीन चालु झाल, पण उर्वीला स्वतःच्या रूटीन मधे बदल करायचे होते, साकेत वर तिला या गोष्टी लादायच्या नव्हत्या. त्याला लवकरात लवकर या गोष्टींची जाणीव व्हावी एवढीच इच्छा होती. राग नव्हता पण साकेतशी बोलायची इच्छा तशी नव्हती तरीही जुजबी संभाषण चालु होते. साकेत कधी नव्हे ते आज उर्वीच्या वागण्याकडे लक्ष देऊन होता तिला राग तर नाही आलाय, पण नाराजी आहे. 
काही बोलायचं तर विषय वाढायला नको म्हणुन तो नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाला.
उर्वीच मन आज कशातच लागणार नव्हत म्हणुन मधुराला तिने मेसेज केला, 'खुप बोअर होत आहे अर्धा दिवस काम करून मुव्ही बघायला जाऊयात का...?, साकेत साहेब काही रुळावर यायला तयार नाही'. मधुरा तशी कंटाळलीच होती तिने लगेच 'हो चालेल, लंच पण बाहेर करू' रिप्लाय दिला.
दोघीजणी ऑफिसला वेळेत पोचल्या. एक क्लाएंट मीटिंग कँसल झाल्या मुळे लवकरच बाहेर पडल्या. जवळच रेस्टॉरंट मधे छोले भटुरे खाल्ले, मल्टिप्लेक्स च्या दुकानांमध्ये फेरफटका मारून मुव्ही बघायला आत गेल्या. लकीली मुव्ही खुप छान होता. जाताना मस्त भेळ आणि चाट वर ताव मारला. घरी पोचल्यावर उर्वीला एकदम फ्रेश वाटत होत. नुकतंच तिने एक पुस्तक वाचायला चालु केलं होत. सीमा ताईंना फक्त साकेतच जेवण बनवायला सांगुन ती बेडरूम मध्ये पुस्तक वाचत बसली. साकेत बराच उशीरा आला, उर्वी पुस्तक वाचण्यात बिझी होती तिने साकेत ला जेऊन घ्यायला सांगितले, मधुरा सोबत तीच खाऊन झालंय. साकेतला वातावरण नॉर्मल बघुन बर वाटलं. जेवण झालयावर तोही बेडवर येऊन बसला.
साकेत - ऐक ना एक बोलायचं होतं बिझी आहेस का..?
उर्वी - नाही रे बोल ना
साकेत - अगं माझ्या जुन्या ऑफिसचा एक कलीग आहे, तो बँगलोर ला होता एवढे दिवस आता आलाय पुन्हा इथे. कालच फोन आला होता त्याचा भेटायचं म्हणत होता मी घरीच बोलावलं त्याला वीकेंड ला, तुला चालेल ना..?
उर्वी - हो अरे चालेल ना, त्यात काय. तेवढीच नवीन कंपनी होईल बोलायला. जेवायलाच थांबवशील. सीमा ताई आणि मी बनऊ काहीतरी.
साकेत - पार्सल मागवून घेऊ, कुठे घरी घाट घालायचा.
उर्वी - ओके चालेल, वेळ मिळाला तर स्वीट बनवेल एखाद.
साकेत - ओके, नो प्रोब्लेम.

 

क्रमशः

शुध्दलेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
पुढचा भाग संध्याकाळी प्रकाशित केला जाईल.