Oct 30, 2020
स्पर्धा

थोडासा तडका - भाग १

Read Later
थोडासा तडका - भाग १

थोडासा तडका - भाग -

आज पुन्हा अलार्म वाजला, उर्वी व साकेत च तेच रोजच आयुष्य सुरु झालं. नेहमीप्रमाणे आजही ते मशीन प्रमाणे आपली काम॑ अवरत होते, कामाप्रमाणे संभाषणही तेच अगदी रेकॉर्डिंग केल्यासारख -
- ब्रेकफास्ट लवकर देशील आज मीटिंग आहे
- बिल भरून देशील
- आज उशीर होईल काम जास्त आहे
- गिजर खराब झालंय मेंटेनन्स साठी कॉल करशील
भावना विरहित यांत्रिक भाषा.
साकेत नी आवरलं व डब्बा घेऊन तो ऑफिस साठी निघाला दाराच्या आवाजावरून तिला कळलं. ऊर्वी नी सुद्धा सगळं आवरलं बाहेर निघणारच तेवढ्यात तिला आज काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, दार उघडलं तेवढ्यातच तिच्या मनात काहीतरी आलं आणि लगेच तिनी आज सुट्टी घ्यायचं ठरवलं. छान कडक कॉफी केली आणि सहजच जाऊन त्यांच्या टेरेस बल्कनी मधे गेली. झाडांना बरेच दिवस पाणी नव्हतं दिलं, धूळ ही बरीच होती तिच्या आयुष्या प्रमाणेच नीरस वाटत होतं.
डोळे बंद केले आणि जुन्या आठवींमध्ये रमुन गेली, ३ वर्ष झाले होते त्यांच्या लग्नाला पाहिलं वर्ष खुप सुंदर सहवासाच आनंदी होत, नवनवीन सरप्राइज नी भरलेलं. लग्नाच्या पहिल्या रात्री तिनी दार उघडलं साकेत नी दोघांची छोटीशी बॅग भरलेली, तिला काही कळलंच नाही. तो सरळ तिला लाँग ड्राईव्हला घेऊन गेला शहरा बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात एका लेक जवळ छोटंसं टेंट होतं आणि फक्त काजव्यांचा प्रकशात त्यांनी ते क्षण घालवले, साकेत नी एका रिसॉर्ट तर्फे सोय करवून घेतलेली उर्वीला सरप्राइज देण्यासाठी. त्याच्या सरप्राइज देण्याच्या सवई मुळे तिलाही तशीच सवय झाली. एकदा साकेत च प्रमोशन झालेलं तेव्हा उर्वी नेही त्याला सकाळी ५ वाजता उठवून हील जंपिंग साठी नेलं, नंतर वर्षभर असच होतं गोवा रोड ट्रीप, ट्रेकिंग, जंगल सफारी, कधी प्लॅन करून तर कधी असच. एक वर्षानंतर जणु सगळं बदलत गेलं दोघंही आपल्या कामाच्या व्यापात गुंतत गेले कधी ह्या यांत्रिक आयुष्याची त्यांना सवय झाली त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आज कुणास ठाऊक का तिला ते जुने दिवस फार आठवत होते. 
घरात जाऊन तिने थोडी आवराआवर केली, कामवाल्या मावशींना सुट्टी दिली आणि एवढ्या प्रेमानी सजवलेल्या घरात आपला हरवलेला आनंद शोधायला लागली. असं वाटलं आत्ताच साकेत ला मिठीत घ्यावं, तिला वाटलं त्यालाही सुट्टी घ्यायला लाऊ, म्हणुन लगेच कॉल लावला, त्याचा मेसेज आला अर्जंट नसेल तर नंतर बोलु बिझी आहे. तिने सगळं घर पुन्हा नव्याने सजवल, झाडांना पाणी दिलं, छान तयारी करून त्याच्या आवडीचे पदार्थ करायचं ठरवलं. 
आज खूप दिवसांनी आयुष्यात आलेली मरगळ कमी झाल्यासारखं जाणवलं आणि आपण साकेतला सुध्दा हा अनुभव घ्यायला लाऊ म्हणजे सगळं काही असुन जे काही हरवल्यासारख वाटतंय ते सापडेल.
घर तसं स्वच्छ असायचं उर्वी व साकेत घरी नसतानाही शकु मावशी सगळी कामं अगदी चोख करत धुनी, भांडी, स्वच्छता आणि स्वैंपाकाला सीमा ताई, पण उर्वी ने आज नव्याने आवरलं होत व आपल्याच घराकडे वेगळ्या नजरेनी बघितलं होत ज्याच्यासाठी आपण एवढी मरमर करतो त्याच घरात आपण शांततेने किती क्षण घालवतो..?
बघता बघता संध्याकाळ झाली उर्वी ने पुन्हा फ्रेश अंघोळ केली व साकेत साठी छान बेत करण्यासाठी किचन मध्ये गेली खूप दिवसांनी मनातुन काहीतरी करनार होती. स्पाईसी वेज कोल्हापुरी, पराठा, बिर्याणी, रायता. गुलाबजाम ऑर्डर केले. आता तिला तयार व्हायचं होत त्याच्यासाठी, साकेत ची आवडती मुव्ही मीस्टर इंडिया च्या काटे नाही कटते ये दिन ये रात या गाण्यातल्या श्रीदेवी सारखी तिनी तयारी केली होती फिकट निळी साडी, मॅचींग टिकली व डार्क लिपस्टिक, अगदी मोहक दिसत होती, आरशात बघून जरा लजलीच. सोफ्यावर बसुन साकेत ची वाट बघत बसली, मंद म्युझिक आणि इसेंशिअल ऑईल चा सुवास, अगदी रोमँटिक वातावरण. बेल वाजली तिच्या काळजाचा ठोकाच चुकला जणु आत्ताच लग्न झालं. 
तिने दार उघडलं थकलेल्या साकेत नी रोज प्रमाणे तिच्याकडे न बघता शूज काढले, बॅग ठेवली व फ्रेश होण्यासाठी बेडरूम मध्ये निघुन गेला. उर्वीला तर काही कळलंच नाही काय झालं कदाचित तो जेवताना लक्ष देईल. तिने डायनिंग टेबल छान सजवला, नवीन सेट मधे जेवण वाढलं तेवढ्यात साकेत आला. जेवण तयार बघुन उर्वी ला म्हणाला बर झालं लवकरच केलं खुप थकलोय आणि झोप आलिये. तिला काय बोलावं काही सुचतच नव्हतं काय बोलावं साकेत च भराभर जेऊन पण झालं न राहुन ती म्हटली थोडा वेळ बसुयात का हॉल मधे. साकेत एवढं जेऊन पेंगलाच होता, त्यानी प्लीज उद्या बोलुयात का असं बेडरूम कडे जाता जाता म्हटलं आणि झोपी गेला.
उर्वी चा सगळा उत्साहाच गळुन पडला, हा माणूस आहे की रोबोट, मीही तशीच असते तस एरवी तिनी स्वतःचीच समजुत काढली व काहीही झालं तरी उद्यापासून साकेत लाही जुने दिवस आठवून द्यायचेच आणि आयुष्यात थोडासा तडका आणायचा अस ठरवुन सगळं आवरलं आणि झोपायला गेली. साकेत चा शांत चेहरा बघत तिला झोप लागली.

आज उर्वीला उशिराच जाग आली, कालचा क्षीण तिला आज जाणवत होता, थोडी निराश होतीच तशी. साकेत च आवरून झालं होत त्यानी चहा व ब्रेड बटर करून घेतलं व उर्वी चाही चहा ठेवला, ती थोडी सुखावली परिस्थिती तेवढी ही हाताबाहेर नाही गेलिये तरीही तिला त्याचाशी बोलायचं होतं. तिला वाटलं कालच्या जेवणाबद्दा तरी हा काही बोलेल तेवढ्यात तो चहा घेऊन आला व कालच जेवण थोड स्पाइसी होत, साधं करत जाशील का हल्ली जळजळ होते मसाल्यांनी, ती फक्त ठीक आहे म्हणाली व जणु एक फर्मानच सोडला मला तुझा ऑफिस कडे थोड काम आहे संध्याकाळी, मी तुझा सोबतच येईल थोड महत्त्वाचं बोलायचय. साकेत थोडा गोंधळला व तिला ठीक आहे म्हणुन ऑफिसला निघाला सीमा ताईंनी डब्बा तयार ठेवलाच होता.
साकेतच्या बोलण्याच उर्वी ला आश्चर्यच वाटलं हाच का तो कॉलेज मधला खवय्या तेज मिसळ खाण्याची शर्यत लावणारा, एक एक नवीन पदार्थ गावोगावी सगळ्या कॉलेज गॅंगला नेऊन खाऊ घालणारा. कधी तर स्वतःच चुलीवर झणझणीत पिठलं भाकरी ठेचा करून सगळ्यांना खाऊ घालत.
दोघांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग सोबतच केले ३ वर्षांच्या मैत्री नंतर दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि तेव्हाच ठरवलं, लग्न कॉलेज नंतर दोघांनीही चांगली नोकरी मिळाल्यावरच. तसं त्यांनी घरीही सांगितलं दोघांच्याही घरी वातावरण मोकळं होत त्यामुळे काही अडचण नव्हती. कॉलेज नंतर दोघांनाही कॅम्पस मधुन छान जॉब मिळाले दोन वर्षांनी साकेतला एका मोठ्या मल्टी नॅशनल कंपनी मध्ये मोठ्या पोस्ट वर जॉब मिळाला आणि उर्वी व तिची ऑफिस मधील कलिग मधुरा दोघींनी एक छोटीशी फर्म टाकली सॉफ्टवेअर आणि ॲप डेवलपमेंटची. नंतर लगेच लग्नही उरकलं.
आज उर्वीला संध्याकाळचीच वाट होती, साकेतला काहीही करून सगळं जाणवून द्यायचं होतं. ती लगेच आवरून ऑफिसला निघाली आज कॅब करून जायचं होत म्हणजे रात्री साकेत सोबत परत येता येईल. मधुरा आधीच पोचली होती, त्या दोघी खुप छान मैत्रिणी होत्या. उर्वीच्या वागण्यात तिला अचानक बदल जाणवला कामात उत्साह व चेहऱ्यावर एक स्मित हास्य. मधुरा नी चौकशीच चालु केली कालच्या अचानक सुट्टीवरून सुध्दा चिडवायला लागली, नक्की काहीतरी स्पेशल आहे. उर्वीने तिला सगळं सांगितलं ती पण विचारात पडली त्याचंही आयुष्य थोड अधिक तसचं होत पण तिची १ वर्षाची मुलगी असल्यामुळे जरा वातावरणात बदल झाला होता. 

क्रमशः

अक्षरा देसाई

शुध्दलेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
पुढचा भाग उद्या सकाळी प्रकाशित केला जाईल.
कथेला प्रतिक्रिया जरूर कळवा.