Login

मनशांती (भाग ९)

श्रावणी लोखंडे

भाग १

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826



भाग २

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/



भाग ३

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/



भाग 4

https://www.irablogging.com/blog/manshanti.......-part-4_5594



भाग 5

https://www.facebook.com/581606972323826/posts/1071753296642522/



भाग ६

https://www.facebook.com/581606972323826/posts/1073631626454689/



भाग ७

https://www.facebook.com/581606972323826/posts/1074386723045846/



भाग ८

https://www.irablogging.com/blog/manshanti......part-8_5665



चार दिवसांनी सुयशला घरी सोडतात.शिखा आणि आप्पा स्वतः ....... डॉक्टरांना सुयशचं पथ्य पाणी वैगरे विचारून घेतात.काही चूक नको म्हणून शिखा सगळं लिहून घेते आणि मग सगळे घरी येतात. घरी गेल्यावर शिखा सगळ्या गोष्टी  जातीने लक्ष देऊन करत असते. शिवाय आप्पांची सोबतही असतेच. गेल्या चार दिवसात मनशांती मधली पण काही काम रखडली असतात त्यासाठी शिखा आप्पांची परवानगी घेऊन निघते.सुयश ला त्याची औषध देऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून शिखा त्याला बाय करते.



इकडे मनशांती मध्ये पोचल्यावर अकाउंट ची फाईल चेक करून शिखा अर्जंट मिटिंग लावते. सगळ्याजणी हॉल मध्ये जमतात आणि शिखा ची वाट बघत असतात.इतक्यात शिखा येते.



आज आपली मिटिंग ठेवण्याचं कारण की.........आपल्या जवळच्या नाईक हॉस्पिटलमधल्या बावीस कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळचा डब्बा करण्यासाठी मला विचारणा करण्यात आली आहे.......आणि खुद्द नाईक डॉक्टरांनी याबाबत बोलण्यासाठी मला चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं.काही वयक्तिक कारणांमुळे मला तेव्हा तुमच्याशी बोलता आलं नाही पण आता तुमचा जो काही निर्णय असेल तो सांगा म्हणजे मला तसं डॉक्टरांना कळवायला."शिखा"



अहो ताई........एवढी चांगली संधी का बरं सोडावी......करू की आम्ही सगळयाजणी मिळून........काय ओ सुमन ताई......."मालती"



अगं.......काय म्हणून काय विचारतेस.......घेऊन टाका शिखा मॅडम ऑर्डर........आम्ही सगळ्याजणी मिळून आनंदाने करू डब्बे......."सुमन"



बरं....... मग मी आजच डॉक्टरांसोबत मिटिंग फिक्स करून सगळ्या गोष्टी ठरवून लेखी लिहून आणते,म्हणजे ऑर्डर संबंधी आणि हिशोबासंबंधी तुम्हाला पण कळेल.म्हणजे कधी तुम्हाला कमी दिले किंवा मी जास्तीचे घेतले असं नको व्हायला. "शिखा"



अहो मॅडम.....तुम्ही आम्हाला आधार दिलात आमच्यासाठी एवढं केलात......जिथे घरच्यांनी साथ सोडली तिथे तुम्ही आमच्या पाठीशी........ खंबीरपणे उभ्या राहिलात........आणि आता पैशांचा हिशोब कळावा म्हणून लेखी की काय..... ते पण लिहून आणताय याची खरचं गरज नाही....... आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे...….आम्हाला चार पैसे हक्काचे मिळावे चार लोकांत इज्जत मिळावी म्हणून तुम्ही किती करता हे दिसतंय आम्हाला......तिथे पैशांचा हिशोब काढून आम्हाला लाजवू नका हो........"जोशी काकू"(वय बासष्ट वर्षे. सुनेनं हाकलून दिल्याने त्या मनशांती मध्ये येतात.)

 



असं नाही.......सगळ्याजणी काम करणार म्हणजे मी पण काय करते....... हे आलंच की...... आणि तुमचा महिन्याचा पगार,आपला होणारा खर्च,आणि नफा या गोष्टी तुम्हाला पण कळणं तेवढंच गरजेचं आहे..…..."शिखा"



बरं......जशी तुमची ईच्छा........ तुम्ही या जाऊन आणि बोलून या त्यांच्याशी आणि ऑर्डर घेऊनच या........"मालती"



बरं...... चला......येते मग......."शिखा"



शिखा तिकडून निघते आणि हॉस्पिटलमध्ये पोचते.

डॉक्टर नाईकांसोबत मिटिंग करून ऑर्डर चे ऍडवान्स घेते आणि पुन्हा मनशांतीला पोचते. ऑर्डर भेटल्याची आनंदाची बातमी सगळ्यांना देऊन ऍडवान्स चा चेक देव्हाऱ्यात ठेवून हात जोडते.



सगळ्या जणी जोमाने कामाला लागतात. रोज दोन टाईम चा टिफिन बनवून वेळेत डब्बे हॉस्पिटलमध्ये पोचत असतात.वेळच्या वेळी काम होत असल्याने सगळेच खूप खुश असतास. अश्यातच आणखीन दोन ठिकाच्या ऑर्डर येतात.चविष्ट जेवण असल्याने पार्टी,मुंज,बारसं,आणि छोटे मोठे कार्यक्रमाच्या ऑर्डर सुद्धा येत असतात. सगळे अगदी मन लावून काम करत असतात. सुयश आणि आप्पा पण मधे मधे मनशांतीला चक्कर मारत असतात.



एकदा मनशांती मधून घरी येत असताना आप्पा निमेश ला एका मुलीसोबत फिरताना बघतात.दोघेही अगदी एकमेकांना चिटकून बसलेले असतात. आप्पांना शंका येते म्हणून संध्याकाळी घरी गेल्यावर रात्रीची जेवणं आटोपल्यावर सगळ्यांसमोर आप्पा निमेशला विचारतात.



निमेश......आता तुझ्या पण लग्नाचं बघावं म्हणतोय मी..….." आप्पा"



आप्पा........ऍकच्युली.......माझं एका मुलीवर म्हणजेच आमच्या बॉस च्या मुलीचं आणि माझं गेल्या दोन वर्षांपासून........म्हणजे आम्हाला लग्न करायचं आहे........ मी संगणारच होतो.......पण मध्यंतरी खूप काही घडून गेलं त्यामुळे बोलता नाही आलं......."निमेश"



काय??? बॉस ची मुलगी........??? म्हणजे बक्कळ पैसा असेल त्यांच्याकडे...??तिला आपलं हे एवढंस घर जमेल का..??"माई"



न जमायला काय झालं??? प्रेम केलं आहे म्हणजे या गोष्टींचा विचार केलाच असेल की दोघांनी.....आणि एवढंस म्हणजे काय???? तीन बेडरूम चा फ्लॅट आहे आपला.......लहान आहे का..???? नाही तसं असेल तर सांगा......समोरच्या चौकात बंगला बांधतो आता........मग तर झाले...."आप्पा"

माईंना आप्पांचा टोमणा समजला तश्या त्या तरातरा आत निघून गेल्या.



आता मी तुमच्या माईंना टोमणा मारला तो गमतीचा भाग होता म्हणून तो जाऊदे....... पण ती बोलली त्यात पण तेवढंच तथ्य आहे......बॉस ची मुलगी....... आणि मी तुझ्या बॉस ला भेटलोय.तेंव्हा त्यांच्या बोलण्यातून समजलं आईविना पोर आहे ती.तिच्या वडिलांनी तिचे सगळे हट्ट पुरवले...… पण आपल्या घरात ती ऍडजस्ट करू शकते का???"आप्पा"



लग्न झालं की रुळेल ती आपल्या घरात.......तसं प्रॉमिस केलं आहे तिने........!!"निमेश"



वादा किया वो निभाना पडेगा........अस करून नाही चालणार.जे वादे केलेत ते तर निभवावेचं लागणार पण जे नाही केलेत ते पण निभवावे लागणार. संसार आहे म्हंटल्यावर थोडं वरखाली होणार......बघा म्हणजे मी काही........ नाही म्हणत नाही....... पण पुढे काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही....!!!"आप्पा"



हो आप्पा.......तुमचं म्हणणं पटतंय मला..... आणि आम्ही प्रयत्न करू सगळं व्यवस्थित मॅनेज करण्याचा."निमेश"



दोन आठवढ्यातच निमेश आणि कामिनीचं लग्न होते. एका आलिशान हॉटेल मध्ये आणि मोजक्याच माणसांमध्ये  दोघांच लग्न लागते. कामिनी चे पप्पा सोडून सगळे खुश असतात.कारण त्यांना.….. त्यांच्या एकुलत्या एका मुलीच लग्न चांगल्या मोठ्या घरात करून द्यायचं असतं. जिथे तिला कशाचीच कमी पडणार नाही. तरी त्यांनी तिला लग्नात......फोर व्हीलर आणि पंचवीस माळ्याच्या टॉवर मध्ये फोर बी.एच.के. चा आलिशान फ्लॅट ची चावी  गिफ्ट दिली होती.त्या घरात सगळ्या आधुनिक सुख सोयी उपलब्ध होत्या. सोबतच कामिनी ची सगळी काम करण्यासाठी एक मोलकरीण पण पाठवली होती. माई तर खूप खुश होत्या. त्यांना वाटलं होतं आता त्यांची काम पण त्या मोलकरणीला सांगू शकतील. लग्नानंतरचे सगळे सोपस्कार पार पडतात. नवीन जोडपं बाहेरगावी फिरायला जातं. कामिनीच्या वडिलांनी म्हणजे निमेशच्या सासऱ्यांना निमेशला महिन्याभराची सुट्टी दिली होती शिवाय ऑफिस जॉईन केल्यावर ते त्याला CEO ची पोस्ट देणार असल्याची बातमी देखील देतात.खरंतर निमेशला त्याची हौसमौज करता यावी म्हणूनच गोड गोड बोलून त्याने कामिनीला स्वतःच्या प्रेमात पाडलं होतं.  त्याने हे सगळं ऐैशो आरामच्या जिंदगीसाठी केलं होतं. जे त्याला नोकरी करून मिळणार नव्हतं ते सगळं त्याला कामिनिशी लग्न करून आयत भेटलं होतं. जो फ्लॅट आणि कार गिफ्ट मध्ये भेटले होते,तेच कमवून घ्यायला त्याला कित्येक वर्षे लागली असती.



फिरून आल्यावर निमेश ऑफिस जॉईन करतो आणि तेंव्हाच त्याला CEO केल्याची बातमी समजते.निमेश खूप खुश होतो.त्याला त्याची सगळी स्वप्न खरी होत असल्याचं दिसतं. इकडे कामिनी पण तिचा रुबाब दाखवायची सुरवात करते.माईंना तर ती काही विचारत सुद्धा नाही...... उलट गोड बोलून माईंकडूनच ती स्वतःची काम पण करून घेत असते. बाकी तिच्या जेवणाचं वैगरे तिच्या सोबत आलेली मुलगीचं बघत असते.



काही दिवसांनी कामिनी शिखा ला पण संस्कारच्या आवाजाचा त्रास होत असल्याने तुम्ही दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी सांगते. शिखा पण कुठलेही आढेवेढे न घेता माई आप्पांचा आशीर्वाद घेऊन सुयश सोबत मनशांती ला राहायला जाते. इकडे संस्कार शिवाय माई आप्पांना करमत नव्हते. त्यातच हल्ली माईंच्या पण कमरेचं आणि गुढघ्याचं दुखणं वाढलं होत. माईंनी दोन वेळा निमेश ला सांगितलं पण निमेश कमिनीच्या सांगण्यावरून नेहमी टाळाटाळ करत होता. शेवटी नाईलाजाने आप्पांनी माईंसोबत मनशांती ला जाण्याचा निर्णय घेतला.

माई आप्पा........सुयश,शिखा आणि छोटा संस्कार या सगळ्यांसोबत मनशांती मध्ये  राहू लागले. मनशांती फक्त स्त्रियांसाठीच होत पण मनशांतीची कर्ताधर्ताच शिखा असल्याने आणि त्यांची परिस्थिती बघून सगळे एकत्र राहू लागले. सुयश मनशांतीच अकाउंट बघू लागला तर आप्पा सगळ्या बायकांना लोणची पापड आणि इतर खाद्यपदार्थाच सामान आणून देऊ लागले. शिवाय त्यांना कापणे, वाळवण सुकत घालणे, केर काढणे या कामातही मदत करू लागले. सुयश चा बालमित्र मंगेश पण सुयशला तिथे भेटायला येऊ लागला. त्याला पण चार वर्षांची मुलगी होती मीरा.......पण देव सुद्धा किती निष्ठुर झाला त्याच्या बाबतीत. मुलीचं बारसं झाल्यावर देवदर्शनाला निघालेली ती सगळी......त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच मंगेश चे आई वडील,लहान भाऊ आणि बायको दगावली मात्र मंगेश गंभीर जखमी होता. तेंव्हा शिखा आणि सुयशनेच त्याला आधार दिला. एवढ्या मोठ्या धक्क्यातून त्याला बाहेर काढलं. मंगेशला मिराचं सगळं करतांना अगदी नाकी नऊ यायचे...…..शेवटी त्याने एक मावशी ठेवली ज्या मिराचं सगळं करू लागल्या. पण काही झालं तरी आई ती आईचं.......... मीरा बऱयापैकी सारखी आजारीच असायची. आईचं दूध नसल्याने ती सतत काही ना काही कारणांनी आजारी पडू लागली. शेवटी मंगेशने एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आईचं दूध मिळेल का अशी विचारणा केली. पण सहसा या साठी कोणी तयार होत नाही. मंगेश च बोलणं तिथली एक कर्मचारी ऐकत असते आणि मंगेशला लगेच बाहेर जाऊन भेटते. त्या बाई ची मुलगी नुकतीच बाळंतीन झालेली असते पण तीच मुलं पोटातच दगवल्याने ती डिप्रेशन मध्ये असते आणि त्या बाई ला स्वतःच्या मुलीला त्या विचारातून बाहेर काढण्याचा एक मार्ग दिसतो. मंगेश पण त्या बाईला लगेच होकार देतो आणि तिच्या मुलीला घरी घेऊन यायला सांगतो.



त्या बाईची मुलगी पण मीरा सोबत खूप खुश असते ती पण तीच दुःख विसरते पण,मीरा तिची मुलगी नाही याची जाणीव मात्र तिला असते,त्यामुळे ती मिरासोबत जास्त जवळीक नाही करत.वर्षभर मीरा त्या बाईच्या मुलीचं दूध पिते. काही दिवसांनी तिचा नवरा तिला येऊन घेऊन जातो.मीरा पण आता बाहेरच दूध आणि इतर थोडं जेवण खाऊ पिऊ लागली होती. मंगेशही तिला सगळं हवं नको ते आणून देत होता.



आई विना वाढलेली पोरं..........शिखा आणि संस्कार सोबत मिसळू लागली होती. संस्कार लहान असला तरी तो सगळ्यासोबत राहून लवकर बोलू लागला होता. त्याचे बोबडे बोल ऐकून मीरा सुद्धा शिखा ला मम्मा बोलू लागली होती.



काही दिवसांतच शिखा चा वाढदिवस होता. सुयश ने सगळ्यांसोबत मिळून शिखासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं. मनशांतील नवरीप्रमाणे सजवलं होतं. सुयश ने स्वतः सगळ्यांसाठी खरेदी केली होती.मंगेश आणि शिखाला त्याने एकाच रंगाचे कपडे घेतले होते.



सुयशच्या सांगण्यानुसार भटजी सुदधा वेळेत पोचले होते.सुयश ने स्वरांगीला त्याच्या मनातलं आणि डोक्यातला प्लॅन आधीच सांगून ठेवला होता, त्यामुळे स्वरांगी शिखाला अगदी नव्या नवरीसारखी तयार करते. शिखा मंगळसूत्र घालायला घेते........तेंव्हा स्वरांगी तिला थांबवते आणि एक खास गिफ्ट बाहेर तुझी वाट बघतोय, म्हणून मंगळसूत्र घालू नको असं सांगते. शिखाला पण सुयश काही तरी खास करणार आहे असं वाटते, म्हणून ती पण खुश होते.इकडे माई संस्कार ला तयार करून स्वतः देखील छान तयार होतात. सगळ्या बायका पण खूप उत्साहात असतात. त्यांनी जेवणात पण छान असा व्हेज नॉनव्हेज बेत केलेला असतो सोबतच गोड बासुंदी आणि गुलाबजाम असतात.



शिखा तयार होऊन खाली येते. समोर तिला छोटा मांडव आणि अग्निकुंड दिसते. मांडव छान पैकी फुलांनी सजवलेला असतो. भटजी पण त्यांच्या सगळ्या सामग्री सोबत बसलेले असतात. सहज म्हणून तिची नजर राजा राणी च्या खुर्च्या वरती पडद्यावर जी नाव असतात त्यावर जाते आणि ती नाव बघून क्षणात ती खाली कोसळते.



सुयश लगेच तिला खोलीत घेऊन जातो. सोबतच मंगेशही असतो. शिखाला शुद्ध येते. तेव्हा सुयशला ती स्वतःच्या समोर बसलेलं बघते.

 



सुयश........अरे.......काय चालू आहे खाली........ हां??? कसला पोरकटपणा लावला आहे......मंगेशच आणि माझं लग्न.......डोकं ठिकाणावर आहे का???? लोक काय म्हणतील????? आणि माई आप्पांना काय वाटेल????"शिखा"

 



हे बघ लोकांचा विचार मी नाही करत आणि तू पण करू नको आणि राहत राहिला प्रश्न माई आप्पांचा तर त्यांना हे सगळं माहीत आहे. मी त्यांना विश्वासात घेऊनच हे सगळं करतोय........आणि हे सगळं तुझ्या भावी आयुष्यासाठी आहे....नवरा गेला की पुरुषांचा बाई ला बघण्याचा दृष्टिकोन किती बदलतो हे मी स्वतः बघितलं आहे......रोजच्या प्रवासात इतर लोकांच्या तोंडून विधवा बाई साठी अपशब्द ऐकले आहेत. आपण बोलणाऱ्याच तोंड बंद नाही करू शकत शिखा........प्लिज समजून घे....आणि मी हे सगळं स्वतःसाठी करतोय........

 



माझ्या नंतर तुझ्या बांगड्या कोणी फोडू नये....... तुझं मंगळसूत्र कोणी खेचून तोडू नये.......तुझं कपाळ ओकंबोकं होऊ नये........म्हणून करतोय.......आणि माझ्या देखत तू नवीन संसारात गुंतावी म्हणून करतोय मी.......मंगेश माझा खास मित्र आणि माई आप्पांनंतर माझा कोणावर विश्वास असेल तर तो मंगेश वर........"सुयश"



अरे....... पण मला नाही या सगळ्याची गरज.......प्लिज समजून घे......."शिखा"



हे बघ शिखा........ही माझी शेवटची इच्छा आहे अस समज हवं तर......आणि खरचं मला खूप खुश बघायच आहे तुला......मला विसर अस नाही म्हणत मी........पण माझ्या आठवणीत तू झुरू नये.......एवढचं मनापासून वाटते मला....मी पाया पडतो तुझ्या पण प्लिज नाही म्हणू नको.........आणि सहवासातून प्रेम होऊ शकतं गं....... माझा पूर्ण विश्वास आहे......…माझ्यातून तुला मंगेश नक्कीच बाहेर काढेल........ स्वतःचा नाही निदान संस्कारचा तरी विचार कर.......वडिलांचं प्रेम देऊ शकतेस तू त्याला..... पण वडिलांचा आधार आणि साथ नाही देऊ शकत."सुयश"

 



मंगेशला सुयशने आधीच तयार केलेलं असत त्यामुळे तो काही न बोलता फक्त दोघांच बोलणं शांत ऐकत असतो.

 



शिखा काही वेळ शांत राहून विचार करते......तीच मन या साठी तयार नसत पण आता मात्र तिला संस्कार विषयीचे बोलणे सतत कानात घुमत असते.



शिखा एकदा मंगेशकडे बघते आणि एकदा सुयश कडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी जमा होतांना सुयश बघतो. तसा सुयश मंगेशला इशाऱ्यानेचं बाहेर थांबायला सांगतो. मंगेश बाहेर जातो ....तसा सुयश शिखाला घट्ट मिठी मारतो.

शिखा पण त्याला घट्ट मिठी मारते. तिची पकड एवढी घट्ट असते की सुयश ला हलता देखील येत नव्हतं.सुयश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या केसांवर किस करतो तिच्या गालावर किस करतो. शिखाला त्याला सोडायची इच्छाचं नसते ती तिची पकड सुयश भोवती सारखी घट्ट करत असते.सुयश तिची पकड सैल करण्याचा प्रयत्न करत असतो पण शिखा तस होऊ देत नाही........ शेवटी सुयश एक जोराचा हिसका देऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडतो.



राणी.......तुला हे करावंच लागेल आपल्या संस्कार साठी

प्लिज हो म्हण........माझी शेवटची इच्छा आहे.......काय माहीत मी उद्या असेल नसेल.........



शिखा त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि रडवेल तोंड करून मानेनेच अस बोलू नको म्हणते आणि पुन्हा त्याला बिलगते.



चल.......डोळे पूस आणि चल खाली......सगळे आपली वाट बघताहेत......."सुयश"



शिखा जड पावलांनी खाली चालत येते.तिच्या डोळ्यांतून घळा घळा अश्रू वाहत असतात.सुयश डाव्या हाताने तिची कम्बर पकडून उजव्या हाताने तिचे डोळे पुसत असतो. शिखाच्या अश्रूंनी सुयशचा शर्ट ओला झालेला असतो.



सुयश शिखाचं ते प्रेम बघून उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येत. नाही नाही म्हणतच शिखा बोहल्यावर उभी राहते. आप्पांच्या खांद्यावर निजलेल्या छोटया संस्कारला बघून तिला आणखीन भरून येत होतं........मंगलाष्टके सुरू होतात तशी तिला सुयश आणि तिच्या लग्नाचे सनई चौघडे ऐकू येतात.काही वेळासाठी ती भूतकाळात रमते आणि काही वेळापूर्वी घडलेलं सगळं विसरते. मंगलाष्टके संपल्यावर मंगेश ला समोर बघून तिला पुन्हा सगळं आठवत आणि ती भोवळ येऊन खाली पडते.शिखाची आई तिला शुद्धीत आणून लिंबू पाणी पियाला देते. शिखा परत बाजूला बसलेल्या सुयशला मिठी मारून रडू लागते. सुयश हसूनचं तिचे डोळे पुसतो........तिला शांत करतो.....आणि काही वेळाने लग्नाचे सगळे विधी पूर्ण होतात. लग्नगाठ बांधून सुयश स्वतः शिखाचा हात मंगेशच्या हातात देऊन भरून पावतो...शिखाचे आई वडील सुयश समोर हात जोडतात.



आमचं नशीब चांगलं...... म्हणून तुमच्या सारखा चांगला जावई भेटला..... माझ्या लेकीने हिरा शोधला होता पण तोच हिरा देवाला पण पाहिजे आहे........एवढं बोलून ती दोघेही रडू लागतात.



जो आवडे सगळ्यांना, तोचि आवडे देवाला असे आप्पा पण हात जोडून म्हणू लागले.



जेवण वैगरे उरकून झाली तसा सुयश शिखा आणि मंगेश जवळ जातो.



दोघेही बाहेर एका बाकड्यावर बसलेले असतात.



तुला हे सगळं माहीत होतं तरी तू का तयार झालास लग्नाला......????

 



मीरा साठी!!!! मी माझ्या मिरासाठी स्वार्थी झालो..... तुझ्यासारखी प्रेमळ आणि मायाळू आई माझ्या मिराला शोधून पण भेटली नसती......मला माफ कर....पण मी स्वार्थीपणा केला.........."मंगेश"



शिखा काही न बोलता शांत बसून असते.



त्या दोघांच एवढं बोलणं सुयश ऐकतो आणि मागून दोघांच्याही खांद्यावर हात ठेवतो........

 



सुयश............तू इथे.......यावेळी....….तुला मी गोळ्या दिल्या आहेत ना.......मग आराम करायचा सोडून तू बाहेर का फिरतोयस.......मी तुझी एवढी मोठी गोष्ट ऐकली..… निदान माझं एवढं तरी ऐक??? "शिखा"



हो सुयश...... बरोबर बोलतेय ती......तू का फिरतोयस चल आराम कर..........."मंगेश"



दोघेही सुयशला खोलीत घेऊन जातात. मीरा आणि संस्कार माई आप्पांसोबत दुसऱ्या खोलीत झोपलेले असतात.



इकडे मंगेश सुयशला बेड वर झोपवतो.शिखा त्याच्या अंगावर पांघरून घालते आणि त्याच्या उशाशी बसून डोक्यावरून हात फिरवत असते. सुयशला पण दिवसभराच्या दगदगीमुळे आणि गोळ्यांमुळे झोप लागते. शिखा बसल्या बसल्याच बेड ला टेकून झोपी जाते,तस मंगेश तिच्या अंगावर पण पांघरून घालतो आणि दार लावून बाहेर निघून जातो. पहाटे सहा ला शिखा जागी होते. सुयशला शांत झोपलेलं बघून ती सगळं आवरून घेते. सगळ्यांचा चहा नाष्टा होतो पण तरी सुयश उठत नाही म्हणून शिखा मंगेशला पाठवते त्याला उठवायला.



सुयश.......ए सुयश........उठ.......वाजले किती भावा.......अजून गोळ्या घ्यायच्या आहेत तुझ्या......तुझी पोरं उठून तयार झाली......उठ चल.......लवकर.



सुयश निपचित पडलेला असतो.हा नाही की चू नाही...... मंगेश मग जरा पुढे जाऊन त्याचा चेहरा निरखून बघतो तर त्याला तो निस्तेज दिसतो.…....तसा मंगेश लगेच त्याच्या गालावर जोर जोरात चापटी मारू लागतो.

 



सुयश...... ए सुयश......उठ यार........काय मस्करी लावली आहे सकाळ सकाळी.......मंगेश आणखी जोरात त्याला मारू लागतो पण सुयश हलत नसतो.....म्हणून तो त्याचे दोन्ही खांदे धरून त्याला हलवून जोर जोरात हाका मारू लागतो........सुयश..........डोळे उघड यार….काय मित्रा…... नको अशी चेष्टा करुस........सुयश........आता मंगेश चा आवाज रडवेला झालेला असतो.त्याचा कंठ दाटून येतो.मगापासून ओरडणारा मंगेश त्याच्या तोंडून आता आवाजच निघत नसतो......



मंगेश आला नाही अजून.......म्हणून त्याचा पाठोपाठ शिखा जाते,तर ती मंगेशला डोक्याला हात लावून बसलेलं बघते. तिला जरा सगळं विचित्र वाटते. शिखा जरा पुढे जाते आणि हळूच मंगेशच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यानेच काय झालं ते विचारते. मंगेशचे भरलेले डोळे बघून ती गोंधळते.........आणि हळूच आवाजात त्याला बोलते.



मी तुला सुयश ला उठवायला पाठवलं की त्याच्या जवळ बसायला….."शिखा"



शिखा.........आपला सुयश…......मंगेश डोळ्यातलं पाणी पुसत बोलण्याचा प्रयत्न करत असतो.

आ...........आ..…पला सुयश.......आता.........सुयश......



काय सुयश सुयश चालवलयं......."शिखा"



आपला सुयश गेला.............एवढं बोलून मंगेश डोक्याला हात लावून रडू लागतो......



त्याच्या आवाजाने सगळे खोलीकडे धावत येतात. शिखा एका जागी स्तब्ध उभी राहून फक्त मंगेशला बघत असते. जणू तिच्या डोळ्यातलं पाणीच आटलं आहे अशी....... सगळे सुयश ला बघून रडू लागतात पण शिखा मात्र शांत असते जणू काही झालंच नाही......

 



जवळचे सगळे नातेवाईक मनशांती मध्ये येतात. दुखीतांना सगळे आधार देत असतात. शिखा मात्र अजूनही सुयशच्या पार्थिवाकडे एकटक बघत असते.



त्याला उटणं लावून आंघोळ घालतात,नवीन कपडे घालतात,हार घालतात आणि खुर्चीवर बसवतात. सगळे त्याची आरती करून शेवटचं त्याला बघून घेत असतात. शिखा मात्र शांतच असते.शेवटी स्वरांगी तिला हाताला धरून घेऊन जाते आणि त्याच्या पायाशी तिला बसवून सणसणीत तिच्या कानाखाली लगावते.....तशी शिखा जोरजोराने रडू लागते.......शिखाचा आवाज सगळ्यांची मन हदरवणत असतो .



 



सुयश.....अरे उठ ना रे......का असा झोपलायस........उठ ना..…...तुला माहीत होतं का रे...…तू आज आमच्यात नसणार........म्हणून तू माझं काल लग्न लावून दिलंस का....सुयश बोल ना रे......काही तरी बोल ना.......शिखा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली.स्वरांगी  तिला आता जवळ घेऊन शांत करते.......शिखा खूप रडू लागली होती.......दिवसभर शांत राहिलेली शिखा आता मोकळी होत होती........शिखाने सुयश ला मिठी मारली आणि ती पुन्हा रडू लागली........तिला ती मिठी सोडवत नव्हती.......सगळ्यानी तिला खेचून बाहेर ओढली.शिखा आता आवाक्याच्या बाहेर जात होती........हात पाय आपटू लागली होती..... जमिनीवर डोकं फोडून घेत होती.....त्याला न जाळण्याच्या विनवण्या करत होती सारखी म्हणत होती त्याला जाळू नका रे.....चटके लागतील.....तिचा एक एक शब्द सगळ्यांच्या जिव्हारी लागत होता.......माईंना तर शुद्धच नव्हती. नुकतंच बापाचं सुख लाभलेला मुलगा त्यांना पोरकं करून कायमचा निघाला होता या विचारानेच त्यांना सारखी भोवळ येत होती. आप्पा बिचारे त्यांचं दुःख मनात ठेवुन सगळ्या विधींवर जातीने लक्ष घालत होते. कोणीतरी भक्कम राहिले पाहिजे,प असं म्हणत असले तरी आतून तुटलेले आप्पा स्वतःच दुःख लपवत होते......शेवटी बाप तो बापचं.......



सगळे विधी पूर्ण करून आप्पा आणि सुयश मनशांती ला पोचले.



काल पर्यंत सनई चौघडे वाजणार मनशांती आज भकास वाटत होतं.......



आंघोळ्या करून दोघेही दिव्याजवळ येऊन हात जोडून उभे होते.



आप्पा शिखा जवळ जाऊन बसले.



बाळा जे झालं ते कधी तरी होणारचं होतं ..... आणि आपल्याला माहिती होतं....... त्याला कालच त्याच मरणं दिसून आलं होतं म्हणून तुमचं लग्न लावून दिल त्याने........खूप नशीबवान आहेस बेटा तू........स्वतःच्या मरणाआधी त्याने तुझं आयुष्य त्याच्या देखत मार्गी लावलं.....

 



आप्पांच बोलणं ऐकून शिखा आप्पांना बिलगून रडू लागते......माई पण तिला शांत करतात.

काहीवेळाने सगळे आपापल्या खोलीत निघून जातात.

 



बारा दिवसांनी सगळे समुद्रावर  जातात.सगळे काव काव ओरडत असतात पण कावळा पिंडीला शिवायला तयार होईना........

बराच वेळ निघून गेल्यावर मंगेश बोलतो.



सुयश........हे अस पिंडीला शिवण वैगरे मी मानत नाही पण तशी प्रथा असल्याने मी हे सगळं करतोय.....तुला शिखा आणि संस्कार ची काळजी आहे माहीत आहे मला पण तू त्यांची अजीबात काळजी करू नको......संस्कारला बापाचं प्रेम आणि शिखाला तुझी आठवण कधीच येऊ  देणार मी.......तिच्यावर खूप प्रेम करेन तिची काळजी घेईन मी.......वचन देतो........"मंगेश"

 



त्याचे शब्द ऐकून बऱ्याच वेळाने फांदीवर बसलेला कावळा खाली येतो......पण तो पानाला स्पर्श देखील करत नाही......



मग शिखा पुढे येते.....



तुला विसरणं खूप कठीण आहे पण मी मंगेश सोबत संसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि सारखी तुझी आठवण काढून रडणार नाही....... पण जेव्हा तुझी गरज असेल तेंव्हा तू आम्हाला सोबत कर.......आमच्या आयुष्यात.......सुख दुःखात नेहमी आमच्या सोबत राहा.......मी बायकोची सगळी कर्तव्ये पूर्ण करून मंगेशला नवरा असल्याचे सगळे अधिकार स्वेच्छेने देते.......आणि मी आशा करते मंगेश पण ते स्वीकारेल......एवढं बोलून शिखा तिचा डावा हात पुढे करते, तसा तिच्या हातात मंगेश स्वतःचा हात देऊन दोघे आनंदाने  एकमेकांकडे बघतात.........शेवटी सगळी वचनं झाल्यावर कावळा पिंडीला शिवतो........



 



दोन वर्षांनी शिखा आणि मंगेशच्या आयुष्यात नवीन पाहुण्याची चाहूल लागते.सगळे खूप खुश असतात.नऊ महिने पूर्ण होतात आणि शिखाच्या पोटी पुत्र जन्मतो. शिखा आणि मंगेश दोघे मिळून त्याच नाव सुयश ठेवतात.......नाव ऐकताच छोटस बाळं खुदकन हसू लागतं........ मनशांती मध्ये बारश्याचा कार्यक्रम छान झालेला असतो.......निमेश आणि  कामिनीला पण आपल्या माणसांची किंमत कळते म्हणून ती पण आता मनःशांतीमध्ये जमेल तशी काम करून आनंदी राहत असते.माणसापेक्षा पैसा महत्वाचा नाही हे तिला एकटं राहून आणि निमेशच्या नको त्या सवयीनमुळे समजलेलं असत.



समाप्त........



कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.मुलाची तब्येत ठीक नसल्याने भाग पोस्ट करायला खूप उशीर झाला........त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते.



धन्यवाद????????


🎭 Series Post

View all