Dec 01, 2021
Kathamalika

मनशांती.....(भाग४)

Read Later
मनशांती.....(भाग४)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग १
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826

भाग २
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/

भाग ३
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/

ऑफिस मध्ये अर्जंट मिटिंग आहे सांगून सुयश घरातून लवकर निघतो.सुयश घरातून निघताचं शिखा इवल्याश्या संस्कार ला घेऊन त्याच्या पाठी निघते.झपझप पावलं टाकत ती पण खाली जाते.सुयश रॉड क्रॉस करून उभा असतो.सुयश जाईपर्यंत शिखा सोसायटीच्या गेट जवळ एका आडोशाला उभी राहते.सुयश जाताच ती लगेच समोरच्या रिक्षावाल्याला बोलावून सुयश च्या कॅब मागे रिक्षा घ्यायला लावते.रिक्षावाला पण कॅब च्या पाठी पाठी जातो.वॉकला गेलेले आप्पा हा प्रकार पहात असतात पण शिखाचं अस वागणं त्यांना समजत नाही. ते विचार करतच घरी येतात.संस्कार ला घेऊन शिखा...... एवढ्या सकाळी घरातून बाहेर गेली म्हणून माईची कुरबुर चालली असते. आप्पा तिला शांत करून आंघोळीला जातात.इकडे शिखा त्यांच्या सोसायटीपासून वीस मिनिटांवर असलेल्या कृष्णाई अपार्टमेंट जवळ पोहोचते.
 

खर तर ती सुयश चा पाठलाग करते ही गोष्ट तिलाच पटत नसते पण मग ती व्यक्ती कोण ज्यामुळे सुयश एवढा लांब गेला आहे आणि त्याला खोटं बोलावं लागत आहे.......
 

सुयश गेट मधून आतमध्ये जातो. वाचमन आणि सुयश च्या संवादावरून तरी त्यांची चांगली ओळख असल्याचं लक्षात येत.सुयश आत जाताच शिखा रिक्षावाल्याला थांबायला सांगून सुयशच्या पाठी जाते.
 

दादा........हे साहेब......जे आता गेले आतमध्ये...... ते कुठल्या मजल्यावर गेलेत. "शिखा"

तुम्ही कोण मॅडम......"वाचमन"
 

ते........मी त्यांच्या सोबत कॅब शेअर केली होती....
.. आणि त्यात ते त्यांचा फोन विसरून गेलेत.मी कॅब ला थांबवून ठेवलं आहे.......प्लिज जरा सांगता का?? "शिखा"
(एवढं इमानदारी ने फोन परत करायला आल्यामुळे वाचमन कुठलीही शंका मनात न आणता तिला सुयश गेला ते घर सांगतो.)

मॅडम......साहेब आठव्या मजल्यावर गेले आहेत.रूम नंबर ८०३/ स्वरांगी सुयश देशमुख..........."वाचमन"

नाव ऐकताच शिखा हादरते....... आतून ती पुरती कोलमडते.......

मॅडम........काय झालं??? बरं वाटत नाही का तुम्हाला??? पाणी देऊ का??? "वाचमन"
 

आ........नाही.....नको.......येते मी वर जाऊन....धन्यवाद दादा......"शिखा"

शिखा जड पावलांनी पुढे जात असते.तिच्या कानात वाचमनने सांगितलेलं नाव घुमत असत.कशीबशी ती लिफ्ट जवळ पोहचत आठव्या मजल्याचं बटन दाबते..... जस जशी लिफ्ट वर जाते तस तस हिच्या हृदयाचे ठोके वाढत जातात. लिफ्ट आठव्या मजल्यावर येऊन थांबते तशी शिखा घाबरतच बाहेर येते.रूम नंबर ८०३ बाहेर जाऊन उभी राहते. आतमध्ये काय चाललं असेल.......काही वेगळं दृश्य तर बघायला मिळणार नाही ना.......असे नको नको ते वाईट विचार तिच्या मनात येत असतात. एवढयात तीच लक्ष बाजूला असलेल्या नावाच्या पाटीवर जात. नाव बघून शिखाचे डोळे भरून येतात......तरी हिम्मत करून शिखा बेल वाजवते.

स्वरांगी दारात शिखा ला बघून एक नजर सुयश वर टाकते.

काय झालं स्वीटहार्ट........अशी का बघतेस......."सुयश"

स्वरांगी दार खोलून शिखा ला आतमधे घेते.शिखाला आलेलं बघून सुयशला काही फरकचं पडत नाही.उलट त्याच्या कपाळावर आठ्याच येतात.

तू.......तू काय आता माझी जासुसी करतेस का??? का आलीस इथे?? "सुयश"

सुयश.........ही नावाची पाटी....... स्वरांगी सुयश द....देशमुख......... काय अर्थ आहे याचा???? "शिखा"
 

काय अर्थ आहे म्हणजे???? माझ्या बायकोच्या नावाची पाटी आहे ती....."सुयश"

बायको???? आणि मग मी कोण आहे......सुयश का अस वागलास???? काय चूक केली मी........की त्याची एवढी मोठी शिक्षा देतोयस मला....."शिखा"

मी स्वरांगी वर प्रेम करतो.....समजलं...... स्वरा ची जागा तूच काय दुसरं कोणीही घेऊ शकत नाही....."सुयश"

मी हे मानत नाही.......... पहिली बायको असताना दुसरं लग्न बेकायदेशीर असतं सुयश..........."शिखा"
 

हो...... मला माहित आहे सगळं....... "सुयश"
(सुयश कुत्सित पणे हसत स्वरांगीला जवळ घेतो. त्यांना अस जवळ बघून शिखा आणखीन कोलमडते.)

आपल्या बाळाचा तरी विचार करायचा ना........का अस वागलास........ मी अस नाही बघू शकत तुला दुसरं कोणासोबत......"शिखा"
(शिखा रडत होती. हात जोडून विनवत होती.)

हो.......!!!!! मग मी गेल्या दोन वर्षापासून तुम्हाला एकत्र बघते......त्याच काय??? मला या गोष्टीचा किती त्रास होत असेल......याचा विचार केलास का तू??? "स्वरांगी"

का करू मी विचार...... ज्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या त्याचा विचार मी का करू???? "शिखा"

लग्न होऊन पण गेली अनेक वर्षे आम्ही लांब राहतोय......किती सहन केलंय मी........नाही माहीत तुला...... समजलं......."स्वरांगी"
(सुयश तिला मिठीत घेऊन शांत करतो आणि शिखा समोरच तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतो.)

सुयश.........प्लिज थांबव हे सगळं.........आणि काय बोलते ही बाई........."शिखा"

बरोबर बोलते ती.......हो........गेली अनेक वर्षे आम्ही जवळ असून पण  एकमेकांपासून लांब आहोत.........

वयाच्या अठराव्या वर्षी मी आणि स्वरांगी प्रेमाच्या सर्व परिसीमा ओलांडून वाहवत गेलो होतो........त्यातच स्वरांगी गरोदर राहिली.स्वरांगी तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी.........खूप लाडात वाढलेली.......माझ्यासाठी तिने तीच घर सोडलं...... ती गरोदर आहे कळताच तिच्या वडिलांनी तिला गर्भपात करण्यासाठी सांगितलं....... पण आम्हाला हे बाळ हवं होतं......रागाच्या भरात स्वरांगीच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं......... आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच महिन्यात असल्याने......तीन महिन्यासाठी स्वरांगीची सोय मी एका मित्राच्या घरी केली.......तीन महिन्यांनी आमची अठरा वर्षे पूर्ण झाली आणि आम्ही कोर्ट मॅरेज केलं......स्वरांगी जॉब करू लागली......मी पण करस्पॉंड्स करत होतो. एका कम्पनीत जॉब करून शिक्षण घेत होतो.......नऊ महिन्यांनी मायरा नी जन्म घेतला........मला जमेल तसा वेळ मी स्वरांगी आणि मायरा ला देऊ लागलो......स्वरांगी आई झाली कळताच तिच्या वडिलांचा राग निवळला.......त्यांनी आम्हा दोघांना स्वीकारलं......त्यांच्याच कम्पनीत मी मोठ्या हुद्यावर कार्यरत झालो.......आम्हाला सुखात राहत यावं म्हणून त्यांनी हा फ्लॅट घेऊन दिला.......वयाच्या चोविसाव्या वर्षी मी.......माई आणि आप्पांना स्वरांगी आणि माझ्याबद्दल सांगितलं.स्वरांगी आपल्या जातीतली नसल्याने घरात माई आप्पांचा या लग्नाला विरोध होता........त्यातच आप्पांना हृदयविकारचा झटका आल्याने हा विषय मी तिथेच थांबवला......पण काही दिवसांनी आप्पांनी माझ्याकडून वचन घेतलं.......ते ठरवतील त्याच मुलीशी मी लग्न करेन........काही दिवसांनी तुझं स्थळ आलं आणि मी स्वरांगीच्या सहमतीने हे लग्न केलं............."सुयश"

त्याचा एक एक शब्द शिखाच्या जिव्हारी लागत होता.शिखाची अवस्था तर डोक्यावर छप्पर आणि पायाखाली जमीन नसल्यासारखी झाली होती.

अरे........पण यात माझी काय चूक???? मी काय केलं होतं ज्याची एवढी मोठी शिक्षा तू आता देतोयस मला???का एवढं प्रेम केलंस......एवढी काळजी घेतलीस........का बाळासाठी ट्रीटमेंट करून एवढा पैसा आणि वेळ वाया घालवलास????? "शिखा"
 

तुझ्यासोबत नीट वागलो नसतो....... तर आप्पांनी मला घरातून काढलं असत."सुयश"
 

शिखा एकदम सुन्न होऊन तिथेच खाली बसली.......संस्कार रडू लागला होता.......तिने ब्लाऊस ची बटणं काढून त्याला छातीजवळ घेतलं आणि दूध पाजू लागली.........डोक्याला हात लावून सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली.........

सुयश......... खेळणं केलंस रे माझं........मला या गोष्टी आधी सांगितल्या असत्या तर मी हे लग्न केलंच नसत......का माझं आयुष्य खराब केलंस आणि तेही या वळणावर........"शिखा"
 

आय एम सॉरी शिखा............पण माझा नाईलाज होता.......प्लिज समजून घे........"सुयश"

सुयश....... प्लिज...... स्टॉप इट.......अरे मला काय समजतोस तू..........हा..........सॉरी बोलून माफ करण्याएवढी लहान गोष्ट नाही ही.........."शिखा"

काही वेळात मायरा तिथे आली शिखाला अस खाली बसलेलं पाहून ती जरा गोंधळली.......तिने इशाऱ्यानेच तिच्या आई ला म्हणजेच स्वरांगी ला काय झालं तर विचारलं......तिने पण डोळ्यानेच काही नाही असं खुणावलं तशी ती आतमध्ये गेली........मायलेकीचे इशारे शिखा बघत होती.......

म्हणजे तुमच्या मुलीला सुद्धा यातलं काही माहीत नाही तर..........वाहहहहह......सुयश......वाहहहह....."शिखा"
(एवढं बोलून शिखा तिथून उठते......ब्लाऊसची बटणं लावते.....पदर सावरते आणि डोळे पुसत तिथून निघून जाते.......)
 

शिखा खाली येते.....तिने थांबवलेल्या रिक्षात ती बसते आणि आप्पांना फोन करून जवळच असलेल्या गार्डन मध्ये बोलावून घेते...

क्रमशः

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading