मनशांती.....( भाग ८)

श्रावणी लोखंडे

भाग १

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826



भाग २

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/



भाग ३

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/



भाग 4

https://www.irablogging.com/blog/manshanti.......-part-4_5594



भाग 5

https://www.facebook.com/581606972323826/posts/1071753296642522/



भाग ६

https://www.facebook.com/581606972323826/posts/1073631626454689/



भाग ७

https://www.facebook.com/581606972323826/posts/1074386723045846/



शिखा पत्र वाचुन मटकन खाली बसते. तिला काही सुचतचं नाही. ती तडक उठून डॉक्टरांकडे जाते.



डॉक्टर...…......येऊ का आत...??? "शिखा"



हो.......या ना..!!!! प्लिज कम इन........!! सीट.....

मग काय.......झाला वाटत तुमचा निर्णय.......तुम्ही डब्बे देणार नाआम्हाला........??"डॉक्टर"



नाही डॉक्टर...........नाही..... म्हणजे खरं तर मी वेगळ्या विषयावर बोलायला आली आहे......."शिखा"

(शिखाच्या आवाजातला कंप आणि डोळ्यात पाणी बघून डॉक्टर तिला लगेच बसायला खुर्ची देतात आणि पाण्याचा ग्लास देतात तिच्या हातात. शिखा घटाघटा पाणी पिते आणि थोडी शांत होते.)



काही झालं आहे का मॅडम......???"डॉक्टर"



हो........तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुयश देशमुख म्हणून एक पेशन्ट ऍडमिट आहेत त्यांची थोडी माहिती हवी होती...."शिखा"



ओह...…..वेल.......मिस्टर सुयश देशमुखांना ब्लड कॅन्सर आहे..... आणि ते लास्ट स्टेजला आहेत.ब्लड कॅन्सर त्यांना खुप आधी पासून म्हणजे .....मी वर्षभरापूर्वी त्यांच्या टेस्ट केल्या होत्या........त्यात अस समजलं की......निदान दोन वर्षे जास्त झाली असतील त्यांना कॅन्सर होऊन अस त्या टेस्ट मध्ये माझ्या निदर्शनास आले, पण कसं आहे मॅडम.........काही लोकांची लक्षणे ही कॅन्सर च्या सुरवातीलाच दिसतात तर काहींच्या बाबतीत मिस्टर सुयश देशमुखांसारखं होतं......."डॉक्टर"



आता....…यावर काही ईलाज नाही का???? प्लिज डॉक्टर....... काही असेल उपाय तर सांगा मी सगळं करायला तयार आहे.......??"शिखा"



सॉरी मॅडम.......यावर आता काहीच ईलाज नाही........ आपण फक्त त्यांना आनंदी ठेऊ शकतो.......बाकी ती व्यक्ती आपल्या सोबत किती महिने,आठवडे,दिवस अथवा किती तास राहील हे देखील माहीत नाही....."डॉक्टर"



शिखा हे ऐकून रडू लागते.....डॉक्टर तिला शांत करतात.



ते तुमचे नातेवाईक आहेत का....???? "डॉक्टर"



नाही......... माझे मिस्टर आहेत ते.....मला त्रास होऊ नये म्हणून एवढी मोठी गोष्ट........ लपवली त्यांनी माझ्यापासून..…"शिखा



व्हॉट.........पण तुम्ही तर........ठीक आहे ते जाऊदे...….पण आता काही नाही होऊ शकत.........आय एम सॉरी......."डॉक्टर"



शिखा डॉक्टरांच्या केबिन मधून उठून बाहेर येते आणि स्वरांगी च्या शेजारी जाऊन शून्यात नजर लावून बसते........



शिखा..….....प्लिज.….सांभाळ स्वतःला. ते पत्र माझ्याकडे गेल्या वर्षभरापासून आहे आणि ते मी गेले वर्षभर माझ्या या... .....पर्स मध्ये सांभाळून ठेवलं आहे.......हे पत्र त्यानी माझ्याकडूनच लिहून घेतलं होतं.......त्याने स्वतःला किती कठोर केलं होतं हे मी स्वतः अनुभवलं आहे. आता तुला सगळं समजलंच आहे तर प्लिज सांभाळ.......त्याच्या समोर अशी खचून जाऊ नको.......त्याला सहन नाही होणार ते......"स्वरांगी"



शिखा तिच्या गळ्यात पडून रडू लागते.......



एकदा मला सांगितलं असतं तर.….....काय फरक पडला असता......जेवढा वेळ होता त्याच्या कडे निदान तो वेळ तरी आणखीन भरभरून जगलो असतो ना आम्ही........ त्याची सगळी हौस मौज केली असती गं मी........आता हा असा पडून आहे तो उठून बघेल का गं  मला........प्लिज......तू तरी त्याला सांगून बघ ना........त्याला म्हणावं तुझी राणी आली आहे....... तुझ्या स्वप्नातली परी आली आहे........ आता अस वाटतंय खरच मी परी असते तर जादूची कांडी फिरवून सगळं एका चुटकीसरशी नीट केलं असत.......पण मी नाही गं परी........नाही मी परी......."शिखा" (शिखा हुंदके देऊन रडत होती.)



शिखा..…....प्लिज शांत हो.....अग त्याला जस्ट चक्कर आली होती.....पण तो काही रिऍक्ट होत नव्हता म्हणून त्याला ऍडमिट केलं आहे.......बेड खाली नाहीत म्हणून त्याला ओटी मध्ये ठेवलं आहे..…..तासाभरात त्याला जनरल वोर्ड मध्ये शिफ्ट करतील........तू नको टेन्शन घेऊ.......आणि जे आहे त्याला आता सामोरं गेलंच पाहिजे......तू हार नको मानू......."स्वरांगी"



शिखाला स्वरांगीच बोलणं पटत असतं.......ती लगेच स्वतःला सावरते.दोन्ही हातानी डोळे पुसते आणि मनाशी ठरवते.......जेवढे दिवस त्याच्या जवळ आहेत तेवढे दिवस त्याला भरभरून प्रेम द्यायचं.........गेल्या वर्षभराची कसर पुरी करायची.........



सुयशला जनरल वोर्ड मध्ये शिफ्ट करतात. सुयशला जाग येते तेंव्हा उशा जवळ त्याला शिखा बसलेली दिसते.



शिखा...…..तू......इथे....... "सुयश"



मला सगळं समजलं आहे....... आणि आता माझ्याशी खोटं बोलण्याचा विचार पण करू नको........खरतरं आता कुठलाच विचार करू नको. मला तर आधीपासूनच शंका होती,की तू काही तरी लपवतोयस,कारण तू माझ्याशी अस वागूच शकत नाही याची खात्री होती मला...........चल ते सगळं सोड आता.…......माई आप्पा....निमेश माझे आई बाबा सगळेच तुला शुद्ध येण्याची वाट बघत आहेत........."शिखा"



सॉरी सुयश......जे पत्र तू माझ्याकडे ठेवायला दिल होतं..... तू गेल्यानंतर द्यायला सांगितल होतं ते मी आताच दिलं शिखाला........मी हे खूप आधीच करायला हवं होतं पण याला योगायोग म्हण किंवा देवाची मर्जी.........तुझ्याकडे किती वेळ आहे आम्हाला कोणालाच माहीत नाही........ पण शिखाच्या येण्याने तुझं आयुष्य आणखीन महिने किंवा वर्षे नक्कीच वाढलं असेल…........याची खात्री आहे मला.........."स्वरांगी"



स्वरांगीच बोलणं ऐकून दोघेही रडू लागतात.......शिखा सुयशचे डोळे पुसून नजरेनेच नाही रडायचं अस खुणवते. सुयश तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून हृदयाशी धरतो.......



एवढ्यात माई आप्पा,निमेश आणि शिखाच्या घरचे सगळे त्याला भेटायला आत येतात......आप्पांच्या कमरेवर इवलासा संस्कार त्याच्या पप्पांना बघत असतो.........आप्पांनी सुयश कडे बोट दाखवून त्याला त्याच्या वडिलांची ओळख करून देतात..…..



ते बघ.... तुझे पप्पा........ "आप्पा"



इवलासा संस्कार त्याच्या बोबड्या बोलातच सुयशला.......



पापा....... अशी हाक मारतो........ सुयश त्याच्या आवाजाने रडू लागतो.सुयशला......त्यानी खूप काही गमावल्याची जाणीव होते.शिखाला त्याचा रोख समजतो तशी शिखा त्याला सावरते.......सुयश तिच्या कुशीत शिरून रडू लागतो.संस्कार सुयश च्या चेहऱ्यावरून हात फिरवतो......त्याचे मऊ मऊ हात पकडून सुयश त्याच्या हाताचा पापा घेतो....... त्याला कवेत घेऊन बापाचं सुख अनुभवत असतो.........



आप्पा पण त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात.......हा क्षण अगदी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.......कठोर वागणारा बाप.…..... आज हळवा होऊन त्याच्या मुलाच्या क्षणिक आयुष्यासाठी रडत असतो तर दुसरीकडे दुसरा बाप......... हा त्याच्या इवल्याशा मुलाला कवेत घेऊन पुढील आयुष्य त्याला बिना बापाचं रहावं लागेल म्हणून रडत असतो.......तिघांना अस रडताना बघून सगळेच भावुक होतात....शिखा धावतच तिच्या आईच्या कुशीत जाते.......एव्हाना सगळं वातावरण शांत.........आणि निःशब्द झालेलं असत.......



सगळ्यांना अस रडताना बघून मायरा ला खूप भरून येत.....कारण तिला आईच प्रेम तर भेटलं होत पण बापाचं नाही....... त्या सगळ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मायरा म्हणते.........

 



अरे.......तुम्ही पण काय.......काकांना जायला अजून खूप वर्षे बाकी आहेत........तुम्ही सगळे त्यांना ट्रेलर दाखवत आहात का???? सगळे हॅपी रहा......रडू नका......चला आता......सगळयांनी डोळे पुसा बघू.......नाही तर काही वेळात हे पूर्ण हॉस्पिटल वाहून जाईल. "मायरा"



मायरच्या बोलण्यावर सगळे हसतात.…....सगळ्यांना हसताना बघून संस्कार पण हसू लागतो.



क्रमशः



कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.



धन्यवाद????????


🎭 Series Post

View all