एक संघर्ष : आईविरुद्धचा ! (भाग - ४)

Ek sangharsh.. Nakki wacha

एक संघर्ष : आईविरुद्धचा (भाग - )

भाग -  https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha-_5314

भाग -
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---2_5332

भाग -
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---3_5389

आता पुढे...

वीरः आज तब्बल १४ वर्षांनंतर, आम्ही आई-बाबा झालो होतो... आम्हाला मुलगा झाला होता... पण, पण... बाळाचं वजन फक्त १९०० ग्रॅमच होतं.. एका डोळ्यात हसु आणि एका डोळ्यात आसु होते... एवढंच दिसायचं गं ते बाळ! बाळ बाहेर आल्यानंतर त्याला लगेच काचेच्या पेटीत ठेवलं होतंं.. सविताचं सिझेरियन केल्यामुळे ती बऱ्याच वेळाने शुद्धीवर आली.. ती जेव्हा शुद्धीवर आली, तेव्हा तिलाच तीचं आश्चर्य वाटलं... तीने आजुबाजुला पाहिलं, पण तिला बाळ काही दिसलं नाही, नाही बाळाचा आवाज येत होता... पाळणा पण रिकामाच होता... ते पाहुन ती घाबरली... मला जवळ बोलावलं आणि मला विचारलं, अहो, मी जिवंत कशी काय? म्हणजे आपलं बाळ???

          मला तिची घालमेल समजली.. मग मी तिचा हात हातात घेतला आणि हातावर थोपटत तिला शांत केलं... तिला म्हटलं, अगं सविता, शांत हो.. आपलं बाळ सुरक्षीत आहे.. तुझी तपश्चर्या फळास आली.. आपण आई -बाबा झालो... आपल्याला मुलगा झालाय... हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला... पण क्षणभरच... परत तिने घाबरत विचारलं, मग ते माझ्याजवळ का नाही? मला त्याला पहायचं आहे.. कुठे आहे आपलं बाळ, सांगा न लवकर? तिची अस्वस्थता मला कळंत होती.. पण माझ्यापुढे खुप मोठ्ठ प्रश्नचिन्ह होतं, आता हिला काय सांगू म्हणून ...

          मग मी शब्दांची जुळवाजुळव केली... तीला सांगितलं की, आपलं बाळ सुरक्षीत आहे, फक्त त्याचं वजन जरा कमी आहे, म्हणून त्याला काचेच्या पेटीत ठेवलंय. काही दिवसात त्याचं वजन वाढलं कि, मग त्याला कायमंच आपल्याजवळ देतील.. ते ऐकून तिला जरा बरं वाटलं.. ती स्वतःला अजुन खंबीर बनवत होती.. फक्त आमच्या बाळासाठी! ती शेवटी बोललीच की, अहो, मला घेऊन चला नं त्याच्याकडे .. मी त्याला लांबुनच पाहिल, मला बघायचं आहे त्याला.. फक्त एकदा, फक्त एकदा बघु द्या न मला त्याला... तीचं ते बोलणं ऐकून मला गलबलुन आलं, तिला काय सांगावं हेच समजतं  नव्हतं मला..

          तेवढ्यात, डॉक्टर तपासणीसाठी आले.. त्यांनी आमचे बोलणे ऐकले.. त्यांना आमचा बाळासाठीचा प्रवास माहीत होता... त्यांना पण गहिवरुन आले.. त्यांनी मला बाहेर बोलावलं आणि मला म्हणाले की, मला सुरुवातीपासून तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे. तुम्ही केलेला संघर्ष मला माहित आहे.. सहाजिकच आहे की, एक आई तिच्या बाळाला भेटण्यासाठी खूप उत्सुक असेल.. सविताला त्याला भेटायचं आहे नं.. मी एक काम करतो, नर्सला सांगतो आणि थोड्यावेळासाठी बाळाला तुमच्या खोलीत पाठवतो, पण फक्त थोडा वेळच हं! कारण जास्त वेळ बाळाला बाहेर ठेवणे त्याच्यासाठी धोक्याचे असेल.. ठीक आहे? डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मला खुप आनंद झाला. मी डॉक्टरांना वचन दिले की, बाळाला थोडा वेळच पाहू आणि लगेच परत आणून ठेवू.

          त्याप्रमाणे, डॉक्टरांनी नर्सला आवश्यक त्या सूचना दिल्यात आणि बाळाला कपड्यामध्ये गुंडाळून घेऊन आली.. नर्सने त्याला माझ्याजवळ दिले.. गुलाबी कापडात गुंडाळलेला तो एवढासा जीव! त्याचे इवले इवले हात, इवले इवले पाय, छोटंस नाक, गोरा गोरापान, गोल चेहऱ्याचा, डोक्यावर एकही केस नाही, खूप प्रयत्नाने डोळ्यांची उघड झाप करणारा...  खूप निरागस दिसत होता गं तो! जसं नर्सने त्याला माझ्या हातात दिले, तसं त्याचं लोभस रूप पाहून मी त्याला छातीशी कवटाळलं आणि आपोआपच माझ्या डोळ्यातून दोन अश्रू त्याच्या अंगावर पडलेत! पण ते आनंदाश्रू होते! १४ वर्षांच्या अथक परिश्रमांचं ते फळ होतं!

          मी तसंच त्याला सविता जवळ घेऊन आलो.. बाळाला पाहताच, ती सुद्धा रडायला लागली.. पण सिझेरियन झाल्यामुळे तिला ऊठता येत नव्हतं. म्हणून मग मीच बाळाला तिच्या जवळ झोपवलं... तिने मायाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याची पापी घेतली.. तसं ते बाळ खुदकन हसायला लागलं... आईचा स्पर्श त्याने बरोबर ओळखला आणि त्याने डोळे उघडले! मग थोड्या वेळाने त्याला परत काचेच्या पेटीत नेऊन ठेवलं.. आता सविताच्या चेहऱ्यावर जरा समाधान दिसंत होतं..

           सविताला दोन दिवस तर उठताच येत नव्हतं... आणि तिकडे आमचं बाळ पण एकटं होतं... तो जन्मल्यावर जेव्हा त्याला पाहिलं होतंं न, तेव्हा तो इतका अशक्त दिसत होता न, कि आधी मला वाटलं, हा वाचतो की नाही! पण तो बराच  चपळ असल्यामुळे आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमांमुळे, दोन तीन दिवसांतच त्याचं वजन वाढायला लागलं... आता त्याला सविताजवळ दुध प्यायला देत होते.. बाळपण मस्त चुटुचुटु दुध प्यायचं आणि मग झोपुन जायचं...

          त्याची प्रगती पाहुन डॉक्टरांनी, दहा दिवसांतच, त्याला आमच्याकडे सोपविलं... आनंद आमच्या आयुष्यात परत आला होता... पंधरा दिवस इस्पितळात राहिल्यानंतर आम्ही आता आमच्या घरी आलो होतो... खुप खुष होतो आम्ही.. आम्ही त्याची खुप काळजी घ्यायचो... सविता त्याला दर दोन तासांनी दुध पाजायची, त्याची औषधं वेळेवर द्यायची ... त्यामुळे एक-दोन महिन्यातच त्याचं वजन वाढलं आणि तो सामान्य मुलांसारखा दिसायला लागला... तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला...

           तीन- चार महिन्यानंतर त्याची आणि सविताची तब्येत चांगली असल्यामुळे आम्ही त्याचं बारसं करायचं ठरवलं... अशा आनंदाच्या वेळी, माझे घरचे माझ्यासोबत असावे, असं वाटायचं.. मग मी घरी फोन केला आणि सगळ्यांना बारस्याचं आमंत्रण दिलं... सगळे नाखुशीनेच बोलत होते...पण परत मी स्वतःची समजुत काढली आणि तयारीला लागलो...

         बारस्याचा कार्यक्रम खुप मोठा नव्हता. फक्त माझ्या घरचे, सविताच्या घरचे आणि आमच्या इमारतीत राहणारे लोक, एवढेच बोलावले होते.. सगळी तयारी झाली होती, बरेच लोकपण आले होते.. कार्यक्रम सुरु व्हायची वेळ झाली, तरी माझ्या घरचे कोणीच आले नव्हते.. तेवढ्यात मला आई येतांना दिसली... कितीतरी वर्षांनी मी तिला पाहत होतो.. तिला पाहताच माझं मन भरुन आलं.. डोळ्यांतुन गंगा जमुना सुरु झाल्या, पण, पण आईचा चेहेरा निर्विकार होता.. कितीतरी वर्षांनी ती तिच्या मुलाला पाहत होती, नातवाला पाहत होती.. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसंत नव्हता.. फक्त यायचं म्हणुन ती आली होती..

          कार्यक्रम सुरू झाला. बाळाचं नाव ठेवायचा मान तर आत्याबाईंचा! पण बाळाला तीन तीन आत्या असुन एकही आत्या बारस्याला आली नव्हती.. आम्हाला खुप वाईट वाटलं... मग शेवटी आम्हीच बाळाचं नाव ठेवलं... "अनय"... सगळा कार्यक्रम पार पडला... जातांना माझी आई अनयजवळ आली आणि त्याला पाचशे रुपये दिले....  मी म्हटलं की आई आम्हाला पैसे नको, फक्त आशीर्वाद दे.. हे पैसे तुझ्या जवळच राहू दे, तुलाच कामात येतील...

           कारण मोठा दादा श्रीमंत झाला होता. त्याला कोणाचीही काळजी नव्हती.. तो त्याचा वेगळा रहात होता.. त्याने गावात दोन बंगले बांधले होते, मुंबईत दोन फ्लॅट घेतले होते... त्यामुळे आई आमच्या घरातच मधल्या दादाबरोबर राहत होती.. तो काहीच कामधंदा करत नव्हता... फक्त दिवस-रात्र दारू प्यायचा आणि पैसे त्यातच घालायचा! त्याची बायको म्हणजे माझी वहिनी, लोकांकडे धुणीभांडी करायची... त्यात त्यांना तीन मुलं... कसंबसं ते त्यांचं पोट भरत होते... जेव्हापासुन मला हे कळलं होतं, तेव्हापासून मी आईला काही पैसे पाठवायचो.. तेवढीच तिला मदत... म्हणून मी तिने अनयला दिलेले पैसे तिला परत देऊन दिले...

           त्यानंतर ती कधीच आली नाही आमच्याकडे... सविता म्हणायची की आपणच जाऊ त्यांना भेटायला... म्हणुन मग आम्हीच जायचो अधुनमधुन तिला भेटायला.... आई जेव्हा आजारी असायची, तेव्हा आम्ही तीघे तिला भेटायला जायचो...  पण तो जिव्हाळा नव्हताच...  कोणातच.... ना आईला माझ्याबद्दल प्रेम ना तिच्या नातवाप्रती आपुलकी...  फक्त एक कर्तव्य म्हणून सगळं सुरु होतंं... सवितालि तिने एवढा त्रास देऊनही तिची कोणाप्रती काहीच तक्रार नव्हती ...

क्रमशः ...

🎭 Series Post

View all