Login

एक संघर्ष : आईविरुद्धचा ! (भाग - ३)

Nakki wacha...

एक संघर्ष : आईविरुद्धचा (भाग - ३)

भाग-१ -https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha-_5314


भाग-२
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---2_5332

आता पुढे...

वीरः आम्ही टेस्ट ट्युब बेबीसाठी तयार झालो खरं, पण त्यासाठी खुप पैसे लागणार होते. त्याशिवाय, दीर्घ काळ थांबावे लागणार असल्यामुळे, न रागवता शांत रहाणे आणि  सहनशीलता वाढविणे खुप आवश्यक होते.... शरीराने, मनाने आणि पैशांनी आम्हाला सक्षम रहावं लागणार होतं. आम्ही सिद्धी विनायकला जाऊन आलो. गणपतीबाप्पाचे आशीर्वाद आमच्यापाठीशी असणे खुप महत्त्वाचे होते.  आमची सगळी तयारी झाल्यावर, आमच्यावर त्यासाठीचे उपचार सुरू झाले. माझे स्पर्म, सविताच्या गर्भाशयात सोडण्यात आले. पण पहिल्यावेळीचा हा प्रयत्न असफल झाला. 

          तरिही, आम्ही हार मानली नाही. जणु देव प्रत्येकवेळी आमची परीक्षाच पाहत होता. पण त्याच देवावर आमचा पूर्ण विश्वास होता. मग परत दुसऱ्यांदा चान्स घेतला. परत सगळं तेच! परंतु दुसऱ्या वेळी, त्यात दहा पैकी फक्त सविताचा अहवाल सकारात्मक होता... ते ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला. सविताला तर कुठे ठेवु आणि कुठे नको असं झालं होतं.

          पण खरी परीक्षा पुढे होती. पुढच्या महिन्यात सोनोग्राफी केली. त्या सोनोग्राफीमध्ये एक नाही, दोन नाही तर तीळे दिसत होते... आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन! तसं तीन बाळं होते. परंतु, काही दिवसांतच त्यातले एक कमकुवत आणि अशक्त असल्यामुळे आपोआप पडले. पुढच्या सोनोग्राफीमध्ये दुसऱ्या बाळाचे हृदय कमकुवत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यालापण काढुन टाकावे लागले...शेवटी गर्भपिशवीत फक्त एकच बाळ राहिलं. 

          आता त्या बाळाला पोटात वाढविणे आणि त्याला सुखरुप या जगात आणणे, हेच आमचं ध्येय होतं. मृदुला, तु कल्पना पण करु शकणार नाही, की आम्ही हे आव्हान कसं पेललं असेल! बाळाला या जगात आणण्यासाठी सविताने चांगलीच खिंड लढविली... 

मृदुलाः म्हणजे? मला नाही समजलं! असं काय वेगळं करावं लागलं?

वीरः अगं, जेव्हा आम्हाला कळालं, कि गर्भधारणा झालीय, तेव्हापासून बाळ जन्माला येईपर्यंत, सविताला रोज एक इंजेक्शन मांडीवर घ्यावं लागणार होतं. म्हणजे बाळ बाहेर येईपर्यंत जवळजवळ २८० इंजेक्शन्स घ्यावे लागणार होते.

मृदुलाः डिलिव्हरी होईपर्यंत २८० इंजेक्शन्स! बापरे, एवढे इंजेक्शन्स तर कोणी पूर्ण आयुष्यभरात पण घेतले नसतील!  खरंच, किती त्रास सहन केला तिने बाळासाठी! 

वीरः हो ना, खरंच कमाल होती तिची! बाळासाठी सगळं सहन केलं तिने... रोज एक याप्रमाणे २६५ इंजेक्शन्स घेतले तिने... सुरुवातीला एक नर्स घरी येऊन इंजेक्शन देऊन जायची. त्या इंजेक्शनची किंमत होती रु. ४८०/- आणि ते इंजेक्शन टोचायचे रु. २००/- ती नर्स घ्यायची... मग महिनाभराने मीच तिला रोज इंजेक्शन द्यायचो... रोज तिच्या मांडीवर इंजेक्शन देणे, मलाच खुप त्रासदायक वाटायचे... रोज इंजेक्शन घेऊन तिच्या दोन्ही मांड्या सुजल्या होत्या.. त्यामुळे तिला नीट चालताही येतं नव्हतं...  पण बाळासाठी तिने तो त्रास पण सहन केला...

          तिला पूर्णपणे आरामाची गरज होती. पण मला कार्यालयात  जाणे भाग होते.. आठ - आठ तास कार्यालयात काम करणे आणि जाणे-येणे दोन-दोन तास, असं मी बारा बारा तास बाहेर राहणार.... मी सविताला पूर्ण वेळ देवु शकत नव्हतो, हे ओळखून तिचा लहान भाऊ, राहुल आमच्या मदतीला आला. राहुल महाविद्यालयात शिकत होता. त्याचा आपल्या बहिणीवर खुप जीव होता...  तिला सगळं सुकर व्हावं, म्हणून त्याने  स्वतःचं शिक्षण एक वर्ष पूर्णपणे थांबवलं... आणि आमच्याजवळ येऊन राहिला...या वर्षभरात सगळ्यात जास्त राहुलने  सविताची काळजी घेतली... स्वयंपाक करणे, तिला  खाऊपिऊ घालणे, धुणीभांडी करणे, घरातली इतर कामे करणे, असं सगळं तो आनंदाने करायचा... त्याला म्हटलंही एवढं नको करत जाऊ... मग म्हणायचा की, मी दिवसभर रिकामाच तर असतो... तेवढीच माझी मदत.. खूप केलं त्याने आमच्यासाठी! तिच्या माहेरचे खरंच खूप छान आहेत! 

          रोजची ही इंजेक्शन्स तर असायचीच आणि त्या व्यतिरिक्त आठवड्यातून एकदा इस्पितळात जाऊन एक इंजेक्शन पण घ्यावं लागायचं... त्यासाठी आणि सोनोग्राफी साठी इस्पितळात जावं लागायचचं ...  तिला जेव्हा चौथा महिना होता, तेव्हा पावसाळा सुरू होता... चौथा महिना असल्यामुळे सोनोग्राफी करणे आवश्यक होते. मी तिला सोनोग्राफीसाठी इस्पितळामध्ये नेलं... ही सोनोग्राफी आतुन करायची होती. त्यात सोनोग्राफीनंतर तिला चक्कर यायची....

          सोनोग्राफी झाली आणि आम्ही दवाखान्यातुन बाहेर निघालो. थोडं अंतर चालत नाही, तर सविताला चक्कर यायला लागली. तिला एका ठिकाणी बसवलं आणि रिक्षा थांबवून लागलो... तेवढ्यात पाऊस सुरू झाला होता... रिक्षा थांबत नव्हत्या... ज्या थांबत होत्या ते रिक्षेवाले इतके लांब यायला तयार नव्हते... मुंबईचा पाऊस तो... जोरात सुरु झाला होता... मग मी तिला उचलून एका इमारतीच्या फाटकाजवळ गेलो... तिथे एक रखवालदार होता...  त्याला सगळी हकीकत सांगितली.. त्याला खुप विनंती केली, तेव्हा कुठे त्याने सविताला त्याच्या खोलीमध्ये बसवायला परवानगी दिली... नंतर त्याला काय वाटंलं की, त्याने सविताला चहा करून दिला... गरम चहा पिल्यामुळे तिला पण  जरा बरं वाटलं....

          मी तिला तिथेच ठेवून परत रिक्षा शोधायला गेलो होतो.. १२ ते १५ रिक्षा गेल्या... पण इतका इतक्या दूर जायला कोणीच तयार होत नव्हतं... पावसामुळे काही तर थांबतही नव्हत्या... शेवटी, मी रागात एक मोठा दगड उचलला आणि रिक्षावर दगड मारायचा आभिनय केला... तसा एक रिक्षेवाला थांबला... त्याला सगळी परिस्थिती सांगीतली, तेव्हा कुठे तो आम्हाला घरी सोडायला तयार झाला... कसेबसे आम्ही घरी पोहोचलो...  तेव्हाच ठरवलं, आता गाडी घ्यावी लागणार... मग कर्ज काढून गाडी घेतली...

          असेच दिवस, महिने जात होते.. आता सविताला साडे आठ महिने झाले होते आणि अशातच तिचे पोट खुप दुखु लागले... साडे आठ महिन्यातच तिला कळा सुरू झाल्या होत्या...  तिला इस्पितळात दाखल केलं.. आता स्वतःची गाडी असल्यामुळे इस्पितळात जायला मागच्यासारखा जास्त त्रास झाला नाही... डॉक्टरांनी तिला तपासले आणि बाहेर येऊन सविताची तब्येत खूप जास्त गंभीर आहे, आई किंवा बाळ दोघांपैकी एकालाच वाचवता येईल आणि आईला वाचविले तर ती कधीच आई होऊ शकणार नाही, असे सांगितले... 

          पुन्हा एकदा देवाने आमची परीक्षा घ्यायचे ठरविले... ते ऐकुन तर माझ्या पायाखालची जमिनच सरकली... इकडे आड तिकडे विहीर, अशी माझी परिस्थिती झाली होती... जर मी सविताला वाचवायला सांगितले असते तर, सविता मला आयुष्यभर कोसत राहीली असती, मला का वाचविलं, आपल्या बाळाला वाचवायचं होतं, असंच बोलली असती... आणि बाळाला वाचवले असते तर मी त्याला आई कुठून आणून देणार होतो?  त्याला काय सांगणार होतो, तुला वाचविण्यासाठी तुझ्या आईचा जीव गेला? मी खुप मोठ्या धर्मसंकटात अडकलो होतो.... डॉक्टर सारखं येऊन माझा निर्णय विचारत होते... कारण त्यांनाही पुढची सगळी प्रक्रिया करायची होती आणि वेळही कमी राहिलेला होता...

           याही वेळी राहुल माझ्या मदतीला आला. मला म्हणाला की भाऊजी, तुम्ही ताईला वाचवा... मी ताईला नंतर सगळं समजावून सांगेल... ती ऐकेल माझं... तो लहान असुनही  खुप विचारी होता.... मलाही ते पटलं.. सविता राहिली तर एखादं मुल दत्तक घेता येईल, त्यालाही आईवडील मिळतील... शेवटी मनावर दगड ठेवुन मी डॉक्टरांना सविताला वाचवायचं सांगितलं... डॉक्टरांनी पण त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली... आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले... डॉक्टरांनी सविताचे सिजर केले... ते सविताला आणि बाळालाही वाचविण्यात यशस्वी झाले....

          यामुळे माझ्या डोक्यावरील मणामणाचे ओझे उतरल्यासारखे झाले! कोण आनंद झाला मला! माझ्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची घटना होती ती! आज माझ्याजवळ माझं बाळही होतं आणि बायको ही होती...

क्रमशः ...

🎭 Series Post

View all