विभक्त भाग ३६

in this part sayli and mihir settled as vibhkt

विभक्त भाग ३६

क्रमश : भाग ३५

सायली ला तिचे मिळणार होते ते प्रोमोशन मिळाले .. सायली आता हेड ऑफ द डिपार्टमेंट (HOD )झाली . सायलीचा कामाचा पसारा वाढला .. सारखे प्रेझेण्टेशन तयार  करायची आणि प्रेसेंट करायची .. सारख्या लेट मिटींग्स असायच्या .. मग मिहीर ला थांबायला नको म्हणून मिटिंग असली कि ती तिची कार घेऊन जायची .

इकडे मिहीर पण थोडा कामाकडे सिरिअस होऊन काम करू लागला .. कॅज्युअल ऍप्रोच मुळे  त्याने बऱ्याच नामी संधी सोडल्या होत्या . त्याचे झाले असे कि त्याच्या आत्ता पर्यंत त्याच्या प्रमोशन , नोकरी पगार याचे अप्रूप  कोणाला च  नव्हते त्यामुळे त्याला पण काही इंटरेस्ट वाटत नव्हता . पण आता सायली कडे बघून, तिचा कामातला इंटरेस्ट बघून आणि माझ्या स्टेटस मुळे  तिच्या स्टेस्टस मध्ये फरक नको पडायला याचा पण विचार त्याला येऊ लागला . काहि  का असे ना सायली ने मिहीर ला पण आपल्या सारखा वर्कहोलिक बनवूनच टाकला .

सायलीला उशीर होतो मग हा तरी घरी जाऊन काय करणार म्हणून हा पण ऑफिस मध्ये उशीर पर्यंत' काम करत बसायचा. त्यामुळे मिहीर चा बॉस त्याच्या कामावर खुश झाला आणि आपोआपोच त्याचे नाव पण प्रोमोशान लिस्ट मध्ये ऍड झाले . त्याच्या बरोबरचा   रवी राहिला मागे हा पोस्ट वाईज पुढे गेला .

मिहीर ने सायलीच्या आवडीचे मेनू बनवायला सांगितले हे सायलीला माहित नव्हते .. ती आपली जे पुढ्यात येईल ते खायची . जेव्हा तिला कळले तेव्हा तिने एक त्याच्या आवडीची  मेनू लिस्ट बनवली आणि विमल ताईंना सांगितली कि आता पुढील महिन्यात ह्या भाज्या बनवा .

मिहीर ने विमल ताईंना विचारले " हि भाजी का बनवलीत .. "

विमल ताई " सायली ताईंनी हि लिस्ट दिलीय भाज्यांची ती या महिन्यात करायला सांगितली म्हणून केली "

मिहीर " नको .. मी सांगितलेली करा "

विमल ताईंना वाटले या दोघांमध्ये भांडणे झालीत म्हणून दोघे आपापल्या पसंतीची भाजी करायला सांगत आहेत ..

विमल ताई " मी असे करते , मी दोन्ही भाज्या बनवते "

मिहीर " नाही .. मी सांगितलेली  बनवायची "

विमल ताई "ठीक आहे"

विमल ताई ने पुन्हा मिहीर ने सांगितलेल्या भाज्या बनवायला सुरुवात केली

सायली " अहो ताई .. , तुम्ही हि भाजी का बनवलित "

विमल ताई " मिहीर दादांनी काल पुन्हा ह्याच भाज्या बनवायला सांगितल्या "

विमल ताई ला पेचात पाडली या दोघांनी ..

मिहीर म्हणाला मी त्यांना पैसे देतो त्या मी सांगतो त्याच भाज्या त्या  बनवतील . सायली म्हणाली आता पासून मी पण त्यांना पैसे देणार त्या मी सांगतील त्याच भाज्या बनवतील

काय बोलायचे दोघांना .. एकमेकांच्या आवडीच्या भाज्या बनवण्यासाठी  ते असे करत होते आणि विमल ला वाटे की हे दोघे आपल्या आवडीच्या भाज्या बनवण्यासाठी  भांडतायत. अजब प्रेम होते दोघांचे .

मी तुला ऑफिस ला सोडणार आणि आणणार वरून पण प्रेमळ  वाद झाला मग शेवटी दोघांनी असे ठरवून टाकले कि आता जे काही आहे ते ५०/५०.

एक दिवस तू सांगितलेली भाजी एक दिवस मी सांगितलेली भाजी . एक दिवस तुझ्या गाडीने ऑफिस ला एक दिवस माझ्या गाडीने ऑफिस ला जायचे . आपले प्रेम सिद्ध करण्याची जणू कॉम्पिटिशनच चालू होती दोघांच्यात .

मधेच एखादा वीकएंड सायलीच्या घरी राउंड मारून यायचे , एखाद्या वीक एन्ड ला मिहीर च्या गावी जाऊन यायचे असे चालू होतेच .. बोल बोलता ८ महिने गेले  त्यांचे विभक्त पण त्यांनी दोघांनी स्वीकारले होते .

पण हळू हळू दोघे कामात बिझी होत गेले . त्याचे लाईफ एकदम मोनोटोनस होत गेले . या आधी कधी  कुठलेच वेळापत्रक ना पाळणारे दोघे , मुक्तपणे जगणारे दोघे घड्याळाच्या काट्यावर नाचू लागले . ह्या वेळी हे  उठायचे , ह्या वेळी जेवायचे , ह्या वेळी झोपायचे , ह्या वेळी शॉपिंग करू लागले . तरी मिहीर तस सायली पेक्षा खूप बोलका होता आणि त्याचा कॉमिक सेन्स जबरदस्त होता त्यामुळे तिला कधी कधी खूप हसवायचा .

कारण जशी सायली कामात बिझी तसाच हा पण कामात अडकत गेला . त्याला पण टीम , प्रेसेंटेशन , प्रोजक्टस च्या डेड लाईन्स होत्या . कधी कधी तर इतका बिझी असायचा कि जेवताना पण ब्लूटूथ वर कॉल चालू असायचा .

पण हा दोघांनाही आता स्वतः वर अभिमान होता .. ते जे करतायत ते त्यांनी केलेल्या प्लांनिंग ला प्रत्यक्षात उतरवत होते . आणि त्याचा रिझल्ट दोघांनाही हवा तसा स्पष्ठपणे दिसत होता .

मधेच एखादी बर्थडे पार्टी , कोणाची एनिवर्सरी , ला दोघे छान  एकटक टायर होऊन जायचे . मस्त मॅचिंग सारी ला त्याचा मॅचिंग शर्ट असे काहीतरी कॉम्बिनेशन करून जायचे . त्यावेळी मात्र खूप एन्जॉय करायचे.

(पहिल्या भागात जी रवी ची पार्टी लिहलेली आहे ती पार्टी करून ते कालच  आलेले आहे असे समजा आणि कहाणी तिथून पुढे सुरु  )

https://www.irablogging.com/blog/vibhakt---bhag-1

संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आधी मिहीर ने सायली ला मेसेज केला

मिहीर " आज किती वाजता सुटणार आहे स अंदाजे "

सायली "अंदाजे ८ वाजता "

मिहीर " ठीक आहे .. मी येईन तेव्हा खाली "

सायली " ओके .. लव्ह यु "

तेवढ्यात रवी आला त्याच्याशी बोलायला

रवी " काय मिहीर साहेब , थँक्स काल आल्या बद्दल .. तुम्ही दोघे आल्यामुळे चार चांद लागले पार्टी ला "

मिहीर " साहेब काय रे .. तू कधी पासून साहेब बोलायला लागलास .. हिणवतोस तो  का मला ?"

रवी " नाही रे .. तुझी गम्मत केली .. मग आज किती वाजेपर्यंत थांबणार आहेस "

मिहीर " आज मी ७. ३० पर्यंत आहे .. कालची पार्टी मस्त होती .. तो  दिन्या काय सुटला होता .. कसला डान्स करत होता .. नागीण डान्स "

रवी " हो .. ना .. त्याची बायको पण .. दोघे नवरा बायको कसले भारी डान्स करत होते .. "

मिहीर " हो ..ना .. ते फोटो पाठव कालचे .आमच्या मॅडम चे "

रवी " तुमची मॅडम म्हणजे काय ... बोलायचे नाव नाही .. कसली दिसते रे वाहिनी .. तू ना तिला मॉडेलिंग ला पाठव .. "

मिहीर " हमम.. सबकी छुट्टी कर देगी .. अरे ऐक ना .. पुढच्या आठवड्यात सायली चा बर्थडे आहे .. काहीतरी आयडिया सुचव ना .. "

रवी " मी एक काम करतो तुला माझ्या त्या इव्हेंट मॅनेजर चा नंबर देतो तू त्याच्याशी बोलून घे .. तो नक्कीच छान सांगेल काहीतरी "

मिहीर " ठीक आहे .. आणि नंबर घेऊन ठेवतो .. मग तुमचे काय ? संगीता  वाहिनी आणि तुझी आई यांचे गणित जमले कि नाही "

रवी " अरे .. सासवा सुने च जमते का कधी ? मी तर आता दुर्लक्ष करतो ."

मिहीर " तू ना तिला घरात बसवू नकोस .. कुठे तरी जॉब करू दे. तिला पण जरा ब्रेक मिळेल "

रवी " छे रे .. एव्हढि  काय ती स्मार्ट नाहीये .. ती ला  शहरात वावरायला जमलं पाहिजे ना .. जॉब ला जायचे म्हणजे ते गणितच वेगळे  असते .. गावातले इंग्लिश आणि शहरातले इंग्लिश यात पण फरक पडतो "

मिहीर " हेच तर ना .. तू आधीच नकार घन्टा  लावतोस ..ती तुझी बायको आहे आता तुला पाहिजे तसे तू तिला ग्रूम कर ना . सुरुवातीला एखादा कोर्स लाव .. हळू हळू होईल सवय "

रवी " हो रे .. हा विचार मी केलाच नाही .. "

मिहीर " पण आधी तिला विचार .. तिचं काय म्हणणे आहे ते उगाच तुझे म्हणणे लादु  नकोस  तिच्यावर काय ?

रवी आणि मिहीर नावाला मित्र पण भावा  सारखा एकमेकांवर जीव होता .. मिहीर ला विचारून विचारून तो बऱ्याचदा निर्णय घेत असे .

रवी " ठीक आहे .. चल माझे काम झालेय कि आता निघतो घरी .. "

मिहीर " ठीक आहे बाय "

रवी गेल्यावर मिहीर ने त्या इव्हेंट मॅनेजमेंट वाल्याला फोन केला .. आणि काय काय करू शकतो .. कुठे कसे करू शकतो , त्याचे कॉस्टिंग अश्या सगळ्या चौकशा त्याने केल्या .. आणि त्याला म्हणाला मी एक दोन दिवसात तुम्हाला कळवतो .

ठरल्या प्रमाणे साडे सात वाजता ऑफिस मधून निघाला आणि येताना सायलीला घेऊन घरी आला . दोघे एकत्र जेवले .. आणि सायली आता तिच्या रूम मध्ये जाणारच होती तर मिहीर ने तिला विचारले

मिहीर " आज बिझी आहेस का ? "

सायली " खूप नाही फक्त मेल्स चेक करायचेत .. "

मिहीर " मग असे कर तुझे काम झाले कि जरा वेळ बाहेर राउंड मारून येऊ बाइक वर "

सायली " ठीक आहे .. ९. ३० ला निघू .. चालेल का ?"

सायलीने तिचे काम उरकले आणि जीन्स टीशर्ट घालून बाहेर आली .. " चलो आय एम रेडी "

मिहीर " ओके .. हे बघ तुला फोटो फॉरवर्ड केलेत कालच्या पार्टी चे .. अरे ब्लॅक साडीत बघ कसली मस्त दिसतेय तू .. "

मिहीर ने लगेच दोघांचा मस्त एक फोटो dp ठेवून टाकला . .

सायली " चल .. ना जाऊ .. आल्यावर बघ फोटो .. एक ना येताना कुल्फी पण आणू किंवा तिथेच खाऊ .. "

मिहीर " ठीक आहे .. "

दोघे बाइक वर बसून त्याच्या नेहमीच्या टेकडीवर जाऊन थोडा वेळ  बसले .. इकडच्या तिकडच्या ऑफिस च्या गप्पा मारल्या .. छान रिलॅक्स झाले .

मिहीर " अरे एक ना .. पुढच्या आठवड्यात वीक एन्ड ला आपण कुठेरी बाहेर जाऊ .. तुला मॅनेज  होईल का ? टू नाईट स्टे ? संडे  दुपार पर्यंत ला घरी . "

सायली " २ नाईट्स .. "

मिहीर " हो .. म्हणजे जरा महाबळेश्वर वगैरे अशा ठिकाणी गेलो तर २ दिवस तर पाहिजेत च ना .. फिरायला "

सायली " मग कधी निघावे लागेल .

मिहीर "शुक्रवारी दुपार नंतर निघालो तर उत्तम .. नाहीच तर शनिवारी सकाळी निघालो पाहिजे .. कारण पोचायला ४ तास तरी लागतीलच ."

सायली " ठीक आहे मी उद्या तुला शुक्रवार चा हाल्फ डे मॅनेज होतोय का ते सांगते .. वीकएंड तर काहीच प्रॉब्लेम नाही .. "

मिहीर " महाबळेश्वर का माथेरान . मुद्दामूनच जवळचं बघतोय कारण जाण्या येण्यात वेळ नको जायला म्हणून "

सायली " तूच ठरव .. मला  कोणतेही चालेल ."

मिहीर " ठीक आहे "

चला मिहीर ने बोलता बोलता त्याला प्लॅनिंग करण्यासाठी जे काही पाहिजे होते ते विचारून घेतले ..

सायलीने पण शुक्रवार चा हाल्फ डे फिक्स केला आणि मिहीर ने महाबळेश्वर चे २ नाईट्स चे बुकिंग करून टाकले .

🎭 Series Post

View all