विभक्त

This is the story of Mihir and sayali .. one of the perfectly imperfect couple

                                                         विभक्त

                                                   भाग १

मिहीर आणि सायली नुकतेच ऑफिस मधून आले . मिहीर ने घराचे लॉक उघडले आणि दोघे घरात आले .

मिहीर " तुझ्या लक्षात आहे ना ? आज रवी ची ऍनिव्हर्सरी  पार्टी आहे आपल्या दोघांना बोलावले आहे . तू येणार आहेस का ?

सायली " जाणे गरजेचे आहे का ?"

मिहीर " हो म्हणजे तू नाही आलीस तर सतराशे साठ प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतील "

सायली "ठीक आहे . किती वाजता निघायचंय”

मिहीर " ७.३० वाजता निघू .. पार्टी टाईम ८. ०० वाजता चा आहे  "

सायली " ठीक आहे .. मग मी थोडा आराम करते आणि मग तयार होते "

मिहीर " मी कॉफी करतोय ? तुला हवीय का ?

सायली " हो चालेल . .. आणि सायली रुम मध्ये जाते आणि दार लावून घेते .

मिहीर त्यांच्या कूक ला फोन लावतो " विमल ताई आज नाही आलात तरी चालेल " असे कळवतो

आणि कॉफी बनवायला किचन मध्ये जातो .

खर तर आज दोघांनाही बाहेर जायचा  खूप कंटाळा  आला . पण काही वेळा जावेच लागते . मिहीर आणि रवी जिगरी दोस्त होते .. त्याच्या पार्टी ला जावेच लागणार होते.

कॉफी तयार झाल्यावर सायली ला आवाज देतो कि कॉफी तयार आहे .

पाच मिनिटांनी सायली दार उघडते .. नेहमी सारखी ऑफिस चे कपडे बदलून तिने घरातले कपडे घातलेले आणि जणू नुकतीच एक झोप काढून उठल्या सारखी दिसत होती .

बाहेर सोफ्या वर बसून दोघे कॉफी पितात .. बरोबर थोडे स्नॅक्स पण खातात .

सायली " आज कोणत्या रंगाचे कपडे घालायचे .. "

मिहीर " तू सांग .. तू कोणत्या रंगाची साडी घालणार आहेस त्या रंगाचे शर्ट असेलच माझे .. "

असे कुठे पार्टी ला जायचे असले कि दोघे सेम रंगाचे कपडे घालून जायचे ..

सायली " ठीक आहे मी साडी फिक्स झाली तुला सांगते "

मिहीर " ठीक आहे "

सायली " चला मग आवरायला घेते .. नंतर उशीर नको होयला " आणि उठते

सायली " मिहीर .. विमल ताई ला फोन केलास का ?

मिहीर " हो मगाशीच "

सायली पुन्हा रुम मध्ये जाते आणि आतूनच मिहीर ला सांगते मी आज ब्लॅक साडी घालतेय .

मिहीर " ठीक आहे .. आहे माझ्याकडे " बाहेरूनच ओरडून सांगतो

थोड्याच वेळात सायली ब्लॅक कलर ची साडी घालून तयार होऊन येते .. स्लीव्ह लेस ब्लॉउज आणि त्यावर ब्लॅक पार्टी वेअर साडी .. पाठीवर डीप नेक .आणि सिम्पल छोटे मंगळसूत्र . त्यावर मॅचिंग कानातले .. सेमी कुरळे केस  मोकळे सोडलेले ... दीपिका पदुकोण पण  तिच्यापूढे फिकी पडेल अशी सुंदर दिसत होते. आणि सोफ्यावर बसून मिहीर ची तयार होण्याची वाट बघत बसते .. बसल्या   बसल्या सेल्फी काढत बसलेली

तेवढ्यात मिहीर तयार होऊन आला .. मिहीर पण काही कमी हँडसम नव्हता .. डार्क ब्लॅक कलर चे शर्ट आणि त्यावर क्रीम कलर ची पॅन्ट .. सिम्पल .. . पण लै भारी दिसत होता .. काळया रंगाच्या शर्ट मध्ये तर खुलून आला होता .. म्हणतात ना टॉल , डार्क , हँडसम तसाच फक्त तो डार्क नव्हता गोरा होता त्यामुळे या शर्ट मध्ये अजूनच भारी दिसत होता .

सायली उभी राहून तिचा सेल्फी  काढत होती . तिला पाठमोरी बघूनच मिहीर गार झाला होता .. हिच्या पुढे मी फिका पडेल कि काय ? आणि तो पुन्हा आतमध्ये गेला आणि त्याचा ब्लेझर घालून आला . हा आता जोडास जोड वाटेल .

मिहीर " हू..हम्म घशातून आवाज काढतो

सायली " अरे वाह .. आर यु रेडी .. लुकिंग हँडसम "

मिहीर " यस .. यु आर ऍज उज्वल डॅम ब्युटीफुल "

सायली " थँक यु .. देन लेट्स गो "

मिहीर आणि सायली कार ने पार्टी ला पोहचतात .

रवी " वेलकम .. परफेक्ट कपल !! दोघेही खूप छान दिसत आहेत . यु आर मोस्ट अवेटेड गेस्ट ..

मिहीर आणि सायली खरोखरच पार्टी चे अट्रॅक्टशन बनले होते .. रवी आणि त्याची बायको राहिली बाजूला .. सर्व जण या दोघांकडे वळून वळून बघत होते .. पार्टी खूपच छान होती .. कपल डान्स , गेम्स बरेच काही होते .. सगळेच खेळत होते.. पण सायली आणि मिहीर नुसतेच बघत बसले होते .. पण रवी कुठला त्यांना दोघांना बसून देणार .. त्याने आणि त्याच्या बायकोने दोघांना डान्स साठी ओढत नेलेच . शेवटी दोघांचे काही चाले ना आणि दोघांनी कपल डान्स पण केला .. दोघे जेवले , मित्र मैत्रिणी बरोबर हसले , खूप इकडच्या तिकडच्या  गप्पा  मारल्या .

मिहीरचे मित्र तर त्याला चिडवत होते .. " तू जाम  लकी आहेस .. तुझी बायको चिकणी आहे .. तुम्ही दोघे एकमेकांना शोभून दिसता .. वगैरे वगैरे "

एक जण तर चक्क त्याला  म्हणाला " दोघे मेड फॉर इच अदर  लकी कपल "

हे ऐकल्यावर दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसतात

मिहीर " थँक यु .. पण आज आमचे कौतुक बस झाले .. रवी ची ऍनिव्हर्सरी आहे हे विसरू नका "

आणि सगळे रवीला " हैप्पी एनिवर्सरी" असे विश करतात .. आणि घरी निघतात.

मिहीर ने आज थोडे ड्रिंक्स घेतले होते .. सायली म्हणाली "मी कार ड्राईव्ह करते .. तू बाजूला बस "

मिहीर " ओके मॅडम .. तशी आज पार्टीत  जाम मज्जा आली नाही का ? आणि डान्स वगैरे का करवतात काय माहित .... माझे सगळे मित्र तुझे जाम कौतुक करत होते ..तू तर खूपच छान दिसत होतीस .. म्हणजे तशी तू नेहमीच छान दिसतेस .. कोणत्याही ड्रेस मध्ये .. अगदी त्या तुझ्या घरातल्या ड्रेस मध्ये पण "

मिहीर आपला एकटाच बडबड करत होता .. त्याला आता थोडी चढली होती .

सायली आपली गाडी चालून त्याला घरी आणते .. त्याला धरून घरात नेते .. आणि त्याला त्याच्या रूममध्ये झोपवते. त्याचे शूज काढून ठेवते आणि अंगावर टाकते .

आणि तिच्या रूम मध्ये जाऊन झोपते .

वर करणी दोघे एकमेकांना जोडास जोड असताना देखील हे ' परफेक्ट कपल ' मुळात कपल नाहीच आहेत . हा म्हणजे त्यांचे देवा ब्राम्हणांसमोर आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने लग्न तर नक्कीच झालेय म्हणून तर दोघे एकत्र राहत आहेत .

पण असे काय झालंय  दोघांच्यात कि दोघे एकाच घरात राहतात पण वेगळे वेगळे राहतात . बाहेर नवरा बायको म्हणून मिरवतात पण घरात एकमेकांशी मोकळे पणाने बोलत पण नाहीत .. कामापुरते बोलतात आणि नंतर तो त्याच्या रूम मध्ये नि ती तिच्या रूम मध्ये .

हे दोघे लग्न झालेले बॅचलर आहेत जे की रूम  न म्हणता घर शेअर करतात .

या दोघांमध्ये नक्की काय घडलेय ? ते असे का आहेत ? आणि बाहेर आपण खूप सुखी नवरा बायको आहेत असे का दाखवतात . हे नाटक तरी का करतात ? नाही पटत तर सोडून का देत नाहीत एकमेकांना .. काय गुंता करून ठेवलाय या दोघांनी काय माहित .. त्यांचा हा गुंता आता मलाच सोडवावा लागणार आहे . हळू हळू एक एक गोष्ट लक्षात घेऊन .

हे दोघे हे जे असे जगत आहेत ते सुखी आहेत का ? ते हि नाही . दोघे एकमेकांना पण फसवत आहेत का फक्त बाहेरच्यांना .

नवरा बायकोच्या नात्यांमध्ये एक नाही  अनेक पैलू असतात . प्रत्येकाची स्टोरी वेगळी आणि प्रत्येक जण त्याच्या स्टोरी चा हिरो आणि हिरॉइन असतात . जगात अशी किती कपल्स असतील ना .. प्रत्येकाची वेग वेगळी स्टोरी .. पण या सगळ्या स्टोरीज कशाच्या जीवावर जिवंत आहेत माहिते का ? तर उत्तर आहे प्रेम .. हे प्रेम पण ना .. कधी एक तर्फी . कधी दुतर्फी , कधी क्रॉस कनेक्शन , कधी डीप , कधी फेक , कधी रिअल , कधी पझेसिव्ह , कधी इनोसेंट , कधी अग्रेसिव्ह .. कोण कोणत्या प्रकारात जाऊन बसलेय ..

मिहीर आणि सायली पण दोघांच्या नकळत लग्न बंधनात अडकलेत .. आणि काही जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांनी हे नातं अजून जिवंत ठेवलंय .सध्यातरी मला हा प्रश्न सतावतोय कि हे दोघे दिसायला इतके सुन्दर आहेत .. सायली सारखी सुंदर बायको मिळायला खरच सात जन्म वाट बघावी लागेल .. आणि मिहीर हँडसम क्युट .. कोणतीही मुलगी फ्लॅट होईल असाच होता .. हा थोडा मुफट आहे .. तरीही .. अजूनही म्हणजे लग्न होऊन आता एक वर्ष झालंय तरी अजून एकत्र आले नाहीत .. ये क्या है भाई .. धिस इज नॉट फेअर ..

🎭 Series Post

View all