Dec 06, 2021
कथामालिका

मनशांती.....( भाग ६)

Read Later
मनशांती.....( भाग ६)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग १
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826

भाग २
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/

भाग ३
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/

भाग 4
https://www.irablogging.com/blog/manshanti.......-part-4_5594

भाग 5
https://www.facebook.com/581606972323826/posts/1071753296642522/

अजूनही शिखाला..........सुयश परत यावा हेच वाटतं असतं,पण स्वेच्छेने................

आप्पा आणि शिखा.......घरी सगळं काही सांगतात.......मात्र माई या शिखाला चं दोष देतात.

अगं बाई........तुला आधीपासूनच सांगत होते........पोरं झालं म्हणून काय झालं.........जरा स्वतःकडे पण लक्ष दे...….आता तू ही अशी राहणार म्हंटल्यावर त्याला कोणी तरी आवडणं साहजिकच आहे........ शेवटी पुरुषचं तो..…"माई"

लक्ष दे म्हणजे....... नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला माई.......???? संस्कार झाल्यापासून तुम्ही कसली मदत करता का हो?? माहेरी आईकडे दोन महिने आराम केला तेवढंच…....त्याला घेऊन इकडे आल्यापासून तुम्ही एकदा तरी घरात कामाला मदत केली का हो मला?? काम नाही तर नाही पण कधी तो रडायला लागला की त्याचा आवाज येऊन पण कधी घेतलतं का हो त्याला?? तो झोपलाय तर खाऊन घे तो पर्यत मी हे करते किंवा ते करते असं म्हणालात का हो माई??? सकाळी डब्बा बनवा,त्यानंतर कपडे धुवा त्यात तुमच्या सगळ्या गोष्टी नाही वेळेवर केल्या की टोमणे पण ऐका कपडे मशीन ला लावले की तुम्हाला आवडत नाही....... आणि तुम्ही.......मला स्वतःकडे लक्ष द्यायला सांगता........... छान माई.......खूप छान......."शिखा"
आजतागायत कधीही एक........... शब्द उलट न बोललेली शिखा माईंना खुप काही बोलते.आणि तिथेच सोफ्यावर बसून रडू लागते.

बघा बघा........माझा लेक काय गेला.......तर हिची जीभ तलवारीसारखी चालायला लागली."माई"

हे बघ.........तो तुझा लेक जरी असला ना..... तरी तिचा नवरा पण आहे आणि तू.......तिला समजून घ्यायचा सोडून......... दोष देत बसलीस.......??तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला....??तूच तिला असं बोलशील तर तिने काय करायचं.....??"आप्पा"

आप्पांच बोलणं ऐकून माई तावातावाणे त्यांच्या खोलीत निघून जातात.

इकडे शिखा पण तिच्या खोलीत असते. तोंडावर थोडं पाणी मारून फ्रेश होते. काही वेळाने ती बाहेर येऊन किचन मध्ये जाते.निमेश ला जेवण वेळेत लागत म्हणून दहीकढी साठी मसाला काढुन कढीला फोडणी देते,एका बाजुला भात चढवते, पोळ्यांचं पीठ भिजवून पोळ्या करून घेते,मुगाची डाळ टाकलेली मेथीची भाजी आणि कोशिंबीर बनवून सगळं आवरून घेते आणि पुन्हा ती आपल्या खोलीत जाते.

जेवणाच्या वेळेवर सगळे जेवायला बसतात.माई ताट वाढतात.आप्पा सांगतात माईंना शिखाला बोलवायला पण सासू ती सासूच शेवटी.........माई नाक मुरडून जेवायला बसतात.आप्पाचं शेवटी भरल्या ताटावरून उठून शिखाला बोलवायला जातात.

शिखा..........चल.........जेवायला येतेस ना!!!"आप्पा"

शिखा उठून दार खोलते......…

आप्पा......जेऊन घ्या तुम्ही.......मला भूक नाही....."शिखा"

आप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात तसा तिचा कंठ दाटून येतो.......तिचा हुंदका ती आतल्या आत दाबून ठेवते ज्यामुळे तिला थोडा त्रास होतो.

हे बघ.......एक माणूस सोबत नाही.... म्हणून चुकीचा विचार नाही आणायचा डोक्यात.......आपल्यावर एक जबाबदारी आहे हे विसरून नाही जायचं.मी नेहमी तुझ्यासोबत आहे......मला काय म्हणायच आहे ते येतंय ना तुझ्या लक्षात......."आप्पा"

हो आप्पा...."शिखा"

बरं...... कर आराम जरा......."आप्पा"

हम्म......"शिखा"
(शिखा दार बंद करुन तिथेच पाठ टेकून उभी राहते आणि हाताच्या मुठी घट्ट आवळून रडू लागते.

दुसऱ्या दिवशी आप्पा....... शिखाला घेऊन तिच्या घरी जातात........घडलेला सगळा प्रकार ते तिच्या घरच्यांना सांगून त्यांची हात जोडून माफी मागतात.शिखा आता माहेरीच राहणार असते. माहेरच्या माणसांवर ओझं नको म्हणून ती एक कंपनी जॉईन करते. महिन्याभरातच ती तिथे पर्मनंट होते.........पण तिला काही वेगळं करायचं असतं.तिला तिच्यासारख्याच स्त्रियांची मदत करून त्यांना नव्याने उभ राहण्याची हिम्मत द्यायची असते.तिच्या एका मित्राच्या मदतीने ती या कामात आप्पांच्या आणि तिच्या  घरातल्यांचा आशीर्वादाने सुरवात पण करते.दोन महिने जॉब करुन शिखा तिच्या वडिलांनी गिफ्ट केलेल्या फ्लॅट वर शिफ्ट होते. 3bhk चा फ्लॅट आणि त्यामध्ये नवऱ्याने सोडलेल्या किंवा काही कारणाने स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्याना सोडलेलं असत अश्या सात जणी शिखा सोबत राहायला येतात.त्यात एक वृद्ध आजी पण असतात.सुनेच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडल होतं. अश्या या बायका मिळून घरूनच व्यवसाय सुरू करतात.जिला जी गोष्ट चांगली बनवता येते तिने ती बनवायची असं ठरतं. सगळं अगदी सुरळीत चालू असत.

सहा महिन्यांत शिखा आणि सुयश चा पण कायदेशीररित्या घटस्फोट होतो. या सगळ्यात शिखाला सुयश ची कमी भासत असते.पण त्याने स्वतःहून वेगळं राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे म्हंटल्यावर ती काही च करू शकत नव्हती.


शिखा पण तिच्या कामात गुंतलेली असते.एक एक करून सात जणींच्या.......... एका वर्षात चौतीस जणी होतात.कोणी तिथे राहून काम करत होतं, तर कोणी बाहेर जाऊन जॉब करत होतं. संस्कार ला पण खूप साऱ्या मावश्या आणि आज्या भेटल्या होत्या. सगळे त्याचे खूप लाड करतात शिवाय आप्पा आणि शिखाच्या घरचे ही तिला भेटायला येतंच असतात.वर्षभरातचं शिखा तीन एकर जमीन घेते आणि तिथे एक मोठी तीस खोल्यांची सदनिका बांधते त्याच नाव *मनशांती* असं ठेवते.त्यात प्रत्येकी एका खोलीत चार बेड अशी मोठी सदनिका असते.त्यात एक मिटिंग हॉल आणि तिथेच बाजूला आणखी एक मोठा हॉल असतो जिथे बायका काम करतात.घरगुती पापड,लोणची,वेगवेगळ्या प्रकारचे मसाले,सांडगी इत्यादी प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून स्टॉल वर विकत असतात.त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या दहा टक्के रक्कम ही शिखा कडे द्यायची आणि उरलेले पैसे यातून खर्च वजा करून प्रत्येकीला दहा ते बारा हजार महिन्याला मिळत असत.शिखाचं सगळं आलबेल सुरू असतं.

अश्यातच एका खाजगी कामासाठी शिखा जवळच्या नाईक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाते.तिथल्या बावीस कर्मचाऱ्यांना दोन वेळसाठी घरगुती जेवणाचा डब्बा हवा असतो त्यामुळे त्यांनी आधी शिखा सोबत मिटिंग करायची ठरवली असते त्याच साठी शिखा तिथे आलेली असते.
मिटिंग संपवून शिखा तिच्या सहकर्मचार्यांना विचारुन त्यांच्यासोबत एक मिटिंग करून कळवते अस म्हणून तिथून निघतच असते की तीच लक्ष ओटी बाहेर बसलेल्या स्वरांगी आणि तिच्या मुलीकडे जात.

शिखा बाजूला रिसेप्शनईस्ट ला स्वरांगी इथे कोणत्या पेशन्ट सोबत आली आहे असं विचारते तेंव्हा रिसेप्शनईस्ट सांगते.........

पेशन्टचं नाव आहे....….सुयश देशमुख.....!!

क्रमशः

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading