मनशांती.....(भाग ७)

श्रावणी लोखंडे

भाग १

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826



भाग २

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/



भाग ३

https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/



भाग 4

https://www.irablogging.com/blog/manshanti.......-part-4_5594



भाग 5

https://www.facebook.com/581606972323826/posts/1071753296642522/



भाग ६

https://www.facebook.com/581606972323826/posts/1073631626454689/



स्वरांगी........."शिखा"(शिखा स्वरांगीला आवाज देते.)



शिखा.........!!स्वरांगी शिखाला बघून तिच्या गळ्यात पडून रडू लागते.



काय झालंय सुयशला.......???मी इथे कामासाठी आले होते...तुला बघितलं म्हणून रिसेप्शनईस्ट जवळ चौकशी केली.... तेंव्हा समजलं सुयश ऍडमिट आहे ते......"शिखा"



स्वरांगी काही न बोलता डोळे पुसत पुसत तिच्या पर्स मधून एक पत्र काढून शिखाला  देते.......

शिखा प्रश्नार्थक नजरेने स्वरांगी कडे बघून पत्र उघडते.



Dear,

shikha



मी तुझ्याशी खूप वाईट वागलो......पण trust मी........मी हे सगळं तुझ्या साठी केलं......आता तुला वाटत असेल यात माझ्यासाठी काय केलं??? मला तर फक्त दुःख दिलं??



पण खरचं मी सगळं तुझ्यासाठी केलं......मी लहान असताना स्वरांगी वर प्रेम केलं होतं.पण तीच दुसऱ्याच एका मुलावर प्रेम होतं......त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिला लग्नाचं आमिष दाखवून सोडून दिलं काही महिन्यातच तीला समजलं की ती गरोदर आहे. तिने ही गोष्ट घरी सांगितली पण तिच्या वडिलांनी तिला हाकलून दिलं....... तिचा गर्भपात करण्याचं पण ठरवलं पण स्वरांगी ला ते मान्य नव्हत.शेवटी स्वरांगी माझ्याकडे मदतीसाठी आली. मी तिला माझ्या एका मित्राच्या घरी ठेवलं......ती जॉब करून सगळं मॅनेज करत होती मी सुद्धा तिच्यासाठी वाट्टेल ते करत होतो.नऊ महिन्यांनी मायरा झाली. मी तिच्या घरी जाऊन तिच्या आईला स्वरांगीच्या डिलिव्हरी बद्दल सांगितलं ती पण शेवटी आईचं ........तिने चटकन त्यांच्या घरातल्या मावशीना माझ्यासोबत पाठवलं.त्या मावशी स्वरांगीच आणि बाळाचं सगळं काही करत होत्या.स्वरांगीला मुलगी  झाल्याचं कळताच......जेमतेम पंधरा दिवसातच तिचे वडील पण तिच्याशी बोलू लागतात.मायराला बघताच त्यांचा रागही निवळलेला असतो. स्वरांगी तिच्या चुकीची माफी मागून वडिलांच्या कुशीत शिरून रडू लागते.

इथपर्यंत पत्र वाचून झाल्यावर तिला समजत मायरा सुयश आणि स्वरांगीची मुलगी नाही.......सुयश खोटं बोललेला असतो.ती पुढे पत्र वाचते.



माझं स्वरंगीवर प्रेम होतं हे खरं आहे पण आप्पांनी नकार दिला आमच्या लग्नाला.मी तिच्यात खूप गुंतलो होतो म्हणून मला खूप वेळ लागला तिच्यातून बाहेर पडायला. आठ वर्षांनी मला तुझं स्थळ आलं......असं तर स्थळ येत होती पण मीच नकार देत होतो. तुझ्याशी पण मी आपलं....... नुसतं करायच आहे म्हणून लग्न केलं.पण तुझ्या स्वभावाने आणि प्रेमाने मला स्वरांगी मधून कायमच सोडवलं.मी फक्त आणि फक्त तुझा झालो. लहानपणी मला झोपवताना....... माई परी ची गोष्ट सांगायची त्या कथेतली परी होतीस तू माझ्यासाठी. सगळ्यांच करणारी माझ्यासोबतचं सगळी नाती जपणारी, माझी.....परी झाली होतीस तू........तुला जरा काही त्रास झाला ना,की मला राहावयाच नाही.....माझं कशातच लक्ष नाही लागायचं. संस्कार होण्याआधीची तुझी मनस्थिती बघितली होती मी.बाळासाठी तुझी तळमळ बघितली होती मी.



संस्कार झाला आणि तू काही दिवस माहेरी गेलीस.अश्यातच एक दिवस आपले फोटो बघत असताना मला रक्ताची उलटी झाली.सगळा बेड रक्ताने माखला होता.क्षणभर तर मी गोंधळलो. मला काहीच कळत नव्हतं.मी ते सगळं आवरून ती बेडशीट एका पिशवीत भरून खाली फेकून आलो.दुसऱ्या दिवशी लवकरच उठून मी डॉक्टरांना भेटायला गेलो.रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते मला काही टेस्ट करायला सांगतात.



टेस्ट केल्यावर अस समजलं की मला ब्लड कॅन्सर आहे आणि माझ्याकडे फार फार तर वर्ष आहे.मी पुरता हादरून गेलो.आता कुठे आनंदाचे दिवस आले होते.सगळं सुरळीत चालू होतं आणि त्यात हे असं......... मी पुरता ब्लेंक झालो आणि तिथेच चक्कर येऊन पडलो.डॉक्टरांनी मला सलाईन लावली.माझ्या डोळ्यासमोर मात्र तू आलीस...तुझं माझ्यावरच जीवापाड असलेलं प्रेम आपला संस्कार माई आप्पा सगळं सगळं दिसत होतं मला.मी बेड वर आडवा होऊन माझ्या शेवटच्या दिवसाची चित्र इमॅजिन करत होतो.माझ्या मृत शरीराच्या शेजारी तू बसली होतीस.....एकदम निपचित........तुला शांत शांत झालेलं बघून मला कासावीस होत होतं....... काही बायका येऊन तुझ्या कपाळावरचा कुंकू पुसत होत्या.... तुझं मंगळसूत्र तोडू पाहत होत्या...... तू त्यांना गयावया करत होतीस........मला उठवण्याचा निश्फळ प्रयत्न करत होतीस....... मी लगेच भानावर आलो.......आणि या सगळ्यात तुला काहीच त्रास द्यायचा नाही अस ठरवलं.मी लगेच माझ्या एका मित्राकडून स्वरांगीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि हा सगळा डाव रचला.



माझ्या खूप रिक्वेस्ट मुळे स्वरांगी या सगळ्यांसाठी तयार झाली. ठरल्याप्रमाणे सगळं चालू होतं.तुझ्या मनात शंका यावी म्हणून तुझ्याशी तुटक वागू लागलो.तुझ्याकडे दुर्लक्ष करू लागलो.मला जे हवं होतं तसचं सगळं घडत होतं.



तुलाचं काय.......नंतर कोणालाचं त्रास होऊ नये म्हणून मी माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात राग-द्वेष निर्माण केला.

तू खूप कर्तबगार आहेस म्हणूनच माझ्या नंतर तू खचू नये म्हणून तुला घटस्फोट देऊन मोकळं केलं.तुला घटस्फोट दिल्यानंतर मी त्याच दिवशी गोव्याला एका आश्रमात आलो.तिथल्या लोकांनी पण माझ्यासाठी खूप काही केलं.



हे पत्र लिहून मी स्वरंगीकडे देऊन ठेवलं आणि तिला सांगितलं मी हे जग कायमच सोडून बारा दिवस पूर्ण झाले...... की हे पत्र शिखाला दे.......



राणी.....हे सगळं मी तुझ्या साठी वागलो.......तू खंबीरपणे उभी राहाविस म्हणून वागलो........मला माफ कर शिखा........माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम होतं आणि कायम तुझ्यावरच राहील अगदी मी मेल्यानंतर सुदधा........



I love you sooo much shikha......



                                                           Your love,

                                                            Suyash



क्रमशः



कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.



धन्यवाद????????


🎭 Series Post

View all