Dec 01, 2021
Kathamalika

मनशांती......(भाग ५)

Read Later
मनशांती......(भाग ५)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग १
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826

भाग २
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/

भाग ३
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069965543487964/

भाग 4
https://www.irablogging.com/blog/manshanti.......-part-4_5594

शिखा गार्डन मध्ये जाऊन बसते.पाठोपाठ आप्पा पण येतात.आप्पांना बघून शिखाचा बांधचं तुटतो......

आप्पा........सगळं........ संपल आप्पा........आता काय करू मी......."शिखा"

काय झालं आहे शिखा??? मी सकाळी वॉक वरून येत होतो तेंव्हा पाहिलं मी तुला........तू सुयश चा पाठलाग करत होतीस ते.......विनाकारण तू अस करणार नाही याची खात्री आहे मला.........म्हणून मी पण तेंव्हा तुला आवाज दिला नाही....... तू घरातून एवढ्या सकाळी बाबू ला घेऊन का गेली असशील याचाच विचार करत होतो मी......... देवपूजेत पण काही लक्ष लागलं नाही........ नाश्त्याची प्लेट हातात घेतचं होतो की तुझा फोन आला.......आता जे काही झालय ते सांग बघू........आणि आधी रडणं थांबव बघू.........माझी लेक अशी रडतांना बरी नाही दिसतं............"आप्पा"

जे बघितलं आणि जे सुयशने सांगितलं ते सगळं इत्यंभूत शिखा......आप्पांना सांगते.ते सगळं ऐकून तर आप्पांच्या पायाखालची जमीनच सरकते.

काय बोलतेस????? पंधरा वर्षाची मुलगी आहे त्यांना..........!! नालायक मुलगा.......या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या नाहीत आम्हाला.......फक्त त्या मुलीवर प्रेम आहे एवढंच बोलला होता.......

आणि काय..........तर म्हणे काही दिवसांनी.........आठ वर्षे.........किती......आठ वर्षे लावली त्यानी लग्न करायला.......त्या मुलीच्या नादातून बाहेर यावा म्हणून आठ वर्षे प्रयत्न करत होतो आम्ही....... आता नीट आठवत नाही....... पण वयाच्या एकतीसाव्या वर्षी त्याने तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला.........

आमचं नाक तर कापलंच पटठ्याने....... पण स्वतःच्या आयुष्याची पण राख करतोय हा मुलगा..........."आप्पा"

हे सगळं ऐकून आप्पा तर फार चिडले होते.तरी त्यांचा राग बाजूला करत ते शिखाला धीर देत होते.

पोरी.........अगं...... तो कमनशिबी आहे जो तुझ्या सारख्या  लक्ष्मीला  लाथाडतोय........नको करू त्याचा विचार........तुझा बाप काय करेल माहीत नाही...... पण हा बाप फक्त तुझ्या पाठीशी नाही....... तर तुझ्या सोबत आहे........तुझी ढाल बनून.........फक्त तू काय निर्णय घेतेस ते मला सांग......"आप्पा"

काय निर्णय घेऊ मी आप्पा......मी खुप प्रेम करते सुयश वर.......तो परत आला माझ्याकडे, तर मी सगळं विसरून नव्याने आयुष्य सुरू करेन त्याच्यासोबत.........मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय.........."शिखा"( शिखा रडू लागते.)

तुला वाटतं.......... तो परत येईल??? नाही शिखा........तो आता खूप लांब गेला आहे..... आणि तुला आता खंबीर झालंच पाहिजे........स्वतःसाठी पण आणि तुझ्या या बाळासाठी पण........"आप्पा"

मी एकटी काय करणार आप्पा........सुयश माझं अस्तित्व होता........"शिखा"

हे बघ शिखा.......होता...आणि आहे...... यात खूप अंतर आहे बाळा.......तरी तुला वाटत असेल तर मी बोलतो त्याच्याशी........आपण आज संध्याकाळी त्याला बाहेर भेटू.......तुझ्या माईला आधी यातलं काही सांगायला नको.......ठीक आहे...... नको काळजी करू........मी आहे नेहमी तुझ्या सोबत....."आप्पा"

शिखा संस्कार ला छातीशी कवटाळते आणि रडू लागते......आप्पा पण तिला बघून रडू लागतात पण तिच्या समोर अस हतबल होऊन चालणार नाही म्हणून ते स्वतःला सावरतात......कारण त्यांच्यापेक्षा पण जास्त मोठं दुःख तिच्यासाठी असतं..........

शिखा आणि आप्पा घरी येतात.......शिखा शांतच असते......घरी येऊन ती सरळ तिच्या खोलीत जाते......दिवसभरात ती कशाला म्हणून बाहेर येत नाही...... माईंना तर फारच राग येतो.....

अगं...... भरल्या घरात......दिवसाढवळ्या खोलीत अशी काळोख करून का बसली आहेस.......????काय ते नसते व्याप.......दारिद्र्य येईल अगं...... भरल्या घरात........सासू सासरे आहेत घरात तर काही जेवणाचं वैगरे बघायचं तर आराम कसला करतेस........???"माई"
 

सॉरी माई.......पण जरा बरं वाटतं नव्हतं......म्हणून पडले होते थोडा वेळ......मी लगेच कुकर लावते खिचडी चा......."शिखा"

माई खिचडी ऐकून चिडतेच.तीच तस चिडक तोंड बघून आप्पा समजून जातात की माई काही तरी बोलणार.....तेवढ्यात आप्पा बोलतात.....

अरे वाह......खिचडी..... बरं झालं.... बनव बनवं......रोज चमचमीत खाऊन कंटाळलोय....... आज जरा सादस बनव......मी खालच्या डेरी वाल्याकडून मस्त पैकी घट्ट दही घेऊन येतो.......काय???? "आप्पा"

आप्पाचं  हो म्हणाले म्हणजे माईंचं बोलणं थांबलं......शिखा पण आप्पांना चालेल अस म्हणून मुगडाळीची खिचडी लावते कुकर ला.......

सगळे जेवण आटोपून घेतात.......शिखा पण सगळं आवरते आणि तिचा खोलीत जाते.ती विचार करीत असते......... सकाळी जे काही बघितलं त्याचा.......सुयश अस वागेल यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.......तिला कुठे तरी अस वाटत होतं......... सुयश तिची मस्करी करतोय........सुयश ने विश्वासघात करणं तिला रुचतच नव्हतं.......एवढं सगळं ऐकून आणि बघून पण तिला सुयश मस्करी करतोय अस वाटत होतं.........पण एक मन म्हणत होतं....... की हेच सत्य आहे आणि ते लवकरात लवकर स्वीकार.......आप्पा दुपारीच सुयश ला सोसायटी समोरच्या गार्डन मध्ये येण्यासाठी फोन करून सांगतात.
 

संध्याकाळी ठरल्याप्रमाणे शिखा संस्कारला घेऊन आप्पांसोबत गार्डन मध्ये जाते.

बराच वेळ तिघेही शांत असतात......कोण पहिले बोलणार याची वाट बघत असतात.कोणच काही बोलत नाही....... म्हणून सुयशचं आप्पांना विचारतो..

मी घरी येतंच होतो..…तरी इथे गार्डन मध्ये का बोलावलत आप्पा..........?? "सुयश"

अरे........सगळं माहीत असून पण का बोलावलं विचारतोस!!!! एवढापण साळसूद पणाचा आव आणू नये रे......"आप्पा"

आप्पा........आता चर्चा का करायची?? माझा निर्णय झाला आहे........"सुयश"

निर्णय सांगणारा तू कोण????? का खेळ केलास तू........अरे मूर्ख माणसा........तू फक्त तुझ्याचं नाही...... आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळला आहेस.......नक्षत्रा सारखी पोरं...... तिला फसवलंस तू.........."आप्पा"

आप्पांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देताच सुयश बॅग मध्ये हात टाकून एक एनवोलप काढतो आणि शिखाच्या हातात देतो........

शिखा ते खोलून बघते.....त्यातली कागदपत्रे बघून शिखाच्या डोळ्यातून पाणी येत.........तिच्या अश्रूंचा एक थेंब त्या कागदपत्रांवर पडतो........आणि पुढच्या क्षणाला शिखाच्या डोळ्यावर अंधारी येते........आप्पा पटकन उठून गार्डन बाहेर बसलेल्या शहाळे वल्याच्या ठेल्या वरून नारळपाणी घेऊन येतात.
शिखा........उठ......जरा नारळपाणी पिऊन घे.....
बरं वाटेलं बघ........शिखा उठून बसते आणि स्वतःला सावरते.........ती आता हतबल झालेली असते. सुयश कडे असलेल्या छोट्या संस्कार ला आप्पा त्यांच्याकडे घेतात.शिखाला थोडं शांत झालेलं बघून आप्पा तिच्या हातातला एनवोलप घेऊन संस्कारला शिखाकडे देतात........आप्पा त्यातला पहिला मजकूर वाचूनच थक्क होतात.

काय?????? काय कमी केलं रे आम्ही तुला........ज्याची ही शिक्षा देतोयस???? कुठे कमी पडलो आम्ही????काय बिघडवल आहे या पोरीने तुझं........मी तुला लग्नासाठी जबरदस्ती नव्हती केली.......निदान एकदा त्या पोरीला तुझ्या पासून एक मुलं आहे........ हे तरी सांगायचं..........मी मान्य करतो मी तुझ्याकडून वचन घेतलं होतं........पण एकदा सांगून बघितलं असतं........तर बरं झालं असतं रे........??? आता या पोरीच्या आईबापाला काय तोंड दाखवू मी सांग तूच??? "आप्पा"
(आप्पा खूप रडू लागतात.)

आप्पा.........तुम्ही नका दुःख करून घेऊ.......त्यांना घटस्फोट हवाय ना.......मी करते सह्या.......सहा महिन्यांनी भेटू परत.........चला आप्पा.........उठा........इथे आपलं कोणी नाही......."शिखा"
(शिखा तो कागद फोल्ड करतचं आप्पांना उठवते आणि ती संस्कार आणि आप्पांना घेऊन घरी जायला निघते.)

शिखा परत मागे फिरते.....

सुयश........एवढं सगळं होऊनही मला अजून हेच वाटतंय.........की तु परत माझ्याकडे यावस.......मी खूप प्रेम करते तुझ्यावर.......तू अजूनही येऊ शकतोस माझ्याकडे........मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय..........पण जर तुझा निर्णय झालाचं आहे तर............मी प्रयत्न करेन हे सगळं स्वीकारण्याचा.........माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित आहे.........पण तरी..........तुला जर हेच हवं असेल तर मी द्यायला तयार आहे.......... जिथे जाशील तिथे खुश रहा.........तुझ्या आनंदात माझा आनंद आहे.........."शिखा"

शिखा डोळ्यातलं पाणी पुसत स्वतःला सावरते.सुयश च्या हातात संस्कार ला देऊन थोडा वेळ तिथेच थांबते......काही वेळाने सुयश संस्कारला शिखा जवळ सुपूर्त करतो आणि तिथुन निघून जातो...........

क्रमशः

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading