काय फरक पडतो??? (भाग ८)

श्रावणी लोखंडे

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

मधुरा चे पप्पा कैवल्य च्या शेजारी जाऊन बसतात. अनोळखी व्यक्ती बाजूला आली म्हणून कैवल्य थोडं बाजूला अंग चोरून सरकून बसतो. मधुराचे पप्पा पुन्हा त्याच्या जवळ जातात....... तसा तो पुन्हा सरकतो आणि थोड्या अजब नजरेनी तो मधुरा च्या पप्पांना बघतो अचानक त्याला लक्षात येतं..........

अरे.......हे तर मधुरा चे पप्पा आहेत.
तो मनातच विचार करू लागतो. हे आपल्या मुलीला फसवल्याचा जाब तर विचारायला आले नसतील ना????तो पुरता घाबरून जातो कारण त्यांच्या खूप वर पर्यंत ओळखी होत्या. त्यांच्या मुलीला फसवलं,प्रेम करून लग्नाच्या खोट्या शपथा वैगरे घेऊन तिला आपल्यात अडकवल्याचा आरोप वैगरे तर करणार नाही ना???आपल्याला जेल होईल का??
काही बरं वाईट झालं तर आईबाबांना काय तोंड दाखवू???
असे एक न अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले. तोच मधुराच्या पप्पांचा आवाज त्याच्या कानावर पडला.

घाबरू नको मी काही तुला मारायला किंवा तुझ्या मनात जे काही द्वंद्व चालू आहे त्यातलं काही करायला नाही आलोय.मी फक्त तुला भेटायला आलोय.

त्यांच्या या वाक्यावर कैवल्य पुन्हा मनातच बोलतो......

अरेच्चा....... यांना मनातलं पण ऐकू जात की काय....???? तरीच मला मधुरा बोलायची माझ्या मनातील मी न सांगता माझ्या पप्पांना कळते.

नाही नाही तू जो विचार करतोयस त्यातलं काहीचं नाही..... मला तुझ्याच काय कोणाचाही मनातलं ऐकू जात नाही...."मधुरा चे पप्पा"

हं....... कैवल्य आश्चर्यकारक नजरेने त्यांच्या कडे बघतो.

असाच बघत उभा राहणार आहेस का???? बस आता इथे. "मधुरा चे पप्पा"

कैवल्य बसतो,पण तो खूप घाबरलेला असतो.

मधुरा चे पप्पा त्याच्या खांद्यावर हात ठेवतात तसा तो दचकतो.

अरे......तू का घाबरतो आहेस मला.मी जरी खूप मोठा बिजनेसमॅन असलो तरी सगळ्यात आधी एक माणूस आहे. मलाही काही गोष्टी न सांगता कळतात. मी तुला.....भेटायला म्हणून इथे बसलोय. तुझ्या ऑफिस मध्ये गेलो तर समजलं की तू मिटिंग साठी बाहेर आहेस आणि तिथूनच घरी जाणार म्हणून मग मी इथे येऊन बसलो, कारण जेंव्हा मधुराने तुमच्या नात्याबद्दल मला सांगितलं तेंव्हा तुझी आवडनिवड आणि तुझ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यात........ही तुझी आवडती जागा...... हे ही तिने सांगितलं आणि आता तुम्ही वेगळे झाला आहात म्हंटल्यावर तू या जागेच्या अजून जवळ आला असशील असचं गृहीत धरून मी इथे येऊन बसलो.

आपल्या आणि मधुरा च्या नात्याबद्दल ऐकून कैवल्य प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या कडे बघत होता.

काय झालं?असं का बघतोयस??"मधुरा चे पप्पा"

तुम्हाला कसं माहित??"कैवल्य"

मधुरा ने सांगितल सगळं!!! आणि मी परवानगी देखील दिली होती कारण मला माहित होतं माझ्या मुलीची पसंती चुकीची नसणार........"मधुरा चे पप्पा"

हे ऐकून कैवल्यचं डोकं अगदी सुन्न..........होतं.

हे बघ कैवल्य कोणी या जगातून कायमस्वरूपी जरी निघून गेलं तरी आपण जगणं सोडत नाही.....अरे मग तुम्ही तर फक्त वेगळे झाला आहेत......पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी. तुम्ही कुटुंबासाठी जो काही त्याग केला आहे ना त्यासाठी पण जिगर लागतं बाळा.......आणि मला तुम्हा दोघांचा पण अभिमान आणि आदर वाटतो.

जे तुम्ही या वयात केलं त्यातली एक टक्याएव्हढी पण समज आम्हाला पोर झाली तेंव्हाही नव्हती.शारीरिक संबंध कसे ठेवतात हे मुंबईत राहणाऱ्या लग्न झालेल्या मित्रांकडून कळलं.

अरे आम्हाला तर दिवसभरात बोलण्याची पण मुभा नव्हती आणि म्हणून मी हा असा रुष्ट झालो,पण तरी माझ्या मुलीचा मात्र जिवलग मित्र बनलो आणि ते ही तिच्यामुळेचं.

तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो खूप मोठा आहे आणि जे होत ते भल्यासाठीचं होतं. असा उदास आणि रडत राहू नको बेटा............शो मस्ट गो ऑन........ पुढे झाला आहेस तर आता मागे वळू नको.
 

ज्या मुलीसोबत तुझं लग्न होईल ना ती खूप भाग्यवान असेल पण मी मात्र एवढ्या गुणी जावयाला गमावलं याची खंत आहे. असो............
 

हे घे.......शिमला ची दोन तिकिटं....... सगळं बुकिंग आणि पेमेंट मी करून ठेवल आहे. तुझं लग्न झालं की तुझ्या बायको ला घेऊन जा.......आपली गाडी आहेच तिथे........ तुम्हाला शिमल्यामधील सगळे पॉईंट दाखवेल.
 

मला माहित आहे. नवरा बायको म्हणून लगेच एकत्र येण एवढ सोपं नाही,म्हणूनच मी ही तिकिटं तुला देतोय.शिमल्याच्या छान थंड वातावरणात आधी तुम्ही मित्र व्हा खूप...... चांगले मित्र..... ज्यात प्रेम,विश्वास,आधार या तिन्ही गोष्टींचा समावेश असेल. नवराबायको च्या नात्यात हा खूप महत्त्वाचा भाग आहेत. कधीच बायकोला अंतर देऊ नको,तिच्या सोबत प्रतारणा करू नको."मधुरा चे पप्पा"

त्यांच बोलणं ऐकून कैवल्यला खूप भरून येत पण तो स्वतःला सावरतो आणि त्यांच्या पाया पडून त्यांनी दिलेल्या तिकिटांचा मनापासून स्वीकार करतो.

मधुरा चे पप्पा त्याला तोंड भरून आशिर्वाद देतात आणि तिथुन निघून जातात.

मधुरा पण इकडे लोणावळ्याला थोडं चेंज म्हणून आलेली असते.कैवल्यच्या आठवणींपासून खूप लांब. तिथे जवळच एक लहानमुलांचं आश्रम असतं. तिकडच्या मॅनेजमेंटशी बोलून मधुरा रोज तिचा दिवस आश्रमातील मुलांसोबत घालवू लागली. आठ दिवसांत त्या मुलांना पण मधुरा चा लळा लागला होता. पण मधुरा ला ऑफिस जॉईन करायचं असल्याकारणाने ती तिथून निघाली.

घरी येऊन थोडं फ्रेश होऊन मधुरा त्यांच्या बागेत गेली. बराच वेळ बागेत घालवून काही तरी ठरवूनचं ती घरात आली.

नेहमीप्रमाणे ऑफिस ला गेली आणि ऑफिसमध्ये जाऊन तिची ट्रान्सफर मेन ऑफिस ला म्हणजेचं बेंगलोर ला होऊ शकते का?अशी विचारणा केली.

याच्याआधी मधुराला बेंगलोरला जाण्यासाठी सिलेक्ट केलं असता मधुरा ने साफ नकार दिला होता.पण आता ती स्वतःहून बोलत आहे म्हणून मॅनेजमेंट फार खुश होते.त्यांनी लगेच तिला हो सांगून तिकडचं अपॉइंटमेंट लेटर लागलीच तिच्या हातात देऊ केलं आणि पाच दिवसांची सुट्टी देऊन तिला बेंगलोरचं ऑफिस जॉईन करायला सांगितल.

एक दिवस घरी पॅकिंग करायला गेला.मधुरा च्या आई ने तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घरीच बनवून दिलेल्या.फ्लाईट च्या वेळेत सगळे मधुराला सिऑफ करायला विमानतळावर आले.सगळेजण खूप भावुक झाले होते. मधुराची आई तिला निघेपर्यंत त्यांच्या स्वतःच्या  ऑफिस मध्ये चं काम करण्यासाठी सांगत होती पण मधुरा तयार होईना.मधुरा तिच्या ठरल्या वेळेत बंगलोरला पोचली. बेंगलोरला शिफ्ट झाल्यावर सगळ्या गोष्टी अनपॅक करायला दोन दिवस लागले. उरलेले दोन दिवस आराम करून बंगलोरला थोडं फिरून कुठे काय काय मिळते हे बघून थोडी खरेदी केली आणि सहाव्या दिवशी ऑफिस जॉईन केलं.

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

🎭 Series Post

View all