Login

काय फरक पडतो???(भाग २)

श्रावणी लोखंडे

सगळे गरम गरम थालपिट आणि दही एन्जॉय करतात आणि आपापल्या कामाला निघून जातात.इकडे मधुरा पण तिच्या ऑफिस ला जायला निघाली,त्यांची स्वतःची कंपनी होती पण तरीसुद्धा मधुराने कॉर्पोरेट साईड मध्ये स्वतःच्या हिमतीवर आणि शिक्षणाच्या जोरावर जॉब मिळवला होता आणि त्यात ती मोठया पदावर कार्यरत होती.मधुरा कामावर जायच्या आधी कैवल्यला भेटायला बोलावते आणि पुढे कस काय करायचं ते विचारते. 
तु घरी आई ला कधी सांगणार आहेस आपल्याबद्दल……"मधुरा"
या आठवड्यात बोलतो मी आईशी......."कैवल्य"
कैवल्य………अरे नुसतं बोलतो काय?सगळं सांगून टाक ना........आता झालास ना सेटल आणि पुढे जे काही करायचं ते दोघे मिळून करू..... अस बोलले आहे ना मी तुला!!!!तरी तुझं म्हणणं अजून तेच आहे.....'बोलतो आईशी'......."मधुरा"
अगं………एवढी का चिडतेस??बोलतो म्हणालो, म्हणजे सगळंच सांगणार ना......."कैवल्य"
हे बघ कैवल्य.........माझ्या घरी लग्नासाठी मूलं बघत आहेत म्हणून तुला मी बोलते.बाकी तुझी मर्जी......"मधुरा"
मुलं बघत आहेत ना अजून........कोणी पसंद तर नाही ना केलं अजून तुला………."काय फरक पडतो मग????" "कैवल्य"
"काय फरक पडतो"म्हणजे???? मला कोणी पसंद करण्याची किंवा घरच्यांनी माझ्यासाठी कोणाला पसंद करण्याची वाट बघतोयस का???तसं असेल तर आपण बोलूयातच नको ना काही......."मधुरा"
हे बघ बोलतो म्हणालो ना मी मग का चिडतेस आणि सकाळी सकाळी अशी चिडचिड करू नको दिवस खराब जातो मग."कैवल्य"
अच्छा........ म्हणजे तुला आता माझं बोलणं चिडचिड वाटायला लागली आहे तर....ठीक आहे कर तुला काय पाहिजे ते.अस पण "काय फरक पडतो" ना???" मधुरा"
एवढं बोलून मधुरा तिथून निघून जाते.
ऑफिस मध्ये येऊन मधुरा कॅफे एरिया मध्ये जाऊन एक स्ट्रॉंग कॉफी घेते आणि डोकं शांत करते,कारण तिला तिच्या कामात कोणत्याच इशू मुळे हलगर्जीपणा झालेला आवडत नसतो .ती कॉफी घेऊन तिच्या कामाला लागते.सकाळी कैवल्य सोबत झालेल्या वादामुळे तिची जेवायची सुद्धा इच्छा नसते त्यामुळे दिवसभराचे सगळे प्लॅनिंग आणि प्रेझेन्टेशन तयार करून ती रोजच्या वेळेत घरी जायला निघते. ऑफिस बाहेर येते तर गेटच्या समोर कैवल्य त्याची बाईक घेऊन उभा असतो.मधुरा ला आवडणाऱ्या गुलाबी रंगांच्या गुलाबांचा बुके घेऊन मधुरा बाहेर येण्याची वाट बघत असतो.मधुरा त्याला बघून पण, न बघितल्यासारखं करते आणि तिथून निघून जाते,तसा कैवल्य तिच्या मागे मागे येतो आणि तिला मनवण्याच्या प्रयत्न करतो.मधुरा बाजूलाच असलेल्या गार्डन मध्ये जाऊन बसते तसा कैवल्य परत मधुराच्या ऑफिस समोर जाऊन त्याची बाईक घेऊन त्या गार्डन जवळ पार्क करतो आणि मधुरा जिथे बसलेली असते तिथे जाऊन तिच्या बाजूच्या बेंच वर बसतो.
हॅलो……………हा अगं तू येणार होतीस ना?? अग प्लिज जरा लवकर ये ना…………मला खूप बोअर होत आहे..... काय?????अजून 10 मिनटं…… बरं………चालेल आता काय वाट बघावीच लागेल माझ्या पिल्लूची……….. "कैवल्य"(एवढं बोलून कैवल्य खोटं खोटं बोलत असलेला फोन.......ठेऊन द्यायचं नाटक करतो.)
कैवल्य च हे संभाषण ऐकून मधुरा ला तर राग अनावर होतो आणि ती पटकन जाऊन त्याच्या गालावर एक चापट मारते.तसा कैवल्य हसू लागतो.
का चेष्टा करतोयस माझी.……….की मीच आता चेष्टेचा भाग झाली आहे??? "मधुरा"
अगं तस नाही गं राणी…………तुझं पण बरोबर आहे...... तू चुकतेस किंवा घाई करतेस अशातला भाग च नाही मुळात...पण काय आणि कसं सांगू याच थोडं टेन्शन आहे."कैवल्य"
का पण? हे बघ कैवल्य तू अजून पण मी.... मोठ्या घरची असा विचार करून जर टेन्स होत असशील तर तसा विचार करू नको.....प्लिज......आणि तसंच असत तर मी प्रेम करताना मोठ्या घरातलाच मुलगा बघितला असता पण प्रेम हे पैसे किंवा श्रीमंती बघून नाही होत....." मधुरा"
कैवल्य मधुराच्या बोलण्याने पुन्हा विचारात जातो तशी मधुरा त्याच्या चेहऱ्या समोर टिचकी वाजवते आणि कैवल्य ची विचारांची तंद्री तुटते.
हे बघ मी आजच घरी सगळं सांगते आहे........आणि मला खात्री आहे माझ्या घरून काही प्रॉब्लेम नसेल."मधुरा"
ओके......"कैवल्य"
फक्त ओके......."मधुरा"
चल ते सगळं जाऊदे सकाळी आपली कॉफी पण झाली नाही नीट चल आता आपण मस्त कॉफी घेऊ आणि आज डिनर पण बाहेरच करू, मग मी तुला घरी सोडतो आणि मग मी घरी जातो." कैवल्य"
अरे वाहहहहह.......भांडण झाल्यावर एवढं प्रेम उतू जाणार असेल तर मी रोज च भांडण करेन.(मधुरा लाडिक पणे बोलते)
नाही ग बाई......रोज रोज बाहेर डिनर मला नाही परवडणार हो......."कैवल्य"
बरं चल आता मी निघते, कॉफी आणि डिनर च प्लॅनिंग नंतर करू.......घरात बोलून झाल्यावर......मला थोडं ऑफिसच काम आहे. उद्या सकाळी सात वाजता क्लाएंट सोबत व्हिडीओ कॉन्फरन्स आहे त्याची तयारी करायची आहे आणि मी आज पप्पा सोबत बोलणार आहे आपल्या नात्याविषयी. आता निघते मी.... चल बायय......."मधुरा"
हे काय????? नुसतंच बाय.....(कैवल्य तोंड पाडत लहान मुलांसारखा बोलत होता) 
मधुरा त्याचे गाल खेचत बोलली "हो......नुसतं बाय..... "बाकी सगळं तू घरून संमती मिळवल्यावर.
तीच बोलणं ऐकून कैवल्य बोलतो "संमती मिळवल्यावर खूप काही भेटणार असेल तर आज च बोलतो मी पण"
हो का???? मग बरचं होईल.त्यानिमित्ताने तरी बोलशील घरी "मधुरा"
एवढं बोलून दोघेही आपापल्या मार्गाने घरी जातात.मधुरा गेट मधून आत येत असताना हातातल्या बुके कडे एक नजर फिरवते आणि गालातल्या गालातच हसते.
मधुरा घरी येऊन फ्रेश होते आणि खाली येते तर घरात कुणीच नसतं म्हणून ती किचन मध्ये जाते तर,सविता ताई जेवण करत असतात.
आज सगळी मंडळी गेली कुठे."मधुरा"
खरेदीला."सविता ताई"(जेवण करणारी बाई)
खरेदीला......आणि ते ही माझ्याशिवाय.....येउदेच  आता बघते सगळ्यांना.(मधुरा डोळे मीच मीचे करून मान हलवत बोलत होती) 
मधुरा डायनींग हॉल मध्ये येऊन बसते आणि सविता ताई तिला गरम गरम तिला आवडणारी अशी स्ट्रॉंग कॉफी बनवते.मधुरा कॉफी घेऊन झाल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स ची तयारी करत असते तेवढ्यात तिला कैवल्यचा फोन येतो. कैवल्य त्याच्या बाबांसोबत बोलून झाल्यावर ते दोघे मिळून आईला सगळं सांगणार असल्याच सांगतो.हे ऐकून मधुरा खूप खुश होते.आणि ती पण घरी आज च विषय काढेन अस सांगते.त्यानंतर दोघांचं जुजबी अस बोलणं होत आणि कैवल्य फोन ठेवतो.मधुरा पण ही न्युज ऐकून खूप खुश असते आणि थोडी काळजीत पण असते की कैवल्यची आई काय बोलेल.
....................………………………
क्रमशः
…………..
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावासह करावी.साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद????????