Dec 01, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???(भाग१०)

Read Later
काय फरक पडतो???(भाग१०)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/
 

भाग ९
https://www.facebook.com/581606972323826/posts/1055565224927996/
 

नितेश आणि मधुरा.........सोबत काम करायला सुरू होऊन सहा महिने होत आले होते. अश्यातच नितेश चा वाढदिवस असतो. मधुरा ऑफिस मधेच सगळी तयारी करून नितेश ला सरप्राईज देणार असते. सगळा स्टाफ वेळेच्या एक तास आधीच ऑफिस मध्ये येऊन ऑफिस सजवण्यापासून ते केक आणि स्नॅक्स पर्यंत जातीने बघत असतो. सगळेजण मधुरा ने वाटून दिलेली काम अगदी मनापासून आणि उत्साहात करत होते. मधुरा मात्र तिच्या पर्सनल कामासाठी बाहेर गेली होती आणि तासाभरात नितेश ला सोबत घेऊनच येईल असं सांगून गेली. मधुरा जवळच असलेल्या गाडगे अँड सन्स मध्ये नितेश ला बोलावून घेते. नितेश तिथे पोचतो.दोघेही आत शोरूम मध्ये जातात. मधुरा तिथे अर्ध्या एक तोळ्यापर्यंत अंगठी घेते आणि तिथेच तिला कपल ब्रेसलेट आवडत ते ब्रेसलेट सुद्धा ती बुक करून संध्याकाळी व्यवस्थित पॉलिश करून गिफ्ट पॅक करायला सांगून ठेवते.

 

नितेश मधुरा सोबत असूनही थोडा नाराज असतो कारण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मधुराने त्याला विष केलेलं नसतं. मधुरा त्याचा चेहरा बघूनच त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखते पण तस दाखवत नाही आणि पूर्ण वेळ कामाबद्दलच बोलत असते पण नितेशच लक्षचं नसत.
 

मधुरा ऑफिसखाली येताच रिसेप्शन ला फोन करून नितेश आणि ती वर येत असल्याच सांगते.दोघेही लिफ्टने वर जातात मधुरा फोन मध्ये डोकं खुपसून हळूच नितेश च्या मागे होते. नितेश जसा दरवाजा उघडतो तशी..... वर ठेवलेली गुलाबाच्या पाकळ्यांची परडी नितेश च्या अंगावर पलटी होते. सगळ्या पाकळ्या अगदी स्लोमोशन मध्ये त्याच्या मस्तकावर पडत असतात. सगळा स्टाफ हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा असतो.

 

नितेश सगळ्यावर एक नजर टाकतो तसे एक एक जण येऊन त्याला बर्थडे विष करत असतात. एक एक करून अश्या भरपूर वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा जणू काही गुच्छचं त्याचा हातात होता....... अस त्याला वाटत होतं.इतका वेळ लांबूनच हा सोहळा बघणारी मधुरा सेन्टरला येऊन उभी राहते. हातात फक्त लाल गुलाबाचं बुके घेऊन. ते बुके नितेश ला देऊन मधुरा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि केक आणायला सांगते.हा सगळा अचानक होणार समारंभ त्याच्यासाठी जणू.........सुखाची पर्वणीच असतो.
 

नितेश केक कट करून पहिला घास मधुराला भरवतो.मधुरा पण त्याला केक भरवून शुभेच्छा देते. स्टाफ मधले दोघेजण केक घेऊन कॅन्टीन मध्ये जातात आणि प्लेट्स भरायला सांगून पुन्हा ऑफिस मध्ये येतात.प्रत्येकाने काही ना काही अशी छोटी मोठी भेटवस्तू घेतलेली असते. सगळेजण पुढे येऊन गिफ्ट्स देऊन नितेशला शुभेच्छा देत असतात. सगळ्यात शेवटी मधुरा येते. नितेश गिफ्ट साठी हात पुढे करतो पण मधुरा तिच्या डाव्या गुढग्यावर खाली बसून उजव्या हातात अंगठीचा बॉक्स उघडून त्याच्या पुढे हात नेते आणि..................
नितेश ला विचारते............

NITESH...........WILL YOU MARRY ME♥️♥️♥️

मधुराच्या या प्रश्नाने तर सगळेच अवाक होऊन बघतात.....सगळ्यांचे कान आता नितेशच्या उत्तराकडे टवकारले होते. नितेशला तर हा क्षण स्वर्गाहून ही सुंदर भासत होता.पण अचानक......... आनंदाच्या धुंदीत असणारा नितेश पटकन भानावर येतो कारण त्याच्यातली कमी ही विसरण्यासाठी नसते. त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघताच मधुरा उठून उभी राहते.......त्याचा हात हातात घेते आणि त्याला आशवस्त करते की........जो विचार तो करतोय त्याच्यावर खूप चांगला मार्ग आहे तिच्याकडे फक्त तुझी साथ हवी. तिच्या या वाक्यावर नितेश इमोशनल होतो आणि तिच्या प्रपोजल ला  Yes  अस उत्तर देतो. त्याचा होकार ऐकून सगळेच खूप खुश होतात आणि हा वाढदिवस आणखीन जोरदार करतात. बर्थडे पार्टी खूप छान होते.समोसे, कचोरी, वेफर्स,केक असा सगळा सोहळा पूर्ण करून सगळे आपापल्या कामाला लागतात. दुपारी सगळ्या स्टाफला मधुराकडूनच जेवण असते. लंचब्रेक मध्ये सगळे एकत्रच जेवायला बसतात. छोले,पुरी,खीर,व्हेज पुलाव,सॅलड,लोणचं, पापड असा सादा बेत असतो.सगळे एकत्र हसतखेळत,गप्पा गोष्टी करत जेवणं उरकून परत आपापल्या डेस्क वर येऊन बसतात.

नितेश फक्त मधुरा कडे एकटक लावून बघत असतो.तो काही विचारणार एवढ्यातच मधुरा त्याला थांबवून तुला जे काही बोलायच आहे विचारायचं आहे ते संध्याकाळी बोलू. मला माहित आहे तुझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन पण संध्याकाळी...... मधुराच्या बोलण्याने नितेश गप्प बसून हातातील फाईल चाळत बसतो. पण त्याच त्यात अजिबात लक्ष नसतं.

मधुरा तिची मिटिंग करून परस्परच घरी जाते आणि इथे नितेश केबिन मध्ये बसून तिची वाट बघत असतो.तेवढ्यात नितेशच्या फोन वर नोटिफिकेशन येतं आणि त्यात मधुराचा मॅसेज असतो.एका रिसॉर्ट चा ऍड्रेस असतो आणि त्यावर सात वाजेपर्यंत पोहोचायच आहे असं हायलाईट केलेलं असतं.
 

मिटिंग संपवून पाच वाजताच मधुरा घरी गेल्याच नितेश ला पियून कडून समजतं. नितेश पण घरी जातो शॉवर घेऊन दिवसभर घडलेल्या गोष्टींना आठवत असतो. मधुरा ने विष न करणं, ऑफिस मध्ये सरप्राईज भेटणं,त्यात मधुरा णि केलेलं प्रपोज तर..... .. त्याच्या ओलेत्या अंगावर शहारे आणत होतं.
 

या सगळ्या स्वप्नातून बाहेर येऊन तो पटकन रिसॉर्ट साठी तयार होतो.मधुराच्या आवडीच्या रंगाचा म्हणजे पिंक कलर चा शर्ट त्यावर ब्लॅक कलर चं जॅकेट आणि ब्लॅक कलर ची फॉर्मल पॅन्ट, लाईट असा परफ्यूम, सिल्की केसांना हलकासा जेल लावून सेट केलेली केसं......... असा त्याचा लुक आज आनंदामुळे आणखीनच हॉट दिसत होता.

इकडे मधुरा पण पिंक कलर चा चुडीदार,कर्ली करून वनसाईड पिनअप करून खुले ठेवलेले केसं आणि त्यावर लाईट मेकअप करून,डायमंड कलर चं क्लच घेऊन ती ही वेळेत तयार झाली.

दोघेही आपापल्या अंदाजाने निघाले.दोघांच्याही गाड्या एकाच वेळी रिसॉर्ट मध्ये इंटर करतात. गाडी पार्किंग मध्ये पार्क करून नितेश मेन गेट वरच मधुराची वाट बघत थांबतो.मधुरा पण कॅबचे पैसे देऊन येते आणि दोघेही सोबतच आतमध्ये जातात.

मधुराने सगळ्या गोष्टी आधीच बुकिंग करून ठेवलेल्या असतात.

दोघेही त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. मधुरा ने खाण्यापिण्याची पण सर्व ऑर्डर आधीच देऊन ठेवलेली असते. चार तासांसाठी तिने बुकिंग केलेली असते. त्या चार तासात किती किती वेळाने काय घेऊन यायचं या सगळ्या गोष्टी तिथल्या एका माणसाला तिने आधीच सविस्तरपणे सांगीतलेल्या असतात.
 

मधुरा आणि नितेश तिथे जाताच त्यांचा मॅनेजर हॉटेल तर्फे बुके देऊन नितेशला शुभेच्छा देतो आणि निघून जातो. रिसॉर्ट मध्ये वेळेत घडणारी प्रत्येक गोष्ट तो निरखून बघत असतो. वेलकम ड्रिंक झाल्यावर लगेच पंधरा मिनिटांनी मॅनेजर स्वतः त्यांच्या टेबल जवळ केक घेऊन येतो. केक कट करून दोघेही पुलसाईड ला जाऊन बसतात. नितेश पुलसाईडला बुकिंग केलेल्या त्यांच्या टेबलवर जाऊन बसतो तर मधुरा मात्र पुलजवळ जाऊन खाली....... पाय पाण्यात सोडून बसलेली असते. दोघेपण बराच वेळ एकमेकांना बघत असतात.

वेटर स्टार्टर आणि केक घेऊन टेबलजवळ जाऊन ठेवतो. मधुरा काही येणार नाही म्हणून तो स्वतः दोन्ही प्लेट्स पुलजवळ घेऊन जातो.शूज आणि सॉक्स काढून पॅन्टचे बॉटम थोडे वर करून तो पण मधुराच्या शेजारी जाऊन बसतो.एवढा वेळ एकमेकांशी न बोलले दोघे आता कोण पहिले बोलणार याची वाट पाहत असतात.
 

शेवटी न राहून नितेशच बोलायला सुरुवात करतो. मधुरा........... थँक्यू सो........मच.......आजचा दिवस खरचं खूप छान गेला माझा आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं.मी खूप खुश आहे आज.
 

तू खुश आहेस पण वर वर. तुझ्या चेहऱ्यावर तर बरेच प्रश्न दिसतायत मला???? अस मधुरा बोलते.
मी तुला कुठलीही जबरदस्ती नाही करत आहे नितेश.मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ते म्हणूनच मी तुला प्रपोज केलं होतं.
 

कैवल्य त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे.मला पण माझं आयुष्य आता नव्याने सुरू करायचं आहे. मला माहिती आहे तुझ्या सोबत लग्न करून मला आई होण्याच सुख नाही भेटणार ......अरे पण आई होण्यासाठी स्वतःच मुलं असणं गरजेच आहे........ असा कुठे नियम तर नाही ना????
दुसरा कुठला तरी मुलगा बघून त्याच्यासोबत संसार करण्यापेक्षा मी तुझ्या सोबत जास्त खुश राहीन असं मला वाटतंय.तुला तर माझा सगळा भुतकाळ पण माहीत आहे म्हणजे मला नव्याने काही सांगण्याची गरज नाही.कैवल्य पासून लांब झाल्यावर मी आठ दिवसंकरिता लोणावळ्याला गेली होती......... सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी.....  तिथेच एका आश्रममध्ये जाऊन माझा पूर्ण दिवस त्या निरागस मुलांसोबत घालवत होती त्यातच नुकतीच जन्मलेली दोन तीन दिवसांची असेल ती मुलगी तिला आश्रमाच्या बाहेर आणून सोडले होतं. त्या माणसांनी तिला आत घेतलं तिला बॉटल ने दूध पाजलं,भुकेलं ते बाळ दूध पिताच शांतपणे झोपी गेले. आठ दिवसांत मला प्रकर्षाने जाणीव झाली की आपण तर मोठे असून ही ......... एवढ्याश्या दुःखाने उदास होतो यांना तर कोणीच नाही पण तरी किती खुश असतात. हा विचार करूनच मी बंगलोरला शिफ्ट झाले आणि पुढचं तर तुला माहीतच आहे.
तर मला अस म्हणायच आहे की आपण लग्न करून त्या इवल्याशा मुलीचे आई-बाबा होऊयात ना!!!!

स्वतःच मुलं जन्माला घालणं म्हणजे लग्न असत का???? की एवढाच अर्थ असतो लग्नाचा????

हे बघ नितेश......मला खरचं पुढे व्हायचं आहे पण त्यासाठी मला माझा भूतकाळ विसरावा लागेल आणि माझी खात्री आहे तू मला यातून बाहेर नक्कीचं काढशील. "मधुरा" ( एवढ सगळं बोलून मधुरा तिथून निघून रिसॉर्टच्या गार्डन मध्ये जाते.)

नितेश त्या प्लेट्स उचलून एक प्लेट टेबलवर ठेवतो आणि एक प्लेट सोबत घेऊन मधुराच्या मागे गार्डन मध्ये जातो. मधुरा अशोकाच्या झाडांजवळ जाऊन डोळे पुसत उभी असते. नितेश तिला एका हाताने स्वतःकडे वळवतो. मधुरा खाली मान घालून उभी असते. नितेश त्याच्या हातातली प्लेट बाजूच्या बेंच वर ठेवतो.डावा हात मधुराच्या खांद्यावर ठेऊन तो तिला स्वतःजवळ घेतो आणि उजव्या हाताची तर्जनी मधुराच्या हनुवटीवर ठेऊन तो तिचा चेहरा वर करतो.मधुराचे डोळे बंद असतात पण त्यातून गालावर ओघळणारे अश्रू नितेश त्याच्या रुमालाने पुसून तिला शांत करतो. नकळत मधुराच्या हातांचा विळखा नितेश च्या कमरेभोवती घट्ट होतो मधुराला नितेशच्या हृदयाची धडधड अगदी स्पष्टपणे ऐकू येते. आता मात्र नितेश ही मधुराला घट्ट मिठी मारतो.

काहीवेळानी मधुरा त्याच्या मिठीतुन लांब होते आणि पुन्हा उजवा हात नितेशच्या समोर नेतं त्याला विचारते.........

"मला जुनं सगळ विसरून नवीन आयुष्य तुझ्या सोबत  सुरू करायला तुझी साथ हवी आहे........तेवढी साथ देशील मला??????"मधुरा"
 

नितेश मधुराच्या उजव्या हातात स्वतःचा डावा हात देतो आणि मधुराला पटकन स्वतःजवळ ओढून तिला घट्ट मीठी मारतो. त्याच्या भारदस्त हाताच्या मिठीत मधुरा अगदी मुंगी असल्यासारखी भासत असते. मधुराही त्यांच्या त्या मिठीत सुखावते नितेशच्या त्या मिठीने तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेल असतं.

नितेश बाजूच्या बेंच वरची प्लेट उचलून त्यातला केक मधुराला स्वतःच्या हाताने भरवतो मधुरा पण त्याला केक भरवून त्याला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.

एवढा वेळ लांब असणारे दोघे आता मात्र हातात हात गुंफून आयुष्यभरासाठी सोबत राहून एकमेकांना साथ देण्याच ठरवतात.

पूल साईडलाच दोघांच्या जेवणाच्या प्लेट्स लागतात. जेवण सुरू करण्याआधी मधुराने नितेश साठी आणलेल खास गिफ्ट त्याला देते. नितेश गिफ्ट अनपॅक करतो. बॉक्स उघडतो आणि नकळत त्याचे डोळे पाणावतात. त्यात कपल ब्रेसलेट बघून तो त्याच्या नावच ब्रेसलेट उचलतो आणि मधुराच्या मनगटात स्वतःच्या हाताने घालतो. मधुरा पण तिच्या नावच ब्रेसलेट स्वतः त्याच्या हातात घालते.

दोघेही एकमेकांना घास भरवून जेवणं उरकतात.
 

नितेश त्याची गाडी घेऊन मधुराला ड्रॉप करायला घरी जातो. नितेशला आज मधुरा जणू स्वर्गातली अप्सराचं भासत असते. तो ड्राईव्ह करता करता मधुराला बघत असतो.मधुरा तिच्या चेहऱ्यावर येणारे केसं मागे घेत बाहेर बघत असते.काहीवेळातच गाडी मधुराच्या घराबाहेर उभी राहते. नितेश गिअर वरचा हात काढून मधुराचा हात हातात घेतो.बराच वेळ दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत शांत असतात. शेवटी मधुरा "निघू का आता"?????अस विचारते आणि नितेश ची तंद्री तूटते. मधुरा डोर खोलून बाहेर जाते तसा नितेश मधुरा ला आवाज देतो.
 

मधु..........थँक्स........"नितेश"

मधुरा...... नितेश च्या तोंडून मधु ऐकून गोड..... हसते आणि डोळे मिचकाउन निघून जाते.नितेश घरी जाऊन फ्रेश होतो आणि आजचा दिवस हा त्याच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस म्हणून आजच्या दिवसाच्या गोड आठवणी तो त्याच्या हृदयात जपून ठेवणार अस वचन स्वतःलाच देतो....... शिवाय मधुराला कसलीच कमी पडू देणार नाही असही वचन तो स्वतःला देतो.

इकडे मधुराही घरी येऊन शॉवर घेते आणि दिवसभराच्या घडामोडींचा विचार करत असते. मधुराला तर तिच्या आजच्या वागण्याचं थोडं आश्चर्यचं वाटते,कारण कैवल्य शिवाय तिने कधीच कोणाचा विचार केलेला नसतो. दिवसभराच्या दगदगी मुळे विचार करतचं कधी तरी मधुरा ला झोप लागते. नितेशला मात्र आनंदाने झोपच लागत नाही. तो रात्री बराच उशीर जागा असतो.

मधुरा दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर लवकरच उठून सगळी आवरा आवर करून घेते कारण ती आज ऑफिस मधून हाफ डे घेऊन तिच्या घरी जाणार असते तस ती नितेश ला मॅसेज करून कळवते. नितेश सकाळी उशिरा झोपल्याने त्याला दुपारच्या वेळेतच जाग येते.सगळ्यात आधी तो फोन बघतो तर त्या वर मधुराचे तेरा मिस कॉल असतात आणि एक मॅसेज.

"मी आपल्या बद्दल घरी सांगायला म्हणून आज मुंबईला जात आहे.सव्वा दोनची माझी फ्लाईट आहे.तुला कॉल केले मी........पण बहुतेक आनंदाच्या भरात तू रात्रभर जागा होतास आणि सकाळी झोपलास असा अंदाज बांधून मी पुनः कॉल केला नाही. उठून फ्रेश झालास की मला कॉल कर.♥️♥️♥️♥️

 

मधुराचा मॅसेज बघून नितेश घड्याळात बघतो. घड्याळात एक पस्तीस झालेले असतात. नितेश पटकन उठून ब्रश करून कावळ्यासारखी आंघोळ करून दहा मिनिटांत रेडी होतो. त्याचा घरापासून वीस मिनिटांच्या अंतरावर एअरपोर्ट  होत.दुपारची वेळ असल्याने रोड वर ट्रॅफिक पण कमी होत म्हणून रोज पेक्षा जरा जास्तीच्या स्पीड मध्ये गाडी चालवून नितेश पंधरा मिनिटांतच एअरपोर्टवर पोचतो. इन्कवायरी विंडो वर चौकशी करून तो वेटिंग रूम मध्ये जातो तर तिथे मधुरा बसलेली असते. नेमकी तिची फ्लाईट अर्धा तास उशिरा असते.

मधुरा..........सॉरी......ते मी जरा रात्री उशिरा झोपलो......पण तुला कस समजलं?????" नितेश"

आपण ज्या मुलीवर प्रेम करतो......तिनेच जर स्वतःहून प्रपोज करून खूप सारे सरप्राईज दिले असतील तर कोणत्या मुलाला रात्री झोप लागेल????????" मधुरा"(मधुरा भुवया उंचावत हसत हसत नितेश ला विचारते.)
 

नितेश खाली मान घालुन हसत असतो. मधुराच्या हातात हात टाकून तिला स्वतःजवळ ओढुन तो रूम बाहेर येतो आणि दोघेही विमानतळाच्या कँटीन मध्ये जातात. दोन स्ट्रॉंग कॉफी घेईपर्यंतच फ्लाईटची अनौनसमेंट होते तसे दोघेही कँटीन मधून निघतात. मधुराला मिठी मारून नितेश तिला बाय करतो आणि मधुरा गेल्यानंतर बराच वेळ नितेश तिथेच उभा असतो. त्याला भीती असते मधुरा चे पप्पा तयार होतील की नाही याची पण मधुरा वर पूर्ण विश्वास असतो की ती पप्पांना मनवणारचं.

 

मधुरा घरी येते फ्रेश होऊन सगळ्यांना भेटते कारण ती तब्बल सहा सात महिन्यांनी घरी आली होती.दोन्ही भाऊचं काय अख्ख घर तिच्या दिमतीला उभं होतं. मधुरा येणार म्हणून तिच्या पप्पानी पण रात्रीच्या त्यांच्या डिनर मिटिंग कॅन्सल केल्या आणि लवकरच घरी आले.

क्रमश:
खरं तर हा कथेचा शेवटचा भाग करणार होते पण कथा पूर्ण होत नसल्याने आणखी एक भाग वाढविण्यात येत आहे.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading