एक आविष्कार सतरा भानगडी - भाग २
निशांत आणि मिताली रात्री जेवण करून गप्पा मारत बसतात. उद्याचाच दिवस सुट्टी आहे जवळ कुठे फिरायच तर फिरून येऊ, हनिमूनला नंतर जाऊ.
मिताली - बघु रे, एवढ्या गडबडीत कुठे जायचं फिरायला मस्त घरीच झोप काढुया. तसंही शाळेतला ग्रुप पार्टीसाठी बोंबलत आहे लग्न ठरल्या पासून, पार्टी करू भारी. तस आमच्या पार्ट्या खूप झाल्या पण तू नव्हता म्हणून ऑफिशीयल लग्नाची राहिली. आणि तू तिथे काय खुड खुड करत बसलाय इथे बस मझाजवळ.
निशांत - अरे ग्रेट आयडिया, खूप दिवस झाले सगळ्यांना भेटून. मी ड्राॅवर अवरतोय, तुझाजवळ येण्यासाठी आधीची जळमटं साफ करतोय.
मिताली - ओह संजनाच सामान आहे, फेकू नकोस ना किती छान आठवणी आहेत तुमच्या, पाहिलं प्रेम जपून ठेवायचं असतं.
निशांत - यातही मस्करी का ग, तू कितीही जॉली असली तरी माझं पाहिलं प्रेम सहन होईल का तुला, आधी शेअर करायचो मी पण तेव्हा फक्त मैत्रीण होती तू.
मिताली - किती जड जड बोलतो रे तू चिल्ल रहात जा जरा, आणि ही काही मस्करी नाही, ३ वर्ष रिलेशन होत तुमचं जेवढं विसरण्याचा ट्राय करशील तेवढं सलत राहील, त्यापेक्षा त्या गोड आठवणी जपून ठेव.
फ्रॅंकली मला तर वाटते तू घाईच केली लग्नासाठी, कदाचित तुमचं वर्क आऊट झालं असतं. तिला तुझ्या कामाबद्दल रिस्पेक्ट होता.
निशांत - नाही रे मीतू, खूप प्रयत्न केला मी सोलुषण काढण्यासाठी पण पॉसिबल नव्हतं. आणि तिला माझ्या कामाचा रीसपेक्ट नव्हता असं नाही, पण मझाकडून तिला एका सर्वसाधारण पार्टनरच्या अपेक्षा होत्या. तीच्यासारखा ९-५ जॉब, पुण्यात किंवा सासवड एकाच गावी स्थिर आयुष्य. सुरवातीला माझ्या याच कामानी खूप हुरळून जायची, पण नंतर नंतर तिला वेळ न देऊ शकण, PHd नंतर तर व्याप खूप वाढला. १-२ महिने फोनवर जास्त न बोलता दूर राहणे, कुठला रिसर्च प्रोजेक्ट आला तर मला त्या शहरात किंवा कुठल्या खेड्या जंगलातही बरेच दिवस राहावं लागतं, माझ्या जीवाची रिस्क सुध्दा असू शकते. याची भीती वाटायला लागली तिला, मग भीती अटींमध्ये बदलली, माझं काम किंवा ती असं निवडाव लागलं शेवटी, भांडण तरी किती करणार तिच्या जागी ती बरोबर होती माझ्या जागी मी.
मिताली - फारच क्रिटिकल होत बुआ तुमचं प्रकरण, माझे सस्पेन्स मूव्ही परवडले तुमच्या पेक्षा.
पण तू थोडा वेळ अजुन घ्यायला हवा होता त्यातून सावरायला, २ महिने म्हणजे फार घाई केलीस.
निशांत - २ महिने कसले २ मिनिट लागले तुझाबद्दल ठरवायला. संजना आणि आमचं शेवटचं बोलणं झाल्यानंतर तिचा विषय संपला होता, हे मी तेव्हाच आईला सांगितलं. एवढं होऊन तिने तुझ्याबद्दल विचारलं हवा तेवढा वेळही दिला, मी गोंधळलो. नवीन प्रोजेक्ट आल्यामुळे विचार बंद केला ५८ दिवसात काम संपल. त्याच दिवशी तू भेटली, पहिल्यांदा तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं, आणि लगेच क्लिक झालं, हे ध्यान गळ्यात घालायला काही हरकत नाही, दुसऱ्याच दिवशी आईला बोललो. तू कितीही फिरलेल्या डोक्याची असली तरीही मला माझा स्वप्नांना समजून घेते अगदी लहानणापासून.
मिताली - हो ना आणि ८ दिवसात लग्न पण लाऊन दिलं रे त्यानी, एकांतात नीट भेटलो पण नाही आपण. असो तरीही तिच्या वस्तू फेकू नकोस राहू दे तशाच.
आता काय गप्पा मारत बसणार का रात्रभर, बी रोमँटिक, आणि आज रात्री तरी काम काढू नकोस.
निशांत - आज रात्री नो वे, एमरजन्सी साठी दुसऱ्यांना नेमलय आणि फोन सायलेंट. तू पण फोन बाजूला ठेव नाहीतर बघत बसशील एखादा मूव्ही. आज फक्त तू आणि मी.
मिताली - येस बॉस...
-------------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी मिताली सोडून सगळे रूटीन प्रमाणे लवकर उठले, आजच्या दिवस सगळ्यांची शेवटची सुट्टी असल्याने चहा सोबत निवांत गप्पा रंगल्या.
बाहेर आवाज येतो, भाजी घ्या भाजी.
निशांत - हा भाजीवाला वेगळा दिसत आहे आणि आपल्याच घराजवळ का जास्त आवाज देत आहे.
नलिनी - असेल कोणी नवीन.
निशांत - मी ऑफिस कडे जाऊन येतो.
नलिनी - अरे आज सुट्टी घेतली म्हटला नं.
निशांत - हो अग, काम नाही करणार, बस लॉक वगैरे नीट आहे की नाही चेक करतो, नवीन कोणी दिसलं की नको वाटतं. मिताली उठली की पाठवशील, तिला नवीन प्रॉजेक्ट बघायचा आहे, आणि हो चहा पण.
मिताली थोड्या वेळात उठते व चहा नाश्ता घेऊन त्याच्या ऑफिस कडे निघते, घरा समोरच घराचा रस्ता क्रॉस केल्यानंतर गाईंचा गोठा व त्यामागे ऑफिस असतं. जाता जाता भाजीवल्या जवळून एक ऍपल ???? पण घेते.
मिताली - टडाssssss... गरमागरम चहा आणि पोहे, आपलं चहा पोहे झालंच नाही यार निशु.
निशांत - बर तू ये मग बघायला, मी करतो चहा पोहे, तू करू नको प्लीज.
अगं मांडी मॉडेल माझी जाडे बसते काय, हालत जा जरा, एका जागी बसून बसून पुस्तकं वाचते नाहीतर मुव्हीज बघते, ट्रेडमिल वर तरी पळत जा.
मिताली - चांगली आयडिया आहे. हे खा ऍपल, १० रुपयात मिळालं बाहेर.
निशांत - हे स्टिकर वालं ऍपल इथे कसं आणि एवढं स्वस्त, भाजीवाला पण नवीन वाटला.
मिताली - असेल कोणी जाऊदे ना, तू काय पोलीस मध्ये आहे का. मला तुझा नवीन प्रॉजेक्ट सांग ना.
निशांत - सांगतो आणखी बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत तुला. सगळ्यात महत्त्वाचं सतत ऑबजर्व करत रहा आजूबाजूच्या गोष्टी, लोक हालचाली. मी घरच्यांना दाखवला तो एक छोटासा पर्सनल ड्रीम प्रोजेक्ट आहे, मला तो मुक लोकांसाठी फ्री करायचा आहे ज्यासाठी फंडिंग मिळत नाही म्हणून बस डिझाईन करून रेडी आहे. काही लोक मार्केट मध्ये विकण्यासाठी तयार आहे पण मला तसा बाजार नकोय.
हे एक हेडफोन्स सारखं डिव्हाईस आहे आपण लॅपटॉपला लावलं तर हे आपल्या ब्रेनच्या हालचाली नोट करत.
म्हणजे बघ तू हा पेला उचलला तर तुझ्या हाताच्या मसल्सची हालचाल होते तसच जेव्हा आपण म्हणजे आपला ब्रेन एखादा विचार करतो तेव्हा त्याच्या मसल्स मध्येही हालचाली होतात, याच हालचाली हे डिव्हाईस रीड करत आणि आवाजाच्या रुपात ऐकवत.
मिताली - म्हणजे हे हेडफोन्स घालून मी मनात जे काही बोलेल त्याचा स्पीकर मधुन आवाज येईल, मला ओठही हलवाव लागणार नाही.
निशांत - एक्झॅक्टली... पण अजून पूर्ण व्हायचंय हे जस्ट डिझाईन रेडी आहे, कोणी स्वर्थाशिवाय फंडींग दिल तर होईल.
मिताली - होईल होईल तुझ्यासारखे अजून असतील लोक ज्यांना इतरांना मदत करून आनंद मिळतो.
निशांत - होप सो. चला निघू आता, शाळेतले सगळे भेटणार ना लंचला, मजा करू मस्त, कुठल्या रेस्टॉरंटला जायचं.
ओह... डोन्ट गिव्ह मी दॅट लुक, तू असं बघते तेव्हा काहीतरी विचित्र शिजत असते तुझ्या डोक्यात, प्लीज कुठल्या जंगलात जाऊन कंद मुळ खायला घालू नकोस.
मिताली - नाही रे छान सरप्राइज आहे आवडेल तुमच्या सगळ्यांनाच.
निशांत - जेवण मिळालं म्हणजे नशीब आमचं, लास्ट गेट टुगेदरला आम्हालाच शिजवायला लावलं होत.
मिताली ने त्यांच्या शाळेच्या पूर्ण बॅचला बोलावलं होत तेही त्यांचाच शाळेत अरेंज केलं.
सगळ्यांना खूप आवडलं जुन्या आठवणी गिरवायला शाळेच्या गोष्टी तेही शाळेत मस्त रंगल्या. जेवण पण ऑर्डर तिथेच केलं, मॅनेजमेंटची खास परवानगी काढून घेतली होती तिने.
सर्वांनी मितालीच खूप कौतुक केलं एवढी भारी आयडिया केल्या बद्दल आणि पुढे पण नेहमी इथेच भेटू ठरवलं.
गप्पांमध्ये दिवस असाच निघून गेला.
दोघंही संध्याकाळी लॉंग ड्रईव्हला निघाले.
मिताली - कुठे जातोय निशु.
निशांत - सरप्राइज तूच देऊ शकते का, हा पण तुझा एवढं अतरंगी नाही बर, छोटंसं आहे.
निशांत तिला एका लेक साईड हॉटेल मध्ये घेऊन गेला त्यांनी भरपूर गप्पा मारल्या.
मिताली - मस्त सरप्राइज आहे तुझ तर, शिकलास की मझासोबत राहून.
तिथेच डिनर करून दोघंही निघाले.
निशांत - अगं हा आपल्या घराजवळचा भिकारी इथे कसा, २५ किमी दूर, विचित्र आहे जरा.
मिताली - आला असेल कोणाला लिफ्ट मागुन, आपल्या तिकडे कोणी देत नसेल त्याला काही.
निशांत - ऐक मी आज रात्री ऑफिसला थांबतो, आय नीड टू बी मोअर सिक्युअर. तू पण थोडा वेळ ये मला काही गोष्टी सांगून ठेवायच्या आहेत तुला.
------------------------------------------------------
- सर मला वेश बदलावा लागेल निशांतला माझ्या भिकारी असण्याचा संशय आलाय.
- ठीक आहे एक काम कर, तिथे गाई आणि गोठ्याची साफसफाई करायची म्हणून कामाला लाग आपल्याला लवकरात लवकर त्याचा प्रोजेक्ट हवाय. आणि यापुढे जास्त सावध राहा.
----------------------------------------------------
निशांत आणि मिताली घरी सांगून ऑफिस कडे निघाले.
मोहन - १ मिनिट बेटा हे तुझ्या सत्करासाठी पुन्हा पत्र आलंय बहुतेक, एकदा उत्तर देऊन दे त्यांना जायचं की नाही.
निशांत - ठीक आहे बाबा, पण कळत नाहीये असं अचानक कोणी माझा सत्कार का बर करेल, अजुन डिव्हाईस पेटंट पण नाही झालं, बघतो काय भानगड आहे जाऊन.
मिताली - अरे किती विचार करतो तिथे भिकारी काय आणि इथे पण, साईंटिस्ट आहे की पोलीस.
निशांत - सांगतो चल आत.
दूधवाला दादा या आत हिशोब करू.
मिताली गोंधळते दूधवाला एवढ्या रात्री तेही लॅब मध्ये कशाला...?
मिताली - एवढ्या रात्री दुधाचा हिशेब ???
निशांत - सांगतो. हे माझा लॅबच डोअर लॉक डिजिटल आहे प्रत्येक वेळ मोबाईल वर नवीन कोड जनारेट होतो त्यानेच हे ओपन होईल बाकी बॉम्ब फोडला तरी नाही होणार.
या दोघं ही आत.
मीतु हा दूध वाला नाही, इन्स्पेक्टर जय आहेत. मी माझे डिव्हाईस मेडिकल हेल्प आणि इंडियन आर्मी साठीच बनवतो, म्हणून शक्य तेवढी सावधगिरी बाळगतो. आर्मीचे सिक्रेट जीव गेला तरी लीक नाही झाले पाहिजे, हे तूही लक्षात ठेव.
जय - हॅलो मिताली. नाइस टू मीट यू.
मिताली - हॅलो सर.
निशांत - सॉरी जय तुम्हाला अर्जंट बोलावून घेतलं, पण काही गोष्टी खटकत होत्या, माझ्या काही फाईल्स ऑनलाईन हॅक झाल्यात त्यामुळे नक्कीच कोणीतरी मागावर आहे, ज्यावरून हॅक केलं त्या कंप्युटर चे आय पी अड्रेस आहेत. मी बाकी डिटेल्स मुंबईला आल्यावर देईन. फायनल ड्रिल नंतर प्रॉजेक्ट आर्मीला हॅण्ड ओव्हर करेन.
मिताली भविष्यात मी रीचेबल नसताना कधीही काही प्रोब्लेम झाला तर फक्त जय वर विश्वास ठेवायचा. इतर पोलीस, मंत्री कोणीच नाही, आपली सिक्रेट जाणून घेण्यासाठी कोणीही तुमच्या वर दबाव आणू शकत.
जय - ओके निशांत भेटू लवकरच. बाय मिताली.
मिताली - बाय सर.
बापरे किती डेंजर आहे हे. आम्हाला वाटत होत तू फक्त लोकांच्या सेवेसाठीच काम करतो पण तू तर आमच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव पणाला लावतोय.
निशांत - हो पण भीती वाटते माझ्या मुळे तुम्हाला कुठली किंमत नको मोजायला.
मिताली - यात तुझ माझ काय तू देशासाठी एवढं करतोय तर आमचा थोडा वाटा असला तर भाग्यच ते.
निशांत - थॅंक्स रे. मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवतो तसं घरी थोडीफार कल्पना दिलेली असतेच एरवी.
हे मोर्स कोड लँग्वेज आहे शिकून घे म्हणजे आपण गाण्यातून, हातावर टॅप करून, डोळ्यांनी, म्युझिक नी बोलू शकतो.
समजा मला काही झालं किंवा मी कुठल्या संकटात सापडलो तर ही लॅब तू क्रॅश करून द्यायची म्हणजे माझा सिक्रेट डेटा पूर्ण पणे नष्ट होईल, निकामी फाईल्स राहतील फक्त. हा पाथ बघुन घे इथून क्रॅश करायची.
माझ हे नवीन डिव्हाईस जोवर हॅण्ड ओव्हर करत नाही तोवर त्याच्या मागे खूप रिस्क जोडली गेलीआहे. सध्या त्याबद्दल मी तुला सांगत नाही, तुझ्यावरही संकट नको.
तू फक्त काही बेसिक गोष्टी समजून घे.
हे कोऑर्डीनेट्स असतात ते दिले की लॅटीट्युड लॉंजीट्युड (अक्षांश रेखांश) वरून कुणाचीही लोकेशन समजते, आणि ह्या ट्रॅकर नी आपण तिथे पोचू शकतो जसं लग्नाच्या दिवशी आईनी मला शोधलं.
कधी कधी पूर्ण वाक्य साधं असते पण त्यात १-२ शब्द पकडायचे असतात.
सध्या एवढं बसं बाकी हळू हळू तुला सांगेन.
मिताली - बापरे अवघड आहे बट इंटरेस्टिंग, अगदी मूव्ही सारखं. रिस्क पण तशीच आहे.
निशांत - चला झोपू आता, उद्या पासून काम चालू.
मिताली - अरे वाह मस्त सोय आहे इथे बेड छोट किचन.
----------------------------------------------------------------
दोघंही सकाळी लॅब मधुन घरी येतात. गोठा साफ करायला नवीन माणूस दिसतो. (कालचाच भिकारी) त्याची नजर सतत लॅब कडेच असते.
निशांत - आई साफ सफाईला नवीन कोण ठेवलंय, थोड विचारपूस करून ठेवत जा.
नलिनी - हो अरे गरजू होता बिचारा. लॅब जवळ जायचं नाही बजावलय त्याला.
निशांत - मॅडम सगळे कामाला लागताय आजपासून तुम्ही काय करणार दिवसभर, डू समथिंग फ्रुटफुल.
मोहन - काय रे त्रास देतो तिला, २ दिवस झाले नाही लग्नाला, लगेच कामाला कशाला सुरुवात, आराम करू दे काही दिवस.
निशांत - तसं नाही बाबा पण अटलिस्ट काय करायचं हे तरी ठरवावं असं माझ म्हणणं आहे. ६ महिने सुद्धा एका जॉब वर टिकत नाही कधी कंप्युटर, कधी फॅशन डिझाईन, सारखं नवीन.
मिताली - मला न असं काम हवय ज्यात बोअर नाही होणार, समथींग पॅशनेट.
निशांत - ठीक आहे पण मग तोवर नुसतीच बसून राहणार का, आय मीन प्रत्येक माणसानी इंडिपेंडंट असावं असं माझ मत आहे छोटंसं चालेल पण स्वतः च असं काहीतरी असावं.
मोहन - एक काम करू तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आपल्या उदबत्तीच्या फॅक्टरी मध्ये येत जा, तोवर तुझ पॅशण शोधणं चालू ठेव.
निशांत - ग्रेट
मिताली - बाबा आय लव यू
निशांत - तुला न असं काहीतरी पाहिजे ज्यात गप्पांनी काम होईल.
निरज - वाहिनी एक भारी आयडिया आहे, हे बघ ही इंटरव्ह्यूची जाहिरात आहे रेडिओ जॉकी ची, तू तुझ्या सस्पेन्स स्टरीस सांगु शकते.
मिताली - हा रे भारी आयडिया आहे.
निशांत - चालू द्या तुमचं, मी लागतो कामाला.
५-६ दिवस मिताली त्यांच्या उदबत्तीच्या फॅक्टरी मध्ये जाते, सगळं काम समजून घेते, तिला खूप इंटरेस्ट येतो ते सगळं बघून. १ दिवस रेडिओ सेंटर ला इंटरव्ह्यू पण देऊन येते, छान सस्पेन्स स्टोरी तयार केली निरज, तन्मय, तन्वीच्या म्युझिक बँडला पण सोबत नेलं बॅकग्राऊंड साऊंड साठी. मिताली ज्या आर्त पणे कथेत जीव ओतून बोलत होती सगळेच मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. तीची नोकरी जवळपास पक्कीच होती. निशांतच कामही जोरात चालू होत, क्वचितच तो लॅबच्या बाहेर येत, मिताली डबा द्यायला जात, अधून मधून तिकडे थांबत.
मितालीची रेडिओ जॉकी म्हणून नोकरी पक्की झाली, संध्याकाळी एक सस्पेन्स शो साठी.
रात्री सगळे मितालीच्या घरी टेरेस वर सगळे जेवायला जमतात. मिताली अगदी साखरेसारखी घरात मिसळली होती, ते बघून स्मिता सुखावल्या होत्या.
नलिनी - स्मिता ताई मी म्हटलं होतं ना आपली मितु खूप हुशार आहे, चमकणार ती संधी मिळताच.
स्मिता - हो ताई. पण तुम्ही सगळ्यांनीच पैलू पडला हिऱ्याला म्हणून झालं.
निशांत - आई मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाइन ते सत्कार समारंभासाठी, ते नगरसेवक नागरे कडे.
नलिनी - अरे वा छान, मितालीला पण घेऊन जा.
निशांत - बघतो, मग कळवेल तसं. मला दुसरे ही काही काम आहेत, रिसर्च सेंटरमध्ये.
------------------------------------------
गोठ्यातील सफाइवाला फोनवर बोलतो.
- सर विराजस पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे, त्याचा प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात आलाय. आपल्याला लवकर काहीतरी करावं लागणार. त्याच मुंबईला जाणं घातक ठरेल. त्याची डील तिकडे होता काम नये.
----------------------------------------------
क्रमशः
- रेवपुर्वा
प्रामाणिक प्रतिक्रिया जरूर कळवा. नावासह शेअर करावे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा