एक आविष्कार सतरा भानगडी भाग - १

Mitali and Dr. Nishant files a complaint for missing nishants brother Niraj. 2 months back Nishant and mitali gets married. Both are childhood friends with good family relations. Mitali is carefree and Nishant is career obsessive person.

एक आविष्कार सतरा भानगडी - भाग

डिसेंबर २०२० ( मुंबई )

मिताली - इन्स्पेक्टर साहेब मी मिसेस मिताली आणि हे माझे मिस्टर डॉ. निशांत साळवे.
आम्हाला तक्रार नोंदवायची आहे, माझे दीर मी. नीरज २० दिवस आधी सासवड वरून मुंबई साठी निघाले पण नंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला वाटतंय त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय.
प्लीज मदत कराल का आमची. इन्स्पेक्टर मिताली कडून सगळी माहिती घेतात.
एक हवालदार लगेच एका अज्ञात व्यक्तीला फोन करून ही गोष्ट कळवतो. ती अज्ञात व्यक्ती तिच्या माणसांवर ओरडते.
"मूर्ख लोकांनो नक्की कोणाला किडनॅप केलंय, भलत्याच माणसाला उचललं तुम्ही.
---------------------------------------------------
ऑक्टोबर २०२० ( २ महिन्यापूर्वी, सासवड)

पूजेसाठी नवऱ्या मुलाला बोलवा...
कुठे आहे नवरा मुलगा, अरे कोणीतरी बोलवा त्याला
आत्ताच तर होता इथे...
गेला कुठे... निशांत... निशांत...
संपूर्ण लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला
नवरी मुलगी मितालीची आई स्मिताला रडू कोसळलं, आमची मितू पसंत नसेल का त्याला म्हणून निघून गेला असेल का हो..?
निशांतची आई नलिनी - त्याला काय कोणी जबरदस्ती केली होती का आणि तसं असत तर भर लग्नात नाही म्हणू शकेल इतका सडेतोड स्वभावाचा आहे तो, पळून कशाचा जातो.
स्मिता - मग आमच्याकडून काही कमी राहिली असेल का हो म्हणून रागावून गेला.
नलिनी - अहो आपण दोघांनी मिळून केलंय सगळं तुमचं काय चुकणार, कोणी काही कमी नाही केलं मी शोधून आणते त्याला तुम्ही बसा.
मितालीचे बाबा सुरेश - फोन पण लागत नाहीये त्याचा.
नलिनी - तुम्ही थांबा सगळे मी माझ्या फोनवरून शोधून आणते त्याला.
निशांतचे बाबा मोहन - अगं पण बाकी कोणाचा लागत नसेल तर तुझा कसा लागणार.
नलिनी - लागेल माझा बघा तुम्ही.
नलिनी तिचा फोन काढते सोबत एक दुसरं डिव्हाईस असतं आणि त्यात आवाज चालू होतो.
नलिनी - मी म्हटलं होत न पळून कसला जातो तो, इथेच जवळपास आहे त्याची लोकेशन, चला माझ्या मागे. स्मिता, सुरेश आणि मोहन त्यांच्या मागे निघतात.
लग्न मितालीच्याच वाड्यात होत, त्याची लोकेशन ट्रेस करत चालता चालता ५ मिनटात सगळे निशांतच्या घराजवळ पोचले समोरच मोकळ्या जागेत त्यांच्या गाईंच्या गोठ्याजवळ पोचले.
निशांत - यस्सssssss.. पासवर्ड डिकोड झालाय, सोप्या शब्दात जेम गारल्यांड म्हणजे याच कनेक्शन रत्नमाला मंत्र्यांशी जोडलेलं आहे, डिफेन्स मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

नलिनी आत जाते कान धरून निशांतला बाहेर आणते.
निशांत - आ sssss .. आई कान सोड
नलिनी - अरे लाज वाटते का तुला तिकडे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय आणि तू इथे बसलाय.
सुरेश - बेटा गाईंची पूजा करायची असते का तुमच्या इथे आधी सांगितलं असतं तर आपण सोय केली असती.
मोहन - अरे सुरेश यानी लग्नात आहे ती पूजा केली तरी धन्य होऊ आपण, गायींची कुठली करतोय तो. रिसर्च मध्ये आहे न तो त्याच होम ऑफिस आहे गोठ्यमागे.
बेटा ही काय वेळ आहे का कामाची, तुला सांगितलं होतं न आम्ही आजचा एकच दिवस फ्री ठेव, म्हणून सगळ्यांची हाऊस बाजूला ठेवून एकाच दिवसाचं लग्न ठेवलं तेही घरात.
निशांत - हो बाबा माहिती आहे मला पण एमरजन्सी सांगून येत नाही ना, हा मेसेज जर मी आत्ता डिकोड नसता केला तर तिथे सगळ्या टीमच ६ महिन्याच संशोधन चुकलं असतं. लग्न उशिरा होऊ शकतं पण त्यांचा एवढा वेळ परत नाही येऊ शकत.
नलिनी - हो अरे मान्य आहे आम्ही समजू शकतो, पण कोणाजवळ निरोप ठेऊन जायचं ना, आम्ही किती काळजीत होतो एवढा वेळ.
निशांत - अगं मी मितूला मेसेज केला होता की मला १ तास काम आहे तिने मेसेज रीड पण केला होता.
स्मिता - अरे देवा एक नंबरची बेजबाबदार मुलगी आहे ही, माफ करा नलिनी ताई आमच्या मूर्ख कार्टीमुळे झालं सगळं, बघतेच आता तिला.
सुरेश - वाहिनी तुम्ही शांत व्हा, त्यालाही काम दुसर कोणाला हॅण्ड ओव्हर करता आलं असतं, चला मंडपात जाऊ आधी आपण.
स्मिताचा पाराच चढला होता, त्यांना मितालीच्या बेशिस्त आणि बेजबाबदार पणाची चीड होती.
मिताली बिंदास्त, बेफिकीर आणि मनमौजी स्वभावाची होती, घरात सर्वात मोठी असूनही समजूतदारपणा वगैरे तिच्यात नव्हता कधी, तिच्या पाठी तिला जुळे बहीण भाऊ होते, त्यांना ती बोनस म्हणून चिडवत, दोघेही खूप समजूतदार आणि शांत, त्यामुळे मितालीची तिच्या आईला खूप काळजी वाटत पण तिच्या बाबांचं आणि तिचं खूप जमत तिच्या आईच्या मते मितालीनेच तिच्या बाबांना बिघडवलं होत.
त्या तडक तिच्या रूम बाहेर पोचल्या, दार आतून लावलेले होते, बराच वेळ वाजवून मितालीचा काही आवाज नाही आता मात्र त्यांना घाम फुटला, हे कोणत नवीन विघ्न.
तिचे बाबा आणि नलिनी तिथे आले.
स्मिता - आता हिनी काय डोक्यात राग घालून घेतला की काय, ही काय वेळ आहे का असं वागायची. 
नलिनीने बाजूच्या खिडकीच दार जोरात धक्का देऊन उघडलं, खिडकीच्या आवाजाने मिताली धाडकन बेडवरून पडली, डोळे चोळतचोळत दार उघडलं.
नलिनीला तर हसूच आलं.
स्मिता - अगं पोरी तुला काही लाज लज्जा आहे की नाही, स्वतःच्या लग्नात कोणी झोपत का, कधीपासून दार बाडवतोय आम्ही.
मिताली - मग काय करू मी, तुझ्या धाकाने केव्हाची तयार होऊन बसले, कोणीच बोलवायला आलं नाही, त्यात काल जागरण झालेलं मस्त सस्पेन्स मूव्ही बघितला.
स्मिता - तुझ्या आजींनी बिघडवलं तुला रहस्यमयी गोष्टी सांगून सांगून, एक तर तसले पुस्तक वाचते नाहीतर मूव्ही.
बाहेर काय चाललंय काही भान नाही, निशांतनी मेसेज केला होता तुला त्याला कामामुळे उशीर होईल, हे तू आम्हाला का नाही सांगितलं, सगळे शोधत होतो त्याला.
मिताली - ओह अगं मी मेसेज बघितला पण डोळे इतके जड पडले की वाचायच्या आधीच झोप लागली, आणि शोधायचं काय त्यात तो काय लहान आहे का आला असता काम झाल की.
स्मिता - ताई मी म्हटल होत आमची मुलगी तुमच्या घरच्यांसारखी सालस नाही हो. लाज आणली पोरीनी, माफ करा आम्हाला.
नलिनी - हे बघा तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका, मितालीला खूप नीट ओळखूनच लग्नाची मागणी घातली होती मी, माझी फेव्हरेट स्टुडंट आहे ती.
(नलिनी कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे व एकाच गावात असल्याने मितालीला लहानपणाासून बघुन असतात.)
मितालीच्या जागी दुसरी कोणी असती तर लग्नाच्या दिवशी काम केलं म्हणून घर डोक्यावर घेतलं असतं आणि आयुष्यभर ऐकवलं असतं ते वेगळ.
मोहन - अगदी बरोबर, आणि तसंही त्या दोघांना काही फरक पडत नाही तर आपण का टेंशन घेतोय चला लग्न उरकून घेऊ नाहीतर पाहुण्यांना शोधावं लागेल.
वातावरण हलकं होतं लग्न पुढे सुरळीत पणे पार पडतं पण स्मिताच्या मनात मितालीच्या स्वभावा मुळे पुढे कसं होईल याची काळजी वाढते.
-----------------------------
लग्न मंडपात कॅटरिंग वाले २ जन कुजबुजत असतात, 
- २ लोक अजुन वाढवून द्या हवं तर पण निशांतच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा, आजपासून त्याच्या घर ऑफिस यासोबत मितालीच्या घरावरही लक्ष ठेवा, मी सांगितल्या पैकी कुठलीही गोष्ट नजरेस आली की सरळ त्याला पकडायच आणि आपल्या जागी आणायचं.
पण लक्षात ठेवा जोपर्यंत तसं काही दिसत नाहीं तोवर त्याला हातही लावायचा नाही. मी १५ दिवसांनी परत येईल तोवर मला सगळे अपडेट देत रहा. वेशांतर जास्त करू नका एकाच वेशात राहा.
- हो सर
-----------------------------------------------------
दोघांची घरं जवळच असल्याने सगळे डी जे वर नाचत पायीच निघणार असतात.
स्मिता - तन्मय,तन्वी बस झाल नाचनं आता वरातीला निघू द्या.
तन्मय - अगं आई आमचं झालं कधीच, ही ताई नाचत बासलिये आता, आणि जिजूना पण नचवतेयं. 
बाजुला नवरी गॉगल आणि फेटा घालून मस्त नाचत असते.
मिताली - अगं आई माझ्या पाठवणीत रडतेस काय ये न मस्त नाचत जाऊ आमच्या घरी.
नलिनी - ताई मला कळतंय तुम्हाला काय वाटतं आहे, खरंच सांगते काळजी करू नका. ती अल्हड किंवा बेजबाबदार नाही फक्त तीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी ४ वर्ष शिकवायला होते तिला कॉलेजमध्ये,  आधी मलाही वाटायचं तिला अभ्यासात इंटरेस्ट नाही पण तसं नव्हतं तीची अभ्यास करण्याची, असाईंमेंट कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा ते पूर्ण करण्यापेक्षा त्यातून तिला काहीतरी शिकायचं नवीन शोधायचं असायचं.
स्मिता - पण संसार म्हणजे असाइंमेंट नाही न, इथे फेल झाली तर आयुष्य खराब होईल.
नलिनी - नाही होणार फक्त तुम्ही तिच्या चष्म्यातून बघा आपले नियम न लादता तिच्या ट्रिक्स नी तिचा संसार करू द्या त्यातही ती काहीतरी नवीन शोधेल. आणि काही लागलं तर आपण अहोच की. चला आता आमच्या घरी सगळे जेवून मग जा.
मोहन - वहिनी तुम्ही टेंशन घेऊ नका. आणि ही इतकं कसं समजून घेते मितुला माहितीये का कारण ही नलिनी स्वतः कॉलेज मध्ये अशीच होती तेही त्या काळात, हे समजूतदार पणा वगैरे म्हातारपणी दाखवते पण आत्ताही तशीच आहे, तुम्हीच बघा चांगलं निभल की नाही आमचं.
आम्हाला मुलगी असती तर कदाचित तीही अशीच असती.
स्मिता - खर सांगू मलाही तिच्या या वेगळेपणाचा कौतुक वाटत पण भीतीमुळे मी जाणवू देत नाही, आता तुम्ही आहात तर माझी काळजी मिटली.
निशांत - ए बाई चल ना घरी आता, आजच किती नचवशील, पुढे आयुष्यभर नचवणारच आहेस, सकाळपासून दग दग चालू आहे, तू काय मस्त झोप काढलीस दुपारी.
मिताली - अरे काय किती लवकर थकलास, आत्ताच तर मजा येत होती, बर चल घरी जात जात नाचू.
सगळ्यांना नाचवत मिताली आपली पाठवणी करून घेते.
दोघांचे ही वडील लहानपणाासून मित्र असल्याने त्यांच्यात आधीपासून येणे जाणे आणि मोकळेपणा होता.
जेवणं झाल्यावर मिताली कडचे समाधानाने त्यांच्या घरी गेले.
-------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घाई सुरू झाली सत्यनारायणाच्या पूजेची.
निशांत - आई मितालीला उठवाव लागेल, उशिरा उठते ना ती.
नलिनी - अरे कधीच तयार पण झालिये ती, आत किचन मध्ये आहे. 
निरज - अरे बापरे, मिताली ताई आय मीन वाहिनी किचन मध्ये, आई नको प्लीज तिला किचन मध्ये पाठवू, मी तन्मय तन्वी सोबत अभ्यास करताना तिने चहा केलेला २ वेळा, कितीतरी वेळ काही खाऊ पिऊ शकलो नाही मी.
नलिनी - अरे मी कुठे काय म्हटलं तीच सकाळी लवकर तयार झाली आणि किचन मध्ये गेली, तिच्या आईने सांगितलं बहुतेक, मला काही तीच मन मोडवलं नाही.
निरज - अरे देवा, आई मी जातो अभ्यासाला वाहिनी कडेच, सेफ राहील.
मोहन - ए sssss बस खाली, जे होईल ते सगळ्यांनी मिळून भोगायच.
निरज - मागच्या २ वेळ कुठे होता तुम्ही, मी एकट्यानेच भोगलं, तन्वी बिचारीने तर उल्टीच केली.
मिताली साडी नेसून समोरून ट्रे घेऊन येते.
निशांत - अरे वा, मॅडम शाळेत कधी परीक्षेला सकाळी उठल्या नाही तुम्ही, मी १५ मिनिट आधी तुला उठवून न्यायचो म्हणून पास झालीस. आज काय आहे काय, तेही साडी, चहा. 
मिताली - अरे मी कसली उठते , सकाळपासून आई फोन करत आहे, लवकर उठ, किचन मध्ये जा चहा तरी बनव, घरचे कपडे घालून फिरू नको, वैताग आणलाय नुसता.
मोहन - बेटा तू काय नवीन आहेस का आम्हाला, लाहापणापासून बघतोय आम्ही तुला, तू जशी आहे तशीच पसंत आहे आम्हाला, याची काही गरज नाही.
मिताली - हो बाबा, मला तरी कुठे झेपणार रोज हे सगळं, म्हटलं ती एवढं म्हणतेय तर एक दिवस करून बघावं तेवढंच चेंज.
निरज - थॅंक गॉड. वाहिनी आत्ता न चहा नकोय मला, तू बाकीच्यांना दे न.
मिताली - ओ रे रे बिचारा २ वेळचा प्रसाद आठवला वाटते. काळजी नको करू, आज पहिल्याच दिवशी मला शिक्षा नाही द्यायची कोणाला त्यामुळे मी कॉफी केली आहे, आय मीन गरम दूध आणलाय सोबत कॉफी आणि साखर ज्याला जेवढं हवं त्यानी घ्या. सॉरी म्हणजे रोज चहा असतो आजच्या दिवस चालेल ना.
मोहन - वाह सूनबाई मस्तच.
निरज - हो एकदम भारी, आय लव्ह यू ताई अरे...., वाहिनी, कधी प्रॅक्टिस होईल काय माहिती, भारी झालीये कॉफी, कडकं.
नलिनी - आता कळली का निशांत, माझी चॉईस भारी होती की नाही.
निशांत - हो आई म्हणजे काय, मी नाही म्हणालो का कधी.
मिताली - अच्छा म्हणून साहेबांनी २ महिने लावले होकार कळवायला.
निशांत - अगं ते लॉक डाऊन मुळे जरा डोकं लॉक झालेलं, म्हणून. यू आर द मोस्ट युनिक पर्सन आय हॅव एव्हर सीन.
मिताली - ओ हो थॅंक यू, माय डियर हसबंड.
चला आज जेवायला काय करायचं
मोहन - बापरे, आज नैवेद्याला मॅगी आहे वाटते.
मिताली - बाबा अहो मी सालस सुनेची अक्टिंग करणार आहे आज, खरोखर नाही होणार. लीला मावशीच स्वैंपाक करणार, मी फक्त मेनू त्यांना सांगणार.
मोहन - चला सत्यनारायण वाचले म्हणायचं.
हसत खेळत छान दिवस पार पडतो.
संध्याकाळी गप्पा रंगतात. बाहेर लेटर बॉक्स मध्ये काहीतरी येतं, पण कुणीतरी ते घेण्याचा प्रयत्न करत असते, मितालीच तेवढ्यात लक्ष जातं, ए कोण आहे रे हात नको लाऊ.
निशांत - काय झालं?
मिताली - अरे तुझा साठी लेटर आलेलं पण कुणीतरी बघत होत, भिकारी वाटला तो. हे घे.
निशांत - वाच न.
मिताली - ओके, अरे वा, तुझा सत्कार समारंभ करण्यासाठी विचारत आहेत, मुंबईला पुढच्या महिन्यात. कुणीतरी नागरे नगरसेवक आहे त्यांच्या हस्ते.
निशांत - हम् बघु, उगाच कशाला कुणी सत्कार करेल, काहीतरी कारण हवं ना.
मोहन - अरे तू तुझा नवीन प्रोजेक्ट फंडींग साठी पाठवलं म्हटला होता ना, त्यासाठी असेल.
निशांत - बघु, काहीतरी वेगळं आहे हे.
नलिनी - बघ तुला जस वाटतं तसं ठरव.
मिताली - एवढा मस्त सत्कार होणारं तर घे की करून, आणि मला दाखव ना नवीन प्रॉजेक्ट.
निशांत - हो उद्या दाखवतो.
-------------------------------------------------------------
बाहेर २ लोक बोलतात
- ए बघितलं का लेटर मध्ये काय होत?
- नाही ना, त्याच्या आधी लक्ष गेलं माझाकडे.
- बर तू भिकारी नाही याचा संशय नाही आला न.
- नाही तसं नाही वाटलं.
- मी पण काहिदिवस भाजीवालाच बनून राहतो. काहिकरून त्याच्या शोधाकडे लक्ष द्यावं लागेल, जर तो शोध आपल्याला मिळाला तर तो फायद्याचा नाहीतर निशांत आपल्या धोक्याचा आहे.
--------------------------------------------------------------

क्रमशः

- रेवपुर्वा

प्रामाणिक प्रतिक्रिया जरूर कळवा. नावासह शेअर करावे.

🎭 Series Post

View all