अश्रूंचे मोती ...
गालावरती ओघळता तुझे दोन अश्रू
सांग तूच तयास कसे सहज विसरू
का असे पाणावले चंचल नयन तुझे
अन बघुनि हेलावले ग हे मन माझे
अश्रू नच, असे परि मौल्यवान मोती
दावितसे मज तव हृदयातील प्रीती
अश्रूंत लागे मज तव अंतरीचा थांग
बांध कसा घालू यांस तूच अता सांग
अश्रूंत दिसे मज तव अंतरीची ओढ
नको सखे विसरू ग प्रीत ती गोड
काढून टाक सल आतल्या जीवाचा
बांधून घे अपुला बंध हा रेशमाचा
© स्वाती अमोल मुधोळकर
माझ्या आणखी कविताही नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा