अबोली...

Lalit, aboli, kavita, prem, flower, mohar, swapna, shwas, smruti, anand, dhund, vedi, khulaleli, fulaeli, lajleli, poem

अबोली...

तुला अवचित बघता

लाजलेली ही अबोली ...
प्रथमदर्शनी मोहरलेली ...
मोहर सावरतच खुललेली ...
खुलून आणखीच फुललेली ... 
ही अबोली ...

थोडीशी वेडावलेली ...
वेड्या स्वप्नात हरवलेली ...
स्वप्नातल्या तुझ्यात गुंतलेली
गुंतलेल्या श्वासात दरवळलेली...
ही अबोली...

दरवळलेल्या स्मृतीत वेचलेली
वेचलेल्या क्षणांत धुंदलेली
अबोल असून तुझ्याशी बोललेली
आनंदाने सर्वांगी बहरलेली
ही अबोली ... 

वेडी, खुललेली ...
धुंद फुललेली ... 
ही अबोली..

© Swati Mudholkar

ती चांदणभेट
https://www.irablogging.com/blog/ti-chandanbhet-..._4891

हा पतंग सांगे
https://www.irablogging.com/blog/------ha-patang-sange..._4910

या माझ्या कवितासुद्धा नक्की वाचा.