Login

अनिका 31

anikaa and reva talk about sameer ,anu receivs a call from shree ..

https://www.irablogging.com/blog/anika30_7164

भाग ३० साठी वर क्लिक करा .

(पूर्वसूत्र = दादामहाराज  अनु च्या घरी येतात ..सगळ्यांचं दर्शन होत .मोहन तिथे नसतो ..दादामहाराज गेल्यांनतर आईची आणि मोहनची वादावादी होते ..अनिकाची आणि इन्स्पेक्टरची भेट होते ..त्या भेटीनंतर त्या दोघांमध्ये मैत्री हि होते आई तिथून अनु एका बातमीसाठी निघते. आणि मग घरी येते आणी मग रात्री परत तिला  धमकीचा एक फोन येतो. ) 

आता बघूया पुढे .....

"हॅलो ,हॅलो ..."-अनु बोलत होती पण फोन कट झालेला होता ..."कोण असेल तो ? त्याला कस माहित मी पोलीस स्टेशन ला गेलेलं .....हे सगळं काय आहे ?मी विक्रांतला सांगायला हवं होत आज कस विसरले मी ...पण आता सांगावेच लागेल..कोण असेल हा ..युगराज ..त्या दिवशी तो हि तिथेच होता .....पण त्याने तर मला वाचवले होते ...नाही असं मला वाटतंय ,मी कुठे बघितलं त्याने मला वाचवलं कि नाही ते ....कदाचित त्याच्या माणसांकडूनही तो असं करूच शकतो ....नाही पण असं तो का करेल ..मागच्या वेळेस त्याने जीव वाचवला होता ..श्या ...किती गोंधळ आहे हा ? त्यात हे युगराज म्हणजे एक कोडंच आहे  ...पण हे कोड मला लवकर सोडवावा लागेल ....पण कस ?"-अनु स्वतःशीच विचार करत बसली होती .....नंतर तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही ...

सकाळी जेव्हा सूर्यदेव खिडकितुन डोकावू लागले तेव्हा अनुला जाग आली ..आज उशीर झाला होता,पण आज तिला एका बातमीसाठी ऑफिस बाहेर राहायच होत म्हणून ती आवरून खाली आली..

"काय आज तुम्ही फिरायला नाही गेलात .चेहरा बघ कसा दिसतोय ? "-आई 

"गुड मॉर्निंग आई ..रात्री उशिरा झोपले ..."-अनु लाडाने तिच्या गळ्यात हात टाकत बोलली 

"तेच तर विचारतेय ?का ?काय झाले ? इतकं काम कशासाठी ...? "-आई ...

तेवढ्यात मोहन हि येतो .आबा आलेले नसतात ..त्याच आणि आईच अजून बोलणं झालेलं नसत .त्याला अस्वस्थ वाटत होत ..आईच काम सुरु होत .....साहिल फोनवर बोलत बोलत नाश्ता करत होता ...श्रेया बाई अजून खाली आल्याचं नव्हत्या ...

"हो ,आज मी आल्यावर बोलू ....मीटिंग साठी वेळ घ्या त्यांची .."-साहिल फोन वर बोलत होता ......

"अरे काय हे तुम्हा मुलांचं काही कळत नाही ...सारखं काय काम ,खाण्याची ,झोपण्याची सूद नाही तुम्हाला ..साहिल.... काय म्हणतेय मी ..?"-आई साहिल ला उद्देशून 

"आग आई ,आज एक महत्वाची मीटिंग आहे ..हि जर झाली न तर आपल्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळेल ..प्रिंटिंगचं ....म्हणून जरा घाईत आहे ..आणि हो आबा ना सांग कि १२ वाजेपर्यंत ऑफिस ला पोहचा म्हणून कारण मग मला ह्या मीटिंग साठी जावं लागेल .."साहिल आणि साहिल निघतो ...

"आई सॉरी "-मोहन खूप वेळ फक्त विचारच करत होता आणि अचानक बोलला ..आईने फक्त त्याच्याकडे बघितले मोहन पुनः बोलता झाला,

"आई सॉरी ,त्या दिवशी मला तुला दुखवायचं नव्हतं ...पण मला हे मान्य नाही त्यामुळे पुन्हा मला फोर्स करू नकोस "-मोहन तिच्या डोळ्यात बघून बोलत होता त्याच्या डोळ्यात संमिश्र भाव होते ..त्याला त्याच्या ह्या आईला दुखवावं असं कधीच वाटत नव्हतं पण नकळतपणे त्याने तिला दुखावलं ...

"असू दे ,माझच चुकलं मला माहित असूनही मी तुझ्याकडून अपेक्षा केली .."-आई शेंग निवडताना बोलली ...

"आई तस नाहीये ग,सॉरी म्हणालो मी ..हा भविष्य ,ज्योतिष सगळं खार आहे तर मग आईच्या अपघाता बद्दल कस नाही कळलं त्यांना..त्यांच्याच कडून येत होते न त्यादिवशी ..."-मोहन बोलत होता त्याच्या डोळ्यात राग दिसत होता ..आई ला  कळत होत पण अनु मात्र  अवाक होऊन बघत होती ..

"बास ....काय चाललंय हे .....जुन्या गोष्टी परत परत उगाळू नका .."-आबा दारातून आत येत बोलले ..

मोहन असं काही बोलेल हे आईला वाटलंच नव्हतं ..आबा मात्र ऐकून स्तब्ध झाले होते ..मोहन तिथून निघून गेला ...अनु पण निघून गेली ऑफिस साठी .....अनु ला ह्यातलं पूर्ण काहीच माहित नव्हतं .....ह्यावेळेस तिने शांत राहणंच पसंत केलं ...

अनु एका crime स्पॉट ला पोहचली .तिने तीच काम उरकून घेतलं आणि ऑफिस ला गेली ...ऑफिस मध्ये केदार च्या केबिन मधून मोनिका आणि केदार हसत हसत बाहेर पडले ...अनु ने त्यांना जस्ट ग्रीट केलंआणि आपल्या चेअरवरजाऊन बसली ..अनुच काम सुरु होत ...तिला काही गोष्टींची माहिती मिळाली होती ..म्हणजे तिने ती काढली होती ..ईश्वरी हॉस्पिटलची ...युगराज पर्यंत पोहचायचं म्हणजे कुठूनतरी सुरवात करण महत्वाचं होत ...म्हणून तिने "ईश्वरी " हॉस्पिटल च ठरवलं ....ती अजून काही शोधत होती ..आपल्या कामात दंग झालेली अनु तिला हे भानच नव्हतं कि केदार तिला बघतोय ....केदार ला मात्र तीच असं काम करणं आवडत होत ..ती मनापासून काम करत होती ..नेहमीसुद्धा अगदी मन लावून आणि मनापासून काम करणारी अनिका ....त्यामुळे तिला जेव्हा यश मिळायचं तेव्हा त्यातून निख्खळ आनंद हि मिळायचा ...केदार त्याच्या केबिन मध्ये निघून गेला ......इकडे रेवा ने घसा खाकराला आणि अनु ची तंद्री भंग केली ..रेवा ने केदारला अनुकडे बघताना पाहिलं होत ती केदारच्या काही पाऊले मागेच होती पण केदार ला ते कळलं नव्हतं .....

"काय मग ?कसलं एवढं काम सुरु आहे ?"-रेवा 

"अग थोडी माहिती शोधततेय ....महत्वाचं आहे .."-अनु 

"कर कर ..मन लावून काम कर ......"-रेवा ..आणि मग रेवा काही प्रिंट आणण्यासाठी म्हणून जाते ....अनु कामात व्यस्त असते ..रेवाचा फोन वाजतो ...रेवा तिचा फोन टेबल वर विसरलेली असते ....तिचा फोन दोन तीन वेळेस वाजतो त्यामुळे अनुची लिंक तुटते ..तीच लक्ष फोन कडे जात ..आणि त्यावर एक मेसेज चा पॉप अप दिसतो तो नंबर समीर चा असतो ..ती विचार करते उचलू कि नको पण मग सोडून देते ..पुन्हा ५ मिन्टीनानी फोन वाजतो आणि ह्यावेळेस ती उचलते, 

"हॅलो ,रेवा मला एकदा भेटायचंय तुला ..हवं तर पुन्हा नाही भेटणार .."-समीर .रेवा ने फोन उचललं आहे हे समजून तो बोलतो पण फोन अनु ने उचललं असतो ..तेवढ्यात मागून रेवाही  येते ....

"हॅलो "-अनु 

"अनु ,कोणाचा फोन आहे .."- रेवा .तेवढ्यत तिकडून फोन कट होतो ....

"अग सॉरी खूप वेळ वाजत होता मला वाटलं urgent असेल म्हणून उचलला ....खूपदा वाजला .."-अनु तिला फोन देत म्हणाली 

"अग ठीक आहे ..कोणाचा होता फोन ?"-रेवा फाईल मध्ये प्रिंट्स लावत विचारू लागली ..

"समीरचा .."-अनु ...तस  रेवा ने पटकन वर अनु कडे बघितलं ..अनु ने   तिच्या चेहऱ्यवरचे भाव टिपले 

"हो का ? काय म्हणाला ?"-रेवा खुर्चीवर बसली आणि फोन बघू लागली ..तिने अनुकडे बघणं टाळलं ...

"का ग ?काय झालं ?"-अनु 

"कुठे काय ?काय म्हणाला तो "-रेवा 

"एकदा भेटायचं आहे म्हणाला ....शेवटचं .."-अनु अजूनही रेवावर लक्ष देऊन होती 

रेवा ने अचानक वर बघितलं आणि परत दुसरीकडे बघू लागली "ठीक आहे .मी करते त्याला फोन .."-रेवा तिथून निघून गेली बाहेर ..अनु बराचवेळ विचार करत होती तिला जाणवलं कि समीर आणि रेवा मध्ये काहीतरी आहे ....तिने रेवाशी बोलायच विचार केला ...अनुचा फोन वाजला श्री ने फोन केला होता 

"हॅलो श्री ,कसा आहेस ? आज अचानक ...."-अनु 

"का ग ?करू नाही शकत का ? "-श्री 

"अरे नाही तस नाही ...office time  मध्ये अचानक फोन आला न ..'-अनु 

"हम्म ,तुझ्या कामाची गोष्ट आहे ..म्हणून फोन केला होता "-श्री 

"कोणती ?"-अनु 

"पहिले काय देणार तेसांग ...."-श्री 

"ते तर तू काय सांगतोस त्यावर अवलंबून आहे .."-अनु हि चांगलीच खेचत होती ...आणि हसत हि होती ..वरतून केदारच लक्ष तिच्याकडे गेलं ...तो बघत होता ..

"अरे बोल रे मित्रा तुझ्यासाठी काहीपण .."-अनु 

"बघ बर .मी काहीही मागू शकतो ..."-श्री पण हसायला लागला 

"मला थोडीफार माहिती मिळाली आहे युगराज बद्दल ..."-श्री बोलत होता तेवढ्यात अनु किंचाळली आनंदाने ...

"काय सांगतोस ?खरंच .."-अनु 

"अग हो हो ...हे बघ हि माहिती थोडी फार आहे पण बहुतेक तुला मदतच होईल ...."-श्री 

"क्या बात ..मेरे दोस्त ..जियो ....तुम ...आज भेटतोस ?"-अनु 

"मला  वाटलंच होत तुला धीर धरवणार नाही ...म्हणूनच फोन केला ..तुझं  आज ऑफिस संपल्यावर भेटूया नेहमीच्या ठिकाणी...चालेल "-श्री

"एस ,नक्की चालेल ...भेटते मी २ तासात .. बाय "-अनु  अनु ने फोन ठेवला ..ती खुशीत होती ...केदार च्या चेहऱयावर नकळतपणे हसू  आले ...मोनिकाच्या लक्ष होत ,गेले ५ मिन पासून दोघांकडे ..खर म्हणजे अनुला ह्यातलं काहीच माहित नव्हतं अचानक मोनिका तिच्यावर  ओरडायला लागली ,

"मिस अनिका ..हे ऑफिस आहे ..घर नाही ...एवढ्या मोठ्याने ओरडायची काय गरज आहे ..इथे सगळे काम करायला येतात ..तुमच्या सारखं फोन वर time पास करायला नाही .."मोनिका .अनु ला काही कळलंच नाही अचानक ती असं काही बोलेल ह्याचा अंदाजच नव्हता ..

"सॉरी,काय बोलताय तुम्ही ? मी काम करत होते .."-अनु पुढे बोलणार तेच तिने परत तिचे वाक्य तोडले 

"चूक करूनही एवढे कस बोलू शकतेस तू ? "-मोनिका ..बोलत असते 

"मोनिका ,काय चाललंय हे ?"-केदार 

"प्लिज स्टे अवे ..मी हॅन्डल करते ...."-मोनिका 

"पण काय झालं ते तर सांग .."-केदार ..ऑफिस चा सगळं स्टाफ बघत होता ..रेवा पण तिकडून येऊन मध्येच थांबली काय चाललंय ते बघायला ...

"ह्या मॅडम फोनवर तासनतास बोलत असतात ..आणि मध्ये आरडाओरडा करून दुसऱ्यांनाही डिस्टर्ब करतात .."-मोनिका 

"मॅडम मी time पास करत नव्हते .."अनु बोलायचं प्रयत्न करत होती 

"shut up ...."-मोनिका ..खर म्हणजे वादाचं काही कारण नव्हतं पण केदार तिच्याकडे बघून हसतोय आणि तिच्याकडे ओढलं जातोय हे बघून मोनिका च जळफळाट होत होता ....

"ओके ओके पण हि पद्धत नाहीये मोनिका आपल्या कलीग शी बोलायची .."-केदार 

"ओह म्हणज आता तू पण मलाच शिकवं कोणाशी कस बोलायचं ते ?"-मोनिका च राग अजून वाढत होता ..ती चिडून तिथून निघून गेली ....अनु केदार कड बघत होती ...केदार नाकारर्थी मान हलवली आणि तो मोनिकाच्या केबिन कडे गेला .सगळं आप आपली कामाला लागले ..

अनु च डोकं तापलं होत... "काय समजते हि स्वतःला ...काहीही म्हणते ...."-अनु स्वतःशीच बडब करत होती ..रेवा येऊन तिच्या खांदयावर हात ठेवते ."शांत हो ..लक्ष नको देउ "-

अनु पाणी पिते ....आणि तिला समीर च फोन आठवतो ..."रेवा ,सगळं काही ठीक आहे न "-अनु 

"हो कश्याबद्दल बोलतेस तू ?"-रेवा ..अनु बाटली ठेवते  आणि मान हलवत हलवते..रेवा च हात पकडून ती तिला कॅन्टीन मध्ये घेऊन येते ....

"कशाबद्दल काय ? समीरबद्दल ?"-अनु 

"समीरच काय ?  "-रेवा 

"हे बघ रेवा मी तुमच्या दोघांची मैत्रीण आहे ...तो असं का म्हणाला कि शेवटचं भेट ..काहि झालंय का तुमच्या दोघात ....? भांडलात का ?"-aअनु 

"नाही काही नाही तो असाच बोलतो ...वेडा आहे तो ...जाऊ दे ....तू त्यालाच विचार न असं का म्हणाला ते ..?मला माहीत नाही"-रेवा

"हा बघ मी ओळखते त्याला ..चांगला आहे तो ....खूप  काळजी घेतो सगळ्यांची ...  असं अचानक बोलला ...मला काळजी वाटली म्हणून बोलले ..तुला वाईट वाटलं तर सॉरी ...."-अनु 

 "अनु सोड न तो विषय ..मला ह्यावर आ नाही बोलायचं ..तू त्याच्याशीच बोल .... मग कळेल त्याने काय केलाय ते ?"-रेवा 

अनु तिच्याक बघत विचार करते ..आणि विषय सोडते .मनाशी ठरवते कि स श ह्याबद्दल बोलायचे....त्या दोघीही परत येतात ...काम  आटोपतात आणि मग अनु निघते ..तीळ श्री ला भेटायला जायचं असत ...

क्रमशः

🎭 Series Post

View all