Jan 19, 2022
कथामालिका

अनिका 30

Read Later
अनिका 30

पूर्वसूत्र 

(अनिका आणि श्रेया बाहेर फिरायला जातात ..दिवस मस्त जातो ...श्रेया ला केदार हि दिसतो ..केदार आणि विक्रम ची भेट ठरलेली असते ,तिथे विक्रम केदार lलसांगतो की त्या दिवशी युगराज हा तिथे फॅक्टरीत असतो .....ठरल्यावेळेप्रमाणे अनिका आणि श्रेया घरी येतात ..दादामहाराज हि आबांसोबत घरी येतात  ,, आता पुढे )

https://www.irablogging.com/blog/anika-29_6895

भाग २९ साठी वर क्लिक करा 

 

दादमहाराज ध्यानात लिन होतात ....त्यांची व्यवस्था बंगल्याच्या मागे असणाऱ्या एका खोलीत केलेली असते ..ती खोली त्यांच्यासाठीच तयार केलेली असते ...त्या खोलीत फक्त एक चटई ..झोपण्यासाठी बसण्यासाठी एक उच्च आसन ,काही पोथी पुराण एवढच असत ....महाराज तिथेच आलेले असतात ....सगळ्यांचे दर्शन घेऊन होत ....पण  मोहन काही आलेला नसतो .....त्याला  हे सगळं जास्त पटत नाही .....आई ने  सांगितलं होत तरीपण तो अजून तरी आलेला नव्हता ....दादामहाराज ध्यान संपवून डोळे उघडून बसले सगळे त्यांच्या समोरच होते ....मृणाल काही फळं घेऊन आली आणि दूध हि .....

"दादामहाराज ,हि मृणाल ..आपल्या मोहन ची बायको .."-आई 

"अखंड सौभाग्यवती भव .....घराची लक्ष्मी आहेस तू ..घराला असच बांधून ठेव .....तुझ्या प्रेमाने आणि आपलूकीने .. तुझ्या नवऱ्याची साथ सोडू नकोस कोणताही प्रसंग असला तरी हि ..थोडा वेगळा आहे तो ..राग येतो पटकन त्याला ..पण तू पाणीसारखी  बनून त्याला सोबत कर ....देव तुझं कल्याण करो ..."-दादा महाराज .मृणाल पाय पडून निघून जाते ...साहिल हि दोन मिन येतो नमस्कार करतो आणि जातो ....

अनिका पाया पडते..

महाराज दोन मिन तिच्याकडे रोखून बघतात ...." तुझ्यात विलक्षण सामर्थ्य आहे ....खूप शक्ती आहे ,ऊर्जा आहे ...फक्त आपल्या रागावर नियंत्रण ठेव ....संयम हा आपला मित्र आहे त्याची साथ सोडू नकोस ....अनेक चढ उतार हे माणसाला उच्च शिखरावर नेऊन ठेवतात .....माणसं ओळखण्यात गफलत करू नकोस .....डोळे उघडे ठेव आणि जे दिसत त्यापलीकडेही काहीतरी असू शकत त्याचा शोध घे,जुन्या घटना नि विचलित न होता पुढे येणाऱ्या गोष्टीना सामोरे जाण्याचा प्रयत्न कर ...देव तुझं रक्षण करो ..तथास्तु !"-दादाहाराज...  

अनिका जाते ..सगळेच हळू हळू जातात ..आप आपली कामात ,खोलीत ..मोहन खोलीमध्य आलेला असतो 

आई आणि आबा जायला निघतात ,

"आबा ,अनु ला जप ...पोरगी हुशार आहे पण तापट आहे ...रक्त उसळत आहे ..काळजी घे ,घरावर जर वादळ उभं राहील तर सविता तुला खंबीरपणे परिस्थिती हाताळावी लागेल ,ग्रहमान थोडं खराब आहे पुढचे काही दिवस ...देव तुमचं सगळ्यांचं रक्षण करो ..." -दादामहाराज एवढं बोलून परत ध्यानात लिन होतात ..

आई आणि आबा चिंतातुर होतात ...पण मग तिथून निघतात ...

"अहो ,तुम्ही कधी आलात ? चला पटकन महाराजांचे दर्शन घेऊन या ..परत ते ध्यानात लिन होतील ..."-मृणाल 

"तू घेतलंस ,.."-मोहन 

"हो .छान बोलले ...."-मृणाल 

"तू आणि मी काही वेगळे आहे का ?तू घेतलस ना .मग झालं तर ...मी जाम थकलोय ...."-मोहन बेड वर आडवा होतो 

"असं काय करता ?चाल ना ..आई पण वाट बघत होत्या "-मृणाल 

"आई ला माहित आहे ...ती वाट नाही बघणार ...."-मोहन 

"काय हो ..एकदा आलात तर काय होईल ?ते काही पकडून ठेवणार आहेत का ?"-मृणाल 

"हे बघ मी म्हणालो न ...मला नाही आवडत ते .....एवढच सगळं कळत तर ......"-मोहनचा सूर एकदम बदलला आणि तो तेथून निघून आला ...

"अहो ,ऐका तर ...अहो मी काय म्हणते ?"-मृणाल 

अनिका सुद्धा विचार करत होती ..खोलीत बसून ..

"महाराजांच्या बोलण्याचा अर्थ काय असेल ?"-अनिका ...खूप वेळ ती विचार करत होती ,नंतर  तिने सगळे विचार झटकून कानात इअरफोन घालून मस्त पैकी गाणे ऐकणे सुरु केलं ...तिला अचानक एका नंबर वरून फोन आला ,

"हॅलो ,"-अनु 

"काय ग ,आगीशी खेळायला आवडत वाटत तुला? "--ती व्यक्ती 

"काय? कोण बोलताय ?"-अनु 

"ते  महत्वाचं नाही ...नसत्या भानगडीत पडू नकोस..तुझ्यासाठी चांगलं होणार नाही ....."-ती व्यक्ती 

'कोण बोलताय?"-हॅलो हॅलो"-अनु 

तो फोन कट होतो ....अनु परत एकदा फोन लावते पण तो नंबर लागत नाही ..हाअसा कसा फोन होता ..कोण असेल ? अनु बराच वेळ विचार करते पण मग सोडून देते आणि झोपते ...

दुसऱ्या दिवशी ऑफिस ची घाई गडबड .....नाश्त्याच्या टेबल वर सगळे जमलेले असतात ...आई लवकर उठलेली असते पण मोहनशी जरा कमीच बोलते ...दादामहाराज सकाळी लवकर उठून त्यांच्या पुढच्या मार्गाला निघून गेलेले असतात ..

"काय मग ?कालचा दिवस कसा होता ?"-मोहन श्रेया ला विचारतो ..अनु अजूनही थोड्याश्या विचारातच असते ...आबा पेपर वाचत सोफ्यावर बसलेले असतात ..साहिल ,श्रेया ,सगळे नाश्ता करतात ..मृणाल मधून सगळं घेऊन येते आणि बसते ...

" त्यांचा छानच गेला ,आपलं काय ?कुठे होतात आपण ?"-आई मोहन ला विचारते ..मोहन लाही कळते कि ती काय विचारत आहे ते ....तो टाळतो 

"काम होत जरा म्हणून उशीर झाला .."-मोहन 

"कालचा दिवस सुट्टीचा होता मोहन ,खोटं बोलता येत नसेल तर कशाला बोलतोस ? का नाही आला दर्शनाला खरं खरं सांग "-आई 

वातावरण थोडं गरम झालेलं असत .."मृणाल मला आज हि यायला उशीर होईल ....मी निघतो .."-मोहन .मोहन उठून जायला निघतो .बाकीचे गुपचूप बघत असतात ....

"थांब ,मी तुझ्याशी बोलतेय आणि तू असा उठून जातोस ..मला माहित आहे कि तुझा देवावर विश्वास नाही पण एकदा जोडीने आशीर्वाद घेतलं असत तर आम्हाला बर वाटलं असत ...."-आई ..

"अहो, जाऊ द्या ...त्याला नाही वाटत तर नाही ..."-आबा पेपर वाचत बोलले ....

'तुला माहित आहे आई मला हे सगळं पटत नाही ....भविष्य,ज्योतिष शास्त्र काही खर नसत,जे  शास्त्र कोणाचं मृत्यू थांबवूं शकत नाही ,जे शास्त्र खोटी भाकीत करत ते मला मान्य नाही .."-मोहन तिथून तडक निघून जातो ....

"मोहन ,अ रे मोहन ..."-आई आवाज देते पण तोपर्यंत हा निघून गेलेलं असतो "असं बोलू नये बाळा ......काळजी वाटत्ते तुमची म्हणून ......"-आई ..आणि आई मध्ये खोलीत निघून जाते ..सगळे जण बघत असतात .....आबा हि आई च्या मग त्याना समजवायला जातात .....सगळे जण आप -आपलं आटोपून कामाला निघून जातात ..मृणालला  कळत नाही काय करावं ....

अनु ऑफिस ला पोहचते ..कामामध्ये ती तो आलेला फोन विसरते ..केदार हि त्याच्या केबिन मध्ये असतो ...अनु ला एक फोन येतो .......आज पुनः केदार ह्या विचारात असतो कि अनु ला बाहेर घेऊन जावं आणि थोडसा बोलत करावं ....कारण विक्रम ने सांगितल्याप्रमाणे तिला धोका असतो त्यामुळं त्यादिवशी तिने अजून काही पाहिलं आहे का ?हे  विचारन गरजेचं असत ..

केदार खाली येत असतो पण अनु उठू बाहेर जायला निघत असते .

"मिस पाटील .घाईत आहे का ?"-केदार 

"हो ,पोलीस स्टेशन मधून फोन होता ...चौकशी आणि ओळख परेड साठी बोलावलं आहे ..."-अनु 

"ओह ,..ओक्के ..मी येऊ का सोबत ..?"-केदार 

"नाही नको ,मी जाऊ शकते .....तुम्हाला अजूनही बरीच काम असतात न ..."-अनु जेवढ्या तेवढं बोलत होती ....केदार थोडासा विचारात पडतो हि असं काय बोलत आह म्हणून ....रेवा हि सगळं बघत असते ...तिची नजर जरी लॅपटॉप मध्य असली तरी कान अनुकडे असतात ...

"आत्त्ता मी फ्री आहे म्हणून विचारत होतो ..."-केदार 

"नो थँक you सर ....i will manage .."-अनु ..त्याला बाय करून निघून गेली ... केदार विचार करात होता कि हि अशी काय बोलतेय ..तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत असताना त्याची आणि रेवाची नजरानजर होते ..दोघेही हलकी smile करतात आणि  केदार पुनः  केबिन कडे वळतो ....अनु पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या लोकांना ओळखते ,इन्स्पेक्टर विक्रम हि तिथेच असतात ते तिला बसायला सांगतात ...

"मिस पाटील .बसा"-विक्रम . विक्रम दोन चहाची ऑर्डर देतो आणि बोलू लागतो, 

"मिस पाटील,आज ज्यांना तुम्ही ओळखलंत ते सराईत गुंड आहे ,पण हे फक्त पहिल्या पायरीतलते लोक आहे ...ह्यांच्यामागे अजूनही मोठे लोक सामील आहेत ...."-विक्रम 

"हो मला कल्पना आहे त्याची...."-आणिका

"तुम्ही त्या दिवशी अजून काही वेगळं नोटिस केलं का? म्हणजे तुम्ही म्हणाला होता कि तुम्हाला आठवेल त सगळं सांगाल तुम्ह तुम्ही...म्हणून परत विचारतोय .....काही आठवलं का ?"-विक्रम

अनु विचार करते ..ह्यांना युगराज बद्दल सांगावं कि नाही ..ह्याच विचारात ती असते  ,,विक्रम तीच चेहऱ्यावरचे हाव भाव  टिपत असतो ..

"मिस पाटील .चहा घ्या ..थंड होतोय .."-विक्रम पुन्हा एकदा ...

"हो , मला जो फोन आला होता त्याचा काही कळलं की का?"-अनु 

"नाही ,अजून  तरी नाही ....पण माझं अंदाजाने तिथे अजून काही लोकं होती जी आम्ही तिथे पोहचायचे आत तिथून निघून गेली "-विक्रम 

"तुम्हाला असं का वाटत ?"- अनु 

"त्याच काय आहे न जेव्हा आम्ही तिथे पोहचलो तेव्हा दोन गुंड जमिनीवर लोळत होते,त्यांना कोणीतरी मारलं आहे हे जाणवत होत आणि पुढे गेलो तर बाकीचं सगळं आहे असं पकडण्यात आलं ..तुम्ही मला पुन्हा एकदा  सगळा घटनाक्रम सांगू शकाल का सगळं काही ...म्हणजे मला अजून थोडी मदत होईल .. आम्ही त्या गुंडाना विचारलं पण ते काही नीटस सांगू शकत नाही कोणी मारलं ते ."-विक्रम 

"त्यादिवशी मला एक फोन आलाआणि मी त्याजागी पोहचले ..जेव्हा तिथे गेले तेव्हा खास काही आढळल नाही..पण मग काही हालचाल दिसली आणि मा मी लपून छपून फोटो काढले आणि ऑफिसला पाठवले ..ऑफिसमध्ये हि फोन केला होता पण कोणी उचलला नाही   ..मी जेव्हा तेथू निघाले तेव्हा एका गुंडाने मला बघितले होते .मि घाबरले आणि पळाले एक दगडाला पाय लागून खाली पडणार तेच चक्कर आली आणि बेशुद्ध झाले "-अनु 

"हं ..जेव्हा तुम्हाला शुद्ध आली तेव्ह केदार तुमच्यासमोर होता ..आम्ही  पोहचलो होतो तोपर्यंत ...पण त्या गुंडांपासून तुमची सुटका ..तुमचं बाहेर येन ह्यात काहीतरी मिससिंग आहे ...anyway मी शोधेनच सत्य ......पण तुम्ही काळजी घ्या ....थँक you "-विक्रम 

अनु हलकी smile करते "थँक you "-अनु .

अनु आणि विक्रम पोलीस स्टेशन च्या बाहेर येतात बोलता बोलता ...

"मिस पाटील ...तुम्ही जेवढं समजता तेव्हढं वाईट नसतात पोलीस वाले .....आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत,तुमच्या सुरक्षेसाठीच असतो ..आम्हाला फक्त तुमच्या विश्वासाची गरज असते ....केदार माझा मित्र आहे ....तुम्ही हि कधी हि काहीही मदत लागली तर सांगा ,विश्वास ठेवून बघा ...."-विक्रम खूप चांगल्या पद्धतीने बोलत होता ....अगदी मित्रासारखा ..अनु ने हि हसून त्याची मैत्री स्वीकारली होती ....अनुला फोन आला आणि  ति तड्क निघाली .

अनु तिथून एका crime स्पॉट ला पोहचली .... एका  घरात एका वृद्ध जोडप्याची हत्या झाली होती आणि ती तिथून बातमी देणार होती अनु ने आधीच कॅमेरा टीम बोलावली होती त्यामुळे ती बातमी देऊ लागली .

"आज आपण शहराच्या अश्या भागात आहोत जे सुरक्षित समजलं जात होत पण आज ह्याच भागात ह्या फ्लॅट मध्ये एका वृद्ध जोडप्याची हत्या करण्यात आली आहे ..एका  वयस्कर  व्यक्तीने कोणाचं काय वाईट केलं असेल जे त्याला अश्या पद्धतीतीने मृत्यूला सामोरे जावे लागले ...प्रथमदर्शनी हि हत्या चोरीच्या उद्देशाने झालेली दिसून येत आहे पण प्रश्न हा आहे कि चोर इथे घुसलेच कसे ? पोलिसांनी security gaurd ला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे ...ह्यापुढे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे ..ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी सुरक्षा आणि ती हि वयस्कर वृद्ध लोकांची सुरक्षा हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे ...."-कॅमेरामन ओमी सह अनिका पाटील आय टीव्ही ...

अनु बातमी संपवून अजून काही माहिती मिळते का ते बघत असते .....अनुच्या घरी आई बाब त्यांच्या खोलीत होते ..सगळे घरी आले होते कामावरून ...मोहन थोडा उशिरा आला होता ..सगळं यावरून तो खोलीत विचार करत बसला होता 

"अहो ,कसला विचार करताय ?जेवायला पण वाढू का ?"-मृणाल 

"बाकीचे जेवले का ?"-मोहन 

"हो म्हणजे ,आई आबा जेवलेत ,साहिल श्रेया आणि तुम्ही राहिलात ,अनु अली नाही अजून .."-मृणाल 

"ठीक आहे ...येतो मी बाहेरच ...."-मोहन .मृणाल सांगलीची जेवणाची तयारी करत असते 

"हॅलो वाहिनी ,सोफ्यावर बॅग टाकून अनु रिलॅक्स होऊन बसते 

"हम्म ,काय ग खूप दमलीस का ?जेवणार आहेस का लगेच ..सगळे बसतोय आम्ही .."-मृणाल 

"हो ग ,खूपच दमले .. येते मी पण फ्रेश होऊन ..आटोपून घेऊ ..-अनु वर जाऊन फ्रेश होऊन येते .....सगळे जेवायला बसतात .साहिल आणि श्रेया च थोडासा बोलणं चालणं सुरु असा पण मोहन एकदम गप्प असतो ..मृणाल च लक्ष असत मोहन कडे ..अनु हि सगळं बघत असते आणि मधून मधुनफोन हि बघते ..सगळे यावरून झोपायला जातात 

"खूपच शांततेत जेवलोय आज ..नाही का ?"-अनु 

"हम्म ,दादा अजूनही रागातच आहे बहुतेक .."-श्रेया ..

"बघू होईल सकाळ पर्यंत सगळं ठीक ...."-अनु "मी जाते रूम मध्ये ...थोडासा काम आहे आज "-अनु 

सगळे आप आपली खोलीत जातात ..अनु थोडं फार वाचन कारण असते ....नेट वर माहिती शोधत असते ..रात्रीचे ११ वाजलेले असतात ..ती झोपायची तयारी करते आणि परत एक नवीन नंबर वरून फोन येतो 

"हॅलो ,"-अनु 

"आमच्या रस्त्यात येऊ नका ...बर्याबोलाने सांगितलेलं ऐका ...आज तुम्ही पोलीस चौकीत जायला नव्हतं पाहिजे ,बर नाही केलं..लवकरच परिणाम दिसतील .."-ती व्यक्ती

"हॅलो ,हॅलो ..."-अनु बोलत असते पण फोन कट होतो

 

क्रमशः  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....