अनिका 29

anika and shreya enjoys alot ...Anika believs that relations became stronger with love ....

https://www.irablogging.com/blog/anika28_6807

भाग २८ साठी वर क्लिक करा 

पूर्वसूत्र -अनिका श्री आणि सोनम ला कॅफे मध्ये भेटते ...त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात येतात ....अनु श्री ला सांगते कि तिला वाचवणारा युगराज होता ..आणि आता युगराज बद्दल अजून माहिती काढावी लागेल .....दुसरीकडे युगराज आणि राकेश दोघेही मुंबईबाहेर जाणार असतात ...युगराज ला कुठेतरी वाईट वाटत असते कि अनु ह्या ड्रग च्या केस मध्ये त्याच्यामुळे ओढल्या गेली ....राकेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो कि असं काही नाही ...अनुला घरी यायला उशीर होतो आणि म्हणून आई अजूनही काळजीत असते ..... अनु श्रेया च्या रूम मध्ये जाते आणि तिच्याशी बोलते ....आता पुढे .....

.............

"श्रेया काय झालाय ? बरेच दिवस झाले मी नोटीस करते आहे कि तू उदास असतेस ..पहिल्यासारखी जास्त बोलत नाहीस ..सारखी कुठेतरी हरवतेस ?"-अनु 

"चला म्हणजे आमच्यकडे हि लक्ष गेले तर .."-श्रेया अगदीच खिन्नपणे हसत म्हणाली 

"असं का बोलतेस ? "अनु 

"काही नाही असच ..लक्ष नको देऊ. जा तू झोप, तुला काम असतात ...आमचं काय काही नसत  "-श्रेया च्या डोळ्यात अश्रू आले 

"श्रेया ,तू रडतेस ?वेडी आहेस का ? सांग   मला काय झालाय ते ...सांग न ? इकडे बघ "-अनु तिची हनुवटी हातात घेऊन चेहरा वर करून हातात घेते ..

"काही नाही ग असच ..आजकाल कशातच मन नाही लागत ..एकटं एकटं वाटत ...बाकी काही नाही ,,"-श्रेया 

"पिल्लू ,तुला कोणी काही बोललंय का ?मित्र मैत्रिणी कोणी त्रास देताय का कॉलेजमध्ये ?"-अनु

"नाही ग .सांगितलं न असच .."-श्रेया

"तू संगीत नाहीस तर कस कळेल..आम्हाला ?"-अनु

"अनु खरंच असं काही नाहीये ....मागचे काही दिवस जो तो आप आपल्या कामात आहे ..तू सुद्धा खूप व्यस्त असतेस ...म्हणून मग "-श्रेया

""ओह...सॉरी .."-अनु दोन्ही हाताने कान पकडते स्वतःचे " खरंच, आपण बरेच दिवस झाले बाहेर कुठेच गेलो नाही ..सोबत वेळ घालवला नाही ....  आपण उद्याच भटकंती करू या मनसोक्त ..उद्या सुटटी आहे  तुला हि मलाही ....ओके ...शहाणं माझं बाळ ते कस खुद्कन हसतेय "-अनु आता श्रेया ला गुदगुदल्या करू लागली 

"ये नको न ...अनु प्लिज नको हा ..."-श्रेया तस हि खूप गुदगुदल्या होत असत .....अनु आणि श्रेया न ने बरच वेळ मस्ती केली आन मग दोघी हि झोपल्या ...

दुसऱ्या दिवशी सकाळी आरामातच उठले सगळे..रविवार   म्हणजे सगळ्यांनाच सुट्टीचा दिवस ..एकत्र वेळ घालवायचा या ठरलेले ....नाश्त्याच्या टेबल वर सगळे हळू हळू जमू लागले .....आबा येऊन बसलं होते ...मोहन आणि साहिलशी गप्पा मारत होते ..मा अनु आली आणि ५ मिनीटांनी श्रेया शुद्ध आळेपिळे दे खाली आली

"काय मग ?श्रेया बाई झाली का सकाळ ?"-आबा

"हम्म ,,गुड मॉर्निंग .."-श्रेया  अजूनही जांभया देत होती ...मृणाल ,आई आणि आशा बाई सोबात स्वयंपाकात होती ...नाश्ता  बनत होता .... आई बाहेर येऊन बसली 

"काय मग जरा लावकारच उठला नाही का तुम्ही दोघी ?"-आई उपहासात्मक बोलली 

"हो न ग आई ,मी अजून झोपले असते पण भूक लागली होती ..काहीतरी खाऊन मग झोपते परत "-श्रेया 

सगळे तिच्याकडे बघून हसायला लागले. आई न मात्र कपाळाला हात मारून घेतला ..आईच बोलणं श्रेय ल कळलंच नव्हता

"घ्या धन्य आहात तुम्ही....हाथ जोडले आता ..."-आई

"ये काय ग ,काय झालं ?मी खरच बोलतेय ..मला अजून झोप येतेय भूक लागली म्हणून उठले ...तसाही एक दिवसचं मिळतो सुट्टीचा "-श्रेया ...थोडा तोंड वाकड करत म्हणाली ..परत सगळे हसायला लागले

"हो ...नाहीतरी पूर्ण आठवडाभर खूपच काम असत नाही का तुला ?"-साहिल ..मृणाल नाश्ता घेऊन येते सगळ्यांसाठी ..

"ये काय आहे आज ..मस्त वास सुटलाय .."-श्रेया

"आग थांब ....आम्ही पण आहोत इथे वाट बघतोय "-मोहन

"ये दादा तुझं पोट भरण्यासाठी ह्याची काय गरज ?"-श्रेय सहज बोलून जाते नंतर जीभ चावते...मोहन तर बघतच बसतो 

"ये श्रेया चावटपणा पुरे आता .."-आई

"वाव ,वाहिनी आज इडली मस्तच बर का?"-साहिल

हो न ..खूपच छान ...गरम गरम एकदम ..चल तू पण बैस "-अनु

"अग नको मी नंतर घेते ...अजून आणते ..तुम्ही सुरु करा "-मृणाल

"मृणाल ते काही नाही ..सगळ्यांनी सोबतच नाश्ता करायचा असतो "-आबा

"बघ बाई आता सासरेबुवांची मर्जी मोडू नको .."-आई

"ये अनु आपण कधी निघायचं ?"-श्रेया

"तुझी झोप झाली कि लगेच .."-अनु इडली खात खात डोळा मारत म्हणाली ..

"ये ..काय ..कुठे स्वारी आज ?"-साहिल

"कुठं नाही रे सहजच भटकंती .."-अनु

"कोणी कुठेही जाणार नाहीय आज "-आई ..सगळे आ करू आई कड बघू लागले .

"ये आई का? .थोडावेळ जाणार आहे .."- श्रेया

"   नाही ..नाही म्हणजे नाही .."-आई 

"का पण ..?काय काम आहे ...."-श्रेया 

"काम सांगून कधी केलाय का तुम्ही ?.."-आई 

"तेच तर ..मग का थांबवतेस ?"-श्रेया 

"श्रेया नाही म्हणाले न मी एकदा ...विसरली का ?आज दादामहाराज येणार आहेत ?"-आई 

"ओह, "-सगळे एकदम ....

"आजच का ग ?"-श्रेया रडवेला चेहरा करून ...

'अग आपल्या हातात असत का ते ?किती महान तप आहे त्यांचं ,त्यांच्या मनात असेल तरच येतात ते ..."-आई

 "आबा प्लिज तुम्ह तरी सांगा न ....किती  दिवसांनी आमच प्लॅन ठरला आहे .."-श्रेया 

"नाही ह्यात मी काहीच करू शकत नाही .. तुमच्या आईच आदेश मी कधी मोडलं आहे का ? काय हो ?"-आबामस्करी करतच.... आई फक्त हसली ...श्रेया मात्र नाराज होऊन  पाय आपटत निघून गेली ...

"श्रेया ,श्रेया ऐक अग .."अनु ती आवाज देत होती 

"अनु तीच लाड कमी कर लहान नाहीये ती आता ....तू आवरून घे लवकर "-आई 

"तस नाही आई पण   खरंच मागच्या काही दिवसांपासून आपलं  तिच्याकडे लक्षच नाहीये ....आणि म्हणून आजच प्लॅन केलं होता 

"-अनु 

"का ?काही झालंय का ?"मोहन 

"अरे  दादा,विशेष असं काही नाही ,पण तिच्या वागण्यात आणि बोलण्या त थोडं फरक जाणवत आहे मला ..आई थोडावेळ बाहेर जाऊन येतो न  ...."-अनु 

"तू काही ऐकणार नाही ..घरात पाय नसतोच तुम्ह मुलींचा ..उद्या दुसऱ्याच्या घरी गेलात तर काय म्हणतील लोक ? जाऊ दे माझीच ती बडबड ..करा काय करायचा ते ..पण संध्याकाळी ४ पर्यंत या म्हणजे झालं ..५ वाजता  महाराज येणार आहेत .."-आई 

"थँक you आई .."-अनु ने एकदम आईच गळ्यात हात टाकले .....अनु  श्रेया कडे जायला निघाली ....जाताना मृणालला सांगू गेली 

"वाहिनी तू पण तयार रहा आपण आज तिघी पण मज्जा करू .."- अनु ..

"राजधानी exprees आहे अनु म्हणजे .."-साहिल .सगळे  नाश्ताकरून आप- आपलं ठरलेल्या गोष्टी करायला गेले  ....

अनु आणि श्रेय तयार होऊnन एक तासात बाहेर जायला निघाल्या 

"वाहिनी तू तयार नाही झालीस?"-श्रेया 

"अग नाही तुम्ही या जाऊन पटकन ..महाराज येणार आहेत न मग तयारी करावं लागेल ,आई एकट्या काय काय करतील "-मृणाल 

"हं ..बघ शिका जरा ...खरंच किती का करते मृणाल ...नाहीत तुम्ही दोघी ....लवकर या जाऊन "-आई 

श्रेया नेपरत वैतागत बाहेर चा रस्ता धरला....  अनु न हसून दुजोरा दिला ...

दादामहाराज म्हणजे खरतर आबांचे काका ..ज्यांनी लग्न न करता अध्यात्माचा मार्ग निवडला  होता..त्यांना ज्योतिष विद्या हि प्राप्त होती ...संसाराचा मोह सोडून तेकेव्हाचं मठात जाऊन राहू लागले ..केव्हातरी वर्ष किंवा दोन वर्षेतून एकदा  घरी येऊन जायचे ..पण तेव्हाही एखाद संत मह्त्य्म्यासारखे राहायचे ...अचानकच यायचे आणि जायचे हि ......आज ते येणार होते  ..साधारण दोन वर्षांनी ते ह्या शहरात आले होते ..शिव मंदिराच्या धर्मशाळेत उतरले होते...संध्याकाळी आबा कडे येण्याचा त्यांच मनसुबा होता .....म्हणून आई ने आज सगळ्यांना घरीच थांबवले होते ......

इकडे अनिका आणि श्रेया मॉल मध्ये मस्त मजेत गप्पा मारत होत्या ..शॉपिंग करत होत्या ..

"काय मग गेला का कंटाळा ?"-अनिका 

"हो ग ,छान वाटतंय आता .."-श्रेया 

"हम्म म्हणजे शॉपिंग केली नव्हती इतक्या दिवस म्हणून उदास वाटत होततर .."-अनु ..आणि दोघीही हसू लागतात ....श्रेया ची नजर एका कॅफे कडे जाते .

"ये ते बघ अनु.... ते तुमचे केदार सर आहे न ,"-श्रेया ..अनु च लक्ष मग त्या कॅफे कडे जात तर तिथे केदार मोनिका सोबत बसलेला दिसत होता 

"ती कोण आहे त्यांच्यासोबत ..?"-श्रेया 

"मोनिका ,आमच्या technical मॅनेजर ..आणि चॅनेल ची पार्टनर .."-अनु .."जाऊ दे त्यांना ....आपण निघूया का .आई ने ४ पर्यंत संगितले होते घरी यायला .."अनु 

"हम्म चल बाई नाहीतर परत रागवायची ती ..ये पण जाताना पाणीपुरी खाऊया प्लिज .."-श्रेया अगदी लहान मुलीसारखी हात करत होती ......

इकडे केदार आणि मोनिका कॅफेत बोलत होते ..मोनिका आणि केदार तिथे योगायोगाने भेटले होते ..आणि मग कॉफी पिण्यासाठी त्या कॅफे मध्ये बसले होते ....

"तू इथे कसा ? माहित असत तर सोबत आलो असतो शॉपिंग ला .."-मोनिका 

"सहजच काही खास नाही ...वेळ जात नव्हता म्हणून मग आलो होतो ....एका मित्राला पण भेटायचं होत .."-केदार ने उत्तर दिले ...त्याच्या थोडयाफार गप्पा झाल्या  ...खर म्हणजे मोनिका ने अनु ला पाहिलं होत .....केदार  ला फोन आला आणि मग ते निघाले 

"घरी निघालास का ?"-मोनिका 

"नाही ..एक काम आहे ...चलो बाय उद्या भेटू ...."-केदार निघून गेला ..

केदार आणि विक्रम आज भेटणार होते ....विक्रमने च त्याला मॉल मध्ये यायला सांगितले होते ....मोनिका मध्येच आडवी गेली होती .

"हाय विक्रम कसा आहेस ?"-केदार 

"मी छान .तू बोल काय म्हणतोस ?"-विक्रम 

"काही नाहीरे ,तू जे काल फोन वर सांगत होतास ते अर्धच राहील ..."-केदार ..दोघे हि बोलत बोलत मूवी थिएटर च्या बाहेर असतात ..

"केदार तुमच्या त्या रिपोर्टर आनीक ला मानलं पाहिजे ....खूपच डॅशिंग आहेत .."-विक्रम 

"हं का काय झालं असं कि आज तू तिचे गोडवे गात आहेस .."-केदार 

"ड्रग च प्रकरण रे ....काल मी बोललो न ....किती मोठा साठा आहे तो .....आणि जीवावर संकट उभे असताना सुद्धा  त्यांनी हा काम केले .....ह्या प्रकरणात खूप लोकांचे चेहरे समोर येऊ शकतात ....अजून एक म्हणजे मला असं कळलंय कि तिथं त्या दिवशी युगराज धर्माधिकारी पण होता "-विक्रम 

"काय ?तो कसा काय? म्हणजे त्याचे हि हाथ ह्यामध्ये आहेत तर .."-केदार 

"नाही अजून नक्की असं काही सांगता येत नाही ..पण मला तुला हे सांगायचं आहे कि अनिका च्या जीवाला जपलं पाहिजे .."-विक्रम 

"हम्म...ते  तर आहेच .."-केदार ..केदार  आणि विक्रम बराच वेळ बोलत होते ....

दुसरीकडे अनु आणि श्रेया घरी पोहचल्या होत्या ....ते  हि सांगितलेल्या वेळेत .....

"आलात तुम्ही जा ..तयार  व्हा .. आबा कधी हि येतील दादामहाराजांना घेऊन ...."-आई 

अनु आणि श्रेया तयार व्हायला जातात .....थोड्याच वेळात आबा येतात आणि सोबत दादामहाराज हि ....सविता बाई महाराज च्या पायाला पाण्याचं अभिषेक करतात ..त्यानं ओवाळतात आणि 

"या न ..आत या ....."-आई 

"कशी आहात सुनबाई ..?"-महाराज 

"तुमचे आशीर्वाद ... बसा न ...."आई आणि अब त्या एक उच्च पाटावर बसवतात ....तिथेच महाराज सगळं पाहणी करतात ..सगळे जण एक एक  करून येतात,अनु हि येते पण तोपर्यँत महाराज ध्यानात लिन झालेले असतात  ..

क्रमशः

🎭 Series Post

View all