अनिका 28

Anikas mother get worried again ..anu meets her friends shreedhar and sonam .

https://www.irablogging.com/blog/anika27_6677

भाग २७ साठी वर क्लिक करा 

भाग २८ 

अनु ला असं जाताना बघून केदार ला वाईट वाटलं आणि रागही आला ...अनु ला घ्यायला समीर आला होता तीच आणि त्याच बोलणं झालं होत आणि म्हणून समीर अनुला घेऊन निघून गेला ..अनु ला श्रीधर ला भेटायला जायचं होत ..समीर ने तिला तिने सांगितलेल्या कॅफे ला सोडलं आणि तो निघून गेला ..दुसरीकडे युगराज दिवसभर मिटींग्स मध्ये व्यस्त होता ....

"राका आत  ये.."-युगराज

"मला बोलावलात ..काय झालं ?"-राकेश

"हे  बघ दोन दिवस आपल्याला मुंबईच्या बाहेर जायचं आहे ... त्यामुळे इथली व्यवस्था नीट सांभाळली जाईल ते बघणं आवश्यक आहे ...घरी पण सगळं नेहमीप्रमाणे व्हायला पाहिजे ...."-युगराज बोलत होता 

"युग,आपण पहिल्यांदा बाहेर गावी जातोय का ? "-राका 

युगराज ला त्याच्या बोलण्याचा ओघ कळला आणि युगराज हसला .

"डेव्हिड च काय झालं राका....?"-युगराज राकेश कडे बघत विचारतो 

"तू अजूनही त्याच प्रश्नावर का आहेस? जाऊ दे न काहीही वाईट झालं नाही सोडून दे विषय ?"-राका 

"तुला काहीच वाटत नाही ह्याबद्दल ? तू ह्यावेळेस इतका डेव्हिड च्या बाजूने का बोलतोयस ?तू अजूनही डेव्हिड कडून कारण काढून घेऊ शकला नाही म्हणजे ..."-युगराज 

"तस नाहीये ..... तूला खर सांगितलं तर पटेल कि नाही ह्याचा विचार करत होतो . .....मी त्याच वेळेस डेव्हिड शी बोललो त्यात खास असं काही नाही म्हणून   तुला सांगतोय सोडून दे "-राका 

"म्हणजे ...उगीचच त्याने फोन करून एक निष्पाप मुलीला अटकवलं का ?"-युग 

"हे बघ युग .त्या दिवशी प्रेस कॉन्फेरंस मध्ये त्या रिपोर्टर अनिका ने तुझ्या वर आरोप केले .तुला अडकवायचं कस हे ती बघत होती आणि म्हणून डेव्हिड ने तिला एक बातमी पोचती केली जेणेकरून तीच लक्ष तुझ्यावरून दुसरीकडे जाईल ...बस एवढाच "-राकेश 

"एवढंच ..असं कस म्हणू शकतो तू राका "-युगराज 

"अरे, मग काय म्हणू ...तिने आपल्या बॉस वर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला ....जुन्या पुराण्या गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न केला .ज्याचा आपल्या विश्वासू आणि इमानदार अश्या डेव्हिड ला राग आला आणि तीच लक्ष अजून तुझ्याकडे जाऊ नये ,नवे वाद विवाद होऊ नये म्हणून त्याने तिला दुसऱ्या केस मध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला ..मला त्यात खरच काही गैर वाटत नाही ..मला एक कळत नाही तू इतका का विचार करतोय ह्या गोष्टीचा ..?.आज पर्यंत तू कधीही इतका विचार केला नाहीस ..सोड ना हा विषय ..ती मुलगी बरी होऊन तिच्या कामाला सुद्धा लागली आणि एक तुम्ही आहात ज्याची गाडी अजूनही त्याच रुळावरून धावते आहे ."-राका 

"तुला नाही कळणार ....एखाद्या निष्पाप व्यक्तीची जेव्हा चूक नसते आणि तरीही जेव्हा त्याला भोगावं लागत तेव्हा त्याच्या मनाची स्थिती कशी असते ,ते तुला नाही कळणार ....मला एक गोष्ट माहिती आहे कि आपल्या मुळे त्या रिपोर्टर च आयुष्य धोक्यात आलं आहे ...दिसतंय तेवढ सोप्पं नाहीये हे प्रकरण..आणि ती ह्या जाळ्यात ओढल्या गेली आपल्या माणसामुळे ..उद्या तिला जर काही झालं तर त्याला आपण जवाबदार असू .."-युगराज दोन्ही हात खिश्यात घालून खिडकीतुन बाहेर बघत बोलत होता  

"हे बघ युग मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते ..पण काळजी करू नको तिला काहीही होणार नाही ....ते लोक तिला काहीच करू शकणार नाही .....ते जाऊ दे .चल निघूया उशीर होतोय ....."-राकेश युगराज  ला घेऊन ऑफिस मधून निघाला.. ....

इकडे अनिका श्री ची वाट बघत होती  ...श्री सोना सोबत आला होता ....

"हेय हाय अनु ,कशी आहेस ?"-सोना 

"मस्त,तू कशी आहेस ? खूप दिवसांनी भेटतोय नाही का ?"-सोना 

"हो ग ,बघ ना बर झालं तू आलीस .."-अनु 

"अग मग काय .मी ऐकला ह्याचा फोन तेव्हा कळलं कि आज तू आणि श्री भेटणार आहेत ..हा बाबा टांग देणार होता पण मी कसली ऐकतेय ..आलेच बघ त्याच्या सोबत .."-सोन हसून हसून सांगत होती ..अनु च्या आणि तिच्या गप्पा चालू होत्या खूप दिवसांनी भेटल्या होत्या दोघी ..श्री आल्यापासून तसाच दोघींकडे बघात बसला होता ...यांचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं शेवटी सहज फिरकी घ्यावी म्हणून तो बोलला 

"बर तुमचा हे असाच चालू राहणार असेल तर निघतो मी आता .."-श्री .तस दोघी दोन मिन थांबल्या ..तिघेही गप्प झाले दोन मींसाठी आणि अनु आणि सोना परत खी खी करू लागल्या ..श्री न तर कपाळावरचं हात मारून घेतला 

"काही उपयोग नाही तुमच्याशी बोलून .....मी निघतोच आता तेच बर राहील "-श्री 

"ये श्री बस ना रे ,किती दिवसांनी आपण तिघे एकत्र आहोत आज ....खूप बर वाटतंय मला ....."-अनु ..श्री नुसतीच मान हलवतो आणि परत बसतो ...अनु,आणि श्री दोघे हि कॉलेज पासून चे मित्र मैत्रिणी असतात त्यामुळं त्यांच ट्युनिंग मस्त असत ..कॉलेज संपवून ते एकाच पेपरसाठी काम करत असतात पण मग नंतर अनु दुसरीकडे जॉईन होते पण त्यामुळे दोघांच्या मैत्रीत कधीच फरक पडत नाही ..खूप जिवाभावाचे मित्र असतात तसे ..अनु च्या बाबतीत श्रीला आणि श्रीच्या बाबतीत अनुला बरंच माहित असत ..सोनम म्हणज सोना हि त्या पेपरच्या ऑफीसा मध्ये असते. तेव्हपासून अनु ,श्रीधर आणि सोनम मस्त गट्टी जमते त्यांची ..अजूनही सोना आणि श्री एकाच ठिकाणी काम करतात ...आताही बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा होत असतात ..नंतर निघायची वेळ  होते

"आरे बाप रे ,७ वाजून पण गेले ..आई नक्की ओरडणार आज परत "-अनु .

"अग का ग ..काय झालाय ?आधी तर तू ९ वाजेपर्यंत पण बाहेर असायची .."-सोना 

"हे  आपल्या बाईंचे प्रताप कमी नाही न ..म्हणून असेल ..बरोबर न "-श्री 

"श्री अरे तुम्ही सगळं मला असे बोलता जसे कि  मुद्दाम केला मी सगळं ...."-अनु 

"तस नाही ग ..पण चूकी तुझी पण होतीच न ..काही झालं असत म्हणजे ..तुझ्या टीम न वेळीच हालचाल केलं म्हणून ..नाहीतर "-श्रीधर 

"अरे मी एकटी जाणारच नव्हते पण वेळेवर कोणीही नव्हतं आणि तुझं हि फोन लागत नव्हता .."-अनु 

"अनु पण तुला शंका नाही आली ,म्हणज एक निनावी फोन, काहीतरी घोटाळा असू शकतो असं "-श्री 

"अरे मी आपल्या खबऱ्याकडून माहिती मागवली होती ..त्याबद्दल त्याला जास्त काही माहित नव्हतं पण तो म्हणाल कि तिथं काहीतरी चालू असत अधून मधून .."-अनु 

"कोणी केलं होत फोन काही पत्ता लागलं का ?"-श्री 

"नाही अजून तरी नाही ..पण आजपहिल्यांदाच आशुतोष सरांचा एवढा कडक सूर बघितला मी ह्या प्रकरणारून "-अनु 

"म्हणजे ,.?"-सोना 

"म्हणजे अग त्यानं म्हणायचं होत कि मी हे एकटीने करायला नको होत .काही झालं असत तर त्यांच्या चॅनेल वर आलं असत ...आणि त्यांचं म्हणान आहे कि केदार ने वेळेवर पावलं उचलली म्हणून सगळ  निट झालं "-अनु 

"हम्म बरोबर आहे ते ..."-श्री 

"हो रे म्हणजे हे बघ केदार न जे केलं ते चांगलाच केलं पण मला त्यानं नाही वाचवलं ...दुसऱ्यानेच मदत केली "-अनु 

"काय ?कोण होत तो "-सोना 

"युगराज धर्माधिकारी .."-अनु 

"काय ?पुन्हा  एकदा ..असं कस शक्य आहे "-श्री 

"तेच तर ..मला  आज तुझ्याशी त्याबद्दलच बोलायचं होत श्री ...मी जेव्ह चक्कर येऊन पडणार होते तेव्हा मला युगराज न सावरलं ..."-अनु 

"पण तो तिथे कसा ?"-श्री 

"तेच तर कोड सुटत नाहीये न .....तो तिथे बरोबर वेळेत कसा आला? का आला ?त्याचा ह्या घटनेशी काय संबंध आहे ? ईश्वरी हॉस्पिटलची आग आणि हे ड्रग रॅकेट काय संबंध आहे का ?"-अनु बोलात होती आणि दोघेहि ऐकत होते  

"पण असं कस असेल ?तू काहि पुरावे मिळाले आहेत का ? दोन्ही गोष्टी मला वेगवेगळ्या वाटत आहे .."- श्री 

"श्री तू म्हणतो तस असू शकत पण ईश्वरी हॉस्पिटल मध्ये मी त्याला पाहिलं, ठीक आहे ते हॉस्पिटल त्याच आहे म्हणून तो तिथे असेल ,पण इथे कसा ..दोन्ही कड एकच गोष्ट कॉमन आह आहे "युगराज ".......इथे हि त्याच संबंध असल्याशिवाय तो तिथं असणार नाही...एक तर तो तिथं आधिपासुन असला पाहिजे किंवा ह्या रॅकेट मध्य त्याचे हाथ गुंतलेले असले पाहिजे ...."-अनु

"हम्म ..विचार करून बघाव लागेल "-श्री काहीतरी विचार करत बोलत होता ..

".  श्री मला तुझी मदत हवी आहे ...ह्य  युगराज बद्दल आपल्याला माहीती काढावी लागेल आणि विशेषतः ह्या रॅकेट संदर्भात ....."-अनु 

"ठीक आहे ..करू  आपण .मी बघतो कस काय कळत  ते?"-श्री  

अनु ,श्री आणि सोना ह्यांच्या गप्पा संपत नव्हत्या पण आता खरंच उशीर होत होता .आई चा एकदा फोनयेऊन गेला  ...साधारण ८ वाजता ते सगळे निघाले...श्री ,सोनाला घरी सोडून मग घरी जाणार होता ..अनु हि निघाली होती घराकडे....

घरी आईच वाट पाहणं सुरु होत ..   

"अजून आली नाही हि पोरगी ..."-आई 

"अग आई येईल ती फोन झाला न तुझा कशाला काळजी करतेस .."-साहिल फोन मध्ये बघत बोलत होता 

आबा खोली बसले होते पुस्तक वाचत.मोहन अन मृणाल बाहेर गेले होते ..श्रेया रूम मध्ये होती ...आई आणि साहिल फक्त हॉल मध्ये होते

"आई काय ग कसली चिंता करते .."मोहन आणि मृणाल आले बाहेरून ...

"अनु ची ..अजून आली नाही ....तिला न आता गाडी घेऊन द्यायला पाहिजे ..."आई

"अग येईल ती ..."-मोहन ..आबा हि बाहेर येऊन बसतात ...

"काय पोरांनो आलात का ? जेवून घ्या "-आबा मोहन ला म्हणले

"नाही आबा आमचं बाहेर खाणं झालंय ..मी सांगितलं होत तस आई ला ..."-मोहन

"बर बर ठीक आहे आराम करा जा .."-आबा.

"घ्या ह्या मॅडम पण आल्यात"- साहिल  दारातुन बाहेर पडत असताना अनु आली होती   .

"काय ग बाई? आईला फोन करत जा ...नुसती काळजी करत असते आणि दुसर्यांनाही स्वस्थ बसू देत ना नाही"-साहिल अमुक कानात हळूच बोलत होता 

"काय रे काय खुसुरफुसुर करतोय ,अग किती उशीर? जेवून घे चल .."-आई

"अहो तिला येऊ तर द्या  ..."-आबा 

"आई तुम्ही  सगळे जेवलात का?"-अनु 

"हो ,जेवलो श्रेया बाकी आहे भूक नाही म्हणात होती ..बघ विचारून "-आई 

"आई ,मी घेते हाताने तुम्ही आराम करा सगळे ...आले न मी  आता ....."-अनु .

अनु फ्रेश होऊन श्रेया च्या रूम मध्ये जाते जेवणाची प्लेट घेऊन 

"श्रेया दार उघड ..."-अनु

श्रेया दार उघडते या आत येते

"चल माझ्यासोबत जेव ..भूक लागलीये मला खूप....."-अनु श्रेया नुसतीच हसते .....अनु मला भूक नाहीये तू जेव "-श्रेया

"का? काही खाल्लास का बाहेर एकटीने मला सोडून .....  "-अनु 

"नाही ग ..असाच मी आज बाहेर गेलेच नाहीये "-श्रेया 

"का नाही गेलीस? काय झालाय ...काही प्रॉब्लेम आहे का ?"-अनु 

क्रमशः 

अनिका च्या वाचकांनो , सप्रेम नमस्कार .सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार कि तुम्हीअनिकाला आतपर्यंत साथ दिली ...मला माहित आहे कितुम्ही आतुरतेने पुढच्या भागाची प्रतीक्षा करता ,पण माझ्याकडून दररोज भाग प्रकाशित होत नाही त्यासाठी मी मनापासून क्षमस्व आहे. मी जेव्हा अनिका हि कथा लिहण्यास सुरवात केली तेव्हा मी ठरवलं होत कि ह्या कथेचे  दर एक दिवास आड भाग प्रकाशित करेन पण सध्याच्या ह्या कठीण काळामुळे मला ते प्रकाशित करण जमलं नाही ...आमच्या घरी माझ्या दिराच्या मृत्यूमुळे मागचा एक महिना खूप कठीण गेला .....असो ...मला माहित आहे कि तुम्ही तुमचे रुसवे,फुगवे,आणि प्रेम सगळं काही तुमच्या प्रतिक्रियेमधून देत असतात ..मलाही तुमच्या प्रतिक्रियेची खूप उत्सुकता असते ...एका लेखकाला जेव्ह त्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया येतात तेव्हा त्याला त्याच्या लिहण्याच समाधान मिळत, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रया नेहमी कळवत जा ...  आम्ही या लेखनातून तुमचे मनोराहण करण्याचा प्रयत्न करत असतो .एक लेखक हा त्याच्या लेखावरच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघत असतो तीच त्याच्या कामाची पावती असते .तुम्ही आज पर्यंत माझी साथ सोडली नाही खूप प्रेम दिले .मी आशा करते कि अशीच साथ तुम्ही पुढे हि मला द्याल ....मी ह्या कथेचे भाग लवकर लवकर प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन पण थोडा अजून वेळ लागेल त्यासाठी ..पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार ...अनिका च्या कथेमध्ये आता अजून रंग भरले जाणार आहते तेव्हा तिच्यावर असच प्रेम करा आणि भरपूर प्रतिसाद द्या.स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या ..मनसोक्त जगा ,हसा आणि खुश राहा ...धन्यवाद !

© अनुराधा पुष्कर 

................................................................................................................................................................................