Login

अनिका 27

Anikaa and her work brings so much sruggle and problems ..she faces so many hard situations but she tackels with her own ...

https://www.irablogging.com/blog/anika26_6564?fbclid=IwAR0A44wq63f32b0D8KHLpKpnLU1G3CohurGmq__f46mW2g08H_PJNh3hqkw

भाग २६ साथ वर क्लिक करा

(अनिका कथे मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की अनिका एका वर्तमान पत्रात का काम करत असते आणि नंतर एका टीव्ही न्यूज चॅनेल साठी काम करायला सुरवात करते  तिथे सगळे नाव असतात नवे मित्र मैत्रीण ,आणि नवा बॉस ..केदार (मॅनेजर )

अनिका आपलं काम खूप चोख करते आणि मनापासून करत असते ...ती आणि केदार चॅनेल ला एका उंचीवर नेऊन ठेवतात ..बाकीच सहकारी सुद्द एकमेकांना खूप मदत करतात पण मोनिका बोस आनीक वर जळत असते ,तिला अनु व केदार ची जवळीक सहन होत नसते ..अनुच्या घरी तिच्या मोहन दादाच लग्न मृणालशी होत ..मृणाल आपल्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलस करूनघेते..... त्यांच्या लग्नाला आता ५, ६ महिना होत आलेले असतात अनु न जॉईन करून वर्ष होत आलेले आहे ....आतच तिने एका ड्रग रॅकेटचा पर्दा फाश केला होता ..त्यात तिला थोडं लागलं आणि चक्करही आली  होती,

 ह्या सगळ्यात  एका व्यक्तीची ओळख राहील तो म्हणजे युगराज धर्माधिकारी ज्याने  अनिका ला दोन वेळेस  वाचवले....ह्या वेळेस अनिका त्याच्याच बाहुपाशात चक्कर येऊन पडली होती ...

आता पाहूया पुढे ..हि कथा काल्पनिक आहे ..वास्तवामध्ये कोणत्याही गोष्टीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...)

सकाळी सूर्यदेव आपली कोवळी किरणे सगळीकडे पसरत होते ..."युगविला सुध्दा त्यांच्या किरणांनी न्हाऊन निघाला होता ...भल्या मोठ्या आवारात पसरलेला हा बंगला ज्याला काही लोक विला म्हणत होते एखाद्या राजवाड्यासारखा होता ....गेट मधून आत गेल्यावर दुर्तफा झाडी ,मोठे हिरवे लॉन त्यामध्ये फुलांचे पसरलेले गालिचे ....विला च्या पायऱ्या शुभ्र संगम रावरी ...दारावर भलं मोठं तोरण ....भव्य दार ...."युगविला"ची बातच काही और होती ....दिमाखात उभा हा विला ....भक्कम ,सुंदर ......युगराज चा  "युगविला "....!

आतमध्ये खालच्या बाजूला असणाऱ्या एका रूम मधुन आवाज येत होता ...संभाषण सुरु होते 

"राका ,अनिका तिथे कशी पोहचली ? तिला हि माहिती कामिळाली?"-युगराज थंडपणे पण डोळ्यात राग दिसत होता 

"मी माहिती काढतोय ,अजून काही कळलं नाही .."-राकेश (राका)

"अजून माहिती मिळाली नाही म्हणजे काय ? तुझ्याकडून होत नसेल तर मला सांग मी बघतो माझ्या पद्धतीने .....मी बोलतो डेव्हिड शी .."-युगराज 

"नको ,मी म्हणालो न मी बघतो म्हणून ..तू ह्यात पडू नकोस ...तस हि डेव्हिड खूप जुना आणि भरवशाचा माणूस आहे ..."-राका 

"तेच तर कळत नाहीये ,डेव्हिड ने हि माहिती का दिली  ? तिथं किती धोका होता ..अनिका ला काही झालं असत तर ..नो ..नो ..नो .मला आज संध्याकाळ पर्यंत सगळी माहिती हवी आहे ..."-युगराज एक हात टेबल वर जोरात आपटत बोलला ...

"युग शांत हो,मी म्हणालो न .तू माझ्यावर सोड ते सगळं ..जा तयार हो मिटींग्स आहेत "-राका 

राकेश हा युगराज चा सर्वात जवळचा मित्र ,त्याचा उजवा हात ,राकेश युगराज ला युग म्हणू शकत होता ..अगदी घरच्यासारखं ,राकेश नेहमी युगराज च्या सोबत असायचा ..कधीच त्यानं युग ला एकटं सोडलं नाही .....युगराज ला राग आल्यावर काय होत आणि तो कसा रिऍक्ट  होतो आणि त्याला कस सांभाळायचं हे फक्त राकेश लाच माहित होत ... युगराज च्या आयुष्यात जे काही चांगले वाईट प्रसंग आले त्या सगळ्या प्रसंगात राका त्याच्यासोबत होता ....डेव्हिड त्याचा विश्वासू माणूस त्यानेच अनु ला माहिती पुरवली होती ,पर्ड्याआड राहून ,त्या फॅक्टरी संदर्भात ....चुकून तो फोन युग ने ऐकला आणि म्हणून तो अनुला वाचवू शकला ....पण डेव्हीड ने असं का केलं हे अजून त्याला कळले नव्हते ......

इकडे अनिका आज आरामात उठली ...तिचा हाफ डे होता ...त्यामुळे जेवण करून मग ती जाणार होती .....आरामात उठून ती खाली आली तर साहिल ,मोहन दा ,आबा सगळे गेले होते ....आप आपल्या कामाला ...तिला कोणी दिसले नाही ...

अनु kitchen मध्ये गेली .मृणाल काम करत होती .

"वहीनि ..काय बनवतेस ?"-अनु 

"अग अनु ,तू खाली का आलीस ?मला आवाज द्यायचं न ...कस वाटतेय आता ..तू बस बर तिकडे ,मी आलेच .."-मृणाल 

"अग हो हो ,मी ठीक आहे ..मी इथेच थांबणार ....तू काय बनवतेस ते सांग ?"-अनु 

"बटाट्याची भाजी ...तुला आवडते न ..आई म्हणाल्या .."-मृणाल 

"हि आई पण न ...."-अनु स्वतःशीच हसत होती 

"का ग ?काय झालं ?चहा देऊ का ?"-मृणाल 

"काह नाही ग असच ..मी ठेवते चहा आपला ..तुझं चालू दे ...."-अनु चहाची तयारी करते ..दोघीही गप्पा मारत मारत काम करत असतात चहा घेऊन त्या दोघी डाईनिंग टेबल,चेअर वर येऊन बसतात 

"वाहिनी कधी कधी न आईची काळ्जी वाटते खूप ...ती खूप चिंता करते माझी ....."-अनु 

"अग आई अशीच असते ...किती हि म्हणालो न तरी सुद्धा तिची काळजी मिटत नाही ....आईचा जीव असतो तो ..."-मृणाल 

"हो ग ,काल तिची  अशी अवस्था मी पहिल्यांदा पहिली ..तिला तर मी हे क्षेत्र निवडायलाच नको होत असं वाटत होत पण मला मात्र खूप आवडत हे काम करायला ...धोका आहे पण तो कुठे नसतो ...इथे खूप बनावटीचेहरे पाहायला मिळतात ....सत्य असत्य ,,असं खूप काही असत ...पण हे तिला कस समजावू हेच कळत नाही .."-अनु .मृणाल फक्त तिच्याकडे बघत असते ..आज पहिल्यांदाच ती इतका वेळ बोलत होती ....तिकडून श्रेया पण येऊन खाली बसते 

"अरे ,तू गेली नाहीस अजून ..मला वाटलं कि तू गेली असशील ?"-अनु 

"नाही ग बाई ,आज उशीरा जाणार आहे ....."-श्रेया 

"का ?lectures नाहीयेत का ?कि तू करणार नाहीयेस ?"-अनु चे आपले प्रश्न सुरूच होते ...

"ये गप ना ,नकोय का तुला मी इथे ...तस सांग ..त्या आईसारखे प्रश्न नको विचारू भाराभर ..."-श्रेया वैतागून ....उठून निघून गेली 

"अग ऐक ना ,श्रेया . श्रेया ...मी सहज विचारलं .."-अनु बोलत होती तोपर्यंत श्रेया बाहेर लॉन वर टाकलेल्या खुर्च्यांवर  पेपर घेऊन बसली ...

"हिला काय झालं ? मी काही चुकीचं विचारलं का  वाहिनी "-अनु मृणाल ला 

"अग नाही ,अभ्यासाचं टेन्शन असेल ...जाऊ दे ..मागच्या १० बारा दिवसांपासून असाच चालू आहे ... चल बाई मी आवरून घेते ..आई पण येतीलच इतक्यात ...."-मृणाल उठून kitchen मध्ये जाते .अनु विचार करत असते ..श्रेया ला काय झालं असेल? का ती इतकी चिडते ...आधी तर किती  छान बोलायची ,हसायची .....अनु न विचार केला कि श्रेय शी बोलावं पण मग ऑफीसा मधून आल्यावर बोलावं असं ठरवलं आणि ती वर आवरायला निघून गेली ....

अनु तयार होऊन आली आणि तिच्या वेळेवर ऑफिस साठी निघानार तोच .. समीर तिला भेटायला आला होता

"अनु कशी आहेस ?"-समीर 

"मी मस्त .काही नाही रे साधी चक्कर आली होती .."-अनु 

"हो घरी सगळ्यांना हलवून सोडलं होत तुम्ही मॅडम,कळलं  मला ते ..म्हणून तर आलो "-समीर 

"हो न ह्या पोरींना त्याच काही वाटत नाही ....पन तू कुठं होता इतकं दिवस आलाच नाही .."-आई 

"हो तर इतके दिवस कुठे गायब होता ...भेटलाच नाही .. आत बोल ..उत्तर दे .."-अनु 

"अग आत्या कडे गेलो होतो ...जाऊ दे ते ...उशीर होत नाहीय का आज , चल मी सोडतो तुला.."-समीर 

"ओके ..वाहिनी मी येते ग ..आई येते .."-अनु 

"सांभाळून जा ...लवकर या .."-आई .अनु काहीस हसतच बाहेर पडली ..श्रेय मॅडम चा काही मूड नव्हता कॉलेज ल जायचा 

समीर अनु ला सोडतो तिकडून रेवा त्यांच्याजवळ आली ,

"हाय अनु ,कशी आहेस ? तुला काही घरी बसवत नाही तर "-रेवा ... समीर न मात्र लगेच काढता पाय घेतला ...रेवा कडे बघितलं सुद्धा नाही .

"चल मी निघतो .. "-समीर आणि बाईक काढून तो जातो सुद्धा .....

"ये अरे .हा असं काय ?  गेलं पण "-अनु 

"जाऊ दे ना तू चल आत ..."-रेवा 

ऑफिस मध्ये आल्यावर सगळे तीची विचारपूस करू लागले ..  आशुतोष सरांकडून तिला केबीन मध्य बोलावलं गेले ...

"सर मे आय come इन ?"-अनु 

"प्लिज या न ,बसा .... how are you ?"-आशुतोष 

"थँक्स ,मी ठीक आहे ...."-अनु 

"मिस अनिका काल तुम्ही जे काम केलं ते कौतुकास्पद आहे ....एवढी मोठ्ठी बातमी..आणि ते हि फक्त आपल्या चॅनेल वर मस्तच ..तुम्हाला त्याबद्द टीप कशी मिळाली सांगू शकाल ..?"-आशुतोष पंडित  

"सर मला एक निनावी फोन आला होता त्यामुळे माहित मिळाली .."-अनिका 

"एका फोनवर तुम्ही लगेचच गेला कोणालाही नसांगता...."-आशुतोष

"नाही सर मी माझं खबऱ्या कडून माहिती मिळवली होती रिक्षात बसल्यावर ..आणिमोनिका मॅम ला कल्पना दिल होती ,तसाच रेवा ला मेसेज केलं होता .."-अनु

"ओके ...मिस अनिका कोणतीही बातमी मिळवण्यासाठी आधी ती बातमी किती महत्वाची  आहे  हे पडताळू बघणे आवश्यक आहे आणि त्या बातमीसाठी बाहेर जाताना सिनिअर च परवानगी घ्यावी लागते ..की"-आशुतोष बोलत होते अनु मध्येच बोलली

"पण सर मी ..."-अन थांबवत

"माझं अजून पूर्ण झालं नाही....तर मी हे म्हणत होतो की बातमी च गाम्भीर्य आणि माहिती बघून मग निर्णय घ्यावे ..काल तुम्ही एकट्या गेल्यात ..काही झालं असत तर त चॅनेल ची जबाबदरी झालं असती .....केदार ला लक्षात आलं आणि अनर्थ टळलं असं म्हणू आपण .....सो पुढच्यावेळी काळीज घ्या .."-पंडित सर

"हो सर ......येऊ मी आता .."-अनु

"मीस पाटील  ..मी रागावलो नाहीये ....पण प्रत्येक कामाची काही procedure आहे ती फोल्लोव करावी लागते ....अजून एक ज्या लोकांना तुम्ही पकडू दिल आणि जिथे तुम्ह गेला होता  त्याची थोडी आज माहिती काढा ..तुमच्यासाठी बर राहील ....तुम्ही थोड्या सतर्क रहा..काळजी घ्या ..माझा नंबर आणि केदारचा नंबर तुम्ही कधीही अडचणीत असल्यावर लावू शकता ..."-पंडित 

"हो  सर थँक you .."- अनु  केबिन मधून बाहेर येते ...

अनु ने ज्या लोकांना पकडून दिल होत ते मोठ्या रॅकेटची खूप छोटी माणसं होती .... हे एक मोठं जाळ होत आणि आता अनुच्या जीवाला धोका होता ..कारण पकडलेला माल लक्षावधी रुपयांचा  होता ..केदार ने जेव्हा गाडीत बसल्यावर आपल्या पोलीस मित्रला माहित दिली तेव्हा तो आपल्या टीम सोबत वेळेत पोहचला होता ...आणि म्हणूनच अनर्थ टळलं होता ..तस तर  युवराज न अनु ला वाचवले आणि गुंडाबरोबर हातापायी पण केली पण जेव्हा पोलीस आणि केदार येताना दिसले तेव्हा राका ने युग ल बाजूला नेऊन गाडीत बसवले आणि अनुला एका माणसाच्या मदतीने बाहेर झाडाजवळ बसवत केदारच्या हवाली केलं ...अनु ला वाचवणारा युग होता तरीपण केदार समोर आलेला दुसराच कोणीतरी होता आणि हे अजून अनु  ला  माहित नाहीये...आता हि केदार ल त्या पोलीस मित्राने बोलावलं होत म्हणून तो तिकडेच गेला होता ऑफिस मध्ये तो नव्हता ......

अनु केबिन मधू बाहेर येऊन विचार करू लागली ....आणि आपल्या डेस्कवर येऊन बसली बराच वेळ तिथं माहिती घेत होती डोक्यात विचारचक्र सुरूच होते ....तिला एकच प्रश्न भेडसावत होता, 

"युगराज तिथे कसा ?"-अनु

"ह्या सगळ्यामध्ये त्याचाच तर हाथ नसेल ,नाही नाही ...असं कस असेल ..?पण मग तो तिथे काय करत होता ? फॅक्टरी त्याची असेल नाही ती फॅक्टरी पण त्याची नाहीये आपण माहिती काढली होती ....कस शोधू ह्याच कारण ? तिला तेवढ्यात श्री चा फोन येतो

आणि ती तंद्रीतून बाहेर येते ....

"हॅलो ,काय मॅडम .अजून  एक झंडा रोवला वाटत .."-श्री

"काय रे श्री ,असं काही नाही झालं आणि मी तूला फोन केला होता काल  .. पण आपलं बोलणंच झालं नाही "-अनु

" हो अग मी एका बातमी साठी कॉन्फरेन्स मध्ये होतो .....तिकडे रेंज च प्रॉब्लेम होता .....तू कशी आहेस ?"-श्री 

"मस्त , आपण कधी भेटतोय ?"-अनु 

"अरे मी तेच विचारणार होतो ....आज भेटू शकतेस का ? नेहमीच्या ठिकाणी .....तुझ्या घरीच येणार होतो तू भेटायला पण म्हंटल बाहेर भेटू ......"-श्री 

"हो चालेल न ..मी निघताना फोन करते ....."-अनु 

अनु ने फोन ठेवला आणि  मग काम आवरू लागली .....तिने खुप काही शोधलं ईश्वरी हॉस्पिटल आणि कालचा ड्रग रॅकेट चा काही संबंध लागतोय का ? अजूनही ह्यामागे कोणत्या लोकांचा संबंध असू शकतो त्याचा हि ती शोध घेण्याचा प्रयत्न करत होती ....ती कामात इतकी व्यस्त होती कि तिला केदार आलेला कळलंच नाही ...केदार तिला बघत होता ..तिच्या हालचाली बघताना तो तिच्यात गुंतत होता ....त्याच्या लक्षात आले कि आपण ऑफिस मध्ये आहोत आणि त्यानं नजर हटवली आणि तिच्या डेस्क जवळ गेला ..अनु खाली बघून तोंडात पेन्सिल धरून काही तरी काम करत होती ..

"मिस पाटील ..."-केदार .त्याचा आवाज ऐकून अनु चमकली आणि उठून उभी राहिली त्याच्याकडं बघत ...केदार पुन्हा म्हणाला ,

"कस वाटतंय आता ?"-केदार 

"मी ठीक आहे ..."-अनु 

"-गुड .. कॅरी ऑन "-केदार हसून तेथून आपल्या केबिन कडे जायला वळतो तेवढ्यात अनु त्याला आवाज देते 

"सर एक मिनिट ,काही विचारायचं होत मला तुम्हाला..."-अनु 

"ओके केबिन मध्ये या .."-केदार वर केबिन मध्ये जातो 

अनु हि त्याचा केबिन मध्ये जाते .."मी आत येऊ का ?"-अनु 

"हो या न बसा बोला काय विचारायचं होत .."-केदार  हातातल्या फाईल बघत बोलला 

"सर काल मी चक्कर येऊन पडल्यानंतर काय काय झालं ? मला काही आठवत नाही "-अनु ने थेट प्रश्न केला .केदार  दोन मिन तिच्याकडे बघत होता त्याने फाईल खाली ठेवली आणि तिच्याशी बोलू लागला,

"मी जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा एक व्यक्ती तुम्हाला झाडाजवळ बसवत होता आणि तुम्ही बेशुद्ध होता ..."-केदार

"म्हणजे तुम्ही मला वाचवलं नाही ..बरोबर ...तो व्यक्ती कोण होता ?"-अनु

"नाही ..तुम्ही ऑफिस मधून  मला काहीही नसांगता निघून गेलात शिवाय कोणालाही बरोबर घेऊन नाही गेलात ..... नंतर जेव्हा तुम्ही फोटो पाठवलेत तेव्हा मी तडक निघालो कारण तुमचा फोन लागत नव्हता ...आणि तुमच्यवर संकट येऊ शकत हे जाणवत होत  ...मी कार मध्ये बसल्यावर विक्रम ला फोन केला आणि त्याला हि तिथे यायला सांगितलं ..जेव्हा आम्ही तिथं पोहचलो तेव्हा तिथे तुम्ही बेशुद्ध होतात ...आणि तिथे बाहेर कोणी दिसत हि नव्हतं ..... विक्रम मध्ये गेला तेव्हा काही गुंड नशेत पडून होते ...आणि काही जणांच्या डोक्याला मार लागला होता ....."-केदार 

"पुढे ?"-अनु 

"पुढे ?पुढे काय ?"-केदार 

"म्हणजे त्यांना कोणी मारलं ?तो व्यक्ती कोण होता ज्याने मला झाडाजवळ बसवलं ..."-अनु 

"पोलिसांच्या मते त्या गुंडाचे आपा आपसात भांडण झाले आणि त्यांनी एकमेकांना मारलं ...ज्या व्यक्ती ने तुम्हाला झाडाजवळ बसवलं त्याला मी ओळखत नाही .."-केदार 

"ओह ,एवढंच .."-अनु 

"अजून काही व्हायला हवं होत का ? मिस पाटील .."-केदार जरा वाकड्यात बोलतो 

"अ ,काय ?"-अनु ला काही कळलं नाही ....

"नाही म्हणजे ,तुम्ही कधीही कुठेही न सांगता न विचारता जाता, चक्कर येऊन पडता ,हातापायाला दुखापत करून घेता ...आजून काय हवय ....अजून काय होण्याच वाट बघत आहात ते विचारले मी .."-केदार .केदार चा राग अजून काय होता ..ती ना सांगता गेली आणि तिला काही झाल असत तर ह्या विचाराने तो काळजीत होता आणि रागात हि ...कारण  विक्रम ने सुद्धा तिच्या जीवावर हे प्रकरण बेतू शकत असं सांगितलं  होत ...

"मला हौस नाहीये स्वतःहुन संकटात पडायची , आणि राहिला प्रश्न तुम्हाला सांगण्याचा तर तुम्हीच मीटिंग मध्य होता ..तरीसुद्धा मोनिका मॅडम कडे निरोप ठेवला होता ...तुम्ही स्वतः जागेवर नसता आणि दुसऱ्याला दोष देता ..."-शेवटची वाक्य ती फक्त पुटपुटत होती .."अनु 

"काय ?"-केदार 

"काही नाही निघते मी ......."-अनु घुस्स्यातच बाहेर पडली ...

मोनिका ने केदार ल काही सांगितलंच नव्हता .....केदार ला आत्ता कळलं होत  ते .....त्याला आत आपण उगीचच अनुवर  चिडलो असं वाटयाला लागल होत ..अनु खाली आली ..आपलं काम आवरतं घेतलं ...थोड्यावेळाने ती जायला निघाली ...बॅग घेऊन बाहेर आली ..केदार हि तिच्यामागे आला होता, तिला आज बाहेर चलते का विचारायला पण त्याला उशीर झाला . अनु तोपर्यंत कोणाच्यातरी बाईक वर बसून निघून गेली होती ..

क्रमश:

🎭 Series Post

View all