अनिका कथा एका मुलीची ,जिला अन्याय सहन होत नाही ,जी स्वतःच्या हिमतीवर जग जिंकू पाहते ..घरी सर्वांची लाडकी आणि सुरक्षित वातावरणात वाढलेली ....गरम डोक्याची पण तेवढीच हळवी आणि समजदार ...अशी आपली अनिका .. आतपर्यंत आपण कथेत पाहिलं कि अनिका एका न्युज पेपर मध्ये काम करत होती पण मग तिने एक टीव्ही चॅनेल जॉईन केलं ...आय टीव्ही ...हे चॅनेल सुद्धा थोडंफार नवीनच पण स्वतःच स्थान नक्कीच आहे ..ह्या न्यूज चॅनेल मध्ये काम करायची पद्धत वेगळी ..अनिका साठी सगळं नवीन ...आणि तिचा मॅनेजर केदार तोही नवीनच ..पण केदार खूप महत्वकांक्षी असतो ....त्याला आलेले अनुभव वेगळेच असतात ...खूप मेहनतीने तो ह्या पोस्ट वर आलेला असतो आणि पुढेही त्याच्या बऱ्याचश्या इच्छा असतात ...त्याच्या ऑफिस मध्ये असते रेवा जी आपल्या अनिका ची खूप छान मैत्रीण बनते पण ती च आणि समीर च बिनसतं ..
समीर सोज्वळ आणि समंजस ,अनिकाचा बेस्ट फ्रेइन्ड ....रेवाच्या लग्नाची बातमी त्याला मिळते आणि तो उदास होतो .......अनिका आपल्या कुटुंबात खूप सुखी असते ...तिला तिचा जॉब ,तिचं काम खूप आवडत आणि मनापासून ती ते काम करत असते ...ती आता सुद्धा एका नव्या केस साठी खूप मेहनत घेत आहे ..
आता पाहूया पुढे
रेवा अनुला तिच्या ठरलेल्या लग्नाविषयी सांगते ...रेवाचं लग्न तिचे मामा ठरवतात ....केदार ने अचानक एक मीटिंग बोलावलेली असते ..चॅनेल च्या साठी काही खास योजना तयार करायच्या असतात ..त्याची जबाबदारी सगळ्यांना देण्यात येते ..रेवा आणि केतन वेबसाईट च काम बघणार असतात ...ओमी नवा शो रन करणार असतो ....अजून काही नवीन लोकांना रुजू करून घेण्यासाठी ची रूपरेषा आखली जाणार होती आणि ते काम मोनिका बघणार होती ...अनु ने एक कल्पना सुचवली ती म्हणजे जुन्या बंद पडलेल्या केसेस च्या पुन्हा चौकशीची .केदार ने हि त्या योजनेसाठी होकार दिला ....खर म्हणजे अनुला युगराज बद्दल माहिती काढायची होती ....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा