Aug 16, 2022
कथामालिका

अनिका 36

Read Later
अनिका 36

पार्ट ३६ 

https://www.irablogging.com/blog/anika35_8531

पार्ट ३५ साठी वर क्लिक करा 

पूर्वसूत्र = अनिका ठरवूनच येते कि आज रेवा शी बोलायचं ..रेवा आल्यावर अनु विषय काढते  मग दोघांमध्ये वाद होतात होतात...मोनिका त्यांना येऊन दरडावते .... अनु ला पुनः धमकि चा फोन येत असतात ,अनु चिडून आणि वैतागून कँटीन मध्ये निघून  जाते ...रेवा सुद्धा तिच्याशी बोलायला म्हणून जाते .....आत पुराहूया पुढे )

 

"तुझं खरच लग्न ठरलंय ?"-अनु 

"तसंच काहीस ....."-रेवा 

"म्हणजे .....?"-अनिका 

"अनिका , मी जेमतेम ९,१० वर्षांची असेन तेव्हा एका अपघातात माझे आई वडील गेले ..मी माझ्या काकांसोबत राहत होते ..आज्जी जोपर्यंत होती तोपर्यंत मला जास्त त्रास नाही झाला पण मग एके दिवस आज्जी ला काय वाटले काय माहित पण तिने माझ्या मामा ला बोलावून घेतले आणि मला त्याच्यासोबतच राहायला घेऊन जा म्हणून समजावले ..मामा ची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती ...तरीपण आज्जीला असे वाटले कि मला मायेची उब मामाकडे मिळेल म्हाणून तिने तस सांगितले असावं ,कारण काका काकू त्यांच्याच दुनियेत मग्न असायचे ......त्यांत काही दिवसातच आज्जी पण कायमच सोडून गेली ...आणि तेव्हापासून काका पण दुरावले .....मामा कडे मी लहानची मोठी होऊ लागले ..तस मला काही त्रास नव्हता मामी पण चांगलीच होती ...पण शेवटी मी दुसऱ्याची पोर आणि घरची परिस्थिती ..मला सगळं दिसत होत ....मामीच्या घरच्यांनी मामाला व्यवसायात मदत केली त्यामुळे त्यांची परिस्थिती बरी झाली  .मी १२ वि नंतर हॉस्टेल वर राहू लागले आणि नोकरी पण करू लागले ..माझा स्वतःच खर्च भागवून जस जमेल तस थोडे फार पैसे मामाच्या घरी पाठवते ....त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठीही मी जमेल तेवढी मदत करेन असं ठरवलंय मी ......मामा ने माझा सांभाळ केलाय आणि माझ्या आयुष्यावर त्याचा हक्क आहे ..त्याने मामीच्या चुलत भावाच्या मुलासोबत माझं लग्न होईल असं मला सांगितलंय ..ते लोक गावाकडे असतात आणि त्यांना ......"-रेवा बोलत बोलता थांबली..डोळ्यात आलेलं पाणी पुसलं .....अनु हे सगळं ऐकून एकदम शांत झाली होती काय बोलाव हे तिला कळत नव्हते ..

रेवा पुढे बोलू लागली ..."समीर खूप चांगला मुलगा आहे पण माझ्या नशिबात नाही ..शिवाय  माझी नोकरी अशी आहे कि ज्यात वेळेचा ताळमेळ बसण अवघड आहे ...त्यामुळे लग्नानंतर मी नोकरी पण सोडणार आहे "-रेवा ने सगळंच सांगून टाकलं 

"तुला हे आधीपासूनच माहित होत रेवा ?"-अनु 

"नाही ..मागच्या महिन्यात मामाने मला सांगितलं तो आला होता हॉस्टेल मध्ये भेटायला ..त्याला व्यवसायात नुकसान झालं म्हणून चिंतेत होता ..मी तेव्हा हि त्याला पैश्याची मदत केली ....त्याने सांगितलं कि मामीच्या चुलत भावाला मी सून म्हणून खूप आवडले आहे आणि ते लग्नासाठी तयार आहे ..त्यांना हुंडा वैगरे काही नको .फक्त मुलगी हवी आहे ..."-रेवा 

"तू बघितलं आहे मुलाला ...तो काय करतो ?"-अनु 

"नाही ,त्यांचं दुकान आहे गावाकडे ...बाकी काही नाही ....त्याच पाहिलं लग्न मोडलं म्हणून आता त्याला दुसरं करायचं आहे .."-रेवाने अचानक मान वळवली आणि डोळ्यातले पाणी पुसण्याचा प्रयत्न केला .....अनुला खूप वाईट वाटलं 

"काय दुसरं लग्न ?"-अनु अजूनही शॉक मध्ये होती ..इतकी हसणारी ,हसवणारी रेवा ..तिच्या मनात ..आयुष्यात इतकं काही घडत असेल हे कधी जाणवलाच नाही ....अनु ने तिच्या हातावर हात ठेवले , तिच्याकडे बघत म्हणाली '" i am sorry ....मी तुझं काहीच न ऐकता तुला खूप बोलले ..रेवा ,ये रेवा इकडे बघ न ..प्लिज ..मला माफ कर .."-अनु रेवाचा चेहरा स्वतःकडे फिरवत बोलू लागली .रेवाने मान खाली घातली 

"शांत हो , रेवा हे सगळं जर तू समीर ला आधीच सांगितलं असत तर .."-अनु पुढे काही बोलणार तेवढ्यात रेवा ने सुरवात केली 

"बोलणार होते ,त्या दिवशी सांगणार होते पण त्याने संधीच दिली नाही ..माझा हाथ पकडला आणि मग .. मी घाबरले ...."-रेवा पुन्हा रडू लागली "शांत हो रेवा ..समीर ने जे केलं ते रागात असताना केलं ...त्यालाही त्याचा पश्याताप होतोय ..त्याच चुकलं हे त्याला मान्य आहे आणि तुझी माफी मागण्यासाठीच तो तुला एकदा भेटायचं म्हणतो ..समीर वाईट मनाचा नाहीये रेवा ..मी त्याला ओळखते ..त्याच तुझ्यावर खरच प्रेम आहे आणि तुझ्यासाठी तो तुझ्या मार्गातुन बाजूला होणार आहे ...."-अनु तिला समजावत होती.. एव्हाना रेवा आणि अनिका ह्या दोघींमधला वाद शमला होता ...दोघीही परत कामावर रुजू झाल्या ..अनु ने पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं ह्या सगळ्यात ती तिला आलेला धमकीचा फोन विसरली होती ...केदार ने अचानक एक मिटिंग बोलावली होती त्यामुळे सगळे मीटिंग हॉल मध्ये जमले होते ....

"मी आत्ता हि मीटिंग बोलावली आहे  त्याच कारण म्हणजे पंडित सर उद्या ऑफिस ला येणारआहे ....आणि एक मोठ्ठी घोषणा करणार आहेत ....आपल्या चॅनेलसाठी काही महत्वाच्या आणि फायद्याच्या गोष्टी घडल्या आहे ...त्या सगळ्या तुम्हाला उद्या कळतीलच ...सर्व माहिती डिटेल्स हे उद्या डिसकस करण्यात येतील ... मी आता तुम्हाला कमी शब्दात हे सांगू शकतो कि आपल्या चॅनेलच expansion झालाय ...आपल्याला आपल्या चॅनेल च्या ग्रोथ साठी काहीतरी नवीन गोष्टी करण्याची गरज आहे ...

मी इथं काही मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलावले आहे ...पहिला असा कि येणाऱ्या काही दिवसात आपल्याला अजून काही लोकांची गरज आहे त्यामुळे आपल्या वेबसाईट ला ह्या बाबतीत अपडेट् करावे लागेल ..  केतन वेबसाईट संबंधी च काम तू आणि रेवा दोघे मिळून करा ....कोणत्या पोस्ट साठी काय वयोमर्यादा आणि पात्रता असेल हि माहिती मोनिका तुम्हाला देईल ..उद्या संध्याकाळ पर्यंत आपल्याला हे तयार ठेवावे लागेल ...

दुसरं असं कि  एक मार्केटिंग टीम तयार करावी लागेल ..ज्यात मुखत्यावेकरून आपल्या चॅनेल चा t .r .p कसा वाढेल आणि त्यासाठी नवीन कोणत्या बातम्या किंवा कॅटेगरी ऍड करता येतील ते निश्चित करून त्यावर त्यायोगे काम करावे लागेल ..

महत्वाचं म्हणजे आपली टीम वाढणार आहे त्यामुळे जस आज पर्यंत आपण शांततेत काम करत आलो एकमेकांच्या सोबतीने तसेच पुढेही करायला हवं ....काही महिन्यातच आपल्याला नवीन जागेत स्थलांतरित व्हावे लागेल ..त्यामुळे ते हि बदल होतीलच ....आता  तुमच्याकडे जर काही नवीन योजना असतील तर तुम्ही सांगू शकता .."-केदार 

"सर आपण नवीन कॅटेगरी साठी बोललात तर आपण नवीन प्रेक्षणीय जागेच माहिती आणि फोटोज ,त्यामागचे काही रहस्य आणि प्राचीन भारत असं हि टाकू शकतो .."-ओमी 

"ओके छान आहे कल्पना त्यावर जर तुला काही डेटा मिळाला तर त्याची पूर्ण फाईल बनव आणि मग प्रेसेंट कर आपण तो शो रन करू "-केदार 

"आपण काही पर्यावरणपूरक गोष्टी करू शकतो जस कि असे शो ज्यात शेती आणि त्याविषयक माहिती ,रोजगार आणि करियर ह्याबाबतीत माहिती देता येईल "-ऋचा 

"ठीक आहे शेती आणि करियर आणि इतर हि करियर पर्याय हे सगळं आपण रविवारच्या शो साठी करू शकतो ....ऋचा आणि नितीन तुम्ही दोघंही  ते बघा "-केदार 

"सर आपण काही जुन्या बंद पडलेल्या केसेस किंवा ज्यांना दाबलं गेलय अश्या केसेस ला पुन्हा ओपन करू शकतो आपण आपल्या मार्फत त्यांना न्याय मिळवून द्यायचं प्रयत्न करू शकतो .."-अनिका ..

"nice पण त्यासाठी खूप research आणि मोठं मोठ्या लोकांची परवानगी लागेल त्यासाठी एक टीम तयार करूया ..ह्या टीम मध्ये कोण कोण असेल ,काय काय असेल हे सगळं मिस पाटील तुम्ही बघा आणि उद्या संध्याकाळ पर्यंत मला त्याची रुपरेश द्या ...."-केदार च्या डोळ्या चमक होती ..त्याला वाटलंच होत कि अनु कौन काहीतरी भन्नाट कल्पना येईल म्हणून ... नितीन संपते आणि सगळे या आपल्या कामाला लागतात ....रेवा आणि अनुच भांडण ,गैरसमज मिटलेला असतो ....

अनु नवीन जोमाने कामाला लागते ...काहीतरी नवीन करायचं तिच्या डोक्यात असते ....त्यात तिला मारवा आणि युगराज च्य केसेस आणि त्यांची माहिती काढण्याची संधी चालून आलेली दिसते ..ह्या  शो मुळे तीच काम थोडस सोप्प होईल असं तिला वाटत असत ..त्यामुळे ती जोमाने कामाला लागते .....आजचा दिवस संपलेला असतो ......

निघताना ती रेवा ला भेटते "रेवा ,मला तुझ्याशी बोलायच आहे ....."-

"बोल न "-रेवा 

"साकलिजे झालं त्यास्थ त्यासाठी खरंच सॉरी .....पण प्लिज एकदा समीर ला भेट आणि तुझ्या लग्नाच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार कर .....प्लिज ...बाय"-अनु ..अनुच्या मनात अजूनही समीर आणि रेवा विषयी विचार घोळत होते ....त्या विचारातच ती घरासाठी निघते .......रस्त्यावर चालत असतं केदार गाडी घेऊन तिच्यासमोर येतो ..आणि तिला बसायला सांगतो 

अनु सुद्धा गाडीत बसते ..

"मिस पाटील ,तुमचं दुसरीकडे काही काम नसेल आणि दुसऱ्या कोणाला भेटायचं नसेल तर कॉफी प्यायला जाऊ या का "-केदार 

अनु च्या लक्षात येत कि मागच्या वेळी तिने नकार दिल्यावर त्याला किती राग आलेला असतो ते ...आणि तास हि आज खरंच तिला दुसरं काही काम नसत ती हसून हो म्हणते ,

ते पुन्हा त्याच कॉफे शॉप मध्ये येतात ...... एका टेबल वर बसतात आणि मग वेटर त्यांना मेनू कार्ड आणून देतो 

"मिस पाटील प्लिज .."-केदार तिच्यासमोर मेनू कार्ड ठेवतो ..ती त्यात बघून ऑर्डर देते ..केदार सुद्धा त्याची ऑर्डर देतो ..

"मिस पाटील आज तुमची कल्पना आवडली मला ....छान आहे ...काही विचार केला त्याबाबतीत ....?"-केदार 

"नाही अजून म्हणजे थोडंफार आहे कि जस काही पोलीस मित्रांची मदत लागेल त्यासाठी ..तर कोण कोण असू शकतात ..कोणत्या केसेस घ्यायच्या ?हे सगळं ठरवावं लागेल ...."-अनु 

"हम्म छान ....."-केदार ..दोघांमध्ये एवढं बोलून शांतात असते ..काय बोलावं हे कोणालाच कळत नाही ...

ऑर्डर येते .."मिस पाटील ..घरी सगळे कसे आहेत ?"-केदार सहज काहीतरी सुरवात करावी म्हणू बोलायला लागतो ...

"छान सगळे बरे आहेत ...तुम्ही आलंच नाही त्या दिवसानंतर .."-अनु 

"तुम्ही बोलावलच नाही ..तर कस येणार न ...?"-केदार हलकच हसत म्हणाला..अनुला असं उत्तर येईल असं वाटलं नव्हतं .....ती पण हसली .....

"मिस पाटील हे ऑफीस नाहीये .."-केदार बोलला अनुला काही कळलेच नाही 

"हो माहित आहे मला ..मग "-अनु 

"मग ..मग असं कि आप फारच फॉर्मॅलिटी करतो आणि फॉर्मल वागतो एकमेकांशी असं नाही वाटत का तुम्हाला ..ऑफिस मध्ये ठीक आहे पण इथे सुद्धा ..?"-केदार बोलत होता 

अनिका फक्त बघत होती .....

"कॅन वी बी फ्रेंड्स ?"-केदार न विचारलेच ...अनु २ मिन त्याच्याकडं बघत होती काय करावं काही सुचेना ...केदार ने हात पुढं केला आणि अनु ने ही मग मैत्री स्वीकारली ... दोघे हि आता मित्र झाले होते 

त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग केदार ने आणिका ला घरी सोडलं ...

"या या ..ताईसाहेब कश्या आहात तुम्ही ?'-श्रेया फारच मूड मध्ये होती ...सगळेच बसलेले होते

"ये काय हे ताईसाहेब ..आज काय एखादा पौराणिक मूव्ही बघितला का ?"-अनु पर्स ठेवून  आईच्या बाजूला बसली ...

सगळे हसायला लागले 

"आज काही खास आहे का ?सगळेच जमले आहे इथे ?"-अनु 

"तुमच्या स्वागतासाठी ...ताईसाहेब ...."-श्रेया .अनु तिला एक चापटी मारते ..आई आबा बसलेले असतात ...मोहन अजून आलेलं नसतो 

 

"हो ना ,तुझ्या साठी स्थळ आलंय,मुलगा तसा बरा आहे ....म्हणून चर्चा सुरु आहे "-साहिल पण खेचत होता 

"शादी है भाई शादी है ,,..................सून सून सून दीदी तेरे लिये रिश्ता आय है ?"-श्रेया  गाणं म्हणून तिला चिडवू लागली ..

आई ,आबा मृणाल सगळेच हसत होते तेवढ्यात मोहन तिथे येतो ...गोंधळ बघून विचारतो 

"काय हे ?कोणासाठी रिश्ता ? ..कोणाचं लग्न आहे ?"-मोहन 

"अनुच .."-साहिल अन श्रेया एकसाथ .....

"ये गप रे ..मी नाही करणार ..मला आतच करायचं नाहीये ...."-आणिक ओरडून सांगते मोहन पन हसायला लागतो 

"तुला विचारलाय कोणी ? आम्हाला मुलगा पसंत आहे ..तुला फक्त बोहल्यावर उभं राहायच आहे ..तुझं झाल्यशिवाय श्रेया च होऊ शकत नाही ..ती किती उत्सुक आहे बघ जरा तिच्याकडे .."-साहिल 

"ये गप रे ....आता अनुचा विषय सुरु आहे न .."-श्रेया 

"आई ...........बघ न तू बोलत का नाहीये ?"-अनु रडवेला चेहरा करून 

"ये  तिला रडवू नका रे ...जाऊ दे अनु लक्ष नको देऊ ..आपण न पुढच्या महिन्यात करू तुझं लग्न ...ओके बाळा .."-आई सुद्धा खेचत होती ..आईच हे बोलणं ऐकून तर श्रेया आणि साहिल ओरडायलाच लागले ...अनु मात्र हात पाय आपटू लागली ......तिला राग आलं तिला हे सगळं खरच वाटलं ,

"ठीक आहे ..तुला हि मी आता नकोशी झाले न ....कोणीच नाही माझं ह्या घरात ..मला बोलायचंच नाही तुमच्याशी ."तोंड वाकड करून रागाने आणि वर रूम कडे जायला निघाली ..

"आग कित्ती आटा पिटा तो .............गम्मत  करतोय आम्ही .. आम्ही ह्यावेळेस रक्षाबंधन कास साज करायचा ते विचार करत होतो "-आई तिला समजावत 

"तू समजतेस तस काही नाही ..."-आणि  अनुच्या चेहऱयावर हास्य उमटतं "खरंच  .अरे हो राखी आली न जवळ ."आणि ती आईच्या गळ्यात पडते ...

"तर बघा ह्या ..ह्यांची दुनियाच निराळी ..आपला विचार पण नाही करत त्या बाईसाहेब .."-साहिल 

"ये तस नाही रे .... बार काय ठरलं मग ?"-अनु 

"अजून काही नाही ...दादा आणि साहिल आपल्याला भरपूर शॉपिंग करून देणार आहेत "-श्रेया 

"ये असं काही नाही ठरलं .."-साहिल 

"मी एक सुचवू का ?आमच्या संस्थेत जी मुलं आहेत न त्यानं आपण राखी बंधू आणि त्यानं गिफ्ट्स देऊ .."-मोहन 

"अरे वा मस्त कल्पना आहे "-आबा .."हो चालेल "-अनु न दुजोरा दिला  

"ठरलं तर मग ह्यावेळी आपन दादाच्या संस्थेत राखीचा कार्यक्रम करू .."-साहिल ,श्रेय 

सगळ्यांचं एकमत झालं आणि ठरलं सुद्धा ...

सगळे मज्जा मस्ती करून झोपायला जातात .....अनु रूम मध्ये आल्यावरगाणं गुणगुणत असते ..आज तिला खूप छान वाट असते ..एकतर रेवा आणि समीर बद्दल तिला सगळं कळलेल असत ....केदार च्य सोबत मैत्री झालेली असते ...आणि घरी सुद्धा सगळेच भेटलेले असतात ....  ह्यावेळी राखी चा एक आगळा वेगळा कार्यक्रम होणार होता ...

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....