Aug 18, 2022
कथामालिका

अनिका 35

Read Later
अनिका 35

https://www.irablogging.com/blog/anika32_7685

 

पूर्वसूत्र = (अनु आणि विक्रमाची भेट होते .अनिका त्याला युगराज बद्दल सांगते ..घरी आल्यावर तिला कळते कि आबा समीर कडे गेले आहेत ..ती सुद्धा समीर कडे जाते त्याला भेटायला ...समीर तिला सांगतो कि त्याला रेवा आवडते ...पण आता सगळं संपलाय ..आत पाहूया पुढे )

समीर म्हणतो ,"पुढे काहीही होणार नाहीये ..सगळं संपलंय "

अनुचा आनंद एका क्षणात मावळतो .

'का?तू असं का म्हणतोय ?"-अनु 

समीर तिच्याकडे वळतो आणि विचारतो ,"रेवा तुझी मैत्रीण आहे न ..मग तिने तुला सांगितलं नाही .."-सॅम 

"काय?कशाबद्दल ?"-अनु 

"आमच्याबद्दल ..."-समीर 

"नाही ..त्यादिवशी चुकून तिचा फोन मी घेतला जो कि तू केला होता ...म्हणून मग मीच विचारले ...पण तिने मला काहीच सांगितले नाही ..हे काय चाललंय ..तू मला काही सांगणार आहेस का  सविस्तर ?"-अनु 

"दादाच्या लग्नात मी रेवाला पाहिलं ..तेव्हा आमची मैत्री झाली छान ..मग आम्ही परत एक दोनदा भेटलो ...तिचे विचार ,तीच बोलणं हे सगळं मला कुठेतरी हळू हळू आवडू लागलं होत ....मला ह्याची कुणकुण लागली होती पण तिच्या मानत काय आहे हे माहित नव्हतं ? तुला आठवत तू एकदा आम्हाला कॅफे मध्ये भेटली होतीस "-समीर बोलत होता आणि अचानक थांबला 

"हो ,तुम्ही काहीतरी बोलत होतात ...आणि मी ..म्हणजे ...थोडासा थांबत विचार करत अनु पुन्हा बोलली ..म्हणजे त्यादिवशी तू तिला प्रोपोज केलस का ? मी मध्येच आले ..ओह शीट ...मूर्खच आहे मी पण ...anyway पुढे काय झालं ?"-अनु खूप उतावीळ होत होती 

"काही नाही ...मी तिच्यात इंटरस्टेड आहे हे तिला हि कुठेतरी जाणवत होत बहुदा पण ती ओळख देत नव्हती ...मी त्यादिवशी तिला सांगितलं कि ती मला आवडते ..पण ती काहीच बोलली नाही ...विषय बदलू लागली ..उडवा उडवी केली ..मला वाटलं कि तिला मी जे बोललो ते आवडलं नसेल कदाचित ..आणिमग तू पण आली तेव्हा ..."-सॅम 

"हम्म मी मूर्खपणाच केला तेव्हा ..मला तेव्हाच कळायला हवं होत .."-अनिका ...

"नाही असं काही नाही कारण तेव्हा जवळ जवळ ५ मिन आम्ही दोघेही शांतच होतो ...तू आल्यामुळे थोडा तरी रिलीफ मिळाला ....नंतर तिने माझ्याशी संपर्क कमी केला ....मग एकदा मी तिला तुमच्या ऑफिस जवळ गाठलंच ..आणि म्हणालो कि मी जेकाही बोललो ते तुला आवडलं नसेल तर प्लिज विसरून जा पण आपण मित्र तर राहूच शकतो न ,,,"-समीर 

"मग ती काय म्हणाली ? पण तिने होकार का नाही दिला .."-अनु 

"नाही तस शक्य नाही म्हणाली ....आणि म्हणाली कि कोणासाठी हि असा प्रेमाचं विचार करू शकत नाही ...तीच आयुष्य हे तीच नाही म्हणून ती त्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही ....प्रेम वैगरे ती करणार नाही कोणावर कधीच .."-समीर 

"पण का ?असं काय झालाय ?नेमकं "-अनु 

"माहित नाही ..ती त्या नंतर काही बोलली नाही ..."-सॅम 

"पण ती मला असं का म्हणाली कि त्यालाच विचार म्हणून  ...असं "-अनु 

"मी तिचा हात पकडला होता आणि .."-समीर 

"आणि काय ? काय केलंस तू सॅम ?"-अनु ...सॅम खाली मन घालून उभा होता 

"त्यादिवशी मी तीला बोलावलं होत  भेटण्यासाठी ..माझा विचार होत कि तिच्याशी शांतपणे बोलावं आणि तिला मनवावं पण जेव्ह आम्ही बोलायला सुरवात केली तेव्ह तीन सांगितले कि तीच लग्न ठरतंय ....आणि आता ती भेटणार नाही ..मला राग आला खूप ..इतके दिवस मी प्रामाणिक प्रयत्न करत होतो ,एक आशा होती कि मी तिला मनवेलच पण तीन असं बोलून सगळे मार्ग बंद केले ..मला खूप राग आला तिने सरळ सरळ माझ्या प्रेमाचं अपमान केला म्हणू मी तिचा हाथ पकडला घट्ट , आणि तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला सांगितलं कि जर ती माझी नाही झाली तर दुसऱ्या कोणाची हि नाही होऊ शकणार ,मी होऊ नाही देणार ...."-समीर च्या डोळ्यात त्यादिवशीचा प्रसंग दिसत होता ...

"सॅम .."-अनु काही बोलणार तेवढ्यात समीर पुनः बोलू लागला 

"अनु ,मला माहित आहे कि हे चुकीचं होत ..माझा असा काही हेतू नाहीये आणि नसणार आहे ..पण त्यादिवशी रागाच्या भरात मी बोललो ..तिला नसेलच माझ्यासाठी प्रेम तर जाऊ दे ..तिने खुश राहावं मी मध्ये येणार नाही ..मला वाटलं होत कि तीच माझ्यावर प्रेम आहे, कदाचित मला गैरसमज झाला असेल ......मला फक्त एकदा तिची माफी मागायची आहे म्हणून शेवटचं भेट असं म्हणालो ...बाकी काही नाही .."समीर खाली मन घालून बेड वर बसला ....अनिका ने खांद्यावर हात ठेवत त्याला समजावलं 

"हे बघ सॅम ,प्रेम कधीच जबरदस्तीने मिळत नाही ....तुझं प्रेम खर असलं तर ते तुला नक्कीच मिळेल ..मला माहित नाही रेवा ने जे सांगितल ते खरं आहे कि नाही पण तुला एक संधी नक्की मिळायला हवी ..मी प्रयत्न करेन तुझी आणि तिची भेट करून देण्याचा ...."अनु एवढं बोलून थोडं थांबून घरी परत येते ..

टेबल वर साहिल ,श्रेया ,मोहन मृणाल असतात ..आई आणि आबा रूम मध्ये गेलेले असतात ...

"अनु चल ये ,जेवायला..कुठे होतीस तू ?"-मोहन

"अरे समीर कडे गेले होते ,बरेच दिवस भेट नाही झाली न .."-अनु

मृणाल ने तोपर्यंत तीच ताट वाढायला घेतलं ... "वाहिनी थांब मला भूक नाहीये "-अनु

"का ग ?काही खाऊन आलीस का ?"-मृणाल   

"थोडास खाल्लंय समीर च्या घरी .."-अनु 

"कुठे आहे कुठे तो ?आलाच नाही इकडे बऱ्याच दिवसात .."-साहिल 

"थोडा कामात होता म्हणे .."-अनु

"आणि जरी आलं असता तरी तुम्ही असता का घरी भेटायला .."-श्रेया  

"ए काम करतो आम्ही.... तुझ्यासारखं timepass नाही करत "-साहिल 

"म्हणजे मी timepass करते असं म्हणायचं तू तुला "-श्रेया 

'नाहीतर काय ?  त्या कॉलेज मध्ये आहे काय ?नुसतं कांती मध्य गप्पा असतात तुमच्या "-साहिल 

"तू आलं होतास का बघायला आम्ही काय करतोय ते "-श्रेया आणि साहिलची चांगलीच जुंपली होती 

"अग तो तुला बघायला नाही तर पोरी बघायला आलं असेल "-मोहन आगीत तेल ओतत होता 

"पोरी ..छ्या ..त्याला कोणी भाव नाही देणार .."-श्रेया 

"ये ,तुला काय माहित ..पोरींचीरांग असते रांग माझ्यामागे ..."-साहिल फुशारकीय मारत बोलतो ..

"हो का ,मग निवडली का एखादी त्यातली .."?-मोहन मध्येच ..अन अनु आणि  श्रेया परत हसू लागतात .. 

"ये दादा ,तू नेमका कोणाच्या बाजून आहेस हं?"-साहिल 

"वाहिनीच्या .."-अनु आणि श्रेया एकदम ...तस मोहन आणि मृणाल आवक होऊन बघूलागले ..सगळे एकदमच हसू लागले ..हसात खेळत जेवण आटोपून सगळे आप आपल्या खोलीत गेले 

"अनु सुद्धा थकली होती,जाऊन बेड वर आडवी झाली लगेच ...

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर तिने तीच काम सुरु केलं ...तिला कस हि करून रेवा शी बोलायचं होत ...रेवा अजून आली नव्हती ती १२ नंतर येणार होती ...बाहेर एका बातमीसाठी तिला जाव लागलं होत ..अनु कामात व्यस्त होती ... रेवा सगळं आटोपून बाजू येऊन डेस्क वर बसली 

"बाप रे ,किती भयानक गर्दी आणि ट्रॅफिक आहे रस्त्यावर ...जाम दमले मी ..."-रेवा अनु ला सांगत होती ..अनु ने फक्त हलकी smile केलं केली..अनु विचार करत होती कि मुद्द्यावर कस   बोलाव सुरवात कशी करावी ...

"ह्ये ,कुठे हरवलीस मी तुझ्याशी बोलत आहे ...अनु "-रेवा

"इथेच आहे ..तू बोल .."-अनु तिच्याकडे बघत ...अनु तिच्या खुर्चीवर टेकून बसली होती तिच्या हातात पेन्सिल होती आणि ती बोटावर खेळत तिचा विचार सुरु होता ..... 

रेवा ने पुन्हा एकदा तिला हलवले आणि डोळ्यांनीच विचारले काय झालं?

 अनु अचानक म्हणाली” अभिनंदन तू सांगितलं नाहीस मला..”-

“ काय? कसलं अभिनंदन? काय नाही सांगितलं मी तुला”- रेवा ने विचारलं

“ अगं तुझं लग्न ठरलंय ना ते म्हणत होते.... तुला मला  सांगावंसं नाही वाटलं पण मला कळलं ते….. मग कधी आहे लग्न मला बोलावणार ना का ते पण नाही सांगणार.?’  -अनु कुत्सितपणे बोलत होती हे जाणवत होत कुठेतरी ....

“ अनु एक मिनिट तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही कोणाचं लग्न?... कधी आहे?"- रेवा 

“ अरे तुझं लग्न आणि तुलाच माहीत नाही असं कस होऊ शकत .."-अनु 

 "काही काय म्हणतेस तुला कोणी सांगितलं , माझं लग्न आणि तुला नाही सांगणार?

 का   तूच तर समीरला तुझ्या लग्नाबद्दल बोललीस... खोटं आहे का ते आणि जर ते खोटं आहे तर मग तू खोटं का बोललीस” अनिका 

 रेवा कावरीबावरी झाली तिला आपण काय बोलावं हे सुचेनासं झालं अनुने  तिच्यासमोर  पाण्याची बाटली पकडली

“ घे पी पाणी पी म्हणजे जरा शांत होशील आणि शांत झाली की मग मला सांग कोणासोबत लग्न करतेस ते...?

 रेवा परत आश्चर्याने बघू लागली आणि विचार करू लागली . तिला आपण काय बोलावे हे कळत नव्हतं . अनुने पुन्हा तिला बोलतं केलं ,"का ग? काय झालं? शब्द सापडत नाहीयेत का....... की पुढे काय खोटं बोलावं हे कळत नाही ...?अनु जाम चिडली होती ...तिला खोत बोललेलं आवडत नव्हतं ....आणि त्यात हि ती सगळं का लपवतेय ते कळत नव्हतं ..एखाद कोड सुटलं नाही ता अनिल भयंकर त्रास व्हायचा ....तिला चैन च पडत नसे ...

"रेवा ,मी कालच समीर ला भेटले आहे आणि मला सगळं कळलं आहे आता तू मला सगळं काही खरं खरं सांग.."-अनु 

 रेवा विचार करत असते ती पुढे सांगते," हे बघ अनु, तू समजतेस तसं काही नाहीये मी खोटे बोलत नाही”-  रेवा

"मग काय तू खरंच लग्न करतेस ?तुला समीर आवडत नसेल तर तास स्पष्ट सांग पण हे उगीचच चे खोटे नाते कारण का सांगतेस ..?'-अनु 

"अनु प्लिज समजून घे ...मी सांगेन तुला सगळं नंतर "-रेवा तिला शांत करत बोलत होती ..बरच वेळ त्यांची खुसर्फुसार चालू होती .मोनिका च्या ते लक्षात आलं होत त्यामुळे ती तिथे आली 

"किती वेळ असतो नाही तुमच्याकडे कामाव्यतिरिक्त ..गप्पा मारायला मारायला"-मोनिका त्यांना टोमणे मारत होती ..आधीच तर अनु च डोकं भडकले होते ...त्यात भर म्हणजे मोनिका ..

"हे बघा आम्ही गप्पा करत नव्हतो ..मह्त्वाचंच बोलत होत होतो"-अनु 

"ओह really ,काय होत ते महत्वाचं बोलणं ..सांगू शकाल का  ?...तुझं तर राहूच दे ...रेवा ..तू सांग काय एवढं बोलणं चालूहोत मागच्या १ मिन पासून तुमच्यात .."-मोनिका ने मोर्चा रेवा कडे वालावल होता ..रेवा काय बोलावे ते सुचत नव्हते ...तिने मान खाली घातली होती ..अनु मध्येच बोलत रेवा ला वाचवण्याचं प्रयत्न केलं केला"ते आम्ही एका केस साठी बोलत होतो .....

"केस साठी ..कोणत्या ?"-मोनिका मोनिका "ते आतच नाही सांगू शकत ..माहिती काढणी काम सुरु आहे "-अनिका 

"मिस अनिका ..तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला आठवण करून देते कि कि कोणतीही केस जेव्ह तुम्ही हॅण्डल करता तेव्हा त्याची कल्पना तुम्हाला सिनिअर ला द्यावी  लागते.."-मोनिका 

"मम् मी काही विसरले नाहीये ..आम्ही मारवा ग्रुप बद्दल बोलत होतो .."-अनु न एकदम एक नाव घेतलं .रेवा डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होती ...कारण तिला काहीच माहित नव्हते ....त्यामुळे काळात नव्हते ..अनु ने फक्त मोनिका च फोकस बाजूला व्हवा ह्यासाठी ते सांगितलं ..

"मारवा..?त्याच काय /केस काय आहे ?"-मोनिका 

"मॅम तेच तर शोढतॊय न .."-अनु 

"काय ?काय बोलत आहात कळतंय का ?"-मोनिका रागावून बोलते .."पुनः जर टाइम पास करताना दिसलं तर याद राखा .."-मोनिका एक धमकी देऊन निघून जाते पण अनु आणि रेवा ह्यांच्यामधला वाद अजून संपलेले नसतो .....सध्यातरी अनु तिच्या डेस्कवर आ रे तिच्याडेस्कवर बसून आप आपलं काम करायच प्रयत्न करतात ...अमुक मूड आ बराच वैतागलेला असतो ..तीच एकही काम नीट होत नसत ..रेवा सुद्धा उदास असते ....अनुच काम सुरु असत ....तीळ एक फोन येतो परत .....

"हॅलो ,लक्षात आहे न ....विरोधात जायचं नाही .."-धमकी देणारा माणूस ....

अनु आधीच रागात असते ...तिचा पारा पुनः चढतो ...."तू समजतोस को स्वतःला?हिम्मत असे तर समोर येऊन  बोल .फोनवर धमकी कोणाला देतोस ?मी नाही घाबरत .काय करायचं ते करू घे .."-अनु एव्हडं बोलत असत आणि फोन क होतो टीकडू स शुद्ध..सुद्धा आवाज मोठं झालेलं असतो ...तो केदार च कानावर पडतो तो तिथं येऊन विचारतो 

"का झालं मिस पाटील ...any प्रॉब्लम ?"-केदार 

"प्रॉब्लेम च प्रॉब्लेम आहे ...प्रश्न फक्त असतात उत्तर मात्र कोणीही देत नाही ....कितीह काम करा लोकांना वाटत की आम्ह फक्त टाइम पास करतोय ...."-अनु चिडू बोलत होत होती "रिलॅक्स मिस पाटील मला  काहीच कळत नाहीये तुम्ही कशाबद्दल बोलात आहात ....."-केदार 

"नाही कळत ना ,मग जाऊ द्य न मलाही नाही कळतये .."-अनु तीथुन निघून कँटीन मध्ये जाते. केदारला ल काही कळत नाही तो  नकारार्थी मान हलवतो आणि त्याच्या केबीन कड जातो ..थोड्यावेळ रेवा शुद्ध कँटीन मध्य जाते 

एव्हाना अनुचा पारा थोडं कमी झालेला असतो .....बाहेर पाऊस सुरु असतो ती खिडकीजवळच्या टेबल वर बसलेली असते ....रेवा  तिच्यासमोर दोन कप कॉफीचे घेऊन बसते .....रेवा तिच्याकडे बघत असते ..अनु तिला बघून न बघतिलयासारखं करते आणि मोबाईल उचलून जायला निघते तोच रेवा तिचा हात पकडते "थांब ..मला बोलायचं आहे तुझ्याशी ....."

अनु तिच्याकडे बघते .."काय बोलायचं आह आहे?"-

"बैस .सांगते .."-रेवा ..अनु बसते 

"मला तूला दुखवायचं नव्हतं ..मी हे तूला आधीच सांगायला हवं होत ....सगळं काही अचानकच झालं आहे ..."-रेवा 

"हे बघ मी जरा जास्तच बोलले .....मला फक्त त खोटं बोलल्याचं राग आला इतकंच "-अनु 

"पण मी खोटं नाही बोलले ....."-रेवा 

"म्हणजे ..तुझं खरच लग्न ठरलंय ?"-अनु कुतूहलानं विचारात होती ...

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....