पूर्वसूत्र = अनिका ला धमकीचे फोन येत असतात ...ती सगळं आटोपून ऑफिस मध्ये जाते तिथे तिला रेवा आणि समीर बद्दल कळत ...आणि श्रीचा पण फोन येतो ...केदार हळू हळू अनु कडे झुकतोय हे लक्षात आल्यावर मोनिका चिडते आणि काही कारण नसताना अनु वर राग काढते ...अनु श्री ला भेटण्यासाठी निघते ..आता पाहूया पुढे
ऑफिस संपवून अनु निघते. ऑफिस बाहेर टॅक्सिची वाट बघत असते तेवढ्यात केदार येतो
"मिस पाटील ..बसा मी सोडतो तुम्हाला ....."-केदार
"नाही सर नको मी कॅब बुक करते .."-अनु
"तुम्ही कॅब च बुक केलीये असं समजा ...हवं तर पैसे द्या ..पण आता मध्ये बसा ....पाऊस केव्हाही येऊ शकतो .."-केदार
अनुला थोडं आश्चर्य वाटत ..हा असा काय बोलतोय ते ? मग ती पटकन बसण्याच्या नादात जाते तर हाताला ब्रेसलेट खाली पडत ....ती ते उचलते सहज म्हणून लक्ष जात तर एक माणूस तिच्याकडे लक्ष देऊन असतो असं तिला वाटून जात पण त्या माणसाची नजर दुसरीकडे असते ....ती दुर्लक्ष करते आणि गाडीत बसते
"सर मी गेले असते ... कशाला उगीच तुम्हाला त्रास ...."-अनु
"मिस पाटील ..आपल्या लोकांची, कलिगची काळजी घेण्यात कसला आलाय त्रास ...?"-केदार बोलत होता ..त्याचा मूड छान होता आज ..त्याचा विचार होता कि आज अनु सोबत पुन्हा एकदा कॉफी प्यावी आणि बोलावं ....पण त्याला अनुच्या प्लॅन विषयी काहीच माहिती नव्हतं ...
"मिस पाटील ..सॉरी .."-केदार ने बोलायला सुरवात केली ..अनु तिच्याच विचारात होती ...केदार अचानक असं काही म्हणेल हे तिला समजण्यापलीकडच होत .."हं ?"-अनु चकित होऊन त्याच्याकडे बघते "कशासाठी ?"-अनु
"आज मोनिका जे काही वागली ते बरोबर नव्हतं ..म्हणजे तिने सगळ्यनसमोर असं करायला नव्हता पाहिजे ..."-केदार
"हा ते ..मी त्यांना तेच समजावत होते कि त्यांना काहीतरी गैरसमज झालेला आहे .....मी एका न्युज साठी फोनवर बोलत होते "-अनु
"बातमी ..कोणती बातमी ?"-केदार विषय बदलत ..
"अं ..ते अजून पक्की नाहीये पण बघू त्याचीच माहिती काढायचं चाललंय ....."-अनु
"ओके नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं नसेल तर राहू द्या ..काही हरकत नाही पण लक्षात असू द्या टीम सोबतच जायचं कुठेही जायचं असेल तर ......नाही मला माहिती आहे कि काहीतरी खास बातमी असणार पुन्हा एकदा ..."-केदार
"नाही सर असं काही नाही पण खरंच मला अजून पक्के काही कळलं नाहीये ..एक मिनिट आपण कुठे चाललोय ?"-अनु ..केदार ने गाडी वळवली होती ,
"सॉरी मी तुम्हाला विचारले नाही पण मला वाटलं आपण एक एक कॉफी घेउया का सोबत ?"-केदार
"सर ,आज नको प्लिज मला एका ठिकाणी जायचं आहे ..urgent .."-अनु ..थोडासा पप्पी face करत बोलली ..खर म्हणजे केदार ला नाही हा शब्द आवडायचा नाही तेही एका मुलीने त्याला नकार दिला हे तर फारच अवघड होत ..
"ओके ठीक आहे ..."-केदार
"सॉरी सर ..पण तुम्ही मला पुढच्या बस स्टॉप ला सोडा ?मला कॅफे मून ला जायचं आहे ..मी जाईन ...."-अनु
"ठीक आहे मी तुम्हाला तिकडे सोडतो ...काही हरकत नाही .."-केदार ने लगेच गाडी वळवली ..
"नाही सर ..ते... "-तोपर्यंत केदार ने गाडी वळवली होती ..तो थोडा शांत होता अनु ला हि कळत होत कि काहीतरी बिनसलंय ...पण आज खरंच तीच आधीच ठरलं होत ती तरी काय करणार होती ...अनुचा फोन वाजला
"हॅलो ,हा मी रस्त्यात आहे पोहचते १० मिनटात .."-अनु ..फोन श्री चा होता ..इकडे केदारने गाडीची स्पीड वाढवली होती
"सर इट्स ओके ...पोहचू आपण .."अनु
केदार ने लक्ष नाही दिले आणि गाडी कॅफे मून च्या गेट जवळ थांबवली ..
"सॉरी ,माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला ...."-केदार थोडं तिरसाट पणे बोलला ..
"नाही सर असं काही नाहीये ..."-अनु तो जास्त लक्ष देत नाही पाहून अनु ने काढत पाय घेतला ..आणि गाडीतून उतरली
"थँक you सर .."-अनु ..आणि केदार जबरदस्ती हसून निघून गेला ....
"बाप रे ,काय माणूस आहे ...अचानक वेगळा वाटत होता ..काय झालं काय माहित ?"-अनु स्वतःशीच विचार करत आत गेली तीच बाहेर लक्षच नव्हतं .. श्री आधीच आलेला होता ....
"हेय सॉरी,किती वेळ झाला तुला येऊन ?"-अनु
"हे आपले २० मिन ..तू कुठे अडकली होतीस ?"-श्री
"अरे आज माझा बॉस मला सोडत होता, त्याला actually माहित नव्हते मला इथे यायचं आहे ते ..तो कॉफी साठी बाहेर जाऊ म्हणाला तेव्हा त्याला मी सांगितलं आणि मग त्यानं इथे सोडलं ..जाऊ दे ....ते नंतर बोलू आधी तु काय म्हणत होतास ते सांग?"-अनु
"अग हो हो ....किती हा उतावळेपणा ....बाप रे ..एवढं तर कोणी आपल्या प्रियकरासाठीही उतावीळ नसेल .."-श्री उगीचच खेचत होता ...वेटर ने दोन कॉफी आणि sandwitch आणून टेबल वर ठेवले ....
"ये गप रे ,तुला काय माहित प्रियकरासाठी कायकाय करायचं असते ते ...तू केलाय का प्रेम ?"-अनिका
"हं ,आमचं एवढं नशीब कुठे ..?तू करते वाटत प्रेम .....?"-श्री उगीच timepass करत होता ...तिला चिडवायला
"हम्म केलाय न कामावर माझ्या ...तुझी भंकस झाली असेल तर कामाचं बोल ..प्लिज बोल नारे .."-अनु. श्रीधर ल हसू आवरत नव्हते ..अनु नेअक्षरशः हात पाय आपटले लहान मुलीसारखे....
"ओके ओके ..थांब ..लहान मुली सारखं खाली बसून लोळ शील नाहीतर आता .....सांगतो .."-श्री हसत होत अनु हि ....
" युगराज धर्माधिकारी ..मोठं business मन आहे...कमी वयात खूप काही कमावलंय ....."-श्री बोला होत होता
"त्याला अवॉर्ड मिळाला आहे ..ईश्वरी हॉस्पिटल त्याच आहे ....तो खूप हुशार आहे ,देखणा आहे .ब्ला ब्ला bla ........पुढे बोलशील हा मला माहित आहे .."-अनु
"अरे वा ..बराय कि मग ..तेच तर सांगायचं होत "-श्री
तू मार खाशील हा .."-अनु
"ओके ओके नो भंकस .."-श्री
"जे तुला माहित आहे ते खरंय पण जे तुला माहीत नाही ते असं कि त्यानं कमी वयात खूप काही गमावलाय सुद्धा ...एवढं मोठं जे उभं दिसतंय त्यासाठी खुप गोष्टी त्याला कराव्या लागल्या .....मागे एकदा ईश्वरी हॉस्पिटल मध्ये औषधांचा काळाबाजार होतो अशी बातमी होती ..तेव्हा तो आणि त्याच काका योगेश धर्माधिकारी दोघे मिळून ते हॉस्पिटल बघत होते ...नंतर काय झालं ते काही कळलं नाही... केस दाबण्यात आली ..गावाकडे ह्यांचं मोठं घर अजूनही आहे ...त्या केस मध्ये काही हाती लागलं नाही ...त्यादिवशी ज्या ड्रगस च्य लोकांना पकडले तिथं तो होत असं तूझ म्हणणं आहे.. असू शकतो पण त्याच ह्या गोष्टींशी किती संबंध आहे ..आहे कि नाही ते आजून स्पष्ट्पणे सांगता येत नाही ....पूर्वी धर्माधिकारी आणि मारवा असे दोघे मिळून काही व्यवसाय करात होते ..पण नंतर मारवा वेगळे झाले ...त्या दिवशीचे ड्रुग्स च लोक किंवा असे म्हणू कि ते रॅकेट मारवा ग्रुप शी संबंधित आहे ....मारवा आणि धर्माधिकारी का वेगळे झाले हे कळलं नाही ....दुसरं असं कि मारवा हा ग्रुप मोठा आहे त्यांचं काळे धंदे आहेत पण धर्माधिकारी च काळबेर आहेत कि नाहीत हे आजून उजेडात तरी नाही आले.."-श्री
"बाप रे ,बरंच काही आहे म्हणजे अजुन गुलदस्त्यात ......तू म्हणाल कि त्याचे काका आणि तो असे व्यवसाय बघात होते पण मग त्याच वडील म्हणजे कुटुंबाबद्दल काही माहिती ?"-अनु
"त्याचे वडील ह्या जागात नाही ....ईश्वरी हे त्याच्या आईचे नाव त्या सुद्धा नाहीत ...त्याच्या कुटुंबाविषयी बाहेर काही जास्त माहित नाही कारण काहीही झालं तरी त्याला त्याच्या कुटुंबाला प्रकाशझोतात आणायचे नाहीये,त्याला आवडत नाही ते आणिम्हणून तर त्या सगळ्यांना ह्या सगळ्यापासून दुर ठेवतो तो ...त्याचे आई वडील नाही ....गावाकडे मोठं घर आहे बहुतेक तिकडे त्याची माणसं /कुटुंब असेल अंदाज आहे ...इकडे मात्र तो त्याच्या एक मित्रांसोबत म्हणज राकेश सोबत असतो .तो त्याचा तो फक्त मित्र नसून भाऊ ,बॉडी गार्ड हितचिंतक सगळं काही आहे त्याच्या घरात कोणीहि कधी हि घुसू शकत नाही ..त्यामुळे घरात खरच कोण कोण असत हे बाहेर जास्त माहित नाही ......"-श्री ...
"हं बऱ्यापैकी मोठी आसामी आहे ..पण ह्या पर्यंत पोह्चायच कसा ? मला सगळं बाहेर आणयच आहे ?"- अनु
"अनु तू एवढं का ह्याच्या मागे लागली आहेस? "-श्री
"अरे हे बघ बातमी मोठी असली कि मजा येते ....आणि तस हि मला ह्याच्या मुळापर्यंत जायचंच आहे ..मला धमकी देतो का ?"-अनु
"काय ?काय म्हणालीस ?धमकी ?कोणी दिली ?"-श्री
"अरे सोड न ..."-अनु
"नाही तू सांग मला काय म्हणालीस ते ....तुला कोण धमकावत का ?"-श्री
"actually ,एकदा दोनदा फोन येऊन गेले ..कोण बोलताय माहित नाही ..पण मी काल जेव्हा पोलीस स्टेशन ला गेले ते सुद्धा त्या लोकांना माहित आहे ....मला म्हणाले कि त्या गुंडाना ओळखून मी चूक केली ..त्याचे परिणाम वाईट होतील ...."-अनु
"तुला असं का वाटत कि हि धमकी युगराज च्य लोकांनीच दिली असेल ?त्यांनी तस नाव घेतलं का ?नाही म्हणजे जे पकडले गेले ते "मारवा" चे लोक होते ..."-श्री
"नाही रे ,नाव कशाचं माझा अंदाज होता तो ....आणि हे मारवा प्रकरण आत्ता कळतंय मला ....त्यामुळे अजून मी तो विचार केलाच नव्हता ... पण आता हे मारवा प्रकार पण उघडावं लागेल "अनु
"हम्म ,जरा सांभाळून .....तू पोलिसांना सांगून टाक complain कर ...."-श्री
"हो अरे आज करणार होते पण जमलंच नाही उद्या बोलते विक्रांत शी .."-अनु. अनु ने आणि श्री ने बऱ्याच गप्पा मारल्या ...नंतर अनु घरी निघाली ....श्री म्हणाला कि सोडतो पण ती कॅब नेच गेली. घराजवळ उतरली परत तिला एक गाडी जरा अंतरावर उभी दिसली तिला शंका आली पण तेवढ्यात ती गाडी तिथून निघून गेली ....अनु घरी येते
"हॅलो वाहिनी ,दादा आला नाही का अजून ?"-अनु
"नाही ग ,ते उशिरा येतात .. अलीकडे.. तू चहा घेणार का ?"-मृणाल
"अग राहू दे ,बाहेरून खाऊन आलेय मी ..आई कुठेय ?दिसत नाहीये "-अनु
"आग त्या आणि आबा समीरच्या घरी गेले आहेत ..सहज म्हणून .."-मृणाल ..अनिका ला अचानक ऑफिस मधला किस्सा आठवतो .रेवा आणि समीर ती पूर्णपणे विसरली होती ....
"हो का ,बार वाहिनी मी येते फ्रेश होऊन ....आणि हो मी जेवणार नाहीये थोड्यावेळाने थोडासा दूध घेईन फक्त ...मी घेईन तू जागी नको राहूस ..."-अनु रूम मध्ये जाते ..फ्रेश होते आणि गर हवेसाठी गॅलरीत येते...सकाळपासून झालेल्या सगळी गोष्टींबद्दल विचारमंथन सुरु असत तीच .....समीर असा का वागत असेल? काय झालं असेल ? भांडण ..पण इतका टोकाचं नाही काहीतरी दुसरच आहे ...उद्याच भेटते त्याला ...आणि हे युगराज आणि मारवा काय प्रकार आहे शोधालाच पाहिजे ...औ च्या डोक्यात बरेच विचार सुरु होते ....शेवटी ती फेऱ्या मारून थकली आणि रूम ध्ये जाण्यासाठी वळली तर तिला बंगल्याबाहेर एक जण घुटमळताना दिसला ....तिने बारकाईन बघितलं ...तो माणूस तिथून निघाला आणि एक गाडीत जाऊन बसला पण ती गाडी तिथेच होती ....ती रूम मध्ये गेली ...आणि विचार करू लागली ...
"कोण असेल तो ?माझ्यावर कोणी पाळत ठेवत असेल का? उदय विक्रांत शी बोललाच पाहिजे .....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा