Jan 28, 2022
मनोरंजन

अनिका 6

Read Later
अनिका 6

https://www.irablogging.com/blog/anika5_4716

(भाग ५ साठी वर क्लिक करा .)

 

दुसऱ्या दिवशी घरी मोहन साठी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो ..आई सकाळपासूनच आशा बाईंच्या मदतीने सगळं आवरत असते ...श्रेया कॉलेज तर साहिल प्रेस मध्ये जातो ..आई च्य हुकुमावरून आबा ना घरीच राहायचे असते ...अनु ला तर ऑफिस होते.घरी फक्त आई ,आबा ,मोहन ,आणि आशा बाई असणार होत्या ...

"आई ,मुलीचं  नाव काय आहे ग ?'-अनु 

"मृणाल ..."-आई 

"व्वा ,नाव तर मस्त आहे ...चला तुम्ही चालू द्या मला उशीर होतोय ..संध्याकाळी बोलू आपण .."-अनु 

अनु ऑफिस साठी निघते आज दुपारी तिला एक मुलाखत कव्हर करायची होती ..ती सगळी माहिती गोळा करते आपला पूर्ण अभ्यास करून त्या व्यक्ती कडे जाते ..

"हॅलो सर ,मी अनिका पाटील .."आय "टीव्ही कडून आले आहे ....आपलं फोन वर बोलणं झालं होत ."-अनु 

हो या न ..आत या बसा ..."-ती व्यक्ती ....आत जाऊन त्यांच्या बायकोला बोलावते ...दोघेही येऊन बसतात .अनु आणि कॅमेरामन दोघे तयारी करतात ....अनु ची त्यांच्याशी ओळख होते ..गप्पा होतात आणि मुलाखत सुरु होते ...

"नमस्कार  आज आपण भेटणार आहोत एका अश्या व्यक्तीमत्वाला जे अगदी आपल्यासारखं आहे ...पण तरीही त्यांचं काम असामान्य आहे.. त्यांचं नाव आहे .. डॉक्टर बनसोड सर .गेली १० वर्ष अनाथ मुलांना आणि वयोव्रुद्ध असणाऱ्या व्यक्तींना अगदी मोफत उपचार देत आहे    आणि .. त्यांच्या सौ .म्हणजे  कमला बनसोड मॅडम ह्या  शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून ,अनाथ मुलांना मोफत शिकवतात ...."

"सर ,आमच्या प्रेक्षकांना तुमच्या दोघां- बद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे काय सांगाल ?"-अनु 

"नमस्कार ,मी दिलीप बनसोड आणि ह्या आमच्या सौभ्याग्यवती कमला बनसोड ... मी एक  डॉक्टर आहे आणि आमच्या सौ शिक्षिका आहेत ... आमचा मुलगा अमेरिकेत असतो .आपल्या कडे असे अनेक अनाथ मुलं आणि वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना कोणाचाही आधार नाही ..त्यांच्याकडे जगण्याचं काही साधन नाही ...आणि अश्या माणसांचं आपलं आरोग्याकडे बघण्याच दृष्टिकोन हि बदललेला असतो .त्यानं वाटते कि आपल्या कडे पैसे नाही तर आपण इतके भले मोठे आणि महागडे उपचार कसे करून घेऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना जगण्याचा एक समान अधिकार मिळावा आणि त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांच्या वर उपचार करतो ..ते हि निशुल्क ...आणि त्यासाठीच आम्ही आमच 'सेवाश्री' नावाचं हॉस्पिटल उघडलं आहे ...'-डॉक्टर 

"छान ,छान मॅडम तुम्ही सुद्धा अनाथ आणि गरजू मुलांना गेली कित्येक वर्षे  निशुल्क शिकवत आहात .....तुम्ही  ह्या कार्याची सुरवात कधी आणि कशी केली ?"-अनु 

"खरं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच मला शिकवण्याची खूप आवड होती ..त्यासाठीच मी माझं शिक्षण पूर्ण करून एक शिक्षिका झाले ..एक समाज जर घडवायचं असेल तर त्या समाजात नीतिमूल्ये रुजवावी लागतात आणि ते काम एक शिक्षक खूप चांगल्या प्रकारे करू शकतो असं मला वाटत ....त्यामुळे मी आधीपासून बऱ्याच मुलांना शिकवत होते ...आजची मुलं हि उद्याचे शिल्पकार असतात . पण जी  अनाथ मुलं असतात त्यांच्याकडे शिकण्यासाठी पैसे नसतात आणि मग ते शिक्षणापासून वंचित राहतात,सगळ्यांना समान शिक्षण मिळावे हा माझा हेतू आहे आणि त्यासाठी मला जमेल तेव्हा ,जमेल तस मी कार्य करत असते ."- कमला बनसोड मॅडम .

"नक्कीच ,खूप छान विचार आहेत तुमच्या दोघांचे ...सर मी असं ऐकलंय कि तुमच्या  हॉस्पिटल मध्ये तुम्ही काही खास उपक्रम हि राबवता त्याची थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या ना .."-अनु 

" हो ,म्हणजे आमच्याकडे महिन्या च्या शेवटच्या रविवारी वृद्धाश्रम मधील वृद्ध आणि अनाथाश्रम मधील अनाथ मुलं ह्यांच्यासाठी काही कार्यक्रम असतात .त्यादिवशी अनाथ मुलांना आपल्या आज्जी आजोबांचं प्रेम मिळत आणि वयस्क माणसं ना नातवंडांचे लाड पुरवत येतात ...तसेच जे वृद्ध आमच्यकडे उपचार घेतात त्यातल्या काहींची आपल्या अवयव दान करण्याची इच्छा हि असते तर आम्ही त्यांची हि इच्छा पण पूर्ण करतो ..असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो ..."-डॉक्टर 

"तुम्ही समाजातील तरुणांना काय संदेश द्याल ?"-अनु 

"आपल्या भारत देशात ज्ञानाची गंगा वाहते ,ह्या ज्ञानगंगेचा उपयोग सगळ्यांनी सत्कारणी लावावा म्हणजे झालं ...सगळ्यानि आपले अधिकार आणि माणुसकी जपावी ..हीच आमची इच्छा आहे .."-कमल मॅडम 

"मी म्हणेन कि ,आपल्या पैकी बऱ्याच लोकांकडे हि कुवत असते कि तो दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो ,मदत हि फक्त पैशानेच करत येते असं नाही ,ज्या मार्गाने आपल्या ला दुसऱ्यांच्या उपयोगी पडत येईल त्या मार्गाने आपण आपले कार्य ,कोणतीही अपेक्षा न ठेवता करावे एवढेच !"-डॉक्टर बनसोड .

"नक्कीच ,तुमच्या कार्याकडे बघत अनेक तरुणांना ह्यातून प्रेरणा नक्की मिळेल .तुम्ही दोघांनी आम्हला तुमचा इतका बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी धन्यवाद .!"-अनु 

अनु तिच्या मुलाखतीचं काम संपवून परत ऑफिस ला निघाली होती ..

इकडे अनुच्या घरी मृणाल आणि तिचे काका काकू आणि आई  असे तिघे आले होते . चहा पाणी झालं होत, बोलणी सुरु होती 

"मृणाल तुला आमच्या मोहन ला काही विचारायचे असेल तर विचार हो .."-आई 

"हो आणि मोहन तुही बोल रे तिच्याशी ..एक काम करा मोहन ,तू मृणाल ला आपलं बाग बगीचा दाखव ...."-आबा 

दोघेही बाहेर येऊन बसतात .. काय बोलावं हे दोघांनाही सुचत नाही ....मृणाल दिसायला सुंदर असते ..काहीतरी सुरवात करावी म्हणून मोहन विचारतो ,

"तुम्हाला काय काय आवडत ?म्हणजे तुमचे छंद काय आहेत "?

"मला पेंटिंग करायला खूप आवडत ...आणि ड्रेस design सुद्धा ....आणि तुम्हाला ?'-मृणाल 

"समाजासाठी काहीतरी करावे हेच माझा छंद आणि हाच माझा ध्यास आहे .."-मोहन 

"हो म्हणजे काका म्हणाले होते कि तुम्ही एका संस्थेत काम करता ..आणि तुम्हाला लोकसेवा करायला खूप आवडते ...."-मृणाल 

"हो ,मी माझं जीवन त्यांच्यासाठीच अर्पण करायचं असं ठरवलं आहे ....जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते ,प्रेम दिल तर प्रेम,हास्य दिल तर हास्य आणि द्वेष केला तर द्वेष ..."-मोहन .

"म्हणजे जर तुम्हाला कोणी साथ दिली तर तुम्ही हि त्याला साथ द्याल..हो ..न ..?"-मृणाल थोडस स्मितहास्य करत  ,लाजत आणि मोहनच्या डोळ्यात बघून विचारात होती ..मृणाल ला मोहन आवडला होता ..मोहन हि क्षणभर तिच्या ह्या प्रश्नावर विचार करत तिच्या डोळ्यात हरवून गेला होता .....आतून दोघांनाही बोलावंन आलं आणि तस त्याने हसतच तिच्यावरून नजर हटवली ..दोघेही आत गेले ....

इकडे अनिका ऑफिस मध्ये पोहचली होती ..तिच काम आज हि छानच झालं होत ....सहज इकडे तिकडे नजर फिरवली पण रेवा ,अवनी ,ऋचा ,ओमी कोणी दिसत  नव्हते..बघता बघता नजर केदारच्या केबिन कडे गेली तर तो फाईल मध्ये डोकं खुपसून होता ..अनु न आपलं काम सुरु केलं. लॅपटॉप उघडला आणि काही नोट्स काढू लागली ..तेवढ्यात तिचा फोन वाजला.

"हॅलो ,बोला ....हं ,हं ,ओके  ...."-अनु गंभीरतेने काहीतरी ऐकत होती ...हे स्पष्टपणे जाणवत होते ....तिने फोन ठेवला आणि लगेचच इंटरनेटवर काहीतरी संशोधन सुरु केले ....आपल्या कामात ती इतकी गढून गेली कि तिला ऑफिस ची वेळ संपली  हे कळल च नाही .....तिला उशीर झाला होता. तिने पटापट आपलं सामान उचलल आणि निघाली. गेट च्याबाहेर आली तेव्हा रिक्षाच मिळेना ...इकडे तिकडे बघत होती तेवढयात एक कार समोर येऊन थांबली .

......................................................................................................................................................................................

ती कार कोणाची असेल ? अनु ला फोनवर काय कळले ? मोहन आणि मृणाल चा निर्णय काय असेल? 

बघूया पुढच्या भागात ..

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....