अनिका 5

journey of women

.. https://www.irablogging.com/blog/anika-4_4668

(भाग ४ ची लिंक वर दिली आहे ..)

दुसऱ्या दिवसापासून अनु च ट्रैनिंग सुरु होत त्यानंतर आता तिला काम सुरु करायचं होत ....तस पाहिलं तर त्या अनुषंगाने आज तिचा पहिलाच दिवस असणार होता ..आज काम सुरु करायचं होत . सगळं आवरून नाश्त्याच्या टेबल वर अनु आली ,

"आवरलं का सगळं ? आज दही साखर खाऊन जा हो ....छान काम कर ..यशस्वी हो .."-आई 

" मज्जा आहे बाबा एका पोरीची .....आता काय टी   व्ही  वर दिसणार ...आम्हाला आता कोणी विचारणार नाही .."-श्रेया उगीचच चिडवत होती ...तेवढ्यात मोहन दादा येतो ..

"आग मज्जा माझी नाही एका मुलाची आहे .....डोळे बघ ..आता पासूनच झोप गायब झाली आहे .."-अनु 

दोघी हि मोहन ला बघून चिडवत होत्या ....

"ये ,गप  ग तू ....नवीन काम आहे त्यावर लक्ष दे ... झोपेचं म्हणशील तर पुस्तक वाचत होतो रात्रभर ..बाकी काही नाही "-मोहन 

" ते सगळं ठीक आहे रे ..पण तू पुढे बोलला नाहीस काही ....मी बोलावू न त्यांना ..."-आई 

"हा ..म्हणजे बघ.. तू .ठरव ..मला तर आताच काही घाई नाही ...."-मोहन पेपर बघत बोलत ..

"हम्म ..असं का ? बघू जरा बघू ...आपला चेहरा बघा जरा आरश्यात कसा लाल झालाय .."-अनु श्रेया ला टाळी देत बोलली 

सगळेच हसायला लागले ..खेळी मेळित नाश्ता उरकून सगळे आप -आपल्या कामाला गेले सुद्धा ..

अनु ऑफिस मध्ये पोहचली ...तिच्या जागेवर बसली आणि लॅपटॉप वर काही तरी बघत होती ..इकडे तिकडे बघता बघता सहज नजर वर गेली तर केदार त्याच्या केबिन मध्ये कोणाशी तरी फोन वर बोलत होता ..अनु त्याच्याकडेच बघत होती ..इतक्यात "हम्म ,स्मार्ट आहे नाही आपला बॉस .."- रेवा 

अनु  दचकलीच एकदम ...तिने नजर खाली केली.."नाही म्हणजे ठीक आहे मी बघत होते ऑफिस मध्ये कुठे काय आहे ते ...इथे  चहा ,कॉफि कुठे दिसतंय का ते बघत होते .."-अनु ने सारव साराव केली ...

"आग असू  दे ग ,चांगल्या गोष्टींकडे नाही पाहायचं तर कुठं पाहायचा ..आणि तस हि चहा कॉफी इथून दाराबाहेर गेल्यावर उजवीकडे आहे .."-रेवा 

दोघी आपल्या कामाला लागल्या. अनु ची आणि रेवा ची चांगली मैत्री झाली होती ....तेवढयात एक मिटिंग साठी बोलावन आलं .

केदार सगळ्या सोबत मिटिंग करायचा सकाळी ११ वाजता ....

'तर मग सुरु करूयात ...आजच सगळं प्लॅन सांगा ..."-केदार 

"सर आज एका प्रदर्शनासाठी जावं लागेल ...त्याच्याचसोबत एका नृत्यं कार्र्यक्रम पण आहे ..ते सुद्धा कव्हर करेन मी.."-रेवा

"काही राजकीय घडामोडी होणार आहे तर मी तिथूनच लाईव्ह करेन..माझ्यासोबत विक्की असेलच ."-ओमी

"आजचा वेदर रिपोर्ट तयार केला आहे ....त्याच वाचन वेळेवर होईल ."-अवनी

"ओके .तुमचं काय अनिका  पाटील ...तुम्ही काय करणार आहात?..का काहीच नाही ."-केदार

"अम्म,नाही म्हणजे सर मी online काही डेटा बघत आहे ...तयार झाला कि सांगेन .."-अनु

"मिस .पाटील तुम्ही जे करताय ते ठीक आहे ..पण इथे बातम्या शोधून आणाव्या  लागतात आणि त्यावर काम हि करावं लागत ....आपल्या सगळ्यांना आपल हे चॅनेल टॉप वर घेऊन जायचं आहे ...खरी खबर हि बाहेर आलीच पाहिजे ...आज भले हि नसेल पण उद्यापासून बातमीवर लक्ष द्या ...online तर काय चालूच असत ...ठीक आहे तर मग ...कोणाला काही अडचण असेल तर केबिन मध्ये या ..आणि विचारा ...."-आणि केदार मिटिंग संपवून तिथून निघून जातो ..सगळे बाहेर अप आपल्या कमल जातात .अनुला जरा वेगळंच वाटत ..तिच्याकडे बातमी नाही असं नाही पण ती काम समजून घेत होती आणि केदार तिला फारच रुक्ष वाटला ..."त्याला काय म्हणायचं होत आपल्याला काम नाही ...कि आपल्याला येत नाही ..मी बातमीवरच तर काम करत होते ...ठीक आहे तस तर तस .मी दाखवतेच अनिका काय चीज आहे ते .."-स्वतःशीच अनु विचार करत होती ..

ती पुन्हा आपल्या कामाला लागली.....काही तरी ठरवून बाहेर गेली .....२ तासात परत आली

"हे ,अनु कुठे होतीस ..?"-रेवा

"काही नाही जरा काम होत एका बातमीच ..."-वर केदारच्या केबिन कडे बघत ती बोलली .

"मी आलेच ह.."अनु केदार च्या केबिन कडे गेली ."मी आत येऊ का ?"-अनु

केदार एक फाईल चाळत होता ..दाराकडे न बघता म्हणाला "या .."-

"सर हे रिपोर्ट्स ...."-अनु

वर डोकं करून "कशाचे ..?"-केदार

"सर तुम्ही म्हणाल होतात कि ,बातमी स्वतःच आणावी लागते ..तर हि ती बातमी ..मी ह्याच बातमीवर ऑनलाईन काम करत होते .."-अनु  ने थोडं ताठ मानेने आणि डोळे त्याच्याकडे रोखून एका दमात सांगून टाकले.

केदार तिच्याकडे बघत बोलला"मिस पाटील ..इथे काम करायची एक पद्धत आहे ..तुमच्या कडे जर बातमी होती तर ती तुम्ही तेव्हाच सांगितली का नाही ..? आणि हे जे तुम्ही करताय ते तुमचं कर्तव्य आहे ...बाय द वेय  ..काय आहे बातमी?"-केदार

"एका बिल्डर ने घोटाळा केलाय ....घर देऊ म्हणत म्हणत पैसे घेऊन लंपास झालाय .."-अनु

थोडस गालात हसत ...."त्याने पैसा घेतले ,तो बुडाला ....तो खूप मोठा बिल्डर होता ....त्याचे ५ प्रोजेक्ट्स झाले आहे आणि सध्या दोन वर वर काम चालू आहे ..मागच्या काही दिवसांपासून तो गायब आहे ..आणि त्याच नाव आहे शर्मा बिल्डर्स ...बरोबर ना ..?"-केदार ने सगळंच अनु ला सांगितलं ती बघतच होती ..तिच्या चेहऱ्यावर प्रश्न होते कि सगळं ह्याला कास माहित ..?तेवढ्या परत केदार म्हणतो ,"मला कस माहित एवढं सगळं ?हा प्रश्न पडला असेल न ..?तर मिस पाटील ह्या बातमी ची मी पूर्ण माहिती  आधीच काढली आहे .मला वाटलं कि तुम्ही काहीतरी नवीन घेऊन याल ..पण तुम्ही तर.....anyway   तुम्ही हा रिपोर्ट घ्या ह्यात थोडी अजून सविस्तर माहिती आहे तुम्हाला ह्याचा उपयोग होईल .तुम्ही हि बातमी कव्हर करा ....अजून काही .."-केदार परत फाईल बघत बसतो ..

अनु विचारात पडते ..तिला थोडा राग येतो. आपलं कौतुक करण्यापेक्षा त्याने चार शब्द आपल्यालाच सुनावले असं तिला वाटू लागत ....ती फाईल घेते आणि केबिनच्या बाहेर येते .बाहेर येऊन फाईल बघते त्यात खरंच सविस्तर सगळं असत ..आत तिला फक्त कॅमेरापुढे बोलायचं होत ....ती सगळं काही कॅमेरापुढे बोलते ..छान सुरवात होते तिच्या कामाची .....आजचा दिवस संपतो ..सगळे जायला निघतात ...एक मेकांना बाय करतात तेवढ्यात केदार अनु ला बोलावतो ....

"मी आत येऊ का ?-अनु (खार तर तिला परत एकदा केदार ला भेटायची इच्छा नसते ..पण काम ते काम )

"हो या ,मिस पाटील ..उद्या एका व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे ...हा त्यांचा पत्ता ,फोन  नंबर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि तयार राहा तिथून live दाखवायला ....जमेल ना ..? नाही म्हणजे ह्यात काही जास्त माहिती काढायची नाहीये ..सगळं तयार आहे ..त्यांना माझं नाव सांगा ते भेटतील तुम्हाला.."-केदार 

अनु त्याच्याकडे बघत असते .हा मला काय समजतो ?स्वतःशीच विचार करत असते .तेवढ्यात केदार परत वर मन करून विचारतो ,"तुम्ही उत्तर नाही दिलात ...नाही म्हणजे जमणार नसेल तरसांगा मी दुसऱ्याला सांगतो .."-केदार 

"उद्या हे काम होऊन जाईल सर , डोन्ट वरी .. येऊ मी आता ..?"-अनु  थोडासा रागाने बोलते आणि परवानगी घेऊन तिथून निघते ..तेवढ्यात केदार परत  बोलतो ,"आज तुम्ही छान स्टोरी कव्हर केलीत ...गुड लक .."-

"थँक यू सर ,महंत अनिका तिथून निघते 

हा कोण समजतो स्वतःला .. कधी तर उगीचच काढूस पण करतो तर कधी छान म्हणतो ...मी त्याला चांगला समजत होते पण तो तर दुसर्यांना काही समजतच नाही ...असेल त्याचा रोल मोठा पण म्हणून काय झालं ? आम्ही हि काही तरी शिकलोय ...आता तर त्याला दाखवावंच लागेल ...काहीतरी शोधलाच पाहिजे ..(अनु स्वतःशीच विचार करत करत घरी पोहचली होती )

"काय ग ?आजच  दिवस कसा होता ?"-आई 

"बरा होता ग आई ...चहा दे न प्लिज ... बाकीचे कुठे आहेत ?"-अनु 

"आहेत सगळे कामात ..मी आपली रिकामी तेवढी ....श्रेया बाई गेल्या आहेत मैत्रिणी कडे ..तुझे आबा जोशी काकांकडे .साहिल वर आहे आणि मोहन अजून आलाच नाही ....बाकी तुझं ऑफिस, नवीन लोक काय म्हणताय ?"-आई 

"ठीक आहेत ग ..म्हणजे सगळे सहकारी छान आहे पण बॉस जरा खडूस आहे .."-अनु 

"काय ग ?कोणाबद्दल बोलते ?"-आबा येतात ..

"काही नाही आबा असच ..ऑफिस बद्दल बोलत होते ..."-अनु 

"हो का ,बाकी आज छान बोललीस तू ....बार वाटलं तुला बघून ...थोडा वेळ दे ..नवीन जागा ,नवीन लोक आहेत .."-आबा 

"हो न आबा ,,बाकी आई काय झालं ग दादाच ..तू मुलगी बघितली आहे न .."-अनिका 

"हो ग बाई , मोहन तर काही ठरवत नाही आता मीच ठरवलं आहे ..उद्या येतील ते ..."-आई 

"उद्याच ..व्वा मस्त आहे मग तर ..दादाला माहित आहे का ?"-अनु 

"नाही म्हणजे  कल्पना दिली आहे ... तुम्हा मुलांचं काही खर नसत तुला थांबायला जमेल असं वाटत नाही .तसही उद्या फक्त भेटायचं आहे बाकी सगळं पसंती नंतरच ठरेल ...तुम्ही हि घरीच थांबायचं आहे बर का ?"-आई आबांना उद्देशून म्हणते तस आबा हि मान डोलावतात ... जेवण ते उरकून सगळे झोपायला जातात .. अनु च्या डोक्यात मात्र परत एकदा केदार चा विचार येतोच ...बघू आता उद्याच  दिवस काय घेऊन येतो ते .. म्हणत ती झोपते ..

.......................................................................................................................................................................................

क्रमशः 

🎭 Series Post

View all