https://www.irablogging.com/blog/anika-3_3901
"हॅलो , अनिका बोलत आहेत ना ..."-समोरची व्यक्ती
"हो मी अनिका बोलतेय ..."-अनु
"हॅलो ,मॅडम ,मी ऋचा बोलतेय तुम्ही आमच्याकडे मुलाखत दिली होती ..टीव्ही रेपोर्टरसाठी "-ऋचा
"हो हो बोला न .."-अनु
"अभिनंदन ,तुमची निवड झाली आहे ..तुम्ही पुढच्या गोष्टी साठी कधी येऊन भेटू शकता .."-ऋचा
"मी उद्या भेटलं तर चालेल ?"-अनु
"हो चालेल ..उद्या सकाळी १० वाजता ...भेटू ..बाय '-ऋचा
"बाय "-अनु
अनु ने एका टीव्ही रेपोर्टरच्या पोस्ट साठी मुलाखत दिली होती ..तिची निवड झाल्याबद्दल तिला फोन आला होता .
अनुने रमेश साहेबाना जाऊन सांगितलं,
"सर,तुम्ही नेहमीच योग्य तो मार्ग दाखवतात . मला इथे काम करून बरच काही शिकायला मिळालं ....तुमच्या सगळ्यांपासून दूर जाताना खुप वाईट वाटत आहे ..."-अनु
"हे बघ ,बेटा ..माणसाने नेहमीच चांगले काम करावे ...मित्र मैत्रीणी हे वेगवगेळ्या वाटेवर भेटत असतात पण आपण कोणासाठी थांबू नये ..आणि आपण आपल्या कामावर प्रेम करावे. तुला नेहमीच नवीन अनुभव घ्यायला आणि वेगळे प्रयोग करायला आवडते ना ...आणि तू म्हणाली होतीस कि, आता तुला नव्या पद्धतीने रिपोर्टींग चा अनुभव घ्यायचा आहे म्हणून तू हा निर्णय घेतला आहेस तर मग तुझा मार्ग निवड आणि त्यावर खंबीरपने न डगमगत चालत राहा ....आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. "-रमेश सर
अनु ने घरी येऊन सगळ्याना सांगितलं ...दुसऱ्या दिवशीची तयारीही केली ...घरी आनंदच वातावरण होत .अणूचे खास मित्र जसे कि सोना ,श्री ,आणि इतर तिच्या पाठीशी सदैव उभे असत ..आता ज्या ठिकाणी तिला रुजू व्हाऊचे होते ते एक नवीन ठिकाण होते नवीन जागा होती ,नवीन लोक भेटणार होते ....
सकाळी अनु तयार होऊन नवीन ऑफिस ला गेली ...मोठा कॉररिडॉर तीन चार केबिन्स ...साऊंड सिस्टिम , सगळं काही नवीन एकदम
"हॅलो ,मॅडम .."-ऋचा
"ओह हाय ...मी अनिका ...काल आपलं भेटायचं ठरलं होत "-अनु
"हो मला माहित आहे . चला सर तुमची वाट बघत आहेत ..."-ऋचा
अनु आणि ऋचा एका केबिनच्या बाहेर उभे ते केबिन वरच्या बाजूने होते ..."मी आत येऊ का सर "-ऋचा
"प्लिज या ."-सर
"सर ह्या आहेत अनिका पाटील ..."-ऋचा तिला केबिन मध्ये सोडून जाते
अनु cच्यासमोर एक खूप सुंदर व्यक्ती बसली होती ...मस्त पैकी कोट ,शूज ,उंचपुरा ,धारदार नाक रंगाने गोरापान अगदी एका नजतेराच डोळ्यात भरणारा तरुण तिचा बॉस होता .
" बसा ना ...प्लिज "-बॉस
"थँक यु ,सर ...."-अनु
"अभिनंदन ,आमच्या परिवारात तुमचं स्वागत आहे ..तुम्हाला तुमचे सगळे काम ऋचा समजून सांगेलच ....या आधी जे काम तुम्ही करत होता ते आणि हे वेगवेगळं आहे ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल .इथे पारड्याच्या मागे नव्हते तर पारड्याचे समोर राहावे लागेल ..तुमची इथे निवड झाली म्हणजे तुमच्यात नाकी खास काहीतरी आहे ...आणि आम्हला तेच हवं आहे ...जस कि तुम्हाला माहित आहे आपली हि कंपनी खऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करते पण आज काल सगळीकडे बिसनेस सुरु झालाय ...आणि आपल्यालाही त्या रेस मध्ये राहावंच लागत .....त्यामुळे नवनवीन संकल्पन ,कार्यक्रम ह्याबाबतीत तुमचा सहभाग असेल तर उत्तमच ! बाकी तुमचे काही अजून प्रश असतील तर विचारा ...?"-बॉस
" नाही काही नाही ...."-अनु.
"ठीक आहे तर मग ..तुम्ही ऋचा सोबत जाऊन तुमचे काम समजून घ्या ....अजून एक तुमची वेळ ठरलेली असेल पण आपल्या ह्या व्यवसायात फिक्स वेळ नसते ह्याची कल्पना तुम्हाला असेलच ..तुमची सुरक्षितता आमची जबादादरी आहे त्यासाठी निश्चिन्त राहा ...तुम्ही येऊ शकता ..आता .."-बॉस
अनु केबिन च्या बाहेर येते ..रुचला भेटते ..ऋचा तिला तीच काम समजावून सांगते ...अनु काही दिवस फील्ड वर्क असते म्हणजे बाहेर जाऊन बातम्या ,माहिती गोळा करणे आणि तिथूनच लिव्ह रिपोर्टींग करणे ......ऋचा तिची ओळख बाकी सहकाऱ्यांशी करून देते ...ओमी, रेवा, आर्यन ,विक्की, ,अवनी ,ऋचा सगळे सोबत असतात .
"ऋचा ,बॉस नाव नाही सांगिलंत ..?"-अनु
"ओह ,,ते त्यांचं नाव केदार आहे ."-ऋचा
अनुचा आजचा दिवस खूपच छान गेला होता ..नवीन काम ,नाव चॅलेंज ,नवे मित्र सगळं छान छान वाटत होत ....घरी येऊन तिने सगळी कल्पना दिली ..स्वारी आज भलतीच खुश होती ...तिला केदारच्या चेहरा सतत आठवत होता ...काय होत असं चेहऱ्यात काय माहित ?पण त्याचाच चेहरा आठवत तिला झोप लागली ...
क्रमशः
......................................................................................................................................................................................
प्रिय वाचकहो ,हि एक काल्पनिक कथा आहे ...हि कथा सुरु केली आणिकही वयक्तिक कारणांमुळे पुढे लिहू शकले नाही ..आता हि कथा पुन्हा सुरु केली आहे आणि मी प्रयत्न कारेन कि तिचे भाग तुमच्या पर्यंत वेळावेळी पोहचावेत ...तुम्ही माझ्या कथेला नक्की प्रतिसाद द्याल हि अपेक्षा करते ..इतक्या दिवसात तुमच्या भेटीला येऊ शकले नाही त्यासाठी तुमची क्षमा मागते ..पण आता आपण पुन्हा नक्की भेटू .......हि कथा वाचल्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा