Jan 28, 2022
सामाजिक

अनिका 3

Read Later
अनिका 3

https://www.irablogging.com/blog/anika-2_3802

सकाळची वेळ खूप घाई गडबड ची असायची ...साहिल आणि आबा प्रेस साठी निघायचे त्यामुळे ते तयार होऊन नाश्ता  करायला म्हणून टेबल वर येऊन पेपर वाचत बसले ...अनु सुद्धा ऑफिस ला जायचं म्हणून तयार होऊन यायची नाश्ता  करायला ...आज तर मोहन हि होता श्रेया थोडं आरामात असायची ...आबा पेपर वाचत होते त्यात अनु ने लिहलेला जळजळीत लेख होता ,

" आपण एका अश्या समाजात  राहत आहोत ज्या समाजमध्ये नऊ दिवस देवीची आराधना होते पण बाकीच्या वर्षभर तिच्यावर फक्त अत्याचाराचं होतात ...प्रत्येक स्त्री हि सन्मामची हकदार आहे पण तिच्या वाट्याला नुसत्या यातना असतात . स्त्री ने  कर्तबगार असावं ,संस्कारित  असावं पण मग मुलांचं काय ? त्यांचे संस्कार  कोण पाहणार ? आज एका स्त्री  वर पुन्हा अत्याचार झाले ...तिला यातना दिल्या गेल्या ....आणि पुरुषी अहंकार एवढ्यावरच थांबला नाही तर ..तर तिने अन्याला वाचा फोडू नये म्हणून तीच तोंड कायमच बंद करण्यात आलं ...या आणि अश्या अजून किती महिलांना  हे सहन करावं लागेल ?किती दिवस अजून आपण  ह्याच ह्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत ? एक सरकार गेलं कि दुसर येत पण महिलांवरील अत्याचार काही थांबत नाही ............तिच्या बाजूने बोलायला कुणीही कधी हि नसत ...तिने एकटीनेच सगळं सहन करायचं आणि टन दाबून मुक्क्यांचा मर झेलायचा...त्या गावात जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होत ...पण खंत तर हे  आहे कि हा सगळं अत्याचार ,एका स्त्री ची बेअब्रू आपला समाज  डोळे उघडे ठेवून बघत बसतो ....कोणालाही ह्याबाबतीत बोलयला तोंड नाही ,कि कोणातही  एवढी हिम्मत नाही कि सत्याची  बाजू मांडली जाईल ....आज एक घटना घडली ,त्याची फक्त चौकशी झाली आणि पुराव्याअभावी फाईल बंद करण्यात आली ..हे असेच होत आले आहे आणि हेअसेच होत राहील ....पण कधीपर्यंत ?आज दुसऱ्याच्या मुलीचा प्रश्न आहे उद्या आपल्या मुलीचा असेल तेव्हा काय कराल ?   उठा जागे व्हा ....एकजूट व्हा ..अन्याच्या  विरोधात लढा .....  तेव्हाच हे थांबेल -" अनिका  पाटील.

"आबा पेपर  द्या न ...बघू तरी बातमी आली  कि नाही ."-अनु  

"हो हो ,आली  तर, फारच जळजळीत लेख आहे आज ..!"-आबा 

पेपर अनु ने नजरेखालुन  घातला ....आणि मग मोहन ने तो वाचायला घेतला ....

"असं काही नाही  आबा मला जे वाटलं ते लिहला ....हि अशी परिस्थिती आहे कि ह्यात आपण कसे सुरक्षित राहणार ह्याचा प्रश्न पडतो ...? रोज अपहरण ,बलात्कार ,ह्यासारख्या घटना घडतच आहे ....काय होणार आहे पुढे कोण जाणे ?"-अनु 

"पुढचं पुढे बघू ..आता नाश्ता  करा बर सगळे......आणि हो मोहन आपला कालचा  विषय अर्धाच राहिला आहे ..बर का ?"-आई 

"कोणता विषय आई ?"-अनु 

"तेवढ्यात श्रेया पण येते ..."काय ग आई, आज काय दादाची दिवाळी का ?"-श्रेया 

"ए गब ग ,दिवाळी काय ? मी मोहन साठी एक मुलगी बघितली आहे .....छान आहे मुलगी .."-आई 

"oooooooooo,,दादा मला एक वाहिनी आन ,,दादा मला एक वाहिनी आन .."-श्रेया आणि अनु एकदम चिडवतच म्हणतात 

" ए,काय ? गप बसा.. आई , काही काय ग ?मी आताच तर आलोय .. एवढ्यात काय ?"-मोहन 

"चला, चालू द्या तुमचं ,,,नाही म्हणजे ह्या विषयवार तुमच्या दोघांचं  ठरलं कि सांगा आम्ही  तेव्हाच बघू काय ते ?..नाही का ..चल साहिल आपल्याला उशीर होतोय .."-आबा .

"गुड लक दादा ,एन्जॉय .."-साहिल डोळा मारत ...बोलतो 

आबा आणि साहिल हसत  हसत निघतात ..आणि इकडे अनु आणि श्रेया मोहन ला चिडवत असतात ...

"मुलींनो थांबा ग जरा ....मोहन ,ए मोहन अरे एकदा मुलीला भेटून तर घे ..मग बघू पुढचं पुढे .पण मला आता घरात सून हवीच ..."-आई 

तेवढ्यात मोहन तिथून सटकायचा  प्रयत्न करत असतो ..  "मला एक काम आहे ...आपण नंतर बोलू ह्याविषयावर आई .."-मोहन तिथून रूम मध्ये जातो ...

"उम्म्म्म्म मन मे लड्डू ......"श्रेया आणि अनु दोघेही त्याला चिडवतात आणि हसता हसत नाश्ता आटोपतात....

सगळं आवरून  श्रेया कॉलेज  ला आणि अनिका  ऑफिस ला येते ...

"काय मग मॅडम आज काय खास ?"-श्री 

"काही नाही रे ..असच रोजचंच  ...आज एका ठिकाणी जायचे  आहे ....बाकी हि काही छोट्या मोठया गोष्टी आहेतच ..तू सांग ..आणि सोना कुठेय. आली नाही का ?"- अनु 

"सोना इथेच होती ..कॉफि  घ्यायला गेली असेल ......बाकी तर तेच प्रदर्शन मध्ये जायचं आहे फोटो काढायचे आहेत ..बाकी आज चा तुझा लेख वाचला छान आहे ...पण नेमक काय झालं त्यादिवशी हे तू अजून सांगितलं नाहीस .."-श्री 

"हो ना ,नुसताच घाबरवलं होत आम्हाला , आता तरी सांग काय झालं होत ते ..?"-सोना कॉफी घेत घेत आली... 

"खर म्हणजे त्यादिवशी आपण सगळ्यांना भेटलो ,सगळं बघितलं पण मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही दुसरीकडे गेला होता फोटो काढायला तेव्हा मी चालत चालत  एका घराजवळ पोहचले तिथे मला काही आवज आले ,ते लोक म्हणत होते कि ' कोणाला काहीही कळता  कामा नये ...जे झालं ते झालं ....आणि मी  तिथेच लपले ..ते दोघे होते मी त्यांचा पाठलाग केला ....एका गावाबाहेरच्या बंगल्यात ते गेले .मला काही आत जाता  आलं नाही ,म्हणजे मी गेले  नाही....मी त्या बंगल्याची पाहणी केली आजू बाजू ने ....सगळीकडे आता दिवे लागले होते ...मी  दगडावर उभे राहून खिडकीतून डोकावून पहिले तर तीच दोन माणसं  कोणालातरी काम झाल्याच्या सांगत होती .....ते म्हणत होते 'साहेब ,काम झालं आणि कोणाला संशय हि आला नाही ...तो माणूस ज्याला ते दोघे हे सगळं सांगत होते नक्कीच कोणीतरी मोठी व्यक्ती होती ...त्याने ह्या दोघांना काही पैसे हि दिले ..आणि मग विचारलं कि गावात जे बातमी वाले आले आहेत त्याचं काय ?त्यावर ते दोघे म्हणाले कि कोणालाबी काय  बी संशय आलेला नाय ...काळजी करू नगा.....गावात काय झालं काय नाय  कोणी कोनास्नी सांगणार  नाय  ....'आणि तेवढ्यात माझा पाय सरकला दगडावरून ...ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पकडायला माणसं पाठवली ..त्यांनी  माझा चेहरा पहिला नव्हता पण कोणीतरी तिथेआहे हे त्यांच्या लक्षात आले होते ....आणि मग मी पळत  सूटले तुमचे फोन लावले तर लागत नव्हते ,कसे बसे त्या झोपडीतून तुम्हाला मला कळवता आले .... नंतर तर सगळं तुम्हाला माहीतच आहे ..."-अनु 

"बाप रे ,खातरणकच  एकदम  ....हिम्मत आहे हो पोरीत  ..."-सोना हसतच ..

"ए ,खरंच अवघड आहे ते ...काही झालं असत म्हणजे ..."-श्री 

"काय रे काय चाललंय ? "-रमेश सर (ह्या सगळ्यांचे वरचे अधिकारी )

"काही नाही सर ,ते अनुच्या आजच्या लेख बद्दल बोलत होतो .."-सोना 

"हा .अनु बाकी लेख छान आहे ...पण आत पुढे काय ?"-रमेश सर 

"पुढे काय ?काही होणार नाही ....जी माहिती मला कळली आणि जे मला  पोलिसांकडून  हि कळलं त्यातून  असं चित्र समोर ठेवलं गेलाय कि ती मुलगी स्वतःच्या इच्छेने तिथे गेली होती ....तिची मानसिक स्थिती खराब होती आणि म्हणून तिने आत्महत्या केली ..एका खुनाला ह्यांनी आत्महत्या सांगून  सगळे मोकळे झाले ..."-अनु 

"काही खर नाही आज काल...काळ खूपच बदललाय ...चला कामाला लागा ..."-रमेश सर चस्मा डोळ्यावर चढवत म्हणाले .. 

सगळे आप आपल्या कामाला जातात ....तेवढ्यात अनुला एक फोन येतो ...

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....