Jan 28, 2022
सामाजिक

अनिका 2

Read Later
अनिका 2

https://www.irablogging.com/blog/anika-1_3669

भाग १ साठी वर क्लिक करा .

अनिका हि एक पत्रकार असते ...अनिका (अनु ) पाटील   हि एका चांगल्या घरातून आलेली संस्कारित  मुलगी.  ...तिच्या ऑफिस मध्ये तिचा  दबदबा असतो. त्याला कारण हि तसच असत ..कोणतीही जोखीम घेऊन ती तीच काम पूर्ण करते ..नेहमी खरी बातमी आणते आणि लिहते ....तिच्या प्रामाणिकपण  बद्दल कोणाचच दुमत नसत ....सगळेच तिच्यावर खुश असतात ....खरं म्हणजे तिला तीच हे क्षेत्र मनापासून आवडत असत ...त्यात ती तिचा जीव धोक्यात घालून काम करत असते .....आताही  ती तेच करत होती ....शहरापासून काही किलोमीटर दूर  अंतरावर असणाऱ्या एका गावात एक घटना घडली आणि अनु  आपल्या टीम सोबत तिथे गेली माहिती काढण्यासाठी ....एका मुलीवर अत्याचार झाले होते . कुठूनतरी हि बातमी अनिकाच्या कानावर आली होती आणि ती हि माहिती खरी आहे कि नाही ह्यासाठी  तिच्या टीम सोबत गेली होती घटनास्थळी .....पण तिथे जाऊन तिला भलत्याच गोष्टी कळल्या .... हि काही साधी सुधी बलात्काराची कहाणी नव्हती आणि ती त्या गोष्टींचा पाठपुरावा करणार होती ..अनुची एक सवय होती तिला एखाद्या गोष्टीच्यामुळापर्यंत पोहचेपर्यंत  चैनच पडत नसे .  तिने तशी बरीचशी माहिती जमा केली होती ..त्या केस संदर्भात ..आणि आज त्यावर एक लेख  लिहून छापायला देणार होती ....सगळं झालं आणि लेख  छापायला गेलं सुद्धा ...

कालचा दिवस  पूर्ण कामात गेला होता त्यातच तिच्यामागे काही  लोक लागले होते ....आज ती सगळं काम संपवून घरी अली होती . घरी ह्याबाबतीत काहीच माहित नव्हते ..

"आलात आपण ?काय मग काल कोणावर आपली मेहरबानी ?"-आई (सविता  पाटील )

"काय ग आई ?आल्या आल्या सुरु करतेस ......बसू तर दे आणि मी काय मेहरबान होणार कोणावर ....एक चहा दे न प्लिज .."-अनु 

"हो ,देते ना तू आधी फ्रेश होऊन ये जा ...तोपर्यंत आशाबाईंना सांगते चहा नास्ता करायला .."-सविता बाई 

अनु जाऊन फ्रेश होऊन येते ..तोपर्यंत तिचे वडील ज्यांना सगळे आबा  म्हणतात ते   (शिवराज  पाटील ) आलेले  असतात..ते हि बसतात

"काय मग अनु बाई ,केव्हा आलात  आपण ? झालं का काम ?"- आबा  .

"हो आबा ,झालं म्हणजे काम सुरु आहे .काही माहिती मिळाली आहे ..त्यावर काम चालू आहे उद्या सकाळी पेपर मध्ये  येईलच ......आपल्याकडे खरंच खूप घाणरेडे लोक राहतात ..त्यांना एका बाईची ,तिच्या अब्रूची काहीच  पर्वा नसते..नुसता स्वतःचा अहंकार महत्वाचा असतो ....मग ती मेली काय किंवा जाळली काय ?"-अनु फार त्वेषाने बोलत होती ...

"आग हो हो ,पुरे कर बर ते  ..चहा घे ...त्याच त्याच चर्चा नको आता ...काहीतरी छान बोल .."-आई 

"अनु ,तुझी काळजी वाटते ..तू जे हे काम करतेस ते खूप धोक्याचं आहे ..सांभाळून राहा !"-आबा  

"हो आबा  ,मी काळजी  घेते ...दादा आला नाही अजून ?  येणार होता न तो आज ...."-अनु 

"नाही जरा उशिरा येणार आहे .फोन आला होता त्याचा ....इतक्या दिवसांनी  परत येतोय  तर येता येताएक काम करून येणार आहे म्हणत होता ..."-आई .

" अच्छा ,आणि साहिल , श्रेया  कुठे आहेत ?"-अनु 

"अग  सगळे आप -आपल्या कामात आहेत  नेहमीप्रमाणे !श्रेया  गेली आहे मैत्रिणीकडे आणि साहिल  च आज बाहेर मित्रांसोबत डिनर चा प्लॅन आहे ."-आई 

तेवढ्यात अनु ला एक फोन येतो आणि ती फोनवर बोलत बोलत बाहेर येरझाऱ्या मारत असते ,

"काय ?अच्छा ..पण हे खरं आहे का ?"-अनु 

"हो ,त्या मुलीवर अत्याचार झालेत आणि गावाचे काही प्रतिष्ठित लोक त्यात सामील आहे ...."-ती व्यक्ती 

"अच्छा ,बघते मी ..थँक यु...."-अनु फोन ठेवते आणि कसल्यातरी विचारातच असते ..तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी  हात ठेवतो ..ती दचकून मागे बघते .."तू ...अरे घाबरले ना मी ,कधी आलास कसा आहेस ?"-अनु 

"अग हो हो किती प्रश्न ..कोणत्या विचारात होतीस ..?"- मोहन (म्हणजे अनुचा दादा ,,जो येणार होता )

"अरे काही नाही रे असच,तू बोल कसा  आहेस ?"-अनु आणि मोहन आतमध्ये जाता -जाता  बोलत असतात 

"अरे मोहन ,आलास का ? ये, ये .........कसा आहेस ?"-आई .

पाया पडत  "मी बरा आहे ,तू कशी आहेस ?आणि आबा   कुठे आहेत ? -मोहन 

"आहेत हो, आत आहेत . येतीलच इतक्यात  जेवायला ..तू फ्रेश होऊन ये मग जेवण करू .सगळं तयार आहे .."-आई 

मोहन फ्रेश होऊन येतो .सगळे जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा हि मारतात ..मोहन हा समाज- सेवक असतो . समाजासाठी काही तरी  करायचं ह्या हेतूने तो एका संस्थेशी जोडला जातो आणि त्याच्या  ह्या व्रतासाठी त्याला बाहेर गावी जावं लागत ..गेली जवळपास तीन वर्ष किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्तच काळ   तो एका लांबच्या खेडेगावात जिथे सुखसोयी पुरेश्या नाहीत अश्या गावात काही मुलांना फुकट शिकवण्यासाठी म्हणून गेला होता ...तिथे मुलांचं शिक्षण हाच एकमेव हेतू नव्हता त्याचा, त्यासोबत अजून हि अनेक कामे त्या गावासाठी तो करायचा ....आज तिकडंच काम संपवून तो परत घरी आला होता ....सगळं आवरून ते बसले होते तेवढ्यात साहिल आणि श्रेया हि येतात .

"हेय ,अनु कधी आलीस ? आणि काय ग तुझा फोन का नव्हता लागत ? हाय , दादा "-श्रेया .

"दादा ,कसा  आहेस ? अनु बाई झालं का लोकांचे हाल करून ......"-साहिल एक डोळा मारत बोलतो ......

अनु नुसतंच हसते...

" मी बरा आहे ,तू सांग कस चाललाय काम ? आपली प्रेस काय म्हणते ?"- मोहन 

"छान चाललंय सगळं ,आपण आता आपल्या 'सेवा' ह्या मासिक सोबत अजूनही एक दोन मासिक काढत आहोत ..त्यावरच काम सुरु आहे "-साहिल .साहिल ला एक फोन येतो आणि तो त्याच्या रूम मध्ये जातो ...

"छान, मस्त  ...बाकी अनु तू सांगितलं नाहीस मी आलो तेव्हा कसला गहन विचार करत होतीस ते ?"-मोहन 

" काही नाही रे दादा ,मला एक बातमी समजली होती त्याचाच पाठपुरवठा करत होते काल  दिवस भर ...आम्ही गेलो होतो  त्या गावात, तस गाव बर  आहे पण माणसं काहीशी वेगळीच आहेत  ..एका मुलीवर अत्याचार झाला आणि तिला मारून टाकलं,  तिथले लोक हे साफ नाकारत आहे ...पण जेव्हा मी चौकशी केली तेव्हा सगळ्या गोष्टी हेच दर्शवतात कि तिच्यावर अत्याचार झाले आणि तिला मारून टाकलं....तू आला तेव्हा मला एक फोन आला होता त्यात त्याने हेच सांगितले कि हा बलात्कार होता आणि त्यात गावातले काही प्रतिष्टीत लोक सामील आहे असा अंदाज आहे ...कधी थांबेल हे सगळं कोण जाणे "?-अनु 

"हे सगळं असं थांबणार नाही ...जोपर्यंत माणसाची वागण्याची दिशा ,विचार करण्याची पातळी बदलत नाही तोपर्यन्त काहीच बदलणार  नाही .चार दिवस फक्त आक्रोश केला जाईल आणि मग पुन्हा "जैसे थे " "-मोहन 

घरात सगळी  हीच चर्चा सुरु होती .... जवळ जवळ एक तास मोहन ,अनु आणि आबा त्यांचे विचार मांडत होते .तेवढ्यात आशाबाई दूध घेऊन येतात सगळ्यांसाठी ......

"चला खूप झाल्या गप्पा ,जरा गरम गरम दूध प्या म्हणजे अजून सुचेल बोलायला ..."आशाबाई ..सगळे हसतात 

"प्लिज मला नको हा दूध ..मी चालले झोपायला जाम दमले आहे मी ..उद्या बोलू ..शुभ रात्री दादा ,गुड नाईट अनु .."-श्रेया 

"हं ,बाय आम्ही पण झोपणारच आहोत ..उद्या परत जायचं आहे कामावर ..."-आबा 

बाकी सगळ्या गप्पा आवरून अनु पण झोपायला जाते ....

"ह्या मधल्या काही काळात  अनु खूप बदलली आहे नाही ...?"-मोहन 

"असं काही नाही ,तू बऱ्याच दिवसांनी  बघतोय न म्हणून वाटत असेल ..बर तू आता इथेच राहणार ना ..आता नको जाऊ बाबा ..लक्ष लागत आमचं .."-आई थोडासा उदास होत बोलते ...

"आम्हाला असं वाटत कि तू आता  इथे राहूनच काम करावं ,तुझ्या समाज सेवेच्या मध्ये आम्ही येणार नाही पण तू जर इथे राहून समाजाची सेवा केली तर काय हरकत आहे ? शेवटी कर्म महत्वाचे ..नाही का ?मी आपलं सुचवलं बाकी तुझी  मर्जी ....काय असत ना मुलं  जेव्हा लांब असतात ना तेव्हा जास्त लक्ष लागत .....आणि शेवटी एवढंच वाटत कि, दादा नाही तर तू तरी  डोळ्यासमोर असावा ..."- आबा थोडासा हसून पण पाणावलेल्या डोळ्यांनी बोलत होते ...त्यांच्या डोळ्यात त्यांच्या भावाबद्दल प्रेम आणि मोहन बद्दल काळजी स्पष्ट जाणवत  होती ..

मोहन त्यांच्या हातावर हात देऊन त्यांच्या कडे बघत असतो ,"मी खूप त्रास देतो का तुम्हा ला आबा आणि आई ...नाही म्हणजे मला माहित आहे कि, तुमच्या इतका जीव मला दुसरं कोणीच लावला नसता .आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्याच मुळे ..मला जाणीव आहे ह्याची ,मला  हि तुमची खूप आठवण येते ,जीव कसनुसा होतो नुसता ...वाटत कि आई कडे जावं लगेचच आणि तिच्या मांडीत डोकं ठेवून  शांत झोपावं ,पण मग आठवत ती मुले  ज्यांना आई ,बाप ह्यातलं कोणीही नसत , ती पोरकी असतात ,त्यानं त्यांचा मार्गच माहित नसतो आणि मग सगळं विसरून पुन्हा त्यांच्या सेवेसाठी हजर होतो पण हे सगळं करताना बरेचदा मला जाणवून गेलं कि आपण दुसऱ्यांसाठी जगताना ,त्यांना प्रेम देताना ,त्यांच्यासाठी कर्तव्य पार पडताना आपल्या घरच्यांवर अन्याय  तर करत नाही ना? ज्यांनी आपल्या जगण्याला  दिशा  दिली ,प्रेम दिल ,त्यांच्या साठी आपलंही काही कर्तव्य आहे ...बाबा गेल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीशी उभे नसता राहिला तर कस  झालं असत  माझं ?मी कसा जगलो असतो ? तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं ते खूप वेगळं आहे ..मला कधीच हे जाणवलं नाही कि माझी आई  ह्या जगात नाही ....तू जेव्हा आमचा स्वीकार केला आणि आम्हाला माया केली तेव्हा आम्ही सगळं विसरून गेलो ....आज आम्ही फक्त आणि फक्त शिवराज पाटील ह्याचे चिरंजीव म्हणून ओळखलो जातो . ..."-मोहन बोलत होता आणि भावुक झाला होता .

"अरे बाबा ,तस नाही दादा च काम आणि नाव खूप मोठ्ठं आहे...तू आणि अनु आमचीच मुले आहात....खूप फिरलास  तू आता, वर्ष -नुवर्षे घरापासून लांब राहतो ...आम्हला कळत नाही असं नाही. हे घर तुझच आहे आणि तू ह्याचा जितक्या लवकर स्वीकार करशील तेवढ बर होईल ...."- आबा 

"मोहन ,आता  तू जरा स्थायिक हो आम्हाला हि वाटत कि घरात सून यावी ...आणि आता मी तुझं ऐकणार हि नाही ह्याबाबतीत ...."-आई जरा दटावूनच बोलत होती ..

"बर बर ,आता खूप उशीर झालाय ,तो हि दमून आलाय ..बाकीचं उद्या बोलू ..कारण काय आहे ना सविता बाई तुम्ही अश्या विषयात हात घातला आहे कि, त्यात बरेच प्रश्न उत्तर ,शंका ह्या राहणारच ....मग आता आपण ते उद्याच बोलावं नाही का ?"- आबा हसतच बोलले आणि सगळे झोपायला गेले .....मोहन थोडावेळ तसाच बसून होता ..........स्वतःशीच विचार करत ..........   

(क्रमशः:)

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....