अनिका 34

anikaa meets samir .. samir loves Reva ..and now the story begins

https://www.irablogging.com/blog/anika-33-_8105

भाग ३३ साठी वर क्लिक करा ..

पूर्वसूत्र = (अनिका ला एका पार्टीची बातमी कव्हर करायला सांगितली जाते ..ती विक्रमला फोने करून तिला मिळत असलेल्या धमकी बद्दल कल्पना देते ..घरी जातात जाता ती विक्रम ला पोलीस स्टेशन ला भेटायला जाते ..आणि सांगते कि त्या दिवशी तिने युगराज्  ला पाहिलं होत ...आता पाहूया पुढे ..)

"कोण?"- विक्रम कपाळावर आठ्या पाडत  पुन्हा विचारतो ....

"युगराज धर्माधिकारी ..खर म्हणजे त्यानेच मला वाचवलं असेल ....कारण मी जेव्हा त्या गुंडांपासून बचाव करण्यासाठी पळत होते तेव्हा माझा पाय अडकला आणि चक्कर आली मी खाली पडणारच होते कि युगराज ने मला सावरले ....पण मग पुढे काय झाले ते माहित नाही .."-अनिका 

"हम्म ,पण मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलंत ?आजच का ?"-विक्रम 

"actually, त्या दिवशी  मी ह्याचा विचार केला होता पण मग मला असं वाटलं कि आधी स्वतः खात्री करावी ..थोडा विचार करून आठवावं कि तो चेहरा खरंच युगराज चा होता का ? आणि त्यातच हे फोन प्रकरण .....म्हणून आता सांगितलं ..सॉरी "-अनु 

"ठीक आहे ,मला त्याची कल्पना होतीच ..मी केदारला हे आधीच सांगितलं होत कि तिथे युगराज होता ..कारण ज्या पद्धतीने काही माणसांना मारलं गेलं ते सोप्प नव्हतं ..तिथल्या माणसांना त्याच ड्रग चा ओव्हरडोस दिला आहे त्यामुळे त्यानं काहीच आठवत नाहीये ...पण तुम्ही म्हणालात तस जर तो तिथे असेल तर मग आता आम्ही अजून त्याची चौकशी करू शकतो ....नक्कीच काही तरी हाती लागेल ..."-विक्रम 

"हम्म .नक्कीच .मला अजून काही विचारायचं होत ?"-अनु 

"बोला न .."-विक्रम 

"हा ड्रग रॅकेट च आणि युगराज चा संबंध आहे का ? अजून कोण कोण आहे ह्यात ते सांगू शकाल का ?"-अनु 

मिस पाटील अजून चौकशी सुरु आहे ..ठामपणे असं काही नाही सांगता येत .."-विक्रम वेळ मारून  नेत होता 

"मारवा च्या लोकांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ?"-अनु 

"मारवा ..?"-विक्रम आस्चर्यचकित होतो कि हिला ते नाव कस माहित ..(अनु क्या चीझ है विक्रम को अभि पत्ता नाही न ....)

"हो मारवा ...माझ्या माहितीनुसार ते लोक मारवा चे मेम्बर्स आहेत .."-अनु 

"मिस पाटील ..मानावं लागेल ....तुमचं नेटवर्किंग छान आहे ..पण अजून ठामपणे हे कळू शकलेलं नाही कि ते लोक कोणाचे आहे ..कारण तिथे युगराज पण होता ....त्यामुळे शंकेची सुई त्याच्याकडे पण वळते .."-विक्रम 

"हम्म .इन्स्पेक्टर .मला ईश्वरी हॉस्पिटलची केस स्टडी करायची आहे ,,तुम्ही काही मदत करू शकाल ?"-अनु 

"का ?काही खास ? तिथे काहीच सापडलं नाही ..कोणतेच पुरावे नव्हते  ..."-विक्रम 

"तेच शोधायचं आहे असं म्हणा हवं तर .."-अनु हसून बोलली 

"बघतो ..ती फाईल बंद करण्यात आली आहे .... तुम्ही उद्या कोर्टात येणार आहात न ..साक्ष द्यायला .त्या गुंडाना ओळखायला "-विक्रम 

 "हो ,येईन न ..."-अनु .मग अनिका घराकडे निघाली ..

घरी आली तेव्हा ...आई देवघरात होती ..मृणाल स्वयंपाक घरात होती 

..अनु स्वयंपाक घरात गेली ..ग्लास हातात घेतला आणि माठातून पाणी घेत म्हणाली ,

"काय मग वाहिनी ,आज काय बेत ?"-अनु 

"अग तू, केव्हा आलीस ?  "-मृणाल 

"आत्ताच आले ...तू बोल कसा होता दिवस ?"-अनु 

"रोजच्या सारखा .."-मृणाल आणि अनु बाहेर येऊन डाईनिंग टेबल वर बसल्या 

"वहिनी तू परत काम सुरु ना ?...."-अनु 

"आग लगेच कस... अजून वर्ष हि नाही झालं लग्नाला .."-मृणाल 

"वहिनी ,अग ते तर दोन महिन्यात होईलच ..पण आजचा वेळ का वाया घालवतेस ? "-अनु 

"नाही ग ,मी खुश आहे ...घरासाठी वेळ देणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं नसतं."-मृणाल 

"तस नाही ग ,सॉरी ..म्हणजे माझा तो अर्थ नव्हता पण मला एवढाच म्हणायचं आहे कि थोडावेळ तुझ्या छंदासाठी किंवा करियर साठी हि काढ ...आम्ही सगळे व्यस्त असतो तूच नेहमी सगळ्यांचं सगळं बघत असतेस ..इतक्या कमी वेळेत तू ह्या घराला ,ह्या घरातल्या लोकांना आपलस केलं आहे ...सोप्प नाहीये हे मला माहित आहे ...पण तरीही .."-अनु बोलत 

"मला समजतंय तू काय म्हणतेस ते ..मी नक्की करेन विचार ..."-मृणाल तेवढ्यात आई मागून येते 

"काय कसला विचार करताय नणंद भावजय ?..."-आई 

"काही नाही हो आई हे आपलं उगीच .."-मृणाल 

"उगीच नाही हा आई ..मी वहिनीला सांगत होते कि छानस एक बुटीक काढ म्हणून ..काम पुन्हा सुरु कर म्हणून .."-अनु 

"हो मग काय तर ..नक्कीच केव्हाही सुरु कर आमची काहीच हरकत नाही .."-आई ने पण दुजोरा दिल .. मृणाल हि खुश झाली ..

"आई आबा कुठे आहेत ग ?"-अनु 

"का ग बाई आज अचानक आठवण ..काही काम होत का ?"-आई 

"काय ग आई ? काही काम असलं तरच  आबांशी बोलते का ?"-अनु 

"तस नाही ग पण वेळ कुठे आहे तुम्हा मुलांना आम्हा म्हाताऱ्यांशी बोलायला ....असो चालायचंच ..आमची काही तक्रार नाही ..आबा गेले आहेत समीर कडे ..."-आई .समोरच नाव ऐकताच तिला परवा ऑफिस मधला किस्सा आठवला ..रेवा आणि समीर ..ती समीरशी बोलणार होतीच पण संधी मिळाली नव्हती ...तो भेटलाच नव्हता महिनाभर ....काहीतरी विचार करूनच ती उठली .

"काय ?कुठे निघाला मोर्चा ..?"-आई 

"समीरकडे ..म्हणजे त्याच्या कडे काम आहे ते आठवलं मग म्हंटल कि जाऊन येते ....जाऊ न ..?"-अनु 

"हम्म ,जस काही मी नाही म्हणाले तर जाणारच नाहीस .....जा पण लवकर ये ..आणि तुझ्या आबांना सांग लवकर यायला .."-आई 

"हो सांगते .."असं म्हणतच अनु बाहेर हि पडली ...अनिका आणि समीर एकाच कॉलोनीत राहत होते ..त्यामुळे तिला वेळ लागणारच नव्हता ....१० मिन पोहचली सुद्धा ..हाल मध्येच आबा आणि समीर चे वडील सुहास राव बसले होते ...

"अरे ,अलभ्य लाभ ...अहो बघ कोण आलाय ?"-सुहास राव अनु ल उद्देशून हसत बोलत होते ...अनु हि हसत होती 

"काहीतरी काय काका ? "-अनु येऊन बसत आबा शेजारी 

"मग काय ..आत तुम्ही टीव्ही वर दिसता ,व्यस्त असता ,भेटत नाही मग आजून काय म्हणायचं नाही का ?"-सुहास राव काय हो न आबा 

"अहो तुम्ही तर इथं राहता .आम्ही एक घरात असून सुद्धा भेट हो नाही आमची .."-आबा पण खेचत होते अनुची ...

"आबा ,तुम्ही पण सुरु झालात ?जाऊ दे मी काकुंशी बोलते .."-अनु उठून किचन कडे गेली.

"काकू ..कश्या आहात ?"-अनु 

"मी मस्त ,तू बोल काम कस सुरु आहे ?"-काकू 

"छान  आहे ....आवडतंय मला "-अनु 

"बर आहे बाई ..आपल्याला जे आवडत न तेच करावं माणसाने ...."-काकू बोलत होत्या 

"हं.बाकी समीर कसा आहे ? बरेच दिवस झाले भेटला नाही तो ...."-अनु 

"चालू आहे काहीतरी ...आजकाल फारच व्यस्त असतो ...काही सांगत नाही ..तेवढ्यास तेवढं बोलतो ..काहीतरी बिनसलंय वाटत पण काय ते माहित नाही .."-काकू हाथ धुवत बोलल्या 

"अच्छा , काळजी नका करू ,  असेल काही तरी छोटं मोठं कारण कामाचं ...कुठं आहे कुठं तो ? मला भेटायचं आहे त्याला ....

अनु मग समीर ला भेटायला जाते तो  रूम मध्ये खिडकीत उभा असतो .. बाहेर अंधारात कसल्या विचारत असतो काय माहित ?

"खयालो मे ,,याद 'तेरी आयेगी मुझको बडा रुलयेगी ."अनु दरवाजातून येत गाणं म्हणत होती.   तिच्या आवाजाने समीरने मागे वळून बघतिले ...आणि चेहऱ्यावर हसू आणत  म्हणाला ,

"हेय अनु ,इथे कशी काय आज स्वारी ..?"-समीर नॉर्मल वागत बोलत होता ...

"तुमचा रथ बरेच दिवस तिकडे आला नाही मग विचार केला आपलीच स्वारी आणावी राजाची भेट घ्यायला ...."-अनु बेड वर बसली 

दोघेही बोलत होते अनु ला कळत होत की काहीतरी वेगळं आहे ...मग अनु ने डिरेक्टली मुद्द्याला हात घालयच ठरवला ,"

"सॅम ,काय झालंय? सांगणार आहेस का ?"-अनु 

"कशाचं?"-समीर न कळलेलं नाही अश्या अविर्भावत उत्तर दिल ...

"समीर मी स्पष्टच विचारते तुझं आणि रेवा च काय चालू आहे ?"- अनु

"काहीच नाही ..काहीही बोलू नकोस .."-सॅम 

"हे बघ त्यादिवशी जो फोन केला होता तो चूक चुकून उचलला होता ..शेवटचा फोन ,म्हणजे काय ?"-अनु 

समीर विचारात पडला .."कोणता फोन ?तू काय म्हणतेस मला काही कळत नाहीये .."-सॅम उठून परत खिडकीकडे तोंड करून बोलतो ..अनिका त्याच खांदयावर हात ठेवते ..आणि बोलते 

"सॅम काही गोष्टी जर मनात ठेवल्या तर त्यांचा काहीही उपयोग होत नाही ..कधी कधी आपली भावना समोरच्या व्यक्तीला पटवून द्याव्या लागतात ...हे बघ तू जर काही सांगितलं नाहीस तर मी तुझी  मदत कशी करू शकेन "-अनु .समीर फक्त ऐकत असतो ...तो काहीही उत्तर देत नाही 

"ठीक आहे जाऊ दे ...तुला नसेल बोलायचं तर राहू दे मी फोर्स नाही करणार ..पण हे बघ बोलल्याने कदाचित मार्ग निघेल ..तुला जेव्हा वाटेल तेव्हा शेअर कर.. येते मी .."-अनु जायला वळते तोच समीर बोलू लागतो 

"i लव्ह रेवा ...."-सॅम .अनु मागे वळून बघते तिच्या चेहऱ्यावर हास्य असत असते..सॅम मात्र अजूनही खिडकीबाहेर बघत असतो 

"आय हाय ..पत्ता हि था ..दाल मे कुछ काला है .."-अनु हसतच म्हणत होती पण सॅम मात्र तसाच उभा होता ...

"आर काय हे ?इतक्या शांत पणे सांगत का कोणी ?आणि  चेहरा बघ कसा केला आहेस .."-अनु .समीर तिच्या कडे मान वाळवून बघतो 

"मग काय नाचू ?"-सॅम पुन्हा बाहेर बघतो 

"ऑफकोर्स डिअर ...नाचों .."-अनु .समीर नकारार्थी मान हलवतो आणि पुटपुटतो "पुढे काहीही होणार नाहीये ..सगळं संपलय ."सॅम 

अनुचा आनंद एक क्षणात मावळतो ....

क्रमशः:

🎭 Series Post

View all