Oct 18, 2021
कथामालिका

अनिका 33

Read Later
अनिका 33
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

https://www.irablogging.com/blog/anika32_7685

भाग  ३२  साठी वर क्लिक करा 

 

पूर्वसूत्र =(अनिका आणि श्री भेटतात ...श्री बऱ्यापैकी माहिती देतो ...युगराज चे आई वडील नसतात ...तो त्याचा व्यवसाय चांगलं सांभाळत असतो ...अनु गॅलरी त उभी असते तिथे तिला कोणीतरी दिसत ...आता पाहूया पुढे ..)

दुसऱ्या दिवशी सकाळी ...

"काय मग ?कस काय "-आई नाश्त्याच्या टेबल वर बसलेल्या श्रेया ला विचारात होती ....

"काय ,कस काय?'-श्रेया 

"कस चालू आहे कॉलेज ..?बरेच दिवस झाले तुम्हाला फेरा नाही आला .."-आई 

"फेरा ..?"-श्रेया भुवया उंचावत म्हणाली ..अनु हि तोपर्यन्त आली होती ..मोहन वल्क घेऊन फ्रेश होण्यासाठी गेला होता ...मृणाल स्वयंपाक घरात होती ...

"हो फेराच ...मागे तुम्हाला स्वतःला खोलीतच राहावं असं वाटत होत नाही ...का ?मग तुम्ही दोघी शॉपिंग करून आलात .आणि मग काय एकटेपणाचा फेरा गेला निघून.... तो फेरा ?"-आई मस्करीच्या मूड मध्ये होती ...

"आई ,काहीही हा ...असं काही नाहीये ..."-श्रेया 

"काय नाहीये ?"-आई 

"मला फक्त शॉपिंग करायची म्हणून काही मी ते केलं नव्हतं ,मला खरंच तेव्हा खूप डिप्रेससिंग वाटत होत ....अनु ला माहित आहे ..हो न अनु "-श्रेया अनु ला विचारात होती पण अनु च लक्ष नव्हतं ..

"हं ..काय म्हणालीस ?"-अनु 

"घ्या ..तुमच्या साक्षीदारच  लक्ष नाही ....काय बोलणार "?-आई 

"साक्ष .?कोणाची ?काय चाललंय ?काय झालाय ?"-अनु तिला काहीच कळलं नव्हतं ...आश्चर्याने विचारात होती ..श्रेया ने कपाळावर हात मारून घेतला ...आई हसायला लागली 

"काय ग ?काय झालं .?आई तू का हसतेस ?"-अनु 

"काही नाही ...कस होणार तुमचं ..काय माहित .."?-आई 

"आई ,माझं लक्ष नव्हतं ग ..."-अनु 

"तेच तर म्हणतेय .कुठे असत लक्ष आजकाल ...?काय एवढं काम करतेस ग तू ...आणि तो एक साहिल ..तोही तसाच ..काल तर १० वाजता आलाय ...अजून तरी खाली यायचा पत्ता नाही महाशयचा .."-आई ...

"काय ग इतका उशीर ? आणि दादा हि उशिराच येतो हल्ली .."-अनु 

मृणाल पण आली तेवढ्यात ....आज सगळ्या बायकाच होत्या ...टेबलावर गप्पा मारत ....

"आग हो ,सध्या त्यांचं काम वाढलंय ,त्यांच्या संस्थेचं एका मोठ्या ग्रुप सोबत टाय उप झालंय ...त्यामुळे त्या ग्रुप च्या नुसार काही कामाची रेखाटणी सुरु आहे .."-मृणाल 

"ओह ,अच्छा ..म्हणजे आता दादाच्या संस्थेला ,त्या ग्रुप ने टेक ओव्हर केलंय .."-अनु 

"कदाचित तसेच असेल .."-मृणाल 

"काय मग अनु अजून गेली नाहीस आज .."-मोहन आला होता 

"अरे निघणारच आहे, ५मीं ..तू बोल कस चाललंय ..?"-अनु 

"छान ,सध्या जरा काही बदल होत आहेत ...संस्थेमध्ये ..त्यामुळे थोडं काम वाढलय .."-मोहन 

"ये अरे काय हे ..सारखं काय काम काम ..?दुसरं काही नाहीच का बोलायला तुमच्याकडे ..?"-श्रेया वैतागून बोलली .आई पण हसायला लागली 

"थोड्यवेळापूर्वी मी हि तेच म्हणत होते नाही का ?"-आई ....

मोहन श्रेयाच्या डोक्यावर टपली मारतो ..."काय ग ,कॉलेज कस सुरु आहे ....जरा अभ्यास करत जा न .."-मोहन 

"ये मी करतेच ...ओके ..तुला काय माहित न ..तस तू असतोस कुठे बघायला मी काय करते ते ?"-श्रेया 

"ओह ,बाईसाहेब ...आमचं लक्ष असत सगळीकडे .. गाफील राहू नका "-मोहन 

"हो का ...आधी कामातून वेळ काढून वाहिनी कडे लक्ष दे जरा ....उशिरापर्यंत वाट बघत असते तुझी .."-श्रेया ..बोलून जाते 

"मोहन ,हे मात्र खर आहे बर का ?तिला त्रास होईल असं वागलास तर गाठ माझ्याशी आहे .."-आई 

"अरे तुम्ही तर असं बोलताय सगळे जस मी तिला मारहाण करतो..मी तर तिला हात सुद्धा लावायला जात नाही ...विचार तिलाच "-मोहन

"तेच तर म्हणतेय न वेळ काढ जरा त्यासाठीही .."-श्रेया बोलते आणि पटकन सटकते ..ती काय बोलली हे लक्षात येताच मृणाल स्वयंपाक घरात पळून जाते ... मोहन चा चेहरा सुद्धा बदलतो ..अनु आणि आई हसत असतात ...सगळं आटोपून अनु निघते ..निघाल्यावर सहज बघते पण रात्रीची गाडी तिथे नसते .....ती निर्धास्त होऊन कॅब ने ऑफिस गाठते ...

"मिस पाटील केबिन मध्ये या .."-केदार चा फोन येतो ...चला झाली सुरवात  येऊन ५ मिन झाले नाही पण सुरवात झाली 

अनु केदारच्या केबिन मध्ये जाते ...."मे आयकम इन सर "-अनु 

"एस प्लिज बसा ..केदार फाईल वाचत असतो "-केदार 

"मिस पाटील आज एक बातमी कव्हर करायची आहे ...काही सिनेस्टार एका मोठ्या पार्टी ला जाणार आहेत ..तिथे कव्हरिंग करायचं आहे .."-केदार 

"पण सर ,"-अनु बोलणार तेवढ्यात केदार फाईल मधून डोकं काढून वर बघतो तिच्याकडे 

"पण काय ? any प्रॉब्लेम ?"-केदार 

"सर ते तर ,शालिनी करते न ..म्हणज पेज ३ आणि बॉलीवूड बातमी ..मग मी कस काय ?"-अनु 

"मिस पाटील ..आपण सगळे मिळून टिमवर्क करतो हे माहित असेलच तुम्हाला ...कोण काय करतो हे माहित आहे मला ..आणि मुख्य म्हणजे कोणाला काय काम द्यायचं हे मी ठरवतो ...एका रिपोर्टर ने फक्त एकाच पद्धतीच्या बातम्या कराव्या असं काही नसत ....बातमी हि बातमी असते आणि रिपोर्टर हा रिपोर्टर .....ओके ..सो do as i say........."-केदार 

अनु ला त्याच राग येतो .."कस बोलतोय हा ...आकडू .."-अनु विचार करत होती त्याच्याकडे बघून .केदार पुनः वर बघतो 

"मिस पाटील तुम्ही येऊ शकता आता ...प्लिज .."-केदार .अनु ताडकन तीथुन निघते आणि डेस्क वर येते ..फाईलआपटते

"कोण समजतो हा स्वतःला .... ह्या ऑफिस मध्ये सगळेच राजे आहेत .वाटेल तस बोलायला ..पद्धतच नाहीये काही .."-अनु ची स्वतःशीच बडबड सुरु होती ..रेवा मात्र टेबलवर एक हात ठेवून त्यावर डोकं ठेवून सगळं ऐकत होती अनु कडे बघत बघत ....

"हेय ,शांत हो घे पाणी पी .."-रेवा ने उठून तिला पाण्याचं बॉटल दिली .अनु ने हातात घेतली आणि पाणी पिलं ..पण लगेच काढलं आणि म्हणाली ,

"ये तू नेहमी नेहमी एकच डायलॉग काय मारते आणि हि बाटली का देते ..?"- अनु

"कारण ,माते आपण डोक्यावर आग घेऊन चालता नेहमी ..त्याची झळ दुसऱ्या कोणाला बसू नये ..वडाचं तेल वांगयवार निघू नये म्हणून हा प्रयत्न ..."-रेवा

"गप ग बाई ...इथं चाललंय काय तू बोलतेस काय ?  जाऊ दे ...कामाला लागू ..."-अनु .रेवा  पण हसून म्हणाली 

"ये हुई ना बात ...चल आटोप लवकर लवकर .."-रेवा ...

अनु न बरच काम आवरत घेतलं ...ठरलेल्या वेळी ती ठरलेल्या जागी जाऊन रिपोर्टींग करणार होती ... 

त्यातच तीने आज विक्रम शी बोलयाचंच ठरवल होत .. ती ऑफीस मधून निघाली आणि सरळ रिपोर्टींग च्य जागी पोहचली

तिथं थोडा वेळ होता कार्यक्रम सुरु व्हायला ..तीन विक्रमला फोन केला ,

"हॅलो विक्रम अनिका पाटील बोलते  .."-अनु 

"ओह हॅलो मिस पाटील बोला आज कशी आठवाण केली ."इन्स्पेक्टर विक्रम ...

"मला तुमच्याशी महत्वाच बोलायच होत ...."-अनु 

"हो बोला न .."-विक्रम 

"मला असं वाटत कि कोणीतरी बहुतेक माझ्या मागावर असत नेहमी ..."-अनु 

"काय ?आत्ता कुठे आहात ? आर you इन danger? "-विक्रम 

"नो नो ,आता मी ठीक आहे .काल  रात्री गॅलरीत उभी होते तेव्हा मला जाणवलं कि कोणीतरी घरावर पाळत ठेवून आहे ,पण सकाळी तिथे कोणी नव्हतं आणि मुख्य म्हणजे काही दिवाणसापुर्वी मला धमकी चे फोन येत होते .."-अनिका बोलत होती तेवढ्यात कार्यक्रम सुरु झाला म्हणून तिला बोलावंण आलं 

"ओके मी बोलते थोड्यावेळात ..जरा जावं लागेल आता .."-अनु 

"ओके ..मी वाट बघेन "-विक्रम .

इकडे युगराज दौऱ्यावरून आला होता ....सगळा  कारभार परत बघणं सुरु होत .... युगराज ऑफिस च्य खिडकीत उभा होता ...तेवढ्यात राकेश आला ..

"युग ,ह्या  पेपर्स वर मला सह्या  हव्या होत्या .. .."-राकेश 

"कशाचे आहेत ?"-युगराज खिडकीतून बाहेर बघत होता 

"परवा आपल्या ग्रुप ने एका सामाजिक संस्थेसोबत करार केला आहे..त्यांना काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी लागणारे भांडवल आपण देणार आहोत त्याबदल्यात आपली त्यात पार्टनरशिप असणार आहे ....आपण आपला हिस्सा ६० टक्के ठेवला आहे आणि त्यांचा ४० टक्के ....त्यामुळे आता त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आपला सहभाग असणार आहे आणि आपण ज्या पद्धतीने काम करणार त्या त्यांचं हा सहभाग असेल  ...."-राका 

"ओह ,ते फायनल झालं म्हणजे ..कोणी केलं ते डील complete ? .."-युग 

"आपल्याकडून मिस्टर रॉय हे सगळं बघत आहे तर तिकडून मोहन पाटील आहेत ..."-राका 

"मोहन पाटील ....अच्छा ...पेपर्स ठेव मी नंतर सह्या करतो ...."-युगराज. युगराज अजूनही खिडकीत बघत होता 

"युग,काय बघतोयस ?काय झालं ? एवढा विचार कसला ?"-राका  .युगराज खिन्नपणे हसतो ..

"खाली काही मुलं खेळत आहेत . .त्यात एक मुलगा त्याच्या बहिणीला हात धरून खेळायला लावतोय ..आणि ती त्याच्याशी भांडतेय ...तेच बघतोय ....."-युगराज 

राकेश युग च्या खांद्यावर हात ठेवतो ..."युग काही गोष्टी आपल्या हातात नसतात ..."-

युगराज राकेश कडे बघतो त्याच्या चेहऱयावर उदासीची किनार असते ..डोळ्यात समुद्र असतो पण त्याच्या लाटा डोळ्यनाच्या किनाऱ्यावर धडकू द्यायच्या नाहीत असं जणू काही डोळ्यांना बाजवलेलं असत ..

"राका ,एवढं मोठं जे हे सगळं आहे त्याचा काय अर्थ?काय उपयोग ?जर आपल्यासोबत भांडायला कोणी नसेल ? आपल्यावर रुसला कोणी नसेल ?आपल्याला चुका आपल्याला समजवायला कोणी नसेल ? की म्हणून सगळी नाती दूर जातात आन आपल्याला एकटं राहावं लागत ?"-अचानक युगराज खूप भावना विवश होतो आणि त्याला पुढचे शब्द बोलवत नाहीत ...समोरून खंबीर आणि कडक दिसणारा युगराज कुठेतरी खूप हळवा होता ...अचानक राकेश त्याला मिठी मारतो ....

"शांत हो ....तुझ्यासारखं जगणं ,वागणं जमत नाही कोणाला ...रोज एका दिव्यातून जावं लागत आणि तरी हि तू तोंडातून एक शब्दही काढत नाहीस .....खूप हिम्मत लागते ह्या गोष्टीसाठी ..आणि तुलाही माहित आहे कि तू एकटा नाही मी आहे तुझ्यासोबत ,नेहमी असेन  .....तू जे करतोस ते का करतोस हे तुला हि माहित आहे आणि मलाही ......काही कर्तव्य हि करावीच लागतात ....काही वचन हि पाळावीच लागतात .."-राकेश त्याला समजावतो ....

अनिकाचं आजच काम संपलेलं असत .....ती सगळं संपवून ती घरी जाणार असते पण ती विचार करते कि जाता जाता इन्स्पेक्टर विक्रम ची भेट घ्यावी ...म्हणून ती पोलीस स्टेशन ला जाते ...

"हॅलो ,विक्रम .."-अनु 

"ओह हाय ..बसा न .. बस दोन मिन.एवढं झालं कि बोलू .."-विक्रम समोरची फाईल पूर्ण करत ती बंद करतो आणि फोन उचलून दोन चहा सांगतो ..तोपर्यंत अनु पूर्ण केबिन बघत असते ...

"सॉरी ,थोडं काम सुरु होत बोला काय म्हणत होतात ?"-विक्रम ..एकजण चहा देऊन जातो ...

"सॉरी काय त्यात ..खर तर इतक्या गोष्टी तुमच्या समोर असतात तरीही तुम्ही आम्हला वेळ देता त्यासाठी आभार .."-अनु 

"अरे का आहे ते आमचं ...त्यात काय आभार ....तुम्ही इथे आलात म्हणज काहीतरी खास असणार ?"-विक्रम 

"हो ..नाही म्हणज खास असं नाही पण मी तुम्हाला सकाळी फोन केला होता ..जो अर्धाच राहिला ..मग विचार केलं कि समोरासमोर बसून बोलूयात .."अनु 

"हं ..तुम्ही काहीतरी धमकीच म्हणत होतात न ..कोण देताय आणि का ?काही कळलं का ? म्हणज मागणी काय आहे त्यांची"-विक्रम

"नाही तस नाही ....मला दोन की तीन वेळे फोन आला होता ...मी त्यादिवशी इथून गेले ,त्या गुंडाना ओळखून , त्या दिवशी मला फोन आला कि त्या लोकांना ओळखून चूक केली ..परिणाम  वाईट होतील ...म्हणून ..नंतर काल रात्री गॅलरीत उभं असताना एक गाडी दिसली असं वाटलं कि कोणीतरी पाळत ठेवतय ...असच एकदा शंका आली होती तेव्ह पण एक गाडी दिसली होती   पण नंतर दिसली नाही ....म्हणून मग खात्रीने नाही सांगू शकत ....."- अनु 

 "अच्छा ...आता जेव्हा तुम्ही आलात तेव्हा असं काही जाणवलं का ?"-विक्रम 

"नाही ..आत्ता असं काही जाणवलं नाही .."-अनु 

"ठीक आहे बघू आपण .....त्या फोनचा नंबर आणि गाडीचं वर्णन मला देऊन ठेवा .."-विक्रम 

"इन्स्पेक्टर अजून एक सांगायचं होत ..."-अनु 

"बोला  न ...."- विक्रम 

"त्यादिवशी तुम्ही विचारलं होत कि त्या फॅक्टरीत मी अजून कोणाला पाहिलं आहे का ? तर हो ..तिथे अजून एक  जण होता .."- अनु 

"कोण होत ?"-विक्रम 

"युगराज धर्माधिकारी ....."अनिका .....

क्रमशः

वाचकहो ,खूप दिवसांनी आजचा पार्ट टाकला आहे ..उशीर झाला  सॉरी ....प काही कारणंच तशी होती ..साध्याच वातावरण बघता उद्याचा दिवस कसा असेल ? हा सांगणं खूप अवघड झालय ....काही मेडिकल कारणास्तव उशीर झाला आहे. .. मला माहित  कि तुमचं प्रेम तुम्ही कमी करणार नाही...माझ्याआजच्याभागावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..आशाकरते कि तुम्ह समजून घ्याल.... धन्यवाद!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....