Jan 28, 2022
कथामालिका

अनिका 26

Read Later
अनिका 26

https://www.irablogging.com/blog/anika25_6516

भाग २५ साठी वर क्लिक करा 

एव्हाना खूप संध्याकाळ झाली होती...टीव्ही वर बातम्या सुरु होत्या .....

"आज एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे .... ह्या बंद असलेल्या फॅक्टरी मध्ये किती दिवसांपासून हे काम सुरु होत ..मात्र आज आमच्या रिपोर्टर मीस अनिका पाटील ह्यांनी हे सगळं पितळ उघड पाडला आहे ....आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे सत्य जनतेपुढे आणल आहे ......"-मी केतन रिपोर्टर अनिका पाटील सह आय टीव्ही .

ह्याच बातम्या गेल्या दोन तासापासून सारख्या येत होत्या ..आई चा जीव टांगणीला लागला होता ..8वाजूंन गेले होते पण अनु चा अजून काही पत्ता नव्हता ...

"अग आई येईल ती ..आजकाल तिला उशिरच होतो .."-श्रेया 

"हो ग , पण तिचा फोन लागत नाहीए .आणि बातमी बघितली ना तू ...जीवाची पर्वा न करता म्हणजे काय ?"-आई 

"आई काळजी नका करू ...ती बरी असेल ..आणि ती एकटी जात नाही कुठेही ..टीम असते सोबत तिच्या ......"-मृणाल 

तेढ्यात मोहन हि येतो ..

"काय रे किती उशीर कधीच फोन केला होता तुला ...."-आई 

"हो आग पण आज एक मीटिंग होती न .....बर ते जाऊ दे ....काय झाल ते तर सांग इतकी कशाची काळजी आहे .?."- मोहन

मृणाल पाणी आणून देते ....

"अरे अनु चा फोन लागत नाहीये .."-आई

"त्यात काय एवढं ...नेटवर्क नसेल ..होत असा कधी कधी"-मोहन

"हो न तेच सांगतेय मी तिला पण ती पॅनिक होते नुसती .....आणि तस हि ९ वाजले नाही अजून ..."- श्रेया  

"आई झाली म्हणजे कळेल पॅनिक होणं काय असत ते ....."-आई रागातच 

"झालं परत सुरु झालं ...."-श्रेया 

"श्रेया ,थांब जरा ...."-मोहन "आई तू काळजी करू नको मी बघतो काय ते .."-मोहन 

आबा  आणि साहिल हि येतात  तेवढ्यात..साहिलचा चेहरा थोडासा गंभीर असतो ...

"काय झालं ?काय गोंधळ आहे ?"-आबा

"काही नाही अनु अजून आली नाही म्हणून आई ल थोडं भीती वाटते  मी बघून येतो जरा "-...मोहन 

"थांब ,मोहन थांब, बैस  इथे..तुम्ही पण बसा ."-आबा थोडास गंभीरतेने ...

"काय हो ?काय झालंय..?तुम्ही असे शांत का?..साहिल ..काय झालंय..अनु ला काही  .."-आई खूपच चिंतेत विचारते ..आत मात्र मृणाल आणि श्रेया पण घाबरतात ..

"नाही ..अनु ला काहीही झालेलं नाही ..ती ठीक आहे .."-साहिल 

"मग ...तुम्ही असे गंभीर चेहरे का करून आलाय ..?"-मोहन 

"हे बघा .काय ते स्पष्ट सांगा ...लपवू नका ..काय झालंय अनु ला ....."-आई 

"आई ,आई घाबरू नको ग ..तीला काहीच झालेलं नाही ..येईल ती इतक्यात ..थोड्यावेळापूर्वी मला  एक फोन आलं होता ..अनुच्या ऑफिस मधून  ...त्यांनी सांगितलं कि आज जी बातमी अनु कव्हर करायला गेली होती तिथे ती बेशुद्ध पडली ...पण आई घाबरू नको ऐक ..ती आत बरी आहे ...तिचा फोन discharge आहे म्हणून लागत नाहीये .आणि तिची सगळी टीम आहे तिच्यासोबत .."-साहिल 

"अरे देवा .,काय हे पोरीच्या मागे लागलाय ..."-आई   डोळ्यात अश्रू येऊ लागलं होते ...

"सविता ,सांभाळा स्वतःला ..तिला काही झालेलं नाहीये .... शांत व्हा .."-आबा ..मृणाल आई ला पाणी आणून देते ...सगळं बसलेले असतात ..

"अरे  मग तू का नाही गेला  तिच्या ऑफिस ला .?."-मोहन 

"नाही म्हणजे मी निघालो होतो पण ते बोलले कि तेच तिला घरी आणून सोडणार आहे,रस्त्यात आहेत म्हणून ......आम्हाला वाटलं कि ते आले असतील एव्हाना म्हणून घाईतच घरी आलो पण अजून...बघतो  फोन करून पुन्हा ...."-साहिल ..

"काय आहे हिच्या नशिबात कोण जाणे ? सारख काहीतरी घडत असत ....सांगितलं होत नको करू हा कोर्स पण नाही माझं कोणाला ऐकायचाच नाही न ....."-आई ची बडबड सुरु होती ..

"सविता किती घाबरता ...तिला  काही होणार नाही ...."-आबा 

"घाबरू नको तर काय करू ?....जबाबदारी आहे ती आपली तिला काही झालं तर काय तोंड दाखवायचं वर जाऊन ..तुम्हाला सगळं माहित आहे तरी सुद्धा असं बोलता ...  "-आई न रडायला सुरवात केली होती 

आई आग रडू नको .. "-श्रेया .

साहिल फोन करायला म्हणून वळला तर दारात केदार आणि अनु उभे होते ..अनिका ला सोडायला केदार आला होता ...

"अनु ,...."-साहिल ..

सगळे उभं राहिले .आई तर आधीच दारात गेली ..

"अनु कशी आहेस बाळ? काय हे .?"-आई आणि आई च लक्ष डोक्यावरच्या बँडेज वर गेलं ."ये  बाई हे काय लागलाय ...."-आई खूपच काळजी करत होती  ..ते  सगळं  वातावरण बघून केदार ला काय बोलावं काहीच सुचेना ..

"नाही काही नाही नॉर्मल आहे त्या ...."-केदार थबकतच बोलला 

"अहो दारातून आत येऊ द्या त्यांना तुमची चौकशी झाली असेल तर .."-आबा ...

"अग बाई हो न ,सॉरी हं तुमच्याकडे लक्षच गेलं नाही ...या न आत या .... बसा न "-आई 

दोघेही आत आले ...सोफ्यावर बसले .... आबा,आई ,मोहन ,श्रेया ,साहिल सगळेच होते ..सगळेच एका मागोमाग एक  विचारपूस करत होते ....ते  सगळं बघून दोन क्षण केदारचे डोळे पाणावले .... त्याच्याकडे फारस कोणाचं लक्ष गेलं नाही ......

मृणाल न मात्र त्याला चहा आणून दिला ,"घ्या न..."-मृणाल 

"नाही नको .."केदार संकोचत म्हणाला 

"नाही कस ..पाहिल्यान्दा आला आहात .....घ्यावेच लागेल .."-आई हक्काने ..केदार चहाचा कप उचलतो ...

"अनु कस झाल हे ...?नेहमी नेहमी तुझ्याच बाबती कस ग घडत ..?"-आई 

"काही नाही ग आई, मी  म्हणाले न पाय अडखळाला आणि खाली पडले म्हणून दगड लागलं डोक्याला ..."-अनु 

"तुम्ही तीला वाचवलंत त्यासाठी खूप आभार तुमचे ...खरं  म्हणजे आम्ही तुम्हाला रोज टीव्ही वरच बघतो .आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला .."-आबा केदार ला म्हणत होते .

"   ..खरं म्हणजे तुमच्याबद्दल खूप ऐकलंय बाहेरून ..तुमच्यासारख्या व्यक्तीची भेट होणं हे माझाच चांगलं नशीब म्हणता येईल .."-केदार 

"पण नेमक काय अन कस घडलं सगळं .....?"- मोहन 

"त्यांनी बरीच माहीती गोळा केली .. त्या त्यांचं काम चोख करत होत्या ..अगदी कोणालाही न कळता त्यांनी माहिती टीम सोबत शेअर केली मी जेव्हा पोहचलो तेव्हा त्या बेशुद्ध  झाल्या होत्या आणि मग लगेचच आम्ही त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो ....त्याची तब्बेत बरी आहे ..डॉक्टरांनी  सांगितलंय कि घाबरण्यासारखं काही नाही  त्यांचं ब्लड pressure  लो आहे ..आजच्या दिवस आराम केला कि बर वाटेल ....."-केदार..

"चला हे बर आहे कि तब्बेत काही सिरीयस नाही "-श्रेया 

"पण म्हणजे अनु एकटीच गेली होती का ? तिथे ...तुमची टीम असते न सोबत ?"-साहिल

"साहिल ,अरे काय लावलंय हे तुम्ही त्यांना दोषी मानून इतक्या चौकशी का करताय ..आलेय न मी घरी आता .....आणि मी ठीक आहे आता ..खरं म्हणजे त्यांनी मला वेळेत दवाखान्यात नेलं आणि माझ्या टीम ने खूप काळजी घेतली माझी ..."-अनु .. 

"बरोबर आहे अनु ,माफ करा खूपच प्रश्न विचारले आम्ही तुम्हाला ...."-आबा 

"अहो नाही प्लिज सॉरी म्हणू नका ..मला  काहीच प्रॉब्लेम नाही .. बर मी निघतो आता..उद्या त्यानं हाफ डे घ्यायला सांगितलं आहे आणि अगदीच वाटलं तर त्या घरून काम हि करू शकतात ...येतो मी .."-केदार उठून जायला निघतो ..

"थांबा जेवूनच जा ..आमच्यासोबत ..."-आई 

"नाही पुन्हा केव्हातरी येईन ..आत मी निघतो ..गुड नाईट .."-केदार जातो ..सगळे परत मोर्चा अनुकडे वळवतात 

"अनु चल बर खाऊन घे .."-आई तिला उठवत म्हणते 

"हो आई ,आग मी खरंच ठीक आहे .मला  काही झालेलं नाहीये ..."-अनु 

"अनु पण एक कळलं नाही ..तू एकटी गेली होतीस न ..तुझी टीम तुझं सोबत नव्हती न ..."-साहिल प्रश्नार्थक नजरेने विचारात होता ...

अनु ला काय बोलावं कळले नाही कारण ती एकटीच गेली होती हे खर असल तरी का न कशी ह्याची उत्तरे देन आणि घरच्या ते समजावंन जरा कठीणच होत ..आबा ना ते जाणवत होत की अनुला आत ह्या बाबतीत काहीच बोलायचं नाहीये म्हणून त्यांनी गोष्ट सावरून घेतली 

"साहिल ,पुरे आता ....उद्या बोलू .हा विषय इथेच बंद ..चल जेवण उरकून घेऊ ..."-आबा .

साहिल निराशेने मान हलवतो ..बरेच प्रश्न तसेच असतात ..सगळे जेवण उरकून आप- आपलय रूम मध्ये जातात .....इकडे केदार घरी आल्यापासून शांतच असतो ..सगळं आवरून तो रूम मध्ये बसतो आणि स्वतःशीच विचार करत असतो ....

"अनु च्या घरी किती माणसं आहेत तिची काळजी घेण्यासाठी आणि मी ..माझं ह्या एवढ्या मोठ्या जगात कोणीच नाही ...आज तिला काही झालं असत तर ..नाही ..नाही तिला काही झालं असत तर ..काय केलं असत मी ....किती सरळ साधी माणसं आहेत ती सगळी ....जीवाला जीव देणारी ..आजच्या जगात  असे लोक शोधून हि सापडत नाही ......आणि अनिका खरंच किती passionate  आहे कामासाठी ..... स्वतःचा जीव धोक्यात घातला ...काय गरज होती एकट्याने जाण्याची ..तिची पण काय चूक म्हणा मीच तर मीटिंग मध्ये होतो ....पण नेमकं काय झालं तिथे ? तो माणूस कोण होता ज्यांने तिला झाडाजवळ आणून बसवलं ....ह्या सगळ्याच शोध लावलाच पाहिजे "-केदार सगळ्या गोष्टींचं विचार करत होता ....

अनिका रूम मध्ये येऊन बेड वर पडली होती ....खूप विचार करत होती ...तेवढ्या श्रेया तिथे येते ...दूध घेऊन 

"हेय अनु ,दुखतंय का ग ? घे आई ने हळदीचं दूध पाठवलय ...."-श्रेया 

"नाही ग .मी ठीक आहे इतकं काही झालेलं नाही ....थोडासा बी.पी लो हो इतकाच ..दिवसभर काही खाल्लं नाही त्यामुळे ...."-आई खूपच काळजी करते .."अनु 

" हो बाई तीन घर डोक्यावर घेतलं होत ... ये अनु पन केदार सर ग्रेट आहेत नाही ..त्यांनी तुला वाचवलं ..दवाखान्यात नेलं ..किती काळजी होती त्यांच्या डोळ्यात ....हो न ...ये पण मला सांग न सगळं कस कस काय काय घडलं ते ?"-श्रेया 

"म्हणजे सांगितलं न केदार नेसगळं .."-अनु 

"तस नाही ग म्हणजतिथे गुंड होते न ..मग केदार ने fight केली असेल ना ..म्हणजे ते  कस झालं सगळं . ते picture मध्ये दाखवतात तस का ?'."-श्रेया 

"नाही तस काही नाही ..मी तिथं पोहचले तेव्हा तिथे काही दिसत नव्हता पण मग फॅक्टरी च्या मागच्या बाजूने काही हालचाल होती म्हणून मग मी आत घुसले तेव्ह मला तिथे drugs दिसले .आणि  मग मी लपतछपत फोटो काढले आणि टीम ल संपर्क केला .....प ण  त्यातल्या एक गुंडाचं संशय आला आणि तो माझं दिशेने येऊ  लागला ...मी लपले ..मग तो गेल्यावर मी बाहेर पडले पण माझा पाय अडकला आणि खाली पडले ..उठून परत गेट च्या दिशेने निघाले तर त्या गुंडाच्या लक्षात आलं आणि मग पळता पळता मी पडणार तर मला 'त्यानं' सावरलं आणी मी बेशुद्ध झाले .."-अनु बोलता बोलता थांबली विचारात गढून गेली .....तीच काहीतरी लक्षात आले ...."अनु .

"वाव म्हणजे picture मध्ये हिरो एन्ट्री घेतात तशी ..काय भारी न ......पुढे काय झालं ?"-श्रेया अनु ल विचारात होती ......पण  अनु च लक्ष नव्हतं ,ती विचार करत होती ...श्रेया ने तीला हलवलं आन परत विचारलं ,

"अग कुठे हरवलीस ..पुढे काय झालं त तर सांग ?"-श्रेया 

"अ ..नाहींम्हणजे मी बेशुद् झाले न ..मला  कळलंच नाही पोलीस कधी आन कसे आले ..त्या गुंडाना कसे पकडले ?जेव्हा  डोळे उघडले तेव्हा केदार पाण्याचे हबके माझ्या तोंडावार मारत होता ....आणि  मग  त्यानं मला दवाखान्यत नेले ..बस "- अनु 

"ओह , ठीक आहे ..जाऊ दे तू आराम कर ...उदय बोलू "---श्रेया तेव्हढा बोलून निघून गेली ...

अनु  बेडवर आडवी पडली आणि आपलय विचारत परत गुंतली 

"खरंच श्रेया म्हणते तस  त्याने हिरो सारखी एन्ट्री घेतली म्हणून मी वाचले कदाचित ..पण तो तिथे काय करत होता ?....हा काय योगायोग आहे परत एकदा त्यान माझं जीव वाचवला ....तो केदार नव्हता "युगराज" होता .. केदार च्य म्हणण्यानुसार एका व्यक्तीने मला झाडाजवळ बसवले ..पण मग केदार ने त्याला ओळखले कस नाही ?  का तो दुसराच कोणी होता..नाही ..नाही त तो "युगराजच होता ..."मी पाहील त्याला ..माझे  डोळे बंद होत होते  आणि त्याने मला कमरेत पकडून खाली पडण्यापासून वाचवले होते  ..मला  त्याचा  चेहरा आठवतोय   तो युगराज धर्माधिकारीच होता ......पण कसा ? आणि का?"-अनु स्वतःशीच विचार करात होती ...

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....