अनिका 25

Anikaa always puts herself in trouble ...she is so much passionate about her work that she is reay to face all challenges .....

https://www.irablogging.com/blog/anika24_6460

भा २४ साठी वर क्लिक करा ..

"मृणाल ये मृणाल लवकर चहा आण ."-मोहन नाश्त्याच्या टेबल वर बसला होता ...आज त्याला लवकर जायचे होते ..आई पूजा आटोपून आली होती 

"हो  आणते ...."-मृणाल किचन मधून ....

"अरे काय एवढी घाई ...दोन हात आहेत तिला ..त्यात आशा ताई नाही माहित आहे न ...."-आई 

तोपर्यंत मृणाल चहा आणून देते ....बाकीचं सगळे अजून आवरून खाली येत होते .

"काय दादा ,आज लवकर .."-साहिल 

"अरे हो ,आज एक मीटिंग आहे .आमच्या संस्थेची एक मोठ्या ग्रुप बरोबर ..त्यांना काही गोष्टी करायच्या आहेत सो आमची संस्था त्यात कशी मदत करू शकते हे बघायचं आहे ....हे जर जमल तर खूप फंडस् मिळतील आणि मग आम्ही बराच काही करू शकू ....."-मोहन घाईत बोलत होता ....

"वाव ग्रेट ..गुड लक .."-साहिल 

"गुड मॉर्निंग ..."-अनु 

"गुड मॉर्निंग आणि बाय .."-मोहन उठून निघालं

"आई येतो ग "-मोहन 

"अरे हा इतक्या लवकर गेला .."-अनु 

"हो घाईत होता तो ..."-आई 

"श्रेया कुठे आहे ..काल पण दिसली नाही .."-अनु आईला ..तोपर्यंत मृणाल पोहे घेऊन आली 

"लोळत असतील राणीसारकर "-आई "चल ग पोरी मृणाल तू पण खाऊन घे .."-आई 

"हो आई येतेच मी तुम्ही सुरु करा .."-मृणाल 

"नाही ,आधी खाऊन घे ..मग होतील कामे ..चल .."-आई न हात पकडून बसवलं ..सगळ्यांचा नाश्ता झाला ..तोपर्यंत आबा आले ..

"काय हो आज खूप वेळ लागला  walk वरून यायला ...."-आई पाणी देत 

"हो देशमुखांशी बोलत होतो .."-आबा 

तोपर्यंत अनु आणि साहिल निघाले होते ....

"आई ,आबा येतो ग आम्ही .."-दोघेही एकदम ....

"काय ..आज काय सगळं लवकर गेले की काय ?'-आबा 

"तुम्हाला उशीर झाला ...."-आई 

"श्रेया गेली का ?'-आबा 

"नाही हो आजून खालीच आली नाही ..दोन चार दिवसापासून काय चाललंय काही कळत नाही ह्या पोरीचं ...खोलीतच असते बराच वेळ .."-आई चिंतेच्या स्वरूपात 

"अभ्यास असेल हो .. "-आबा 

"काय माहित ?बघू येईल खाली ..तुम्ही खाऊन घ्या परत प्रेस वर जायला उशीर होईल "-आई 

इकडे अनु ऑफिस मध्य येते ....नंतर केदार हि येतो ..त्यांची नजरा नजर होते .दोघेही छान हसतात एकमेकांकडे बघून ....तो वरती त्याच्या केबिन मध्य जातो ...

"आँखो हि आँखो मे इशारा हो गया.......बैठे बैठे जिने का सहारा हो गया .."-रेवा गाणं गुणगुणत आली ..ती अनुला बघतच गाणं म्हणत होती ....काय ग काय चालू आहे "

"ये गप ग काही नाही ...उगीचच काहीही बोलू नको ..काम करू दे "-अनु 

अनु कामाला सुरवात करते .तिला एक फोन येतो ...त्यात तो माणूस म्हणतो

"मोठ्ठी बातमी हवी असेल तर लवकर सांगतो त्या पत्त्यावर पोहचा .."-आणि फोन कट होतो ..

"हॅलो,हॅलो,कोण बोलताय ?"-अनु ने विचारेपर्यंत फोन कट झालेला असतो ......तिला काय कराव काही कळत नाही ..ती ते लोकशन चेक करते ..एका बंद फॅक्टरी च लोकेशन असत ..तिला वाटत कि केदार सोबत बोलावं म्हणून ती वर केदार च्या केबिन कडे जाते तिला मोनिका रस्त्यात अडवते..

"काय कुठे निघालात ?"-मोनिका

"केदार सर न भेटायचं आहे .."-अनु

"काय काम होत ?'-मोनिका

"मी ते त्यानं सांगेन मला जाऊ द्या अर्जेन्ट आहे ..."-अनु

"एक मिनिट तो मिटिंग मध्ये आहे त्याने मला सांगितलं आहे कि कोणाला हि काहीही काम असेल माझ्याकडे तर तू बघ म्हणून ..."बघ तूला नसेल सांगायच तर तू वाट बघ एक दोन तास .."-मोनिका निघू लागली .अनु विचार केला ,  खूप वेळ लागेल वाट बघितली तर ...सो हिलाच सांगावं 

"एक टीप मिळाली आहे ..बातमी खास असू शकते .."-अनु 

"बर मग ,,?"-मोनिका 

"मग म्हणजे ?"-अनु 

"म्हणजे मी काय करू त्या बातमीच ..पूर्ण डेटा तयार कर नेहमीप्रमाणे आणि टीम कडे दे ..हे सांगण्यासाठी तू केदार कडे जात होतीस का ? तू काही आता नवीन नाही इथे वर्ष झालंच अल्मोस्ट तुला नाही का ?"-मोनिका थोड्य तिरस्कारात बोलत होती ..

हिच्याशी वाद घालत बसले तर झालंच तीच ऐकण्यापेक्षा कामाला लागावं ,"तुम्ही काही करू नका ..फक्त केदार सरांना सांगा ..आणि मला काही गरज लागली तर .."-अनु पुढे बोलणार तेवढ्यात मोनिका म्हणते 

"तू कॉल कर ..तुला हवी असेल ती मदत पाठवेन मी ....."-मोनिका ...निघून जाते ..खरं म्हणज केदार अनु सोबत कॉफी पिण्यासाठी गेलं होता हे मोनिका ला आवडले नव्हते ..

"काय बाई आहे हि ..मला तर हीच प्रॉब्लेमच कळत नाही .."-अनु बडबडतच डेस्क चसमान बॅगेत भरते ....

"हेय का झालंय कोणावर चिडलीस ..?"-रेवा 

"काही नाही ग ती मोनिका मी तिला  काहीतरी सांगायचं प्रयत्न करत होते पण तिला ऐकूनच घ्यायचं नव्हतं ..anyway मी निघते ...."-अनु 

"अग पण कुठे ?"-रेवा 

"मी तुला मेसेज करते ...."-अनु घाईतच बोलात असते आणि निघून जाते दिलेलं पत्त्यावर ..तीला एकदा वाटते की श्री ला सांगावं म्हणून ती  त्याला फोन करते पण त्याच फोन लागत नाही....ती एक ऑटो पकडते  ऑटो मधून ती तिच्या एका खबऱ्या ला फोन करते आणि चौकशी करते आणि दिलेल्या पत्त्यावर पोहचते ...ती ज्या पत्यावर पोहचते ती एक बंद फॅक्टरी असते ...गेट बंद असत...सगळीकडे घास ,गवत वाढलेलं असते .....गजलेले लोखंड ..सडलेल्या फळ्या असं बरंच सामान तिथे पडले  असत..एकूण काय तर बऱ्याच वर्षांपासून ती जागा बंद आहे असं जाणवत होत ...इकडं तिकडं बघते पण कोणी दिसत नाही .. तिला वाटत कि उगीचच आलो .. म्हणून मग ती तिथे जरा आजूबाजूला फेरफटका मारते ..फॅक्टरी च्या मागच्या बाजूला काहीतरी घडामोडी दिसतात ..काही गुंड आणि टवाळखोर लोकं लपून छपून ...आत जातात आणि बाहेरही येतात ...तिथे एक दोन गाड्या असतात .....तिला  संशय येतो म्हणून मग ती लपत छपत आत घुसते ...मध्ये गेल्यावर  एका जागेत काही लोक सिगारेट फुंकत असतात ...अन हसत हसत काही बोलत असतात  ती स्वतःचा फोन सायलेंट करते ..आणि काही फोटो काढते ...हळू  हळू पुढे जाते ...पुढे  तीला अजून बरेच गुंड दिसतात ....त्यांच्या  समोर एक फुटलेलं पॅकेट असत त्यातून पांढरी पावडर सांडलेली असते टेबल वर ..एक जण त्या पावडर चा वास घेत असतो ....आणि त्याला नशा चढल्यासारखी होते ..

"अरे बाप रे हे तर ड्रुग्स दिसत आहे ..मला ऑफीसा ला कळवलं पाहिजे ..."-ती स्वतःशीच विचार करत असते ..ती  तिथून जरा बाजूला होते ..आणि एका जागी लपते ...ती मोनिका ल कॉल करते पण ती उचलत नाही.... ती  बरेचदा फोन करते मग शेवटी केदारचा खूप फोन ट्राय करते ...पण तोही उचलत नाही तिला आता थोडी भीती वाटू लागते ..."काय करावं काही कळत नव्हतं .. मी एक काम करते फोटोज  टीम ला पाठवते..."

 अनु काढलेले फोटोज केदार  आणि टीम ला पाठवते  ...आणि ती बाहेर जाऊन ऑफिस मध्ये परत एकदा फोन ट्राय करावा असं विचार करते म्हणून ती लपतछपत ज्या मार्गाने आत आली होती तिकडे जाण्यासाठी माघारी फिरते ...पण तीला तिथे काही लोक दिसतात ती परत लपते ..तीला आता चांगलाच घाम फुटतो .....

इकडे केदार कॉन्फरेन्स  रूम मध्ये मीटिंग मध्ये असतो ..आशुतोष ,केदार, मोनिका, ऋचा,रेवा सगळं मीटिंग मध असतात आणि तो त्याच फोन केबिन मध्ये विसरलेला असतो ,मीटिंग संपवून तो केबीन मध्ये येतो आणि फोन बघतो  तर त्याला अनिकाचे खुप सारे मिस कॉल दिसतात ..तो काचेतून खाली बघतो पण ती त्याला दिसत नाही ....त्याला काळजी वाटू लागते ..आणि मग तो मेसेज बघतो तर त्याला अनु ने पाठवलेले फोटो दिसतात ..

"ओह माय गॉड ..."-केदार पळतच खाली येतो ....

"रेवा मीस पाटील कुठे आहेत ?"-केदार मोठ्याने विचारतो ..सगळ्यांचंच लक्ष त्याच्या कडे जात 

"काय झालाय सर ..ती एक फोन आला म्हणून घाईतच निघून गेली ......"-रेवा 

"काय ? खूपच बेजाबदारपणा आहे हा ......आपण कुठे जातो, काय करतो हे सांगायलाच नको त्यांना....केदार खूप चिडलेला दिसत होता खर म्हणज तो काळजीत होता त्यांनी काहीच सांगितलं नाही का कोणाचा फोन होता कुठे जात आहेत त्या ..."?-केदार पुन्हा रेवा lलाविचारतो

"नाही म्हणजे ती मेसेज करते म्हणाली होती  .. मी बघते फोन मध्ये "-रेवा

गोंधळ बघून मोनिका आणि आशुतोषपण तिथे आले होते ....

"हेय, काय झालाय केदार ..व्हाय आर you shouting ?"-आशुतोष..केदार ते फोटो आशुतोष ला दाखवतो .केतन ला अनुच्या  फोनच लोकेशन शोधायला सांगतो .....

"सर ,हा मेसेज आहे अनुचा "-रेवा  केदार ला मेसेज दाखवते... 

तिकडून केतन पण लोकेशन सांगतो दोन्ही लोकेशन match होतात ..

"केदार ,लवकर जा ..तिला मदतीची गरज असेल .. मीबाकी टीम पण पाठवतो ..."-आशुतोष. केदार लगोलग निघतो 

आशुतोश सर नव्या बातमीच्या तयारीला लागतात ....मोनिका ला पण सूचना देतात ...सगळेजण संध्यकाळच्या बातमीच्या तयारीला लागतात ..

केदार खूप फास्ट ड्राईव्ह करत असतो ...तो एक फोन करतो ......

"हॅलो विजय एक बातमी आहे आणि तुझ्या मदतीची गरज पण आहे"-केदार त्याला सगळं सांगतोआणि पत्ता पण देतो ... 

इकडे अनिका लपलेली असते ..तिचा फोन vibrate होतो..केदार तिला फोन करत असतो ....ती त्याचा फोन बघून खुश होते ..

"हॅलो ,"-अनु एकदम हळू आवाजात ...

"हॅलो ,मिस पाटील कुठे आहेत ? काहीही नसांगता जाणं हि काही पद्धत आहे का ?"-केदार काही न ऐकता बोलत असतो 

"सर एक मिन .....मि इथे .."-अनु ती काही बोलणार इतक्यात तिला कोणाची तरी चाहूल लागते ......आणि तिचा फोन कट होतो ....कोणी  तरी तिथे येत असत ती थोडं अजून मागे होते ...त्या गुंडाला चाहूल लागतेम्हणून तो बघायला आलेला असतो पण अनिका मागे सरकते या आणि दिसू शकत नाही ...त गुंड गेल्यावर ती तिथून सटकते आणि दुसऱ्या जागी लपते आता तिच्या नजरे समोर गेट असत जिथून तिला बाहेर पडायचं होत ......ती इकडे तिकडे बघते आणि आडोसा घेत गेट च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते ..तेवढ्यत तिच्या पायाला खालची लाकूड लागत आणि ती खाली पडते ...... तिच्या डोक्याला   लागत ती कशीबशी उठून उभी राहते पण तिल  हलकेच एकचक्कर आल्यासारखं जाणवात ....

"ये कोण आहे तिकडे ..?"-तो  गुंड तिच्याकडे येत असतो ..ती पळण्याचा प्रयत्न करत असते पण तीचा पाय अडखळतो  तिला परत चक्कर येते आणि अनिका धाडकन खाली पडणार असते पण तेवढ्यात तिला कोणीतरी सावरत ..तिचे डोळे बंद होत असतात ती बेशुद्ध होते ..

"अनिका, अनिका .......उठा .."-तो तिला सम्भाळणारा व्यक्ती ती गालावर हलकेच थोपटतो aआणि शुद्धीत आणण्याचा प्रय की असतो पण ती बेशुद्ध च असते .......................

क्रमशः 

............................................................................................................................................................................................

🎭 Series Post

View all