Login

अनिका 24

Anika and kedar chatting for an hour ....and ...

भाग २३ साठी वर क्लिक करा .

अनु ऑफिस मध्ये येऊन कॉन्फरेन्स चे पॉईंट्स टीम कडे देते .त्यावरून न्यूज दिवस भर रन होणार असते ..headlines तयार होत असतात .....तीच काम आवरत आणि ती जायला निघते ..आज दिवस भर केदार ची आणि तिची भेट होत नाही ...सकाळी जेवढं होत तेवढीच ..

"हेय रेवा ,चल निघूया .."-अनु 

"अरे अनु ,थोडं काम आहे यार मला ..तू हो पुढे ...उद्या भेटू .."-रेवा 

"ओके .ठीक आहे ..."-अनु तिला बाय करून निघते ..खाली पार्किंग च्या बाहेर येऊन बस स्टॉप च्या जवळ उभी राहते ...तिकडून केदार येतो कार घेऊन ...तिच्यासमोर उभं राहतो ....बाहेर येऊन तिच्याशी बोलतो 

"मिस पाटील ..मी सोडू का तुम्हाला ?"-केदार 

"नाही सर थँक you ..आज काही इतका उशीर पण नाही झालाय आणि माझी तब्बेत हि ठीक आहे ...."-अनु सहज बोलून जाते 

" म्हणजे उशीर झाला तरच मी तुम्हाला सोडू शकतो असं आहे का ?"-केदार मिश्किल पणे 

"नाही तास नाही ..पण मी जाईन .."-अनु 

"मिस पाटील ..कॉफी घेउया ..आज जरा रिलॅक्स आहे तर माझा विचार होता कॉफि चा ....तुम्ही आलात तर मला अजून छान वाटेल ..प्लिज .."-केदार ..

हाइतका का मागे लागला आहे ह्याच विचार अनु करत होती ..खर तर तिला हि बाहेर काहीतरी खायचं होतच म्हणूनच ती रेवाला हि सोबत चल म्हणून बोलली होती पण ती आली नाही .. ती विचार करतच होती 

"मिस पाटील ..तुम्हाला एवढा विचार करावा लागात असेल तर ठीक आहे ,नो प्रॉब्लेम ...मी जाईन ...."-केदार 

"नाही नाही असं काही नाही .चला ..."-अनु कार मध्ये बसते ......दोघेही एका कॅफेजवळ येतात ..कार पार्क करून दोघेही बसतात .कॅफे खूपच छान असतो ...बाहेरच्या बाजूला काही टेबलाशी  झाडे असतात ..ओपन जागे मध्ये ....खूपशी झाडं ,छोट्या छोट्या कुंड्या त्यात बहरलेली फुले ...वेग वेगळ्या प्रकारचे बसण्यासाठीचे केलेले व्यवस्था अतिशय सुंदर अशी रचना केलीली असते ..अनु ते बघत असते 

"मिस पाटील कुठे बसायचं ?म्हणजे आत कि बाहेर ?"-केदार 

"बाहेरच बसू या ...."-अनु ..केदार होकारार्थी मान हलवतो आणि ते corener च्या टेबल चेअर वर बसतात ..तिथे तीन चार फुलांच्या छोट्या कुंड्या असतात .....टेबल वर एक छोट, अगदी छोटं असं पुस्तक असत ....एकूणच नवीन आणि छान कॉफी शॉप असत ...

"छान आहे जागा ..मी आले नाही कधी इकडे .."-अनु 

"m glad u like इट .."-केदार हसतच बोलतो ...तेवढ्यात वेटर येतो ऑर्डर साठी 

"हॅलो सर कसे आहात?काय घेणार आज ..?"-"वेटर 

"मिस पाटील ....ऑर्डर प्लिज "-केदार 

"कॉफि ...ओन्ली  "-अनु 

"ओन्ली ..?"-केदार 

"हो म्हणजे इथे काय स्पेसिअल आहे ते माहित नाही मला .."-अनु 

"मॅम इथं सगळंच special आहे ...लाइक  सँडविच ,सामोसा,चिप्स ऑफ ग्रीन अँपल ....सरांचा स्पेसिअल अवोकाडो टोस्ट "-वेटर सांगत होता 

"ओह ,then कॉफी विथ सँडविच ....little spicy if u कॅन make it .."-अनु 

नक्कीच .."-वेटर 

"मिस पाटील ...मी इथे बऱ्याचदा येतो ..मला  आवडते हि जागा ..शांत आणि छान वाटत इथे ..वेगळं जगच वसवलंय ,जेव्हा केव्हा पण थोडयाश्या रेफ्रेशमेंटच गरज असते तेव्ह मी इथेच येतो .."-केदार ,तो  आज खूप छान बोलत होता .

"हम्म खरंच छान प्लेस आहे ..."-अनिका ..

"मिस पाटील ..तुम्हाला माझ्याही बोलायला आवडत नाही न  .. .."-केदार विचारत होता 

"नाही ,असं काही नाहीये सर ....कामाव्यतिरिक्त कधी बोलायचं प्रश्नच आला नाही ..म्हणून तुम्हाला असं वाटल असेल कदाचित .."-अनु 

"मी लवकर कोणाशी मैत्री करत नाही ..म्हणजे जाणून बुजून असं नव्हे काही पण, somehow लवकर जुळत नाही wavelength त्यामुळे कधी कधी.."-केदार बोलत होता ..असं वाटत होत की आज त्याला काहीतरी बोलायच आहे ..पण काय..अनु अंदाज घेत घेत त्याच्याशी बोलत होती..कारण तो केव्हा कशावर भडकेल सांगता येत नव्हता ....

"होत असं बऱ्याचदा ....."-अनु .वेटर त्यांची ऑर्डर घेऊन येतो ...

"कस आहे ...आवडलं का ?"-केदार ..

"हो छान आहे आणि खर म्हणजे भूक पण लागली होती .."-अनु 

"ओह म्हणज भूक लागली होती म्हणून छान लागतंय तर .."-केदार सहज तिला चिडवण्याचं प्रयत्न करत होत म्हणज ती बोलेल ...पण तीन नुसतंच बघितलं आणि मान हलवली ..

"काय मग ..नवीन काही बातमी ..लिंक वैगेरे "-केदार..ती जास्त बोलत नाही बघून त्यानं कामाच्या बाबतीत गप्पा सुरु केल्या 

का कोण जाणे पण आज त्याला वाटत होत कि तिने खूप बोलावं अगदी मैत्रिणीसारखं .पण आजून ते एकमेकांचे मित्र बनले नव्हते आणि म्हणूनच कदाचित अनु अजून इतकी त्याच्यासोबत खुलली नव्हती ....

"नाही सध्या खास असं काही नाही ...डोक्यात अजूनह ईश्वरी हॉस्पिटल बद्दल विचार सुरु आहे पण हवी तशी माहिती आजून मिळाली नाही .."-अनु 

"माहिती ..कोणती माहिती हवी तुम्हाला ? i mean काय शोधत  आहेत तुम्ही ?'-केदार 

जस काही यालाच सगळं माहिती असत आणि हा माहिती देणारच आहे .. माहीत असत तर आतापर्यंत बातमी देऊन जगाला सांगन झालं असत ह्याच .."-अनु एक बाईट खात खात त्याच्याकडे बघत स्वतःशीच विचार करत होती....

"मिस पाटील ..मी काही तरी विचारले तुम्हाला ?तुम्हाला सांगायचं नसेल तर ठीक आहे ..नो प्रॉब्लेम ...."-केदार 

"नाही नाही तस नाही ..मी फक्त काही माहिती जमा करायचं प्रयत्न करात आहे ..त्यादिवशी जी आग लागली ती खरंच लागली कि लावली गेली ..आणि जर ती लावली गेली तर का?कशासाठी ..?माझ्या अंदाजाने आग लावली गेली .."-अनु 

"असं तुम्ही त्या दिवशीही बोललं होता ...असं क वाटतंय तुम्हाला ?काही खास कारण ..कदाचित  मी मदत करू शकेन ..." केदार 

'मी ऐकलंय कि ते हॉस्पिटलमध्ये काहीतरी गडबड आहे ..साधारण २ वर्षांपूर्वी त्या हॉस्पिटलवर काह आरोप होते म्हणून.."-अनु 

केदार हसतो आणी म्हणतो "हो ,त्या हॉस्पिटलवर अवयव विकण्याचं, त्याच तस्करीचा आरोप होते ...माहित आहे मला ..त्यादिवशी हि मी हेच चेक करायला आत घुसलो होतो ....तिथे  मी काही डेड बॉडी ची पाहणीपण केली "-

"मग ,?"-अनु फार उत्सुकतेने विचारत होती ..तिच्या डोळ्यात एक चमक होती .....केदार ला तिचे काळेभोर डोळे खूप आवड होते ..असं वाटत होता कि त्यातच गुंग होऊ जावं .... तो काही बोलाल नाहीय बघुन तीने परत विचारले ,"सर मग,काय झालं ?काही माहित मिळाली का ?'-अनु 

"नाही ,तिथं असं काही मिळालं नाही ...."-केदार कॉफी च सिप घेत ....

"ओह "-खूप  खिन्नपणे खाली बघात तीन पण कप ओठाला लावला 

"मिस अनिका ..तुमचे भाऊ काय करतात ?'-केदार विषय बदलत विचारतो ..

"आमचं स्वतःची प्रेसआहे.बराचश्या सोसिअल पत्रक ,काही विशेष मासिक ..अन बरेचनवे नवे प्रयोग साहिल तिथं कर असतो ...आणि  मोहन दादा एका संस्थेसाठी काम करतो .."-अनु 

"ओह  छान,म्हणज घरात सगळेच समाजबद्दल जागरूक आणि सगळ्यान मदत करणारे आहे तर ..."-केदार 

"हो लहानपणापासून घरी असच वातावरण आहे ..आईला मात्र मी ह्या क्षेत्रात येऊ नये असच वाटत होत ...तीला सारखी कशाची तरी भीती वाटायची पण तीन जास्त विरोध केला नाही ...."-अनु 

हं ,छान "-केदार 

"चला  निघायला हवं ....उशीर होतोय .ती घड्याल बघत केदार ला सांगितलं ...."-अन अनु 

"ओह एस चला निघूया .."-केदार . खरं म्हणजे केदारला निघायची इच्छा नव्हती ...पण  आता आजू न काय म्हणून थांबवणार होत तिला तो ....त्यामुळे दोघेहि निघाले. केदार न गाडी चालू केली..गाडीमध्ये दोघीही शांत  होते काय बोलाव   हे दोघांनाही कळत नव्हते  आज पहिल्यांदा इतक्या महिन्यात केदार आणि अनु इतका वेळ कामाशिवाय सोबात होते आणि केदार हि छान बोलत होता .  

अनुच घर जवळ आलं ,केदार न गाडी साईड ला घेतली.

"थँक्स सर ,,प्लेस छान होती ..."- अनु 

"you are always वेलकम ...आणि  थँक्स मी म्हणायला हव तुम्ही इतकी छान कंपनी दिली, नाही तर आजही एकटच खावं लागल असत ...."-केदार खिन्नपणे हसाtत बोलून गेला  ..अनु ल थोडं वाईट वाटलं, खूप हिमतीने तीन विचारलं ,

"का ?तुमच्या  घरी ..कोणी ?"- अनु प्रश्नार्थकी नजरेने त्याच उत्तराची वाट बघत होती

"नाही .. कोणी नाही ..मी एकटाच राहतो  ."-केदार तिच्याकडं बघत ..दोन क्षण  दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात ...

ओह ,काळजी घ्या ..."असं  बोलून अनु दार उघडते आणि बाहेर पडते..अनु घरी येते ..मृणाल तुळसी ल दिवाबत्ती करत असते ..तिचा हसरा चेहरा मी प्रसन्न करून जातो ..अनु तिच्याकडे स्मितहास्य करत हॉल मध्ये येते ...

अनु सोफ्यावर पर्स टाकून रेलून डोळे लावून बसते  ...

"काय झालं बर वाटत नाही का ?'-मृणाल 

"नाही ग ,असच थोडस बसले होते ..."-अनु 

"मी चहा घेऊन येते...बैस तू ...."-मृणाल ..kitchen मध्ये जाते .....

"तुझ्यासाठी पण आन "-अनु

आणि ५मीं  मृणाल चहा घेऊन येते .... अनु च फोन मध्ये डोकावणं सुरु असत .

"घे ..आणि मागफ्रेश हो ..."- अनु ...

"बाकीच कुठेआहेत ?"-अनु 

"हेअजून आले नाही ,भाऊजी उशिरा येणार आहे ...श्रेया बाई रूमध्ये आहे आई अन आबा फेरफटक मारायला गेले आहे ..."-मृणाल 

"तू  एकटीच होतीस  इतका वेळ .तुला कंटाळा आला असेल न ..."-अनु 

"थोडासा जाणवलं ,खरं म्हणजे आईकडे मी एकटी होते सो सवय होती एकटं राहण्याची पण इथे आल्यावर आता एकटं राहवत नाही ...."-मृणाल

"आणि ज्यांच्याकडे कोणीही नसत त्यांचं काय होत असेल? कस वाटत असेल त्यांना घरी आल्यावर ..?'-अनु काहीश्या विचार बोल होती

"कोणाबद्दल बोलतेस तू ?'मृणाल

कोणाबद्दल नाही ..असच विचारात होते ग .."-अनु  भानावर येत..  

"चल ,मि येतेच फ्रेश होऊन ...."-अनु वर रूम मध्ये जाते ..

इकडे केदार घरी पोहचतो .आज  त्याच कशातच मन लागत नसत म्हणून तर अनु सोबत बाहेर गेलेला असतो .... आतमध्ये येऊन फ्रेश होऊन गॅलरी त येऊन उभा   राहतो .समोरच्या ग्राउंड मध्ये काही लोक फेऱ्या मारत असतात ..कुठे मुलं खेळत असतात..मित्र मैत्रिणीचा गप्पा असतात ,हसण्याचे आवाज असतात .... केदार सगळ्यकङे बघत बघत गालात हसतो आणि स्वतःशीच पुटपुटतो ,

"महफिले हजार है यहा,और हम तन्हा खड़े है राहो में ,

 ..कही तो होगा कोई अपना सा, जो बसेगा इन खाली निगाहो में  ......."

क्रमशः